DAILY EDUCATION

Monday, January 24, 2022

इयत्ता तिसरी नोंदी विषय कार्यानुभव



 विषय कार्यानुभव

• परिसर स्वच्छतेची गरज सांगतो. 

• परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो. 

• पाण्याचे महत्त्व सांगतो.

• घरगुती कामासाठी पाण्याचा वापर कसा करावा ते स्पष्ट करतो. 

• शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांची नावे सांगतो. 

• कारखान्यासाठी पाण्याचा वापर कसा केला जातो त्याची वर्णन करतो. 

• पाण्याचे जीवनातील महत्त्व यावर पंधरा ओळी निबंध लिहितो. 

• श्रमाचे मोल जाणतो. 

• इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो.

• सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.

• नैसर्गिक आपत्तीचे चित्र काढून दाखवतो. 

• नैसर्गिक आपत्तीचे चित्र गोळा करतो. 

• अग्निशमन दलाच्या कामाविषयी माहिती सांगतोो. 

• टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करतो.

• प्रत्येक वर्ग मित्राला वाढदिवसाचे भेट कार्ड देतो. 

• प्रत्येक कृती स्वतःहून करतो. 

• मातीकाम व कागद काम यात रुची आहे. 

• रंगीत कागदापासून कान हलवणारा ससा तयार करतो. 

• वर्गात ससा तयार करण्याची कृती सांगतो. 

• कागदापासून विविध वस्तू तयार करतो. 

• परिसरातील नाविन्यपूर्ण रचनेचा संग्रह करतो. 

• इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो.

• वर्गातील सर्वांना मदत करतो. 

• कार्डशिट पासून आकाश कंदील तयार करतो.

• आकाश कंदील तयार करण्याची कृती वर्गात सांगतो. 

• आकाश कंदील तयार करण्याची कृती करून दाखवतो. 

• वर्गसुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.

• पाणी एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाणतो.

• जमिनीच्या प्रकाराविषयी माहिती सांगतो.

• फळे, फुले, भाजीपाला यांचा तक्ता तयार करतो.

• वस्त्र निर्मितीच्या विविध स्रोतांची माहिती जाणतो.

• माती विषयी विविध गाणी म्हणतो 

• माती पासून विविध फळे, भाज्या इत्यादींचे आकार तयार करतो. 

• मातीचे विविध आकार तयार करून त्यावर रंग काम करतो. 

• उपक्रमातील केलेल्या कृती लक्षणीय असतात.

• सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

• शर्टला सुई दोरा वापरुन बटण लावतो.

• मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या याविषयी माहिती ठेवतो. 

• काडीपेटीच्या साह्याने त्या आकराच्या मातीच्या विटा तयार करतो. 

• काडी पेटीच्या सहाय्याने विविध अक्षरे तयार करतो. 

• काडीपेटीच्या सहाय्याने विविध आकार तयार करतो. 

• दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो. 

• विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.

• पाणी गाळण्याचे अनुभव वर्गात सांगतो.

• पाण्या संबंधित खेळाची माहिती गोळा करतो. 

• पाण्याविषयी विविध म्हणींचा संग्रह करतो.

• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

• सुचविलेले गीत सुरेल आवाजात गातो.

• पाण्यासंबंधीचे संवाद, कथा लक्षपूर्वक ऐकतो.

• उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची मुद्देसूद माहिती देतो.

• उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र या घटकाची माहिती देतो. 

• उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा या घटकाची मुद्देसूद माहिती देतो.

• नैसर्गिक आपत्तीची विविध कारणे स्पष्ट करतो.

• परिसरातील नैसर्गिक आपत्तीच्या घटना कथन करतो. 

• कागदापासून हातपंखा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो. 

• हातपंखा तयार करण्याची कृती करून दाखवतो.

• पुठ्यापासून विविध खेळणी तयार करतो. 

• मणी, चॉकलेट, दोरा यापासून माळा तयार करतो. 

• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो.  

