DAILY EDUCATION

Saturday, March 5, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय शारीरिक शिक्षण








• विविध प्रकारच्या हालचाली करून दाखवतो.

• उड्या मारणे, वाकणे, वळणे या हालचालीची कृती करतो.

• इशाऱ्यानुसार जागेवर करावयाच्या हालचालीची कृती करतो.

• विविध व्यायाम प्रकारांची नावे सांगतो.

• उत्तेजक व्यायाम प्रकाराचा सराव करतो. 

• सांध्यासंबंधित सर्व उत्तेजक व्यायाम करून दाखवितो.

• सावधान विश्रामची कृती करतो.

• कवायत संचलन वेळी आरामसेची कृती करून दाखवितो.

• आरामसे या कृतीचा वैयक्तिक सराव करतो.

• सावधान विश्राम या कृतीचा वैयक्तिक सराव करतो.

• विविध प्रकारच्या खेळांची नावे सांगतो.

• खेळांचा तक्ता पाहून त्यातील खेळांची नावे सांगतो.

• परिसरात खेळत असलेल्या स्थानिक खेळांची नावे सांगतो. 

• प्रत्येक खेळात सहभागी होतो.

• क्रीडांगणात मित्रांना मदत करतो.

• खेळांमध्ये प्रामाणिकपणा हा भाव ठेवतो. 

• माहित असलेल्या स्पर्धांची नावे सांगतो.

• उपक्रमावर आधारित असलेल्या लघु खेळांची माहिती संग्रहित करतो.

• उपक्रमावर आधारित स्पर्धेत सहभागी होतो.

• शाळेतील स्पर्धांमध्ये सहभागी होतो.

• आरोग्य संबंधित चांगल्या सवयी सांगतो. 

• आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असतात त्यांची नावे सांगतो.

• क्रीडांगण संबंधित चांगल्या सवयी सांगतो.

• खेळानूरूप पोशाखाची निवड कशी करायची याविषयी माहिती देतो.

• खेळानूरूप पोशाख कसा असतो याविषयी सांगतो.

• जागेवर करावयाच्या हालचालींचा सराव करतो.

• शरीराचा तोल जागच्याजागी कसा सांभाळायचा याची कृती करून दाखवितो.

• उड्या मारत पुढे जाण्याची कृती करतो.

• व्यायाम प्रकारांची नावे सांगतो.

•  ए च्या आकारात धावून दाखवतो.

• बी आणि सी च्या आकारात धावतो.

• बेडूक उडी मारून दाखवितो.

• हत्तीच्या चालीचे अनुकरण करतो.

• विविध प्राण्यांच्या हालचाली करण्याच्या स्पर्धेत सहभागी होतो.

• विविध प्राण्यांच्या हालचालीचे अनुकरण करतो.

• पारंपारिक खेळांची नावे सांगतो.

• पारंपारिक खेळाची चित्रासह माहिती संग्रहित करतो.

• क्रीडांगणावर पारंपारिक खेळ खेळतो.

• उपक्रमावर आधारित असलेल्या स्पर्धांची नावे सांगतो.

• उपक्रमावर आधारित विविध प्रकारच्या लघु खेळात सहभागी होतो.

• विविध प्रकारच्या व्यायाम प्रकाराचा तक्ता चित्राद्वारे तयार करतो. 

• स्वच्छतागृहाच्या वापरा विषयी माहिती सांगतो.

• वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व जाणतो.

• वर्गातील क्रीडांगणा संबंधित चार्टचे निरीक्षण करतो.

• शाळेचे मैदान स्वच्छ ठेवतो.

• मैदान स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• कवायत योग्यरीत्या करतो.

• धावण्याचे प्रात्यक्षिक मैदानावर करून दाखवतो.

• जागेवर लंगडी घालत पुढे जाण्याची कृती करतो. 

• इशाऱ्यानुसार विविध प्रकारच्या हालचाली करून दाखवितो.

• गॅलपिंग ची हालचाल करून दाखवितो.

• तालबद्ध व्यायाम प्रकाराची नावे सांगतो.

• ससाहित्य व्यायाम प्रकार तालबद्ध रितीने करतो.

• डंबेल्स व्यायाम प्रकार कृतीसह करून दाखवितो. 

• तालबद्ध व्यायाम प्रकारांचा सराव करतो.

• सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकाराची ओळख करून घेतो.

• सूर्यनमस्काराची कृती करून दाखवितो.

• लटकणे ही कृती करून दाखवितो.

• परिसरातील खेळांची नावे सांगतो.

• लघु खेळांची नावे सांगतो. 

• आरोग्याशी संबंधित चांगल्या सवयींची माहिती सांगतो.

• विश्रांतीचे महत्त्व जाणतो.

• आरोग्य चांगले राहण्यासाठी झोपेची आवश्यकता का आहे याचे कारण सांगतो.

• विश्रांती व झोप शरीराला आवश्यक आहे त्याविषयी माहिती सांगतो.

• मैदानाची स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो.

 • मैदानाची सुरक्षितता कशी करावी याविषयी सांगतो.

• मैदानाची सुरक्षितता करतेवेळी कोणती काळजी घ्यावी याविषयी सांगतो. 

• मुख्य खेळांची नावे सांगतो.

• खेळांच्या क्रीडांगणाच्या आखणी वेळी मदत करतो.

• कबड्डी या खेळात सहभागी होतो.

• सहकार्‍यांसह विविध हालचाली करतो.

• सूचनेनुसार कृती करतो.

• विविध प्रकारच्या हालचाली साहित्य व सहकाऱ्यांसह करतो. 

• व्यायाम प्रकाराची नावे सांगतो.

• दोरीवरून उड्या मारतो. 

• गतिरोधक मालिकेवरुन धावण्याचा सराव करतो.

• खेकडा चालीची कृती करून दाखवितो.

• जलद चालणे व पळणे या दोन्ही कृतीचा सराव करतो.

• खांबाला वळसा घालून दाखविण्याची कृती करतो.

• आरोग्यविषयक वाईट सवयीची माहिती सांगतो.

• वाईट सवयी वर उपाय योजना यावरील चर्चेत सहभागी होतो.

• वाईट सवयींचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात याविषयी माहिती मिळवितो.

• प्रथमोपचार म्हणजे काय हे समजावून घेतो.

• प्रथमोपचार पेटीतील साहित्याची नावे सांगतो.

• क्रीडांगणावर प्रथमोपचार पेटीचे महत्व समजावून घेतो.

• योगाविषयी माहिती मिळवितो.

• योगाभ्यासाचे महत्त्व समजावून घेतो.

• योगाची कृती करून दाखवितो.

• क्रीडा स्पर्धेचे महत्त्व समजावून घेतो.

• क्रीडा स्पर्धांच्या साहित्याची ओळख करून घेतो.

• क्रीडा स्पर्धेमध्ये स्थळांची नावे सांगतो.

1 comment: