DAILY EDUCATION

Showing posts with label 4 थी प.अ.1 प्रश्नोत्तरे. Show all posts
Showing posts with label 4 थी प.अ.1 प्रश्नोत्तरे. Show all posts

Friday, March 1, 2024

March 01, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय ९.

९.हवा

• सांगा पाहू

या चित्रात कोणती कामे चालली आहेत?

उत्तर - १) एक मनुष्य हवेच्या पंपाने सायकलीत 

हवा भरत आहे.

२) एक मुलगी तोंडाने फुग्यात हवा भरत आहे.

३) एक मनुष्य कारच्या चाकात यंत्राच्या मदतीने हवा भरत आहे.

-------------------------------------------

 स्वाध्याय 

अ) इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात ते कशासाठी?

 उत्तर - इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये  हवेचा दाब असतो. म्हणून इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध देण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात.

-------------------------------------------

 आ) जरा डोके चालवा.

१) रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते.

 उत्तर - सायकल, मोटरसायकलच्या ट्यूब मध्ये हवा दाबून भरलेली असते. तसेच सिलेंडर मध्ये जो गॅस असतो तो गॅस म्हणजे हवाच होय.

-------------------------------------------

२) लाकूड किंवा कोळसा जळताना हवेत काय मिसळताना दिसते ?

उत्तर - लाकूड किंवा कोळसा जळताना कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजन वायू हवेत मिसळताना दिसतो. जो धूर निघतो त्यात हे वायू असतात.

-------------------------------------------

३) पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते?

उत्तर - पाणी उकळत असताना हवेत पाण्याची वाफ मिसळते.

-------------------------------------------

इ ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) पृथ्वीपासून जवळ जवळ ५० कि.मी. अंतरापर्यंत हवा पसरली आहे.

२) पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा विरळ असते.

३) सर्व हवेचे पाच भाग केल्यास त्यातील एक भाग ऑक्सिजन असतो.

४) रिकाम्या भांड्यातही हवा असते.

५) हवेचे पृथ्वी जवळचे थर वरच्या थरांपेक्षा अधिक भार पेलतात.

--------------------------------------------

March 01, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय २४. आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?

• जरा डोके चालवा.

पूर्वी शेतीसाठी वर्षासाठी केवळ पावसाळ्यात पाणी लागे. आता ते बऱ्याच ठिकाणी आठ महिने लागते. जिथे तिबार पिके घेतात, तिथे तर शेतीसाठी वर्षभर पाणी लागते. पाऊस तर फक्त पावसाळ्यात पडतो. मग उरलेले आठ महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामांसाठी पाणी कुठून येते?

 उत्तर - पावसाचे जे पाणी जमिनीत मुरलेले असते ते पाणी उरलेले आठ महिने उपयोगी पडते. विहिरींना आणि कुपनलिकांना जे पाणी लागते ते जमिनीत मुरलेले पाणी असते. तसेच नदीवर बांधलेली धरणे, बंधारे यातील पाण्याचा उपयोग पावसाळा संपल्यावर उरलेले आठ महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामासाठी होतो.

--------------------------------------------

स्वाध्याय

काय करावे बरे.

बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे. ती सुरू केली की स्कूटर मधून खूप धूर येत असतो.

 उत्तर - स्कूटरला व्यवस्थित ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करून नवीन साधने घेता येईल त्यामुळे स्कूटर मधून खूप धूर येणार नाही.

--------------------------------------------

आ) यादी करा.

 पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा.

उत्तर -  डिझेलवर चालणारे वाहन - ट्रक, कार, इतर मोठी वाहने इत्यादी.

 पेट्रोल वर चालणारे वाहन - दुचाकी, स्कूटर, मोटरसायकल, कार इत्यादी.

--------------------------------------------

• जरा डोके चालवा.

१) कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात. त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल?

 उत्तर - पाणी ही सर्व सजीवांची एक महत्त्वाची गरज आहे. माणसाला शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता, स्वयंपाक, शेती, उद्योगधंदे या सर्व गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते. परंतु नदीचे पाणी कारखान्यात वापरून खराब झाल्यामुळे नदीचे पाणी आसपासच्या लोकांसाठी निरोपयोगी आणि घातक ठरेल. खराब झालेले नदीचे पाणी पिल्याने विविध रोग, आजार विषबाधा होण्याची शक्यता असू शकते. नदीचे पाणी हे माणसासाठी आणि तेथील जनावरांसाठी सुद्धा घातक ठरेल. अशा प्रकारचा त्रास आसपासच्या लोकांना होईल.

--------------------------------------------

२) विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? 

उत्तर - विजेच्या शोधामुळे मानवी जीवना अतिशय सोपे झाले आहे. विजेची अनेक उपकरणे मानवी जीवनासाठी गरजा बनल्या आहेत. विजेवर चालणारे पंखे, कुलर , वाटणयंत्र (मिक्सर), फ्रिज ही साधने मानवासाठी अतिशय आवश्यक झाली आहेत. त्यामुळे कोणतेही कार्य  करतांना श्रम आणि वेळ दोघांचीही बचत होते. विहिरी, बोरींग इत्यादीचे पाणी काढण्यासाठी विजेच्या पंपाचा उपयोग होतो. शेतीला पाणी देणे, विजेवरील दिवे यांचा उपयोग दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. त्यामुळे आपले श्रम आणि वेळ वाचतात आणि मानवी जीवन सुलभ होते.

--------------------------------------------

 ई) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

१) माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत?

 उत्तर - बैलगाडी, दुचाकी,चार चाकी, ट्रक, बस, आगगाडी, विमान, जहाज इत्यादी माणसने निर्माण केली आहे.

--------------------------------------------

२) नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते?

 उत्तर - नवीन वसाहती बांधण्यासाठी मोठमोठी जंगले तोडावी लागतात. शहराभोवतालच्या शेती सुद्धा मोकळ्या करून त्या ठिकाणी वसाहती बांधाव्या लागतात.

--------------------------------------------

३) डासामुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर - डासांमुळे हिवताप, डेंगु, हत्तीरोग, चिकुनगुनिया, मलेरिया या रोगांचा प्रसार होतो.

--------------------------------------------

२) दुबार, तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे?

