DAILY EDUCATION

Sunday, January 23, 2022

इयत्ता तिसरी नोंदी विषय कला आणि संगीत



*विषय कला आणि संगीत


• जाड, बारीक रेषा काढतो.

• परिसरातील विविध घटना दृश्य यांचे निरीक्षण करतो. 

• मुक्त आकाराचा वापर करून नक्षी काम करतो.

• परिसरातील नक्षीकामाच्या नमुन्याचे कात्रणे गोळा करतो. 

• निसर्गनिर्मित वस्तूंची यादी तयार करतो.

• वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो. 

• पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो. 

• नाटकाची पुस्तके वाचतो.

• वैयक्तिक रित्या  गायन करतो.

• निसर्ग संबंधित गीतांचा संग्रह करतो. 

• दात घासण्याची कृती करून दाखवितो.

• माती पासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो. 

• मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो.

• मातीची भांडी बनवितो.

• दैनंदिन जीवनात रोज करत असलेल्या कृतीचा तक्ता तयार करतो.

• नाटकाचे पात्र दिल्यास ते सादर करतो. 

• कथा सांगताना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो. 

• विविध आकाराचे चित्र काढून ते वर्गात लावतो. 

• पुस्तकातील कविता स्वतःच्या चालीत म्हणून दाखवतो .

• दाखविलेल्या वस्तूंपैकी गोल, त्रिकोणी, चौकोनी आकाराच्या वस्तू चे वर्गीकरण करतो. 

• आवाजात ओहकता ठेवून बोलतो. 

• संवाद फेकीचे कौशल्य उत्तम आहे.

• देशभक्तीपर गीतांचा संग्रह करतो. 

• हातांच्या बोटांचा परिचय करून देतो. 

• पाठ्यपुस्तकातील छोट्या प्रसंगाचे वैयक्तिक वाचन करतो. 

• शाळेतील लहान प्रसंगाचे वर्णन करतो.

• प्रसंगानुरूप गीताचे गायन करतो. 

• संवाद करताना रममाण होऊन जातो.

• कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.

• विविध सणांचे चित्र मिळवतो व माहिती लिहितो. 

• पानाचे चित्र काढतो. 

• फुलाचे चित्र काढतो.

• कथेवर आधारित कल्पनाचित्र काढण्याचा प्रयत्न करतो. 

• मातीपासून गोल, दंडगोल तयार करतो. 

• कागद विविध प्रकारच्या आकारात फाडतो.

• देहबोलीचा सुंदर रीतीने वापर करतो. 

• छोट्या-छोट्या अभिनयाच्या कृती करून हसवितो.

• योग्य हावभावासह संवाद साधतो. 

• चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतो. 

• सुंदर नृत्य करतो.

• नृत्याची विशेष आवड आहे. 

• गायनाची विशेष आवड आहे.

• गोल त्रिकोणी-चौकोनी आकारावर आधारित पाने-फुले वस्तू यांचे आकार रेखाटतो. 

• परिचित असलेल्या सोप्या वस्तूचे चित्र काढतो.

• ठिपके रेषा आणि गोल त्रिकोणी चौकोनी या सारख्या आकाराचे आवडीप्रमाणे मांडणी करतो.

• रांगोळीची आवड आहे. 

• रांगोळीत अत्यंत सुंदर व कलात्मक रीतीने रंग भरतो. 

• प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभागी होतो.

• स्वतः नेत्तृत्व करुन इतरांना मदत करतो. 

• सर्वांना उपयोगी वस्तू बाबत माहिती देतो. 

• क्रमानुसार बोटांची नावे सांगतो. 

• तालाचा रचनात्मक आविष्कार करतो.

• दिलेल्या नाटकाचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो.

• विविध प्रार्थनांचा तक्ता तयार करतो. 

• दिलेल्या वस्तूचे चित्र काढतो. 

• माती पासून विविध फळे बनवून आणतो. 

• कथेवर आधारित स्मरण चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. 

• निसर्ग कवितांचा संग्रह करतो. 

• देशभक्तीपर गीताचे तालासुरात गायन करतो. 

• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची जलद व अचूक माहिती सांगतो. 

• माती काम करताना घ्यावयाच्या कृतीची पायरी सांगतो .

• मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती नेमक्या शब्दात सांगतो. 

• चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो. 

• सुशोभीकरणासाठी आवश्यक असे सर्व घटक सांगतो .

• सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो .

• दैनंदिन जीवनातील अनुभव कथन करतो. 

• मातीची मूर्ती तयार करतो.

• विविध चित्रांचा वर्तमानपत्रातून संग्रह करतो .

• कल्पनाचित्र काढतो. 

• कागदाच्या सोप्या वस्तू बनवून आणतो. 

• बाहुलीचे चित्र काढून आणतो .

• जुन्या कापडापासून बॉल तयार करून आणतो.

• चिंध्यापासून बाहुली तयार करून आणतो.

• चित्रात सुंदर रंग भरतो .

• दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक वस्तू निर्मिती करतो .

• दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो. 

• दिलेल्या घटकांपासून योग्य कृतीद्वारे विशेष वस्तू निर्माण करतो .

• दिलेल्या घटकाचे मुक्तपणे रेखाटन करतो. 

• स्वतःच्या घराचे सुंदर चित्र काढतो .

• काढलेल्या चित्रावर आधारित नक्षी काम करतो. 

• काढलेल्या चित्रात आवडीचे रंग काम करतो. 

• वर्तमानपत्रातील चित्रांचा संग्रह करून रंग काम करतो.

• विविध कथांचे वर्तमानपत्रातून कात्रणे गोळा करतो.

• स्वरांचा परिचय करून घेतो. 

• स्वरांच्या नावाची यादी तयार करतो.

• शाळेचे रेखीव चित्र काढतो कथा वाचून दाखवितो व त्यावर अभिनय करतो.

• सौंदर्य निर्मिती साठी कोलाज तंत्राचा वापर करतो .

• सजावटीसाठी आवडीचा रंग माध्यमांचा वापर करतो.

• कागदाचे विविध प्रकारे घड्या घालून दाखवतो.

• कागदी वस्तू बनवून त्यांचा संग्रह करतो. 

• विविध वस्तूवर कागदाची सजावट करतो. 

• परिसरातील निरुपयोगी वस्तूंचा संग्रह करून त्याद्वारे वस्तूंची सजावट करतो.

• वस्तूच्या पृष्ठभागावर अन्य निरुपयोगी वस्तू चिकटवून सजावट करतो .

• विविध वेशभूषा असलेली चित्रे गोळा करतो.

• वर्तमानपत्रातील कथा कवितांचा संग्रह करतो .

• परिसरातील उपलब्ध वस्तूंची यादी तयार करतो. 

• कल्पनाशक्तीचा वापर करून नवनिर्मिती करतो.

• पुठ्ठ्यापासून विविध वस्तू बनवतो.

• सजावटीसाठी योग्य वस्तूचे निवड करतो.

• पुठ्यापासून कागदी खोके बनवतो .

• कागदी खोक्यापासून विविध वस्तू बनवतो. 

• परिसरातील निकामी वस्तूंचा संग्रह करतो.

• विविध आकाराचे ब्रश जमावितो..  

• सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. 

• सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो.

• जीवनातील कलेचे महत्त्व जाणतो. 

• कृतीचा सराव सावधानपूर्वक करतो. 

• कृती कशी व का करावी हे समजून घेतो. 

• चित्राचे विविध प्रकार ओळखतो .

• सुचविलेल्या विषयावर चित्र काढतो.

• शालेय सुशोभन करताना कामात रस घेतो.

No comments:

Post a Comment