DAILY EDUCATION

Monday, February 21, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी विषय कला आणि संगीत

 विषय कला आणि संगीत 








•दिलेल्या सूचनेप्रमाणे हालचाली करतो.

• पायाभूत हालचालींच्या कृतीचे निरीक्षण करतो. 

• शब्द संदेशानुसार अवयवाच्या लयबद्ध हालचाली करतो. 

•ठिपके, रेषा यांच्यापासून चित्र तयार करून दाखवतो.

• ठिपके, रेषा यांचे रेखाटन करतो.

• ठिपके ,रेषा यांची ओळख करून घेतो.

 •विविध रेषांचे रेखाटन करतो.

• प्राण्यावर आधारीत बडबड गीते म्हणतो.

• विविध बडबडगीतांचा सराव करतो.

• समूह गीताचे वर्गात गायन करतो.

• कागदाच्या घड्या घालतो.

 •कागद योग्य रीतीने फाडण्याची कृती करतो.

• विविध प्रकारच्या कागदाची ओळख सांगतो.

 • कागदाचे उपयोग सांगतो.

 • कागदाच्या शिल्पाचा नमुना पाहून त्याचे निरीक्षण करतो. 

•रेखाटन संबंधी विविध माध्यमांची नावे सांगतो.

• रेखाटन कसे करायचे याविषयी माहिती मिळवतो. 

•दिलेल्या आकारावर आधारित विविध माध्यमांद्वारे फळांचे, वस्तूंचे रेखाटन करतो.

 • हात व पायांच्या लयबद्ध हालचाली करतो.

• नृत्याची आवड आहे व त्याची माहिती सांगतो.

• विविध नृत्यांची नावे सांगतो.

• नृत्यांच्या नावांचा तक्ता तयार करतो.

• एक ते आठ आकड्यांच्या विविध प्रकारे टाळ्या वाजवतो.

• फळांचे, वस्तूंचे रेखाटन करतो.

•राष्ट्रगीताचे वैयक्तिक रित्या गायन करतो.

• परिसरातील प्राणी, पक्षांचे निरीक्षण करून त्यांची माहिती मिळेवतो.

• प्राणी, पक्ष्यांची चित्रे जमा करतो.

• स्वतःची व कुटुंबाची माहिती सांगतो.

• विविध प्राण्यांप्रमाणे उड्या मारून दाखवतो.

• प्रार्थनांचा तक्ता तयार करतो.

• प्रार्थनेचे गायन तालासुरात करतो.

• मातीचे विविध प्रकारचे शिल्प, निरीक्षण करतो.

• मातीचे गोल तयार करतो.

• मातीपासून चौकोनी, त्रिकोणी,गोल वस्तू तयार करून आणतो.

• परिसरातील विविध प्राण्यांची व पक्ष्यांची नावे सांगतो.

• मण्यांची माळ तयार करतो.

• बडबड गीतांचे वर्गासमोर सादरीकरण करतो.

• पक्षांवर आधारित बडबडगीतांचा सराव करतो.

• पक्षांवर आधारित बडबड गीतांचा संग्रह करतो.

• स्वतः शी संबंधित स्मरण चित्र काढतो.

• परिचित सोप्या वस्तूचे कल्पनाचित्र काढतो.

• दिलेल्या विषयावर चित्र काढतो.

•कल्पना चित्र काढून दाखवतो.

• परिसरातील सोप्या वस्तूची, गोष्टीची कृती करून दाखवतो. 

• परिसरातील विविध घटकांचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो. 

•परिसरातील गोष्टी शरीर आकृती मधून साकारतो. 

• कागदापासून विविध सोप्या वस्तू तयार करतो.

• कागदी वस्तूची सजावट करतो.

• परिचित गोष्टीचे मुक्त रेखाटन करतो. 

• परिसरातील गोष्टींचे रेखाटन करून आणतो. 

• नमस्काराच्या विविध पद्धतीची कृती करतो.

• कागदाच्या सोप्या वस्तु तयार करून दाखवतो.

• विविध प्रकारच्या चालण्याच्या पद्धतींची कृती करतो. 

• चालण्याच्या विविध पद्धती लयबद्ध रीतीने करतो.