 उत्तर - दुबार, तिबार शेतीमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.

--------------------------------------------

उ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) उन्हाळ्यात अनेक गावात प्राण्याची टंचाई निर्माण होते.

२) रेडा किंवा बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते.

३) सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुध्दीमान आहे. 

४) मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी

५)रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत.

--------------------------------------------

ऊ)माहिती मिळवा.

पुढील विषयावर माहिती मिळवा.

१) डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा.

 उत्तर - सुमारे दीडशे वर्षांपूर्वी संशोधकांनी खनिज तेलाचा शोध लावला. खनिज तेलापासून डिझेल आणि पेट्रोलची निर्मिती झाली. लोकसंख्या वाढीमुळे तसेच अतिप्रमाणात डिझेल व पेट्रोलच्या वापरामुळे खनिज तेलाचा साठा हा कमी झाला आहे. डिझेल आणि पेट्रोल नसेल तर आपली वाहने चालणार नाही. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोल जपून वापरणे अतिशय आवश्यक आहे.

--------------------------------------------

२) पाण्याची बचत करा.

 उत्तर - ' पाणी हेच जीवन ' हा सुविचार आपण नेहमीच ऐकत असतो. याचा अर्थ पाणी आपल्या मानवी जीवनासाठी तसेच इतर जनावरांसाठी, वनस्पतीसाठी अतिशय गरजेचे आहे. पाण्यामुळेच आपली सजीव सृष्टी जिवंत राहू शकते. पाणी आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आंघोळ करणे, अन्न शिजवण्यासाठी, प्रात:विधी, कपडे धुणे, पिण्यासाठी, शेतीसाठी इत्यादी गोष्टींसाठी आपणास पाणी आवश्यक आहे. परंतु लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा अपव्यय अधिक होतो. पावसाळा संपला की हळूहळू नद्यांचे पाणी कमी होऊ लागते. विहिरी आटू लागतात. त्यामुळे अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. लोकसंख्या वाढू लागली, पाऊस मात्र तेवढाच पडतो. त्यामुळे पाणी अपुरे पडते. म्हणून पाण्याची बचत करणे गरजेचे आहे.

--------------------------------------------

March 01, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय २३. नैसर्गिक आपत्ती

 स्वाध्याय 

अ) काय करावे बरे ?

तुमचे गाव डोंगरावर आहे. डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे.

 उत्तर - आमचे गाव डोंगरावर असल्यामुळे शेजारील गावातील गावकऱ्यांना पूर ओसरेपर्यंत आपल्या गावात सामावून घेऊ.

-----------------------------------------------

आ) जरा डोके चालवा.

पुढे नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे ते पूर्ण करा. त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या.

१) चक्रीवादळ २) मोडकळीला आलेले घर कोसळणे. ३) वीज कोसळून त्यात मरणे. ४) दोन आगगाड्यांची टक्कर होणे. ५) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे. ६) जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे. ७) स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे. ८) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे.

उत्तर - 

नैसर्गिक आपत्ती

१) चक्रीवादळ 

२) वीज कोसळून त्यात मरणे.

३) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे.

४) जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे.

 मानवनिर्मित आपत्ती 

१) मोडकळीला आलेले घर कोसळणे.

२) दोन आगगाड्यांची टक्कर होणे.

३) स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे.

४) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे.

-----------------------------------------------

२) बर्फ पडणे आणि गारपीट यात काय फरक आहे उत्तर - बर्फाळ प्रदेशात हिवाळ्यात बर्फ पडतो. बर्फ पडत असताना तो कापसासारखा पडतो आणि त्याचे बारीक कण पडत असतात. परंतु, याउलट अवकाळी पावसाबरोबर गारपीट होत असते. गारांचा मारा लागून माणसे,जनावरे जखमी होतात. गारा जमिनीवर पडत असताना अतिशय वेगाने पडतात आणि त्या दगडासारख्या असतात त्यामुळे घराची कौले फुटणे, पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होणे यासारख्या वाईट गोष्टी घडतात.

-----------------------------------------------

३) बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ? त्याचे कारण काय असेल? 

उत्तर - बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहतात. त्यांच्या अंगावर केस दाट असतात. कारण थंडीपासून रक्षण होणे ही निसर्गाची योजना आहे.

-----------------------------------------------

इ) माहिती मिळवा. 

मोठ्या शहरांमध्ये अग्निसुरक्षा दले असतात. त्यांच्याविषयी माहिती मिळवा. त्या दलातले सेवक कोणकोणत्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात त्यांची यादी करा. मिळालेले माहिती वर्गातील इतरांना सांगा.

 उत्तर - इमारतीला आग लागणे, स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे,अपघात,पूर येणे इत्यादी दुर्घटनांमध्ये अग्नी सुरक्षा दलातले सेवक नागरिकांना मदत करतात.

-----------------------------------------------

उ) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात ?

उत्तर - आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो. म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात.

-----------------------------------------------

२) हिवाळ्यातला कोणता प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो?

 उत्तर - हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो.

-----------------------------------------------

३) गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत?

 उत्तर - गारांचा मार लागून माणसे, जनावरे जखमी होतात, घरांची कौले फुटतात, गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागाचे नुकसान होते. आंब्याचा मोहोर झडून आंब्याचे उत्पादन कमी होते.

-----------------------------------------------

४) पुराच्या पाण्यात पोहावे का ?

उत्तर - पुराच्या पाण्याला ओढ फार असते. त्यामुळे पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते.

-----------------------------------------------

५) त्सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनावर काय परिणाम होतो?

 उत्तर - त्सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने आत बसलेल्या माणसासकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा जखमी होतात.

-----------------------------------------------

ऊ) गाळलेले शब्द भरा.

१) पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात.

२) पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते.

३) त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात.

४) त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात.

-----------------------------------------------

March 01, 2024

इयत्ता चौथी प. अ.१ स्वाध्याय २२.वाहतूक व संदेशवहन

मुलांनो, वरील चित्रांचे नीट निरीक्षण करा. 

१)तुम्ही पाहिलेली किंवा वापरलेली अशी वाहतुकीची साधने शोधा आणि चित्राजवळील चौकटीत ✓ अशी खूण करा.

