DAILY EDUCATION

Sunday, October 31, 2021

ओळख थोर नेत्यांची

 इंदिरा गांधी  


भा
रताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान अशी स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ' आयर्न लेडी ' इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथील नेहरू कुटुंबात झाला. इंदिरा गांधी यांच्या अजोबाचे नाव मोतीलाल नेहरू एक प्रसिद्ध वकील आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे स्वातंत्र्य सेनानी. इंदिरा गांधी यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू व आईचे नाव कमला असे होते. इंदिरा गांधी यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते. त्यामुळे लहानणापासूनच भविष्यात घडणाऱ्या राजकारणाचे धडे,ज्ञान त्यांना मिळत होते.

इंदिरा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण अलाहाबाद येथे झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या ' शांतिनिकेतन ' या ठिकाणीं पाठविण्यात आले. इंदिरा गांधी यांनी आपले पुढील शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे पुर्ण केले. विद्वान आजोबा आणि वडील यांच्या सहवासामुळे इंदिरा गांधी यांना विविध विषयांचे ज्ञान मिळत गेले. स्वातंत्र्य लढ्यातील आजोबा आणि वडील यांचे योगदान त्या जवळून अनुभवत होत्या. अगदी लहान वयात बाराव्या वर्षी इंदिरा गांधी यांनी चरखा संघ आणि लहान मुलामुलींची वानर सेना स्थापन केली होती. 

1942 मध्ये इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्यासोबत झाला. इंदिराजींना राजीव आणि संजीव ही दोन मुले होती. इंदिरा गांधी यांनी यूनिस्को कार्यकारिणी, शैक्षणिक मंडळ,शिशुकल्याण अशा अनेक समित्यांवर सभासद म्हणून काम केले.1959 - 60 मध्ये त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांच्याकडे माहिती व नभोवाणी खात्याचे पद देण्यात आले. त्यात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. इंदिरा गांधी यांनी भारतात प्रथम दिल्लीमध्ये दूरचित्रवाणी सुरू केली. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युनंतर इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान झाल्या.

इंदिरा गांधी यांच्या काळात पहिली अणुचाचणी घेण्यात आली. गरीबी हटाव ही महत्त्वपूर्ण योजना त्यांनी राबवली.3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने युध्दाची घोषणा केली आणि भारतीयांविरुद्ध युद्ध सुरू केले भारतीय फौजांनी मुक्तवाहिनीच्या मदतीने 14 दिवसांचे युद्ध करून पाकिस्तानचा पराभव केला.

3 ते 6 जून 1984 या काळात दहशतवाद्यांना सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम राबवली. 


इंदिरा गांधी यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतीय व परदेशीय विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला. 1972 साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून इंदिरा गांधी यांचा गौरव करण्यात आला.

31 ऑक्टोबर 1984 रोजी नवी दिल्ली येथील सफदरगंज या आपल्या निवास स्थानी इंदिरा गांधी यांची त्यांचे अंगरक्षक बिअंतसिंग आणि सत्वंतसिंह यांनी गोळी घालून  हत्या केली.

_________________________________________

Indira Gandhi



The 'Iron Lady' Indira Gandhi, who established herself as India's first female Prime Minister, was born on 19 November 1917 in the Nehru family in Allahabad. Indira Gandhi's grandfather's name was Motilal Nehru, a famous lawyer as well as a freedom fighter who took part in the freedom struggle. Indira Gandhi's father's name was Jawaharlal Nehru and mother's name was Kamla. Indira Gandhi's entire family had joined the freedom struggle. Therefore, from a young age, he was getting lessons and knowledge of future politics.

 Indira Gandhi received her primary education in Allahabad. He was later sent to Rabindranath Tagore's 'Santiniketan' for further education. Indira Gandhi completed her further education at Somerville College, Oxford. Through the association of learned grandfather and father, Indira Gandhi gained knowledge on various subjects. She was experiencing the contribution of her grandfather and father in the freedom struggle. At the tender age of twelve, Indira Gandhi founded the Charkha Sangh and the Vanar Sena of children.

In 1942, Indira Gandhi married Feroze Gandhi. Indiraji had two children, Rajiv and Sanjeev. Indira Gandhi served as a member of various committees such as UNESCO Executive, Board of Education, Child Welfare. In 1959-60, she was elected as the President of the Congress.

When Lal Bahadur Shastri was the Prime Minister, Indira Gandhi was given the post of Information and Space Department. He made many improvements in it. Indira Gandhi was the first Indian to launch television in Delhi. After the death of Lal Bahadur Shastri, Indira Gandhi became the first woman Prime Minister of India.

The first nuclear test was conducted during the time of Indira Gandhi. He implemented the important plan of poverty alleviation. On 3 December 1971, Pakistan declared war and started a war against the Indians.From June 3 to 6, 1984, Indira Gandhi launched Operation Blue Star to drive terrorists out of the Golden Temple.

Indira Gandhi has been honored with various awards. He was honored with honorary doctorates by Indian and foreign universities. In 1972, Indira Gandhi was honored with the highest award, the Bharat Ratna.

 On October 31, 1984, Indira Gandhi was shot dead by her bodyguards, Beant Singh and Satwant Singh, at her residence in Safdarjung, New Delhi.

No comments:

Post a Comment