• सुचविलेल्या विषयास संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो. 

• केलेली कृती व कृतीचा क्रम सांगतो. 

• सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करून आकर्षक रंगात रंग देतो.

• शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्र कढतो. 

• राष्ट्रीय सणानिमित्त लागणाऱ्या पताका सुंदर रीतीने लावतो. 

• स्वतः कृती करतो.

• झाडे लावण्याच्या कुंडीला रंग देतो. 

• विविध कुंड्यांमध्ये माती भरतो. 

• कुंडीमध्ये योग्य माती भरून रोपांची लागवड करतो. 

• शाळेतील झाडांना पाणी घालतो. 

• सुई दोऱ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. 

• जलवाहतुकीचे महत्व स्पष्ट करतो. 

• जलवाहतुकीचे फायदे सांगतो. 

• जलवहतुकीच्या साधनांची यादी करतो. 

• टाकाऊ वस्तूंपासून राखी तयार करतो.

• राखी तयार करण्याची कृती वर्णन करतो.

• रिकाम्या खोक्यापासून मोबाईल स्टॅन्ड तयार करून दाखवतो. 

• रिकाम्या खोक्यापसून विविध वस्तू तयार करतो. 

• नारळाच्या करवंटी पासून वस्तू तयार करण्याच्या साहित्यांची नावे सांगतो.

• नारळाच्या करवंटी पासून विविध वस्तू तयार करतो. 

• वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके या मधून फळांची चित्रे मिळवून चिकट वहीत चिकटवीत होतो.

• फळाच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगतो. 

•रबरी चेंडू पासून बाहुली तयार करतो.

 •विविध फुलझाडांची माहिती सांगतो.

 •परिसरातील फुलझाडांची नावे सांगतो व त्यांची माहिती गोळा करतो.

• परिसरातील फुलझाडांच्या नावांची यादी तयार करून वर्गात लावतो.

• फुलझाडांचे महत्त्व उपयोग सांगतो.

• सार्वजनिक ठिकाणी पाणी साठवण्याच्या साधनांची माहिती सांगतो.

• सार्वजनिक ठिकाणच्या पाणी साठवण्याच्या साधनाच्या स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करतो.

• पाणी साठवण्याच्या पद्धती सांगतो. 

• कागदापासून भिरभिरे तयार करतो. 

• रिकाम्या खोक्यापासून सोफा बनवून दाखवतो. 

• लाकडी चमच्या पासून मोराची प्रतिकृती तयार करतो. 

• आइस्क्रीमच्या काड्यापासून विविध कलाकृती तयार करतो. 

• लाकडी चमच्यापासून बैलगाडीची प्रतिकृती तयार करतो.

• मत्स्य व्यवसायाची माहिती मिळवतो. 

• माशांची विविध चित्रे गोळा करून चिकट वहीत चिकटवतो. 

• काड्यापासून तयार केलेल्या वस्तूंची नावे सांगतो.

• शोभिवंत झाडांची नावे सांगतो.

• सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो .

• दिलेल्या कृतीसाठीचे साहित्य हाताळताना काळजीपूर्वक वापर करतो.

• केलेली कृती कशी केली ते सांगतो. 

• स्वतः कृती करतो. 

• स्वतः प्रात्यक्षिक करतो. 

• परिसरातील आवश्यक घटकांबाबत ज्ञान आहे. 

• प्रत्येक गटात सहभागी होऊन काम करतो.

• पाणी पिल्यावर नळाची तोटी बंद करतो. 

• मानवी जीवनावर होणारे नैसर्गीक आपत्तीचे परिणाम सांगतो. 

• केलेल्या कृतीचा क्रम सांगतो. 

• दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेऊन तंतोतंत पालन करतो. 

• वडीलधाऱ्यांचा आज्ञा पाळतो.

• शिक्षकांशी अतिशय नम्रपणे वागतो. .

• कृती करतो अन ती कशी केली ते सांगतो

• स्वतःचे मत मांडण्याचा प्रयत्न करतो


No comments:

Post a Comment