२) पृथ्वीपासून खूप लांब वर जाण्यासाठी वापरण्यात येणारी साधने ओळखा. त्यांच्या चौकटीत O अशी खूण करा.

----------------------------------------------------

सांगा पाहू 

चित्रांचे निरीक्षण करा.

१) वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो?

उत्तर - वरील वाहतूक साधनांचा वापर आपण माल वाहून नेण्यासाठी करतो.

----------------------------------------------------

२) या तीनपैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते?

उत्तर - ' बैलगाडी ' हे साधन मानवाने सुरुवातीस वापरले.

---------------------------------------------------

३) तीनही वाहतूक साधनात कोणता भाग समान आहे?

 उत्तर - तीनही वाहतूक साधने माल वाहून नेण्याचे काम करत असत.

--------------------------------------------------

• काय करावे बरे.

 मनजीत व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे आहे. परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही. खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल?

१) घोडा २) नळ ३) पालखी

 उत्तर - ' नळ ' हा पर्याय वापरणे योग्य होईल.

---------------------------------------------------

चित्रात संदेश वहनाची विविध साधने व पद्धती दिल्या आहेत.

१) आपल्या घरात वापरात असलेली संदेश वहनाची कोणती साधने चित्रात दिसत आहेत ? त्याच्याजवळ ∆ खूण करा.

 उत्तर -  रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल फोन, वृत्तपत्रे.

--------------------------------------------------

२) इतर साधनांपैकी कोणती संदेश वाहन साधने तुम्ही पाहिली आहेत. त्यांच्याजवळ O अशी खूण करा.

 उत्तर - टपाल, रेडिओ, वृत्तपत्रे, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल फोन.

----------------------------------------------------

३) उर्वरित संदेशवहन साधनांच्या बाबतीत आपल्या शिक्षकांकडून जाणून घ्या.

 उत्तर - काही शतकांपूर्वी कबुतराच्या पायात चिट्ठी बांधून संदेश पाठवला जायचे, निरोप्याला पाठवूनही संदेश होत असत.

पूर्वी राजाला आपल्या राज्यातील प्रजेला एखादा संदेश द्यायचा असल्यास ' दवंडी ' पिटत असे. त्यानंतरच्या काळात संपर्काच्या साधनात तारेचा व टपाल सेवेचा वापर सुरू झाला. आताची जी संदेश वाहनाची साधने आहेत त्यासाठी मानवनिर्मित उपग्रहांचा वापर होतो.

----------------------------------------------------

• जरा डोके चालवा.

१) मासे पाण्यात राहतात ते संदेशवहन कसे करत असतील?

 उत्तर - मासे पाण्यात विशिष्ट पद्धतीने आवाज काढतात त्यानुसार संदेशवहन करतात.

---------------------------------------------------

• सांगा पाहू. 

१) सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे?

 उत्तर - जादूचा खेळ.

----------------------------------------------------

२) चित्रातील माणूस काय करतो आहे?

 उत्तर - जादूचे प्रयोग दाखवत आहे.

---------------------------------------------------

३) असा खेळ तुम्ही तुमच्या परिसरात पाहिला आहे का?

 उत्तर - होय, असा खेळ मी आमच्या परिसरात पाहिला आहे.

---------------------------------------------------

४) असे आणखी कोणकोणते कार्यक्रम तुम्हास माहीत आहेत, त्यांची यादी करा. 

उत्तर - पथनाट्य , कठपुतळीचा खेळ, सर्कस, डोंबाऱ्याचा खेळ इत्यादी.

--------------------------------------------------

 ५) असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो?

 उत्तर - मनोरंजनासाठी आपण असे कार्यक्रम पाहत असतो.

---------------------------------------------------

• जरा डोके चालवा.

 खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही.

१) रेडिओ २) दूरदर्शन ३) बाहुलीनाट्य ४) सिनेमा. 

उत्तर - ' बाहुलीनाट्य ' प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही.

----------------------------------------------------

• काय करावे बरे.

 मीनाला अतिशय महत्त्वाचा संदेश लगेच परगावी पाठवायचा आहे. त्यासाठी तिने कोणता साधनाचा उपयोग वापर करावा असे तुम्हाला वाटते.

 उत्तर - मीनाने ' मोबाईल फोन ' या संदेशवहन साधनाचा वापर करावा.

---------------------------------------------------

 स्वाध्याय 

अ) जोड्या जुळवा. 

                   अ गट                              उत्तरे

१)पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी             अग्निबाण 

२)प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी      चाकाची                                                            ढकलगाडी                                                                                                             

३)पाण्यातून प्रवास करण्यासाठी            होडी 

---------------------------------------------------

आ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवायची आहे संदेश वहनाची कोणकोणती साधने प्रचारासाठी वापरता येतील?

 उत्तर - वृत्तपत्र, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट ही साधने प्रचारासाठी वापरात येतील.

-----------------------------------------------------

२) कार्टून फिल्म पाहण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरता?

 उत्तर - दूरदर्शन या साधनांच्या मदतीने कार्टून फिल्म बघता येते.

-----------------------------------------------------

३) पाठ्यपुस्तक हे कशाचे साधन आहे?

 उत्तर - पाठ्यपुस्तके  'ज्ञान संपादनाचे ' साधन आहे.

-----------------------------------------------------

March 01, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय २१. समूहजीवनासाठी व्यवस्थापन

२१. समूहजीवनासाठी व्यवस्थापन 

सांगा पाहू 

१) कौटुंबिक सहलीत गोंधळ कशामुळे झाला असे तुम्हाला वाटते?

उत्तर - व्यवस्थापनाच्या अभावामुळे कौटुंबिक सहलीत गोंधळ झाला.

-------------------------------------------

२) असा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल?

उत्तर - कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते. आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे हा उपाय गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक आहे. 

-------------------------------------------

• सांगा पाहू 

१) तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात?

उत्तर - वर्गाची स्वच्छता करणे, वर्गातील खडू, डस्टर यासारख्या वस्तू व्यवस्थित ठेवणे, फळा स्वच्छ करणे हे नियमित तपासण्याची जबाबदारी पार पाडणे, फळ्यावर सुविचार लिहिणे, वर्गात शिस्त राखणे ही कामे वर्गाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वाटतात.

