DAILY EDUCATION

Tuesday, August 23, 2022

इयत्ता तिसरी उपक्रम यादी सर्व विषय





*भाषा

• अवयवांवर आधारीत म्हणींचा संग्रह करणे.

• सुविचार संग्रह करणे. 

• एकाच वस्तूसाठी प्रत्येकाच्या घरी कोणते शब्द वापरले जातात अशा शब्दांचा संग्रह करणे. 

• देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे. 

• क्रांतिकारकांची चित्रे काढून वर्गात लावणे.

• धान्याचे नमुने गोळा करणे व पुठ्ठ्यावर चिटकवणे.

• धान्याचे नमुने गोळा करून चिकटवहीत चिटकवणे.

• धान्यांच्या नमुन्याद्वारे नक्षीकाम करणे.

• शिवारात काम करणारे कष्टकरी, शेतकरी, पशुपालन करणारे यांची मुलाखत घेणे. 

• पुस्तकातील कोणत्याही पाच पाठातील शब्दार्थ मुळाक्षराच्या क्रमाने वहीत लिहिणे.

• वेगळ्या कागदी होड्या तयार करणे.

• 'झाडे लावा झाडे जगवा' यासारखे घोषवाक्य संग्रह करणे.

• गाई, म्हशी पाळणाऱ्या लोकांच्या घरी भेट देणे.

• कथा व कवितांचा संग्रह करणे.

• विविध प्राणी अथवा पक्षी यांच्या कात्रणाचा संग्रह करणे.

• कुटुंबातील सदस्यांचा फोटो व माहिती गोळा करणे.

• वर्तमानपत्रात येणाऱ्या शैक्षणिक बातम्याचा संग्रह करणे. 

• 'माझा शब्दसंग्रह' या नावाने बोली भाषेतील शब्द व प्रमाण भाषेतील शब्द यांचा संग्रह करणे.

• मराठी भाषा बोलताना वारंवार वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचा संग्रह करणे. 

• परिसरातील स्थळांची माहिती तयार करणे.

• भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणे. 

• नेहमी वापरात येणाऱ्या शब्दांची यादी तयार करणे.

• नेहमी चुकणाऱ्या शब्दांची यादी करणे.


*गणित

• शाळेतील लहान मोठ्या वस्तूंची यादी तयार करणे.

• संख्यांचे वाचन करणे.

• एका गटाने दुसऱ्या गटात गणिते देणे.

• संख्येतील लहान मोठेपणा ठरविणे.

• चौकटीत योग्य संख्या लिहिणे.

• नाणी व नोटा यांचा संग्रह करणे.

• परिसरातील वस्तूंचे त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करणे.

• वर्गाच्या आतील वस्तूंची यादी बनविणे.

• वर्गाच्या बाहेरील वस्तूंची यादी बनवणे.

• ताळा पडताळणी करून उदाहरण सोडविणे.

• परिमाणांचे परस्पर रूपांतर करणे.

• कालमापन संदर्भाने उदाहरण सोडविणे.

• भौमितीक आकृत्यांची नावे सांगणे.

• विविध वस्तूंचे वजन नोंदविणे

• दिनदर्शिकेत आजचा वार व दिनांक दाखविणे.

• वर्षाचे महिने व आठवड्याचे वार यांची यादी तयार करणे.

• कागदापासून विविध आकार तयार करणे.

• सारखे आकार व वस्तू यांची यादी तयार करणे

• गावातील किराणा दुकानास भेट देऊन व्यवहार करणे.

* परिसर अभ्यास

• वनस्पतींची गळलेली पाने गोळा करून प्राण्यांचे आकार तयार करणे

• प्राणी व त्यांचा निवारा यांची चित्रे जमा करून ती वहीत चिटकवणे

• आपल्या परिसरातील सजीव व निर्जीव यांची यादी तयार करणे.

• घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी तयार करणे

• विविध प्राणी अथवा पक्षी व त्यांचा निवारा यांच्या कात्रणाचा संग्रह करणे. 

• विविध घरांच्या चित्रांचे नमुने मिळवून ते वहीत चिटकवणे.

• कागद, पुठ्ठे, चिपाडे याच्यापासून घरांच्या प्रतिकृती तयार करणे 

• धागे देणाऱ्या वनस्पतींची यादी करणे

• शेतीच्या अवजारांविषयी माहिती गोळा करणे

• वर्तमानपत्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती विषयक बातम्यांचा संग्रह करणे 

• आपल्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतीच्या चित्रांचा संग्रह करणे व माहिती गोळा करणे 

• पालेभाज्या, फळभाज्या, शेंगावर्गीय भाज्यांची नावे लिहिणे

• होकायंत्राचा सहाय्याने दिशा दाखवणे 

• गावातील सार्वजनिक स्त्रोतातील पाणी कोणकोणत्या कारणाने अस्वच्छ होते त्याची माहिती मिळवणे 

• गावातल्या व्यवसायास अथवा शेतीस भेट देणे व माहिती गोळा करणे.

