DAILY EDUCATION

Thursday, August 25, 2022

इयत्ता पाचवी उपक्रम यादी सर्व विषय

 




* भाषा  

•पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरून चित्रे जमविणे.

•गीतांचा संग्रह करणे.

•लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांच्या विषयी माहिती मिळविणे.

•आईच्या, मित्रांच्या, वडिलांच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करणे.

•भारतीय धावपटू कविता राऊत विषय अधिक माहिती मिळवा.

 •माझी आई या विषयावर निबंध लिहा. 

•पाऊस विषयावरील कवितांचा संग्रह करणे. 

•पाऊस विषयावरील चित्रांचा संग्रह करणे. 

•विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह करणे.

• समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.

•विविध प्राणी, पक्षी, झाडे, व्यक्ती यांच्या नावावरून गावांची नावे पडतात त्यांची यादी करणे.

•विविध पत्राचे नमुने जमा करणे.

• परिसरात सण समारंभाच्या दिवशी गायली जाणारी गाणी संग्रहित करणे.

•वर्तमानपत्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांचा संग्रह करणे. 

•शेतीवर आधारित गाण्यांचा संग्रह करणे. 

•गावातील व्यक्तींची मुलाखत घेणे उदा. सरपंच, शिक्षक शेतकरी, दुकानदार, तलाठी, डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक

• शैक्षणिक संस्था स्थापन केलेल्या थोर समाज सुधारकांचे फोटो मिळवा, माहिती लिहा, संग्रह करा 

• तुमच्या वडिलांना पत्र लिहा.

• बैलपोळा विषयी  अधिक माहिती मिळवा.

• वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करणे.

• भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे. 

• शिक्षकांच्या मदतीने ऐतिहासिक काळातील एखाद्या घटनेची माहिती मिळवा उदाहरणार्थ मोहेंजोदारो, हडप्पा संस्कृती किल्लारीचा भूकंप

 * गणित 

•रोमन संख्या चिन्हांची यादी तयार करणे. 

•पुठ्ठयांचे विविध आकार तयार करणे.

 • गुणाकार व  भागाकार यांच्या  शाब्दिक उदाहरणांचा संग्रह करणे.

 • कंपास पेटीतील  साहित्य याविषयी माहिती मिळविणे

•बिलांच्या पावत्यांचा संग्रह करणे. 

•व्याख्या सूत्र व नियमांचे संकलन करणे.

 •तुमच्या वर्गाचे क्षेत्रफळ काढा

 •कोनमापक, कंपास, मोजपट्टी इत्यादीच्या साह्याने त्रिकोणाचे मापे नोंदणी

 • गणितातील विविध सूत्रांविषयी माहिती मिळवा व यादी तयार करणे 

•दुकानात भेट देऊन व्यवहार करणे

• वस्तूंचा साह्याने भागाकार करणे

• घड्याळात किती वाजता कोणत्या कोण तयार होतो याची यादी तयार करणे

• पाढे म्हणणे व यादी तयार करणे

गावातील रेशन दुकानात भेट देऊन एका महिन्यात येणारी धान्य व वाटले जाणारी धान्य शिल्लक यांच्या नोंदी करणे

* परिसर अभ्यास भाग 1 

•उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग लिहणे

•परिसरातील सजीव निर्जीव यादी करणे

•वृक्ष त्यांचे अवयव व उपयोग सांगणे

•प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग सांगणे, लिहणे

•सूर्यमाला काढणे व त्यात ग्रह व उपग्रह दाखविणे 

•महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे याची यादी तयार करणे 

 •परिसरातील औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग याची यादी करणे

•नकाशा तयार करणे

 •मराठी दिनदर्शिकातील कोणत्याही एका महिन्याच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्याच्या तिथींची नावे नोंदवून त्याविषयी अधिक माहिती मिळवा 

•वातावरणाच्या थरांविषयी अधिक माहिती मिळवा 

•शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध याचा तक्ता तयार करणे

 •पर्यावरण संतुलनावर आधारित घोषवाक्य तयार करा 

•सांकेतिक खुणा व सांकेतिक चिन्हे यांची यादी तयार करा 

•पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची माहिती लिहिणे

•पाण्याच्या स्त्रोता विषयी माहिती संकलित करणे

•भारतातील राज्य व तेथील बोलीभाषा वेशभूषा खाद्यपदार्थ घरी व राजधानी यांची यादी तयार करा 

•पदार्थाचे नाव व त्याची स्थायूद्र व वायू गटात विभागणी असलेला तक्ता तयार करून वर्गात लावणे

• कोणत्याही एका लघु उद्योगास भेट देणे व माहिती गोळा करणे लोणचे पापड सरबत इत्यादी 

•प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम याविषयीची माहिती चित्रासह संकलित करणे

 *परिसर अभ्यास भाग 2

 •तुमच्या गावातील किंवा परिसरातील 

•ऐतिहासिक वस्तूंची आणि प्राचीन धार्मिक संस्थांची माहिती व चित्रे संकलित करा 

•दिलेल्या मासिक नियोजनानुसार स्वतःचे मासिक नियोजन करा

• भारताने 5 नोवेंबर 2013 रोजी अवकाशात पाठवलेल्या चंद्रयान मोहिमेबाबत माहिती मिळवा 