-------------------------------------------

२) ती कामे पार पडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल?

उत्तर - वर्गातील काही कामे जबाबदारीने पार पाडण्यासाठी वर्ग प्रतिनिधीची आवश्यकता असते. जो विद्यार्थी कामाचा आराखडा तयार करून जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने वर्गातील कारभार कार्यभार सांभाळू शकेल त्याच विद्यार्थ्याला आम्ही वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून देऊ.

-------------------------------------------

• सांगा पाहू.

१) रस्त्यावर अपघात का होतात?

उत्तर - रस्त्याने वाहने चालत असताना जर एखाद्या वाहन चुकीच्या दिशेने येत असेल तर वाहन चालवणाऱ्याचा गोंधळ उडतो, भरधाव वाहन चालवत असल्यास अपघात होण्याची शक्यता असते. तसेच पायी चालणाऱ्या लोकांसाठी झेब्राक्रॉसिंगची सोय प्रत्येक चौकात केलेली असते. त्याचा उपयोग केला नाही आणि रस्त्यावरील नियमांचे पालन केले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते.

-------------------------------------------

२) वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे? 

उत्तर - समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूह जीवन सुरळीत चालावे. अपघात होऊ नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. 

-------------------------------------------

स्वाध्याय 

अ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे?

उत्तर - आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे. ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे.

-------------------------------------------

२) नियम का तयार केले जातात?

 उत्तर - समाजात गोंधळ माजू नये आणि आपले समूहजीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात.

-------------------------------------------

आ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते.

२) काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते. 

३) स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात.

-------------------------------------------

इ) घरी पाहुण्यांना जेवायला बोलवायला आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? 

उदा.जेवायला कोणते पदार्थ बनवायचे?

उत्तर - १) जे पदार्थ बनवायचे आहे त्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे हे पाहावे.

२) हे सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे.

--------------------------------------------

March 01, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय २०. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

२०.माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

• सांगा पाहू 

दीपिका आणि राहुल यांचे काय चुकले असे तुम्हाला वाटते. 

उत्तर - दीपिकाचा वाढदिवस असल्यामुळे मैत्रिणी आल्यावर तिने मोठ्या आवाजात गाणी लावली मोठ्या आवाजाने शेजारच्या आजोबांना त्रास होऊ लागला. राहुल शाळेतून आल्यावर आजीशी न बोलता कार्टूनचा कार्यक्रम बघायचा, त्यामुळे राहुल आपल्याशी बोलत नाही याचं आजीला खूप वाईट वाटायचं. याप्रकारे दीपिका आणि राहुल यांचे चुकले.

-----------------------------------------------

२) त्यांनी त्यांची चूक कशी सुधारली?

उत्तर - दीपिकाच्या घरातील मोठ्या आवाजामुळे धडधड वाढून आजोबांना त्रास होऊ लागला. हे पाहून आजोबांना त्रास होऊ नये म्हणून दीपक आणि ताबडतोब गाण्याचा आवाज कमी केला. एकदा राहुलच्या बाबांनी राहुलला त्याची चूक समजावून सांगितली; तेव्हापासून राहुलने आजीशी बोलण्यास टाळाटाळ करणे थांबवले आणि तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला.

-----------------------------------------------

३) तुमच्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती आहेत का?

उत्तर  आपल्या सर्वांच्याच घरी किंवा शेतकरी वृद्ध व्यक्ती असतात. आमच्याही घरी आणि शेजारी वृद्ध व्यक्ती आहेत.

-----------------------------------------------

४) त्यांना कोणत्या प्रकारची मदत कराल? 

उत्तर - आपल्या सर्वांच्याच घरात किंवा शेजारी वृद्ध व्यक्ती असतात ते आपल्यावर प्रेम करतात, आपले लाड करतात, परंतु ते आपल्यासारखी धावपळ करू शकत नाहीत. त्यांना दुकानातून औषध किंवा सामान आणून देणे, माळ्यावरील वस्तू खाली काढून देणे, सुईत धागा ओवून देणे. अशी त्यांची छोटी छोटी कामे असतात. ती आपण वेळीच करून दिल्याने त्यांना मदत होईल.

-----------------------------------------------

• सांगा पाहू.

----------------------------------------------- 

स्वाध्याय

१) आजी आजोबांना कोणता विरंगुळा असतो?

उत्तर - अनेकदा आजी - आजोबा दिवसभर घरी असतात.आपल्या मुला - नातवंडाशी गप्पा मारणे हाच त्यांचा विरंगुळा असतो. त्यामुळे त्यांचा वेळ मजेत जातो.

-----------------------------------------------

२) आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी?

उत्तर - आजारी माणसांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.

-----------------------------------------------

आ) योग्य अयोग्य लिहा.

१) मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावावीत. 

उत्तर - अयोग्य.

 ----------------------------------------------

२) आजार बरा व्हावा म्हणून गंडेदोरे, ताईत, अंगारे - धुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा. 

उत्तर - अयोग्य.

--------------------------------------------- 

इ) चुकीचे शब्द खोडा.

१) कर्णबधिर ब्रेल लिपी / खुणांची भाषा वापरतात.

२) पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते.

-----------------------------------------------

Saturday, February 24, 2024

February 24, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय १९. माझी आनंददायी शाळा

 १९. माझी आनंददायी शाळा

सांगा पाहू 

हसत खेळत शिकणाऱ्या काही मुलांची चित्रे वर दिली आहेत.

१) तुम्हाला यापैकी कोणते चित्र सर्वात जास्त आवडले?

 उत्तर - चित्र काढणारी तीन मुले हे चित्र मला सर्वात जास्त आवडले.

-----------------------------------------------

२) तेच चित्र सर्वात जास्त का आवडले?

 उत्तर - कारण चित्रकला हा माझा आवडता विषय आहे. तसेच माझा छंद सुद्धा आहे. त्यामुळे तेच चित्र मला सर्वात जास्त आवडले.

-----------------------------------------------

 स्वाध्याय

अ) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो ?

उत्तर - शाळेत एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो. अभ्यासाच्या बरोबर खेळही खेळतो.एकत्र डबा खातो. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो. सहलीला जातो. वर्ग स्वच्छ ठेवणे, सजवणे इत्यादी गोष्टी शाळेत शिकण्याबरोबर आपण करीत असतो.

