DAILY EDUCATION

Monday, February 21, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सहावी विषय कार्यानुभव

विषय कार्यानुभव इयत्ता सहावी









• पाण्याचे महत्व सांगतो. 

• पाण्याचे उपयोग सांगतो.

• पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा याविषयी माहिती लिहितो. 

• पाण्यासंबंधित घोषवाक्य तयार करतो.

• विविध माध्यमाद्वारे तराजू कसा तयार करतात हे सांगतो. 

• शेतातील पाणी बचत कशी होऊ शकते याविषयी चर्चेत सहभागी होतो.

• शेतातील पाण्याचा अपव्यय कसा होतो या बाबतीत माहिती सांगतो.

• शेतीसाठी पाण्याचे महत्त्व सांगतो.

• आकाशकंदील तयार करतो.

• आकाश कंदील तयार करण्याची कृती लिहितो.

• आकाश कंदील तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती सांगतो.

• पाणी बचत व पुनर्वापराची गरज यावर चर्चा करतो.

• पाणी शुद्ध करण्याच्या कृती करून दाखवतो.

• पाणी शुद्धीकरणाचे महत्त्व समजावून सांगतो.

• पावसाच्या पाण्याची अनियमितता याबाबत वर्गात चर्चा करतो.

• पाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकार समजून घेतो.

• कामासाठी माती घालण्याची कृती करतो.

• वर्गात माती पासून विविध वस्तु तयर करून आणतो. 

• वस्त्र निर्मितीची संकल्पना समजावून घेतो.

• रोपे तयार करण्याची कृती वर्गात करून दाखवतो. 

• रोपवाटिकेत रोपे कशी तयार करतात याबाबत माहिती सांगतो. 

• मातीच्या म्हणी सांगतो.

• तयार वस्तूंना विविध रंग देऊन त्या सजवतो.

• वस्त्र निर्मिती मधील सध्याचे प्रगत तंत्रज्ञान व प्रगतीची नोंद घेतो.

• वस्त्र निर्मिती विषयीचे तंत्रज्ञान याविषयी इंटरनेटवर माहिती शोधतो.

• आदिमानवापासून आत्तापर्यंत वस्त्र निर्मितीचा प्रवास या विषयी माहिती लिहितो. 

• दैनंदिन जीवनातील वस्त्राचे महत्त्व स्पष्ट करतो. 

• जलसाक्षरतेचे महत्व याविषयीची माहिती आहे.

• जलसाक्षरता अभियानाबाबत मित्रांसोबत चर्चा करतो.

• वर्गात जलदिन साजरा करून पाण्याचे महत्त्व सांगतो.

• अंड्याच्या टरफलापासून सौंदर्य कृती तयार करतो.

• अंड्याच्या टरफलापासून केलेल्या सौंदर्य कृतीची कृती लिहितो.

• कागदापासून पाकिट तयार करतो.

• कागदापासून पाकिट बनविण्याचे प्रात्यक्षिक वर्गात करून दाखवतो.

• तयार केलेल्या सौंदर्य कृती वर्गात दाखवतो.

• स्वतः केलेल्या सौंदर्य कृतीद्वारे वर्गाची सजावट करतो.

• विविध गीते हावभावासहित गायन करतो.

• वेगवेगळ्या मातीच्या प्रकाराविषयी माहिती मिळवितो.

• कोणत्या जमिनीत कोणती पिके चांगली येतात याविषयी मित्रांसमवेत चर्चा करतो.

• परिसरातील जमिनी विषयी माहिती सांगतो.

• परिसरात शेतात घेतलेल्या पिकाविषयी माहिती सांगतो.

• वर्तमानपत्रातील पावसांच्या गाण्यांचा संग्रह करतो.

• वर्तमानपत्रातील पावसांच्या गाण्यांचा चित्रासहित संग्रह करतो. 

• बांबू कामाची माहिती सविस्तरपणे लिहितो.

• दैनंदिन जीवनातील निवार्‍याचे महत्व सांगतो.