• बडबड-गीतांवर आधारित कृती करतो.

• वर्तमानपत्रातील लोकगीतांचा संग्रह करतो.

• धनगर गीताचे अभिनयासह गायन, सादरीकरण करतो.

• कोळी गीताचे तालासुरात गायन करतो.

• कोळी गीतावर आधारित कृती करतो.

• प्राणी व पक्षी यांच्या प्रमाणे कृती करून दाखवितो.

• प्राणी आणि पक्ष्यांच्या हालचालीचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो.

• काल्पनिक गोष्टीचे चित्र पाहून निरीक्षण करतो.

• काल्पनिक कवितांचे चित्र पाहतो.

• स्मरण चित्र आणि कल्पनाचित्र यांचा फरक समजून घेतो 

• आवडीच्या आकारात नक्षीकाम सजावट आवडत्या रंगाद्वारे करतो 

• ठिपके रेषा त्रिकोण चौकोन या सारख्या आकाराची मांडणी करतो 

• आवडीच्या बियांची विवीध आकारात सजावट करून दाखवतो.

• विविध प्रकारची नाट्य संबंधित गीते गोळा करतो.

• शरीराच्या लयबद्ध हालचालीचे सादरीकरण करतो.

• नाट्य संबंधित गीताचे तालासुरात गायन करतो व त्याची नावे सांगतो.

• आकृतीच्या साह्याने रंगमंचाची मांडणी करतो

• रंगमंच त्यासाठी आवश्यक असणार्‍या साहित्यांची नावे सांगतो.

• रंगमंच यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची माहिती गोळा करतो.

• परिसरातील निरुपयोगी वस्तूंपासून शिल्प तयार करतो. 

• परिसरातील निरुपयोगी वस्तूंचा संग्रह करतो.

• परिसरातील विविध आवाजाची ओळख करून घेतो.

• प्राणी-पक्षी, ढगांचा गडगडाट इत्यादी आवाजांचे अनुकरण करतो.

• मानवनिर्मित विविध गोष्टींचे आवाज काढून दाखवतो. 

• परिसरातील विविध घटकांचे आवाज काढतो.

• निसर्गातील विविध आकाराचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो.

• फळे व वस्तूचे यांत्रिक साधनाशिवाय रेखाटन करण्याचा प्रयत्न करतो.

• यांत्रिक साधनाशिवाय फळे व वस्तूंचे रेखाटन करतो.

• ठसे कामासाठी परिसरातील वस्तूंचा संग्रह करतो.

• ठसे कामासाठी योग्य ती सजावट करतो.

• पार्श्वसंगीत म्हणजे काय हे समजावून घेतो.

• मातीशिल्पाविषयी वर्गात चर्चा करतो.

• पाठ्यपुस्तकातील लहान गोष्टीचे भावपूर्ण वाचन करतो.

• प्राणी-पक्षी यासारख्या सोप्या कथांचे नाट्यरूपात सादरीकरण करतो. 

• जत्रेच्या प्रसंगाचे चित्र रेखाटतो.

• कमी वेळ, जास्त वेळ हे शब्द वापरून शब्दाची ओळख करून घेतो.

• ठसेकामाद्वारे सुंदर चित्र प्रती तयार करतो. 

• कोलाज तंत्राचा सजावटीसाठी वापर करतो.

• सजावट करताना मुद्रा तंत्राचा वापर करतो.

• मातीपासून गोलाकार यावर आधारित सोपे आकारातील फळांचे शिल्प तयार करतो.

• मातीपासून फळाचे आकार तयार करतो.

• मातीपासून विविध फळांची तयार करतो.

• तयार केलेली फळे पाहून त्यांचे नावे सांगतो.

 • सामूहिक संवादाचे हावभावासहवाचन करतो. 

• पडदा व नेपथ्य यांचा वापर करून वर्गात सादरीकरण करतो. 

• प्राण्यांची चित्रे जमा करतो.

• पक्षांची चित्रे जमा करतो. 

•विविध प्राण्यांप्रमाणे हालचाली करतो.

•पक्षांचे आवाज काढतो. 

• रेल्वेगाडी प्रमाणे आवाज काढून कृती करतो.

No comments:

Post a Comment