-----------------------------------------------

२) शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो?

 उत्तर - शाळेत आपल्याला वेगवेगळे मुले मुली भेटतात. एकमेकांना मदत करण्यासाठी मुले एकमेकांच्या गरजा अडचणी समजून घेतात. तसेच शाळेमध्ये अनेक जाती जमातीचे आणि वेगवेगळ्या चालीरीतीचे विद्यार्थी असतात. त्यामुळे विविधतेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. एकमेकांच्या बरोबर कोणतीही गोष्ट करण्यात वर्गातील प्रत्येक मुला-मुलींना आनंद वाटतो.

----------------------------------------------------

आ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) एकमेकांना मदत केली की कोणती गोष्ट सहज करता येते.

२) शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे.

----------------------------------------------------

February 24, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय १८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल

 १८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल .

स्वाध्याय

•सांगा पाहू 

शेजारी दिलेल्या तिकिटांची चित्रे पहा.

समाजात झालेले कोणते बदल तिकीटांवरच्या चित्रातून दिसत आहेत?

 उत्तर - कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो.

 पूर्वीच्या काळात माणूस फक्त शेती करत असे. शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता.

 फक्त शेतीमुळे कुटुंबातील सर्वांचे उदरनिर्वाह होत नसल्याने व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास झाला; शहरे वाढू लागली.

 एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता रेल्वे सेवा सुरू झाल्या आणि आता विमानसेवा सुद्धा सुरू झाल्यामुळे जग जवळ आले आहे.

---------------------------------------------------

•सांगा पाहू.

१) या चित्रात तुम्हाला काय दिसते?

 उत्तर - शेजारील काही बाया गप्पा मारत बसलेल्या आहे. मुले त्यांच्या अवतीभोवती खेळत आहेत. शेजारी वस्तूंची देवाण-घेवाण करीत आहेत. मुलाच्या घराच्या किल्ल्या शेजारी ठेवलेल्या आहेत. त्या मुलगा घेत आहे आणि पोलीस काका फलकाद्वारे आपला शेजारी खरा पहारेकरी आहे असे सांगताना दिसत आहे.

---------------------------------------------------

२) तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टींची देवाण-घेवाण होते?

 उत्तर - आपण शेजारी एकाच परिसरात राहत असल्यामुळे परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी,वीज  यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांची मदत घेत असतो. घरात केलेल्या खाद्यपदार्थांची सुद्धा देवाण-घेवाण करत असतो. अशा अनेक गोष्टींची देवाण-घेवाण शेजाऱ्यांमध्ये होत असते.

---------------------------------------------------

अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

 १) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे म्हणतात.

२) स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते.

---------------------------------------------------

आ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरनासे का झाले?

 उत्तर - कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसतसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले.

---------------------------------------------------

२) माणूस स्थलांतर का करतो?

 उत्तर - मुले मुलींच्या शिक्षणासाठी, काम धंदा नोकरी व्यवसायानिमित्त घरातील मोठ्या माणसांना स्थलांतर करावे लागते.

---------------------------------------------------

इ) कारणे द्या.

१) मोठी कुटुंबे विखुरली गेली.

 उत्तर - कारण, कुटुंबातील माणसांची संख्या जास्त असल्यामुळे कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले त्यामुळे व्यापार आणि उद्योगधंदे यांचा विकास झाला. शहरे वाढू लागली, पोटापाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली.

---------------------------------------------------

२) शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात.

 उत्तर - कारण, परिसरातील कचरा, सुरक्षितता, आणि वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत हवी असते. वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्याला मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल्या शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात.

----------------------------------------------------

February 24, 2024

इयत्ता चौथी प. अ. १ स्वाध्याय १७. माझी जडणघडण

१७. माझी जडणघडण 

स्वाध्याय

अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 

१)आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात.

२) चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो.

-------------------------------------------

आ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) आपल्या आवडीनिवडी कशा ठरत जातात?

 उत्तर - लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकत जातो. त्यातून आपल्या सवयी घडत जातात आणि आपल्या आवडीनिवडी ठरत जातात.

--------------------------------------------

२) आपल्याला विविधतेची ओळख कशी होते?

 उत्तर - आपल्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली लोक जर शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ, त्यांचे वेगळे सणवार याबद्दल सहजच माहिती मिळते. यातून आपली विविधतेची ओळख होते.

------------------------------------------------

इ) ओळखा कोण ?

१) टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा. - प्रताप

२) सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी. - ताई 

३) शेजारच्या आजीमुळे स्वावलंबनाचे महत्त्व समजून घेणारी. - हिना.

------------------------------------------------

February 24, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय १६. दिवस आणि रात्र

 १६. दिवस आणि रात्र 

स्वाध्याय 

जरा डोके चालवा. 

१) अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल ?

उत्तर - चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्यामुळे पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते. त्यामुळे अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही.

 ---------------------------------------------------

२) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात? 

उत्तर - उन्हाळ्यात दिवस मोठा असतो, त्यामुळे सूर्य उशिरा मावळतो आणि हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते, त्यामुळे दिवस लवकर मावळतो. दिवस मावळला की पक्षी आपल्या घरट्यात जातात. त्यामुळे पक्षी हिवाळ्यात लवकर घरट्यात परततात.

---------------------------------------------------

आ) थोडक्यात उत्तरे लिहा. 

१) पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो?

उत्तर - पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो.

---------------------------------------------------

२) पृथ्वीचा आकार कसा आहे?

उत्तर - पृथ्वीचा आकार एखाद्या भल्याथोरल्या चेंडू सारखा गोल आहे.

---------------------------------------------------

३) दिवस आहे असे केव्हा म्हणतात?

 उत्तर - ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात.

---------------------------------------------------

४) रात्र आहे असे केव्हा म्हणतात?

 उत्तर -  ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही, तेथे अंधार पडतो. तेथे रात्र आहे असे म्हणतात.

---------------------------------------------------

इ ) वर्णन करा 

१) पृथ्वीचे फिरणे 

उत्तर - भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो, तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो म्हणजेच जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो.

