DAILY EDUCATION

Thursday, September 23, 2021

ओळख थोर नेत्यांची छत्रपतीशाहू महाराज

प्रजावत्सल,दलित बंधू ,समतेचे पुरस्कर्ते, सर्वांगीण दृष्टी असलेले कर्ते समाजसुधारक असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे शाहू महाराज. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळचे नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात आनंदीबाई राणीसाहेब यांनी त्यांना दत्तक घेतले व शाहू छत्रपती असे त्यांचे नाव ठेवले.2 एप्रिल 1894 रोजी महाराजांनी संस्थानाची अधिकार सूत्रे हाती घेतली . सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यरोहणाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते इंग्लंडला गेले या प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले त्यांनी अखिल भारताचा प्रवास करून देशाच्या राजकीय धार्मिक व सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण केले होते. शाहू महाराजांनी राज्यात शिक्षणाचा प्रसार केला बहुजन समाजाला शिकण्यासाठी सक्रीय मदत दिली. कोल्हापूर शहरात निरनिराळ्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली.8 सप्टेंबर 1917 रोजी त्यांनी राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा आदेश काढला व त्याची अंमलबजावणी केली. सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा चिपरीपेटा येथे सुरू केली. अस्पृश्य भेदभाव त्यांना मान्य नव्हते अस्पृश्यांना शिकण्यास उत्तेजन, नोकरीमध्ये संधी, निरनिराळे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन, सहभोजन कार्यक्रम व अस्पृश्यता निर्मूलन परिषदांचे आयोजन अशा सर्वांगीण अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाचा कायदा (1917) आंतरजातीय विवाहाचा कायदा (23 फेब्रुवारी 1918), बहुजन समाजास नोकऱ्यांमध्ये राखीव जागा, स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यात प्रतिबंध करणारा कायदा(1919), घटस्फोटाचा कायदा (1920) यासारखे क्रांतीकारक कायदे शाहू महाराजांनीच केले. शाहू महाराजांनी शाहूपुरी येथे गुळाची पेठ वसवली, स्वस्त धान्याची दुकाने उघडली, राधानगरी हे धरण बांधले.आपल्या जीवन हयातीत शाहु महाराजांनी प्रत्येक घटकासाठी प्रयत्न केले. महाराजांनी कोल्हापुरात 11 जानेवारी 1918 रोजी सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली. शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून, हा दिवस आपण 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा करतो. 6 मे 1922 रोजी मुंबई येथे शाहू महाराजांचा मृत्यू झाला.
---------------------------------------- Prajavatsal, Dalit brothers, advocates of equality, all-round visionary social reformers who can be mentioned as Shahu Maharaj. Shahu Maharaj was born on 26 June 1874 in the Ghatge family of Kagal. His original name was YashwantraPrahuvatsal, Dalit brothers, advocates of equality, all-round visionary social reformers who can be mentioned as Shahu Maharaj. Shahu Maharaj was born on 26 June 1874 in the Ghatge family of Kagal. His original name was Yashwantrao Jaysingrao Ghatge. He was adopted by Anandibai Ranisaheb in the royal family of Kolhapur on 17th March 1884 and renamed as Shahu Chhatrapati. He traveled to England to attend the coronation of King Edward VII. He traveled all over India, observing the political, religious and social conditions of the country. Shahu Maharaj spread education in the state and gave active help to Bahujan Samaj for learning. He established hostels for students of different castes in Kolhapur city. The first school of compulsory education was started at Chipripeta. Untouchability discrimination was not acceptable to them. Efforts were made to eradicate untouchability by encouraging untouchables to learn, job opportunities, promotion of various businesses, banquets and untouchability conferences. Shahu Maharaj enacted revolutionary laws such as the Widow Remarriage Act (1917), the Interracial Marriage Act (February 23, 1918), the Bahujan Samaj Reserved Jobs, the Prohibition of Violence Against Women Act (1919), and the Divorce Act (1920). Shahu Maharaj established a jaggery field at Shahupuri, opened cheap grain shops, built a dam called Radhanagari. Maharaj established a branch of Satyashodhak Samaj in Kolhapur on 11 January 1918 and Arya Samaj in 1918. Shahu Maharaj's birthday June 26, we celebrate this day as 'Social Justice Day'. Shahu Maharaj died on 6 May 1922 in Mumbai

No comments:

Post a Comment