DAILY EDUCATION

Saturday, February 24, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय १६. दिवस आणि रात्र



 १६. दिवस आणि रात्र 

स्वाध्याय 

जरा डोके चालवा. 

१) अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल ?

उत्तर - चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्यामुळे पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते. त्यामुळे अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही.

 ---------------------------------------------------

२) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात? 

उत्तर - उन्हाळ्यात दिवस मोठा असतो, त्यामुळे सूर्य उशिरा मावळतो आणि हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते, त्यामुळे दिवस लवकर मावळतो. दिवस मावळला की पक्षी आपल्या घरट्यात जातात. त्यामुळे पक्षी हिवाळ्यात लवकर घरट्यात परततात.

---------------------------------------------------

आ) थोडक्यात उत्तरे लिहा. 

१) पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो?

उत्तर - पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो.

---------------------------------------------------

२) पृथ्वीचा आकार कसा आहे?

उत्तर - पृथ्वीचा आकार एखाद्या भल्याथोरल्या चेंडू सारखा गोल आहे.

---------------------------------------------------

३) दिवस आहे असे केव्हा म्हणतात?

 उत्तर - ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणतात.

---------------------------------------------------

४) रात्र आहे असे केव्हा म्हणतात?

 उत्तर -  ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही, तेथे अंधार पडतो. तेथे रात्र आहे असे म्हणतात.

---------------------------------------------------

इ ) वर्णन करा 

१) पृथ्वीचे फिरणे 

उत्तर - भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो, तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो म्हणजेच जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो.

---------------------------------------------------

२) दिवस आणि रात्र यांचे पाठ शिवणीचे चक्र

उत्तर - पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडू सारखा गोल असल्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस असतो आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तेथे अंधार पडतो, तेथे रात्र आहे असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. दिवसानंतर रात्र येते आणि रात्री नंतर पुन्हा दिवस येतो. हे चक्र न थांबता सुरू असते.

---------------------------------------------------

ई ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) दिवसाचे तास चोवीस असतात.

२) सूर्याच्या उगवण्याला सकाळ म्हणतात.

३) सूर्याच्या मावळण्याला सायंकाळ म्हणतात.

४) २२ मार्चपासून २१ जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो.

---------------------------------------------------

उ ) चूक की बरोबर सांगा.

१) २२ मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात. - बरोबर 

२) २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. - बरोबर 

३) २२ सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात. - चूक 

४) २२ डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. - चूक

----------------------------------------------------

No comments:

Post a Comment