•अपृष्ठवंशीय सजीव पृष्ठवंशीय सजीव यांचे चित्रे जमवा व ती वहीत चिटकवून प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा 

•येणाऱ्या ऐतिहासिक बातम्यांचा संग्रह करणे 

•इतिहासावर आधारित म्हणींचा संग्रह करणे यांच्या विषयी माहिती मिळवा 

•ऐतिहासिक वास्तूंचे जतन कसे करावे याविषयी माहिती मिळविणे 

•ऋतू महिने व पिके यांचा तक्ता तयार करणे 

•खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे धान्याचे नमुने गोळा करणे विविध देशांच्या नकाशांचे संकलन करणे

•विलार्ड लीबी यांच्या विषयी माहिती मिळवा

 •पृथ्वीच्या उत्पत्ती विषयी माहिती गोळा करणे 

•ऐतिहासिक वस्तूंचा चित्रांचा संग्रह करणे 

•गावच्या बाजाराला भेट देऊन वस्तूंची यादी करणे 

•परिसरातील प्रदूषणाची कारणे शोधून त्यांची यादी तयार करणे

 *इंग्रजी 

• Creating a family tree. 

• Presentingg English dramas 

• List the names of English authors and writers and their books. 

• Making English Sentences

• Making a Chart of Tenses

• create a puzzles and riddles 

• tell the story 

• make a list of slogans 

• Making a table of punctuation marks

• Make simple opposite words

• List names of birds and animals their young ones their females and their leaving places 

• Finding a small words from the bigger ones 

• Make a list of singular and plural

• Short conversation 

• Creating messages 

•Creating a list of simple English words with Marathi meaning

 

* कला आणि संगीत

•विविध चित्रे काढून त्यात रंग भरणे

•बडबड गीते देशभक्तीपर गीते लोकगीते तालासुरात म्हणणे 

•गाण्यांमध्ये,कथेमध्ये प्राणी, पक्षी, वाहन इत्यादींचा आवाज काढून पार्श्व संगीत देणे

 •सर्व वाद्ये व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळवणे

 •विविध वाद्यांचा चित्रांसह संग्रह करणे

 •चित्रकाराची मुलाखत घेणे

• सणाचे महत्त्व सांगणे

• मानवी चित्र रेखाटणे

• निसर्ग चित्र रेखाटणे 

•छोटा अभिनय करणे

• प्रथम श्रेणी रंग व द्वितीय श्रेणी रंग या विषयी माहिती मिळवा

 •वल्हवा र वल्हवा यासारख्या गीतांच्या संग्रह करणे 

*कार्यानुभव

• नैसर्गिक आपत्ती संबंधित बातम्यांचे कात्रणे वहीत चिटकवणे

 •पालेभाज्या, फळभाज्या चित्रांचा संग्रह करणे

• शेतीकामाच्या साधनांचे चित्र संग्रह करणे

• बांबू उद्योग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळवणे

 •फुलांचा हार तयार करणे

 •औषधी वनस्पती विषयी माहिती मिळवणे

 •राखी तयार करणे

 •तुमच्या परिसरातील मातींचे वेगळे वेगळे नमुने गोळा करा व माहिती मिळवा 

•कागदापासून होडी तलवार टोपी बनविणे

 • संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे

 •प्रकृती तयार करणे  

*शारीरिक शिक्षण

• सूर्यनमस्काराविषयी माहिती मिळवणे व त्यातील विविध कृतींचे चित्र गोळा करणे 

•कोणत्याही एका मुख्य खेळाविषयी माहिती मिळवा बास्केटबॉल, टेनिस, कबड्डी, क्रिकेट

• खेळ व त्यासाठी प्रसिद्ध देश यादी तयार करणे.

• मानवी मनोरे करणे. 

• भारतीय खेळाडू व ते खेळत असलेले खेळ त्यांची यादी तयार करणे. 

• योगासनांचे प्रकार व माहिती मिळवणे. 

• लाठीचे प्रकार व मूलभूत क्रियांविषयी माहिती मिळवणे.

• स्थानिक पारंपरिक खेळ घेणे. 

• टिपरी,  लेझीम व त्यांचे प्रकार माहिती मिळवणे. 

• अथलेटिक उपक्रम उदाहरणार्थ उड्या मारत पुढे जाणे. 

• पायमागे दुमडत धावणे. 

• जागेवर उड्या मारणे. 

• गतिरोधक मालिका 

• खेळ व त्यासाठी प्रसिद्ध खेळाडू यांचा तक्ता बनविणे 

• खेळाडूंना मिळालेले पुरस्कार व व त्यांची नावे याचा तक्ता बनविणे.

• राष्ट्रकुल स्पर्धेविषयीची माहिती संग्रहित करणे.

• ऑलम्पिक स्पर्धेविषयीची माहिती संकलित करणे.

• भारतात आतापर्यंत किती खेळाडूंना ऑलम्पिक पुरस्कार मिळाला याचा तक्ता तयार करणे.



No comments:

Post a Comment