---------------------------------------------------

२) दिवस आणि रात्र यांचे पाठ शिवणीचे चक्र

उत्तर - पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडू सारखा गोल असल्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस असतो आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तेथे अंधार पडतो, तेथे रात्र आहे असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. दिवसानंतर रात्र येते आणि रात्री नंतर पुन्हा दिवस येतो. हे चक्र न थांबता सुरू असते.

---------------------------------------------------

ई ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) दिवसाचे तास चोवीस असतात.

२) सूर्याच्या उगवण्याला सकाळ म्हणतात.

३) सूर्याच्या मावळण्याला सायंकाळ म्हणतात.

४) २२ मार्चपासून २१ जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो.

---------------------------------------------------

उ ) चूक की बरोबर सांगा.

१) २२ मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात. - बरोबर 

२) २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. - बरोबर 

३) २२ सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात. - चूक 

४) २२ डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. - चूक

----------------------------------------------------

Tuesday, February 20, 2024

February 20, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय ८. मोलाचे अन्न

८. मोलाचे अन्न

सांगा पाहू 

वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी खायला आई कोणकोणते पदार्थ करून देत असेल? ते कशापासून बनतात?

उत्तर - भाकरी सोबत लोणी, मिरचीचा ठेचा,चण्याच्या डाळीच्या पिठाचा झुणका, वांग्याचे भरीत इत्यादी पदार्थ देत असेल. भाकरी ज्वारीच्या पिठापासून, झुणका चणाडाळीच्या पिठापासून बनतो.

----------------------------------------------

२) वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक पदार्थ खाण्यात असतात ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात?

 उत्तर - मासळी, मीठ - समुद्रातून, अंडी - कुक्कुटपालन गृहातून, भाज्या व डाळी कडधान्ये - शेतातून अशा ठिकाणातून हे अन्नपदार्थ बाजारात विकायला येतात.

----------------------------------------------

स्वाध्याय

काय करावे बरे?

डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे.

 उत्तर - डोंगरी आवळे मिळविण्यासाठी शेतकरी सुरुवातीला ते आवळे तोडतात,पोत्यात भरतात, जवळपासच्या बाजारात आणतात आणि व्यापाऱ्यांना विकतात. नंतर व्यापारी आवळे किरकोळ विक्रेत्यांना विकतात. त्यांच्याकडून आपण आवळे घेतो. तेव्हा डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत पोहोचतात.

----------------------------------------------

 आ) माहिती मिळवा 

समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला काय म्हणतात ?

उत्तर - समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला ठिकाणाला ' मिठागरे ' म्हणतात.

----------------------------------------------

२) शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले, तर बटाटे जमिनीखाली तयार होतात. मुळाही जमिनीखाली तयार होतो.वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात ?

उत्तर - रताळे, बीट, गाजर, लसूण, कांदा, भुईमूग ही कंदमुळे मिळतात.

----------------------------------------------

 ३) कणगी म्हणजे काय? त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो ?

उत्तर - धान्य साठवण्यासाठी तयार केलेले तट्ट्यांचे किंवा तुराट्यांचे पेटार म्हणजे कणगी होय. धान्याला कीड लागू नये; खराब होऊ नये; धान्याचे ऊन - पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांना कणगीचा उपयोग होतो.

----------------------------------------------

४) शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात?

उत्तर - शेतकरी तिफण नावाचे अवजार गहू, हरभरा इत्यादी पेरण्यासाठी वापरतात.

----------------------------------------------

५) लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कुठून येतात? 

उत्तर - लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी साखर, लिंबू, मीठ हे पदार्थ लागतात. ते आपण बाजारातून विकत आणतो. 

लिंबू - शेतात पिकतात. शेतकरी लिंबू तोडून बाजारात व्यापाऱ्याला विकतात. त्यानंतर किरकोळ विक्रेत्याकडे लिंब येतात व त्यांच्याकडून आपण लिंब विकत घेतो. याप्रकारे लिंबू आपल्या घरी येतात.

 साखर - ऊसापासून साखर तयार होते. ऊस आधी साखर कारखान्यात नेतात. कारखान्यात उसावर प्रक्रिया होऊन नंतर साखर तयार होते. ती साखर पोत्यात भरतात व पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोहोचवतात. तेथे व्यापारी विकत घेतो. नंतर ते किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे येतात. आपण त्यांच्याकडून साखर विकत घेतो व आपल्या घरी आणतो. 

मीठ - मिठागरात काम करणारे लोक मीठ समुद्रातून गोळा करतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होण्यासाठी ते मीठ कारखान्यात पाठवतात. तेथे मिठावर प्रक्रिया केली जाते व स्वच्छ आयोडीनयुक्त मीठ बाजारात विक्रीसाठी येते आणि आपण विकत घेऊन ते घरी आणतो. अशाप्रकारे या वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचतात.

----------------------------------------------

इ) पुढील तक्ता पूर्ण करा.

----------------------------------------------

ई) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 

१) जमिनीचा वाफसा झाला की पेरणी करतात.

२) कंसापासून बाजारीचे दाणे सुटे करायच्या कामाला मळणी म्हणतात 

३)वाऱ्याने हलकी टरफले उडून दूर जातात 

४) काही लोक बोरे, करवंद अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात.

५) अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात. ती चालवण्यासाठी इंधनावर खर्च होतो.

----------------------------------------------

उ) थोडक्यात उत्तरे लिहा 

१) बाबा जमिनीची मशागत कशी करतात?

 उत्तर - बाबा ट्रॅक्टरवर बसून मशागतीची कामे करत असतात. ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून शेती कामे करतात. मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात. मातीची ढेकळे फोडतात, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. 

----------------------------------------------------

२) धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते?

उत्तर - शेतात पिकलेल्या धान्याची पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोहोचवतात. तेथे व्यापारी धान्य विकत घेतात. तेव्हा शेतकऱ्यांनी उगवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात. व्यापारी जे धान्य विकत घेतात, ते साऱ्या देशात विकले जाते. ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोचवले जाते. अशाप्रकारे धान्य साऱ्या देशभर पोचवले जाते.

----------------------------------------------------

 ३) अन्न वाया का घालवायचे नाही ?

