DAILY EDUCATION

Friday, October 1, 2021

ओळख थोर नेत्यांची महात्मा गांधी

        महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींनी मुंबईत उच्च शिक्षण घेतले व इंग्लंड येथून 'बॅरिस्टर' ही पदवी मिळवली. गांधीजींनी प्रथम राजकोट व नंतर मुंबई येथे काही काळ वकिली केली. आफ्रिकेत असताना जॉन रस्किनच्या 'अन् टू धीस लास्ट' या पुस्तकाचा गांधीजीवर प्रभाव पडला. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी मजुरांचा प्रश्न सोडविला तसेच नाताळ येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग यशस्वी करुन हिंदी लोकांवरील अन्याय निर्बंध दूर केले. 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात परतले तो दिवस'प्रवासी दिन' म्हणून साजरा केला जातो. भारतात परतल्यानंतर गांधीजींनी भारतातील जनतेच्या समस्या बघितल्या, शेतकरी दलित कामगार यांचे प्रश्न सोडविण्यास गांधीजींनी प्राधान्य दिले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा गांधीजींनी स्वीकार केला.
गांधीजींनी सत्याग्रह,असहकार चळवळ,सविनय कायदेभंग या मार्गांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. ब्रिटिशांच्या वस्तू,कार्यालय,नोकरीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले गांधीजी स्वतः चरख्यावर सूत कातून खादीची वस्त्र वापरू लागले.
ब्रिटिशांचे सर्व जुलमी कायदे मोडण्यासाठी गांधीजींनी प्रतीकात्मक असा मिठाचा सत्याग्रह केला 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून 385 किलोमीटर वरील दांडी येथे प्रयाण केले. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून अन्यायकारक कायद्याना विरोध केला. 8 ऑगस्ट 1942 रोजी चले जाव ही घोषणा देऊन गांधीजींनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींनी 'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे स्वतःच्या आयुष्याचा प्रवास लिहिलेला आहे. गांधीजींना आपण सर्वजण 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधतो. 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थनास्थळी जात असताना नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळ्या घालून गांधीजींना ठार केले. ________________________________________      Gandhi was born on 2 October 1869 in Porbandar, Gujarat. His full name was Mohandas Karamchand Gandhi. Gandhi received his higher education in Mumbai and obtained the degree of 'Barrister' from England. Gandhiji practiced law for some time, first in Rajkot and then in Mumbai. While in Africa, John Ruskin's book 'To This Last' influenced Gandhiji. Gandhi solved the problem of Hindi workers in South Africa and also removed the unjust restrictions on the Hindi people by successfully conducting the first experiment of Satyagraha at Christmas. The day Gandhiji returned to India on January 9, 1915 is celebrated as 'Traveler's Day'. After returning to India, Gandhiji saw the problems of the people of India, Gandhiji gave priority to solving the problems of farmers and dalit workers. Gandhiji spent his entire life to give India independence. Gandhiji accepted the principles of truth and non-violence.
Gandhiji fought against the British through satyagraha, non-cooperation movement, civil disobedience. Motivating people to give up British goods, offices, jobs Gandhiji himself started using khadi cloth by spinning on a spinning wheel.
Gandhiji carried out a symbolic salt satyagraha to break all the oppressive laws of the British. On March 12, 1930, Gandhiji left Sabarmati Ashram for Dandi, 385 km away. On April 6, 1930, Gandhiji broke the Salt Act and opposed the unjust law. Announcing his departure on August 8, 1942, Gandhi fled the British. Gandhiji has written his own life journey in the book 'My Truth Experiments'. We all call Gandhiji the 'Father of the Nation'. October 2, his birthday, is celebrated as the International Day of Non-Violence. On January 30, 1948, while going to the place of worship, Nathuram Godse shot and killed Gandhiji.

No comments:

Post a Comment