DAILY EDUCATION

Showing posts with label संतांची माहिती. Show all posts
Showing posts with label संतांची माहिती. Show all posts

Thursday, October 7, 2021

October 07, 2021

संत ज्ञानेश्वर

 संत ज्ञानेश्वर



संत ज्ञानेश्वर यांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव येथे 1275 मध्ये झाला.त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण.संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. घर सोडले होते, पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत लोकांनी त्यांना वाळीत टाकले टाकले होते, त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले असता लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोलणे ऐकावे लागले याचे त्यांना खूप वाईट वाटले ते दार बंद करून ते आत दुःख करत बसले तेव्हा त्यांची बहीण मुक्ताई तेथे आली तिने ज्ञानेश्वरांना उपदेश केला बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला आणि दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना उपदेश केला. त्याकाळी ग्रंथाचे ज्ञान हे संस्कृत मध्ये होते सामान्य लोकांना त्यातले काही कळत नव्हते, सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून 'ज्ञानेश्वरी' हा फार मोठा ग्रंथ लिहिला. आणि सर्वांना धर्माच्या ज्ञानाचे भांडार खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, चांगदेव-पासष्टी, अमृतानुभव, शेकडो मराठी अभंग, ज्ञानेश्वर हरिपाठ, स्फुटकाव्य असे अनेक ग्रंथ लिहिले.
संत नामदेवाच्या सोबतीने भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. "ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा"असा कळकळीचा उपदेश त्यांनी केला. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वर आणि तरुण वयात 22व्या वर्षी पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी-कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात.
_________________________________________
Saint Dnyaneshwar

Saint Dnyaneshwar was born in 1275 at Apegaon in Aurangabad district of Maharashtra. His father's name was Vitthalpant and his mother's name was Rukmini. Nivruttinath and Sopandev are his brothers. Muktabai was his sister. Saint Dnyaneshwar's father had retired. He had left home, but later on the order of Guru, he came back home and started living. Later, the Karmaths of that time did not accept that they had four children. Once Dnyaneshwar went to the village with a begging bag, people did not beg him. He was very sorry that he had to listen to the madman everywhere. He closed the door and sat inside in grief. His sister Muktai came there. She preached to Dnyaneshwar. Dnyaneshwar preached to the people when the poor and backward people were being persecuted in the name of religion. At that time, the knowledge of the scriptures was in Sanskrit. The common people did not understand any of it. And opened the storehouse of knowledge of religion to all. Saint Dnyaneshwar wrote many books such as Bhavarthadeepika i.e. Dnyaneshwari, Changdev-Pasashti, Amritanubhav, hundreds of Marathi Abhangs, Dnyaneshwar Haripath, Sfutkavya.
 Along with Saint Namdeo, he propagated and spread Bhagwat Dharma and Warakari sect. "Have faith in God. Treat everyone equally. Help the miserable people, take away their sorrow," he preached. Taught people brotherhood. Dnyaneshwar and Samadhi at Alandi near Pune at the young age of 22. Millions of people still go to Alandi Pandhari every year on Ashadi-Kartiki with great devotion.
_______________________________

Wednesday, October 6, 2021

October 06, 2021

संत नामदेव

 संत नामदेव


संत नामदेव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नरसी या गावी 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी तर आईचे नाव गोणाई असे होते. संत नामदेव यांचे गुरूंचे नाव विसोबा खेचर असे होते. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अभंग,कीर्तने रचून जनतेत जागृती निर्माण केली. भागवत धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण केले त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी भारतभर मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले असता तेथील लोकांना त्यांनी समतेचा संदेश दिला, हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची पदे शीख लोकांच्या 'गुरुग्रंथसाहिब 'या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथात त्यांची 61 पदे,3 श्लोक व 18 राग आढळून येतात. संत नामदेव यांना संत शिरोमणी या नावाने देखील ओळखले जाते. संत नामदेव यांचा मृत्यू 3 जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे झाला.
______________________________________________
Saint Namdev

Saint Namdev was born on 26 October 1270 in the village of Narsi in Satara district. His father's name was Damasheti and his mother's name was Gonai. Saint Namdev's guru's name was Visoba Khechar. Saint Namdev was an ardent devotee of Vitthal. He created awareness among the masses by composing Abhang, Kirtan. He traveled all over Maharashtra to spread Bhagwat Dharma and taught devotion to the people. He created a strong determination in the minds of the people for the protection of Dharma and the path of devotion. Saint Namdeo spread the message of human religion all over India. When he went to Punjab, he gave a message of equality to the people there. He wrote verses in Hindi. His verses are included in the Sikh scripture 'Gurugranth Sahib'. Guru Granth Sahib contains 61 verses, 3 verses and 18 ragas. Saint Namdev is also known as Saint Shiromani. Saint Namdev died on 3rd July 1350 at Pandharpur.

Tuesday, October 5, 2021

October 05, 2021

संतांची कामगिरी



श्रीचक्रधर स्वामी


12 व्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरातमधील भडोच येथे शके 1142 विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव विशाळदेव तर आईचे नाव म्हाळईसाअसे होते. श्री चक्रधर स्वामी यांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते.
चक्रधर स्वामींचा हा आवडता छंद म्हणजे आजारी लोकांची सेवा करणे.त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून, वैराग्य वृत्ती धारण केली. भ्रमण करत असताना हरपाळदेव ऋद्धीपूर येथेआले, तेथे त्यांची भेट गोविंदप्रभू यांच्याशी झाली. गोविंदप्रभू पासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या, गोविंदप्रभू यांनी त्यांना 'चक्रधर' हे नाव दिले. महाराष्ट्रात भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास 'महानुभाव' पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लिळाचरित्र हा ग्रंथ होय.
_________________________________________
Sree Chakradhar Swami


Chakradhar Swami was born on the Sunday of Shukla Paksha in the month of Shake 1142 Vikram Sanvatsar Bhadrapad at Bhadoch in Gujarat in the first half of the 12th century. His father's name was Vishaldev and his mother's name was Mhalaisa. Shri Chakradhar Swami's birth name was Harpaldev.
Chakradhar Swami's favorite hobby is to serve the sick people. While traveling, Harpaldev came to Riddhipur, where he met Govindprabhu. Harpaldev received power from Govindprabhu, who gave him the name 'Chakradhar'. While touring Maharashtra, he preached equality. They did not accept gender discrimination. So he got many male and female followers. The sect he founded is called 'Mahanubhav' sect. Lilacharitra is a collection of memories of Shri Chakradhar Swami _________________________________________.