उत्तर - अन्न तयार करण्यासाठी शेतकरी, कोळी तसेच इतर अन्नपदार्थ तयार करणारे लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला मिळते. त्यांची साठवण, वाहतूक व विक्री करणे, तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे यात अनेक लोकांचे प्रयत्न व मेहनत कामी येतात  त्यावर खूप खर्च होतो. म्हणून अन्न वाया घालवायचे नाही. 

----------------------------------------------------

४) घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते?

उत्तर - घरात धान्य आणल्यानंतर ते निवडतात, स्वच्छ करतात आणि त्याचे पीठ करतात. मग स्वयंपाक करताना पीठ भिजवून मळतात. थापून भाकरी करतात व भाजतात. अशा प्रकारे भाकरी करतात.

----------------------------------------------------

ए ) जोड्या लावा 

         अ गट                         उत्तरे

          मीठ                         समुद्र 

          ऊस                         मळा 

          मकाणे                     गोड्या पाण्याचे तळे 

          बोरे                          वन

          अंडी                         कुक्कुटपालन 

          भाजीपाला                  शेत.

----------------------------------------------------

February 20, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय ७. आहाराची पौष्टिकता

७. आहाराची पौष्टिकता

आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे पुढे दिली आहेत. ती वाचा:

 भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड.

१) मोठाले डाव किंवा चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ वाढून घेतो?

उत्तर - भाजी, दही, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, घेतात.

----------------------------------------------

२) चहाच्या चमच्याने किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो?

उत्तर - मीठ, गाजराची कोशिंबीर, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे.

----------------------------------------------

३) आता या खाद्यपदार्थांचे दोन गट करा. एका गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ, तर दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या.

----------------------------------------------

• सांगा पाहू.

१) पीठे  कोणकोणत्या पदार्थांपासून मिळतात?

उत्तर - ज्वारी, बाजरी, गहू, डाळ या पदार्थांपासून पीठे मिळतात.

----------------------------------------------

२) लोणी, तूप, दही कशापासून मिळते?

उत्तर - लोणी, तूप, दही दुधापासून मिळते.

----------------------------------------------

३) तेल कोणत्या पदार्थापासून मिळते?

उत्तर - शेंगदाणा, तीळ, करडई, मोहरी, खोबरे, सोयाबीन या पदार्थातून तेल मिळते.

---------------------------------------------

४) प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते?

उत्तर - अंडी, दूध, मांस हे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ आहेत.

---------------------------------------------

५) आंबट/ गोड/ तिखट /कडू लागणारे पदार्थ कोणते?

 आंबट पदार्थ - कैरी, चिंच, लिंबू. 

गोड पदार्थ - चिकू.

 तिखट पदार्थ - मिरची, मिरी, लवंग.

 कडू पदार्थ - कारले.

---------------------------------------------

६) कच्चे खाण्याचे पदार्थ कोणते ?

उत्तर - मुळा, काकडी, गाजर, टमाटर, बीट. 

----------------------------------------------

७) अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?

उत्तर - मिरी, लवंग, विलायची, जायफळ.

----------------------------------------------

८) बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?

उत्तर - ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, डाळी, शेंगदाणे, दूध, लिंबू हे जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ आहेत.

----------------------------------------------

 स्वाध्याय 

अ) काय करावे बरे ?

सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत. ज्या दिवशी आई पालेभाज्या करते, त्या दिवशी ते जेवत नाहीत.

उत्तर - पालेभाज्यांमध्ये पौष्टिक घटक असतात, त्याने शरीर धष्टपुष्ट बनते. शरीराची झीज भरून निघते, हाडे मजबूत होतात, पालेभाज्या खाल्ल्याने शरीराची वाढ होते. हे सुमेध आणि मधुराला समजून सांगितले पाहिजे.

----------------------------------------------

आ) जरा डोके चालवा.

१) नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते? उत्तर - नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते. कारण भाजणीच्या पिठात गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे, चण्याच्या डाळीचे पीठ एकत्र असते त्यातील सर्व घटक निरोगी शरीरासाठी पोषक असतात. म्हणून ज्वारीच्या व बाजरीच्या भाकरी पेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते.

----------------------------------------------

२) भाजीमध्ये दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थांचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो?

उत्तर - भाजीमध्ये दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थांचा पौष्टिकपणा वाढतो.

---------------------------------------------

३) वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात?

उत्तर - लिंबामध्ये क जीवनसत्व असते त्यामुळे अन्नपचन चांगले होते. म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात.

---------------------------------------------

४) शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते?

उत्तर - शेतात पिकणाऱ्या ऊस या पिकात साखर जास्त प्रमाणात असते.

----------------------------------------------

इ) माहिती मिळवा 

दुधाला विरजण लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा. तुम्ही काय कृती केली ते लिहून काढा. वर्गातील इतरांना सांगा.

 विद्यार्थ्यांनी आपल्या आईला विचारून स्वतः करून पहावे.

----------------------------------------------

इ) चित्रे काढा. जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा.

-----------------------------------------------

उ) यादी करा. जी फळे सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा.

उत्तर - केळी, संत्री, कलिंगड, लिची, डाळिंब, मोसंबी, सिताफळ.

-----------------------------------------------

ऊ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 

१)फळांमध्ये  साखर असल्याने फळे गोड राहतात.

२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत.

३) जिभेवर छोट्या छोट्या उंच वट्यांना रुचिकलिका म्हणतात.

-----------------------------------------------

ए) कारणे सांगा.

१) अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी.

 उत्तर - अन्नपदार्थ शिजवताना थोड्या पाण्यात शिजवावे. त्यातील पौष्टिक घटक पाण्यात विरघळतात. सर्व पाणी खाण्यात वापरले नाही तर पौष्टिक घटक वाया जातात. शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे भाजीची मूळ चव व त्यातील जीवनसत्वे तसेच इतर घटक कायम राहतात. म्हणून अन्नपदार्थ शिजवताना काळजी घ्यायला हवी.

---------------------------------------------

२) शरीर धडधाकट हवे.

उत्तर - आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो. दिवसभर केलेल्या कामांना ऊर्जा हवी असते. याशिवाय श्वसन करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीर धड धाकट हवे.