• वस्त्रनिर्मिती मधील नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती लिहितो.

• सूतगिरणीचे चित्र काढतो.

• हातमागात वस्त्र कसे तयार केले जाते याविषयी माहिती मिळवितो.

• बांबूपासून टोपली बनविण्याची कृती सांगतो.

• बांबूकामासाठी संबंधित साहित्य गोळा करतो.

• पाणी अशुद्ध होण्याची कारणे स्पष्ट करतो.

• विविध प्रकारच्या आपत्तीची माहिती देतो.

• पाणी शुद्ध करण्याचे प्रयोग करून दाखवतो.

• अशुद्ध पाण्याचे शरीरावर होणारे परिणाम सांगतो.

• नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे उदाहरण व महत्त्व समजावून सांगतो.

• भूकंप व त्सुनामी मधील फरक चित्राच्या साह्याने स्पष्ट करतो. 

• भूकंप त्सुनामी विषयी चित्रे कात्रणे संग्रहित करतो.

• भूकंप विषयाची माहिती इंटरनेटवर शोधतो.

• कागदापासून पतंग तयार करतो.

• पतंगाची कृती वर्गात सांगतो.

• विविध माध्यमाद्वारे भिंती सुशोभन करतो.

• सुशोभनासाठी विविध माध्यमे गोळा करतो.

• पिशवी बनविण्याची कृती लिहून आणतो.

• फळांची साठवण जेथे केली जाते अशा ठिकाणाला भेट देतो.

• फळांचे आहारातील महत्त्व स्पष्ट करतो. 

• पाणी मोजण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो.

• पाणी मोजण्यासाठीचे साहित्य गोळा करतो.

• विविध फळांच्या बिया ओळखतो.

• विविध फळांच्या बिया व त्यांची नावे यांचा तक्ता तयार करतो. 

• विविध प्रकारच्या फळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

• फुलझाडांची लागवड करतो.

• भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पोशाख घालणाऱ्या व्यक्तींची चित्रे जमा करतो.

• विविध प्रांतातील पोशाखांची नावे संकलित करतो. 

• हंगामाप्रमाणे फुलझाडांच्या बिया व रोपे यांची नावे सांगतो

• गांडूळ खता विषयी माहिती मिळवितो. 

• गांडूळ खत तयार करण्यापूर्वी कोणते साहित्य लागते यावषयी माहिती मिळवतो.

• वाल्मी संस्थेच्या कार्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधतो. 

• वाल्मी तसेच इतर संस्थांची माहिती संकलित करतो.

• साथीचा आजार व बचाव यावर मित्रांसमवेत चर्चा करतो.

•दुष्काळ पडण्याची कारणे शोधतो.

• दुष्काळापासून बचाव कसा करता येईल याची माहिती लिहितो. 

• कागदी पिशवी तयार करतो.

• विविध प्रकारचे कागद दाखवून कागदाची ओळख सांगतो.

• उदबत्या कशा प्रकारे तयार केल्या जातात याविषयी माहिती मिळवतो.

• उदबत्ती तयार करण्याची कृती क्रमानुसार सांगतो.

• उदबत्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून घेतो. 

• कागदी लगद्यापासून कोणत्या वस्तू तयार केल्या जातात याविषयी माहिती मिळवितो.

• कागदी लगद्यापासून विविध वस्तू तयार करून आणतो.

• लाकूड कामाचा परिचय करून घेतो. 

• लाकूड कामासाठी लागणाऱ्या हत्याराची माहिती मिळवतो.

• लाकूड कामातील सांध्याच्या प्रकाराविषयी सविस्तरपणे लिहितो. 

• बाहुली निर्मितीमध्ये कल्पनाशक्तीचा उपयोग करतो.

• बाहुली कामातील कलेविषयी माहिती समजावून घेतो.

• शाळेतील झाडांना नियमित पाणी घालतो.

• शाळेतील झाडांची काळजी घेतो. 

• वर्गातील मित्र-मैत्रिणींशी मिळून मिसळून राहतो.

No comments:

Post a Comment