DAILY EDUCATION

Sunday, September 26, 2021

ओळख थोर नेत्यांची

टेस्ट सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

"विद्येविना मती गेली l मतीविना नीती गेली l नीतीविना गती गेली l गतीविना वित्त गेले l वित्ताविना शूद्र खचले l इतके अनर्थ एका अविद्येने केले l "
   या शब्दात शिक्षणाचे महत्त्व वर्णन करणारे ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा. ज्योतीबा यांचे मूळ आडनाव गोरे (गोऱ्हे) असे होते परंतु त्यांचे आजोबा शेरिबा यांचा फुलांचा व्यवसाय असल्याने फुले हे आडनाव मिळाले. समतेच्या तत्त्वाचा आयुष्यभर पुरस्कार करून समाजातील विषमतेवर ज्योतीबांनी टीका केली रूढी व परंपरा या मधील दोष उघड करून समाजातील उच्चवर्णीयांनी कडून इतरांची होत असलेली पिळवणूक यावर आघात केले. ज्योतीबांच्या काळातील स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती समाजात बालविवाह व जरठ-कुमारी विवाह या सारख्या अनिष्ट पद्धती रूढ होत्या, शिक्षणापासून मुलींना दूर ठेवले जायचे. महात्मा ज्योतीबा फुले यांनी 1848 सली पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनविले. 
महात्मा फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी पुण्यातील चिपळूणकरांच्या वाड्यात ,17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत तर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत अशा मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्या काळी विधवा स्त्रियांची परिस्थिती अतिशय वाईट होती अशा स्त्रियांना समाजात व कुटुंबात स्थान नव्हते या विधानांना केशवपन करावे लागे, ज्योतीबांनी त्या प्रथेशी लढा दिला व स्त्रियांचे केशवपन करण्याची पद्धती बंद केली. इ.स. 1863 मध्ये ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. विधवा पुनर्विवाहास उत्तेजन देऊन 1864 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये पहिला पुनर्विवाह घडवून आणला.' उक्ती प्रमाणे कृती' या अर्थाने काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या यशवंत मुलास ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतले. ज्योतीबा फुले समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांविरूध्द आयुष्यभर लढत राहिले. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 
समाजाला जागृत करण्यासाठी ज्योतीबा फुले यांनी अनेक ग्रंथ लिहिले. तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड ,सत्सार ,सार्वजनिक सत्य धर्म इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ज्योतीबांनी स्वतःला आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांपुढे आधुनिक शेतीचा आदर्श ठेवला शेती मालाच्या विक्रीसाठी पेढी स्थापन केली जुलमी सावकारशाही विरुद्ध लढे दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे लढणारे 'ज्योतीबा ' हे महाराष्ट्रातील पहिलेच समाजसुधारक होत. ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे संबोधले जाते. बालहत्या प्रतिबंध, विधवा केशवपन बंदी, कुमारी मातृत्वाची समस्या, प्रौढ कुमारी विवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण ,अस्पृश्यता निवारण, सर्वांना शिक्षणाची समान संधी, शेतकऱ्यांचे दैन्य अशा प्रत्येक क्षेत्रातील जोतिबांचे कार्य लक्षात घेता त्यांनी स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व इत्यादी मूल्यांचा किती निष्ठेने स्वीकार केला होता हे दिसून येते. समाजसुधारकांचे अग्रणी असा केला जाणारा त्यांचा गौरव यथार्थ असल्याचे जाणवते. 
11मे 1888 रोजी मुंबई येथे रावबहादुर वडेदार यांच्या तर्फे फुले यांना महात्मा ही पदवी अर्पण करण्यात आली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांचे पुणे येथे निधन झाले.

_______________________________________ 
Jyotiba Phule, who describes the importance of education in the words, Mahatma Jyotiba Phule was born on 11 April 1927 in Pune. His native village is Katgun taluka Khatav district Satara. Jyotiba's original surname was Gore (Gorhe) but his grandfather Sheriba's flower business gave him the surname Phule. Jyotiba criticized the inequality in the society by advocating the principle of equality throughout his life, exposing the flaws in the norms and traditions and attacking the exploitation of others by the upper castes of the society. In the days of Jyotiba, the condition of women was very bad. In the society, undesirable practices like child marriage and virgin marriage were prevalent and girls were kept away from education. Mahatma Jyotiba Phule started the first school for girls in 1848 at Bhide's mansion in Budhwar Pethe, Pune. He made his wife Savitribai Phule a teacher to teach girls. Mahatma Phule started schools for such girls on 3 July 1851 at Chiplunkar's Palace in Pune, on 17 September 1851 at Rasta Peth and on 15 March 1852 at Vetal Peth. At that time, the condition of widows was very bad and women had no place in the society and family. इ.स. In 1863, Jyotiba started the Prevention of Infanticide. He initiated the first remarriage in Pune in 1864 by encouraging widow remarriage. Jyotiba Phule adopted the successful son of a Brahmin widow named Kashibai in the sense of 'action according to the saying'. Jyotiba Phule continued to fight against the undesirable norms and traditions of the society throughout her life. On September 24, 1873, he founded the Satyashodhak Samaj in Pune. Jyotiba Phule wrote many books to awaken the society. His books are famous like Tritiya Ratna, Brahmin's skill, Slavery, Farmer's Asud, Satsar, Sarvajanik Satya Dharma etc. Jyotiba set an example of modern farming to the farmers by cultivating himself in a modern way. Jyotiba was the first social reformer in Maharashtra to fight hard for the cause of farmers. Jyotiba is known as Martin Luther King of Maharashtra. How faithfully they embraced the values of freedom, equality, cosmopolitanism, etc., considering the work of Jyotiba in every field such as prevention of child murder, ban on widow's haircut, problem of virgin motherhood, adult virgin marriage, widow remarriage, women's education, prevention of untouchability, equal access to education for all. It appears to have been done. His glory as a pioneer of social reform seems to be real. On 11 May 1888, Phule was conferred the title of Mahatma by Rao Bahadur Vadedar in Mumbai. Mahatma Jyotiba Phule died on 28 November 1890 in Pune.

No comments:

Post a Comment