---------------------------------------------

३) लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही. उत्तर - शरीराच्या गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व अन्नपदार्थांमध्ये थोडे अधिक प्रमाणात असतात. यात खूप काही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही. 

---------------------------------------------

ऐ) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली?

 उत्तर - आवळा चाऊन खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं. ते पाणी गोड लागतं आणि तेही पाणी साखर न घालता प्यायचं. हे पाणी गोड लागतं ही जिभेची गंमत मोनिकाताईने सांगितली.

---------------------------------------------

२) फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का? 

उत्तर - फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते असे नाही तर फळांमध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक आणि जीवनसत्वे असतात.

---------------------------------------------

३) आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते? 

उत्तर - लिंबू, चिंच, कैरी, दही, बोर, आलूबुखार, ताक हे आंबट घटक असणारे अन्नपदार्थ आहेत.

----------------------------------------------

ओ) जोड्या लावा 

       अ गट                             उत्तरे 

         दूध                              लोणी 

         तीळ                            तेल

         चिंच                            आंबट पदार्थ 

         ज्वारी                           पीठ

         चिकू                             साखर 

----------------------------------------------

February 20, 2024

इयत्ता चौथी प.अ.१स्वाध्याय ६. अन्नातील विविधता

६. अन्नातील विविधता.

• जरा डोके चालवा 

१) एखाद्या प्रदेशात एक अन्नघटक मुख्य असतो. असे होण्यामागचे कारण काय असावे?

उत्तर - त्या प्रदेशात विशिष्ट खाद्यांन्नाचे पीक घेतले जाते. त्यामुळे एखाद्या प्रदेशात एक अन्यघटक मुख्य असतो. उदा. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते. कारण तेथील मृदा व हवामान हे त्या पिकाला पोषक असे आहे.

----------------------------------------------

२) प्रदेशानुसार मुख्य अन्नघटकांतही विविधता आढळते याचे कारण काय असेल बरे,?

उत्तर - प्रदेशानुसार मुख्य अन्नघटकांतही विविधता असते. कारण तेथील मृदा व हवामानानुसार अन्न घटकातही विविधता आढळते. तसेच एकाच अन्नघटकाचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे इत्यादी पदार्थ बनवले जातात.

----------------------------------------------

• सांगा पाहू.

१) किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात?

उत्तर - तांदूळ, नारळ. 

----------------------------------------------

२) उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न्य पिके होतात ?

उत्तर - गहू, मका. 

----------------------------------------------

३) मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते?

उत्तर - ज्वारी, बाजरी. 

----------------------------------------------

४) भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. या मागचे कारण काय असावे?

उत्तर - तांदळाच्या पिकाला रेताळ जमीन तसेच पाणी जास्त प्रमाणात पाहिजे आणि दक्षिण भागात पाण्याचे प्रमाण व तांदळाच्या पिकाला पूरक असे हवामान आहे म्हणून भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.

----------------------------------------------

• जरा डोके चालवा.

 पुढीलप्रमाणे तक्ता तयार करा.

१) कोणत्या ऋतूत कोणते पिके येतात त्यांची नोंद करा.

२) तुम्हाला माहीत असणारी फळांची नावे लिहा. ऋतूनुसार तक्त्यात लिहा.

----------------------------------------------

• सांगा पाहू 

महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत.

• नकाशाचे निरीक्षण करा व पुढील कृती करा. 

• जिल्हा /राज्य व पदार्थांची यादी करा.

उत्तर - १) गुजरात राज्य - ढोकळा, ठेपला. 

          २) मध्य प्रदेश - बाफला, लापशी.

          ३) हैदराबाद - बिर्याणी. 

          ४) कर्नाटक - इडली, डोसा, सांबार वडा. 

          ५) पंजाब - मक्याची भाकरी, सरसूची भाजी.

----------------------------------------------

• हे पदार्थ कोणत्या धान्यापासून / फळापासून / भाजीपासून बनवले आहेत, त्यांची माहिती घ्या. त्यांची तिसऱ्या सारणीत नोंद करा.

----------------------------------------------

स्वाध्याय 

अ) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात?

उत्तर - हुरडा, पोळी, पापड, सांडगे, धपाटे, धिरडे, मांडे यासारखे अन्नपदार्थ बनवले जातात.

----------------------------------------------

२) विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा.

उत्तर - शेंगदाणा तेल, तिळाचे तेल खोबऱ्याचे तेल, मोहरीचे तेल, जवस तेल, सोयाबीन तेल ही विविध खाद्यतेलांची नावे आहेत.

----------------------------------------------

३) तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो?

उत्तर - पुरण पोळी हा अन्नपदार्थ बनवतात. पुरण हे चण्याच्या डाळीचे तर पोळी गव्हापासून बनवलेली असते.

----------------------------------------------

आ) गटात न बसणाऱ्यांना अन्नपदार्थाभोवती ⚪ करा. गटात तो न बसवण्याचे कारण लिहा.

१) कैरी लोणचे, आंबा, मुरंबा, आमरस 

उत्तर - आंबा - आंबा या घटकापासून बाकी सर्व पदार्थ तयार केले जातात. मात्र आंबा तयार केला जात नाही.

२) पुलाव, पराठा, दहीभात, बिर्याणी 

उत्तर - पराठा - पराठा सोडून इतर सर्व पदार्थ हे तांदळापासून बनवलेले आहेत.

३) मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर 

उत्तर -  मैसूर पाक - मैसूर पाक महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील पदार्थ आहे. इतर तीनही महाराष्ट्रातील आहेत.

----------------------------------------------

इ) खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यापासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात. त्यांची यादी करा.

१) कणीस - धान्य आहे. 

अन्नपदार्थ - कणसापासून उसळ, पोळी, पराठे, वडे इत्यादी अन्नपदार्थ होऊ शकतात.

                ---------------------------

२) भोपळा - फळभाजी आहे.

अन्नपदार्थ - भाजी, सांडगे, धिरडे, शिरा, खीर, भजे इत्यादी अन्नपदार्थ होऊ शकतात.

                ---------------------------

४) गवार - भाजी आहे.

अन्नपदार्थ - भाजी, पुलाव इत्यादी पदार्थ बनवता येतात.

----------------------------------------------