• ज्ञानेंद्रियांची चित्रे गोळा करणे.

• ज्ञानेंद्रिय व त्यांचे उपयोग यांचा तक्ता करून वर्गात लावणे. 

• गावाला पाणीपुरवठा कुठून होतो याची माहिती लिहिणे.

• खारीक, कारले, भोपळा यांच्या बिया, शेंगा वापरून विविध आकार तयार करणे.

• चाकाचा उपयोग कोठे कोठे केला जातो याची निरीक्षण करून नोंद करणे.

• वेगाने धावणारी कोणती वाहने आहेत ते शोधून त्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

•गावातील ग्रामपंचायत अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देणे.


*इंग्रजी

•write the letters of alphabet properly using proper strokes and directions. 

• Names of birds  

• Names of animals 

• Name of birds,animals their young ones, their female and their leaving places

• Make a chart of one or many

• Make a simple opposite words list

• Write familiar words  like fan, man, cat, boy son 

• Make a simple rhyming words list 

• Make a list of month 

• Short conversation about myself let's speak 

• Collect the words of word basket.

*कला आणि संगीत

• बडबड गीते अथवा देशभक्तीपर गीते अथवा लोकगीते तालासुरात म्हणणे. 

• घरातील वस्तूंचे रेखांकन करणे

• मातीच्या मडक्यावर खडूच्या साह्याने डिझाईन बनवणे

• कागदापासून विमान तयार करणे

• गाण्यांमध्ये अथवा कथेमध्ये प्राणी, पक्षी, वाहन इत्यादींचा आवाज काढून पार्श्व संगीत देणे.

• स्वर व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळवणे. 

*शारीरिक शिक्षण

• शरीराच्या प्रमाणबद्ध हालचाली करणे.

• व्यक्तींच्या चालण्याची नक्कल करणे.

• राष्ट्रगीत - समूहात राष्ट्रगीताचे गायन करणे. 

• वाद्यातून ध्वनी निर्माण करणे.

• विविध वाद्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.

• विविध आकाराचे ठसे कागदावर उमटविणे.

•आवडीचे चित्र रेखाटणे.

• छोटा अभिनय करणे उदाहरणार्थ कृतींचा अभिनय अथवा वाचक अभिनय अथवा एकात्मिक सादरीकरण. 

• विविध आवाज काढणे.

• नकला करणे.


*कार्यानुभव

• वादळ, भूकंप इत्यादी प्रसंगांच्या चित्रांचा संग्रह करणे.

• पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी चित्रांचा संग्रह करणे. 

• शिवणकामाच्या साधनांची चित्र ओळख करून देणे.

• बियांचा संग्रह करणे.

•बांबू उद्योग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळवणे.

• पाऊस पाण्यासंबंधी चित्रे जमविणे.

• वृक्षावरील गाणी व चित्रे यांचा संग्रह करणे.

• छोट्या सोप्या रांगोळ्या वहीत काढणे. 

• मातीचे विविध भौमितिक आकार बनविणे.

•काडीपेटी पासून आगगाडी तयार करणे. 

• औषधी वनस्पती विषयी माहिती मिळवणे व चित्रांचा संग्रह करणे.

• राखी तयार करणे.

•माती पासून भांडी अथवा फळे अथवा घर बनविणे.

•आकाश कंदीलांच्या चित्रांचा संग्रह करणे.

• कापसाचे उपयोग सांगणे. 

• विविध धाग्यांच्या कपड्यांची यादी बनविणे.

• पावसापूर्वी आकाशातील ढगांचे निरीक्षण करून नोंदी लिहिणे. 

• राख्यांचे विविध प्रकार जमविणे व वहीत चिटकविणे.

• कागदापासून होडी अथवा तलवार, टोपी बनवणे. 

• संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे.

*शा.शिक्षण

• प्रतिकृती तयार करणे.

• सूर्यनमस्कारा विषयी माहिती मिळवणे व त्यातील विविध कृतीचे चित्र गोळा करणे.

• पाणीबचत व स्वच्छता यावर आधारित घोषवाक्य यांची यादी तयार करणे 

• खेळ विना साहित्य

• एरोबिक्स व्यायाम प्रकार दोन गटात स्पर्धात्मक खेळ शर्यती विना साहित्य

• मानवी मनोरे करणे 

• डोक्यावर वस्तू ठेवून चालणे अथवा चवड्यावर चालणे.

• लिंबू चमचा शर्यत घेणे. 

• लाठीचे प्रकार व मूलभूत क्रिया विषयी माहिती मिळवणे. 

• स्थानिक पारंपरिक खेळ घेणे.

• टिपरी लेझीम इ.

• धावण्याची शर्यत घेणे 

• अथलेटिक्स उपक्रम उदाहरणार्थ उड्या मारत पुढे जाणे. 

• पायमागे दुमडत धावणे. 

• जागेवर उड्या मारणे.

• गतिरोधक मालिका. 

No comments:

Post a Comment