DAILY EDUCATION

Thursday, February 17, 2022

शिवाजी महाराज

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

 दरसाल आपण ज्यांची जयंती मोठ्या उत्सवाने, आनंदाने, अभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे देशभर साजरी करतो असे थोर शिवाजी महाराज. यांच्याविषयी माहिती 














*शिवाजी महाराजांचे घराणे

शिवाजी महाराजांचे घराणे हे भोसले घराणे, मूळचे वेरुळचे. मालोजी भोसले हे वेरूळला राहात असत. वेरुळ गावचे ते पाटील होते. मालोजीराजे भोसले हे  शिवाजी महाराजांचे आजोबा होते. मालोजी यांच्या लहान भावाचे नाव विठोजीराजे असे होते. 

वेरूळच्या बाबाजी भोसले यांची ही मुले. वेरुळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसलेकडे होती. मालोजीराजे आणि विठोजीराजे हे मोठे कर्तबगार आणि शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा वजीर होता. तो कर्तबगार आणि हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहा जवळ त्यांच्या कर्तबगारीची माहिती सांगितली. आणि  निजामशहाने मालोजीराजे याना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली.

मालोजीराजे यांच्या पत्नीचे नाव उमाबाई. या उभयतांना दोन मुले होते एक शहाजी आणि दुसरा शरीफजी. शहाजीराजे लहान असतांना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत ठार झाले. पुढे विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. त्यांनी शहाजीसाठी सिंदखेडच्या लखुजीराव जाधव यांची मुलगी जिजाबाई हिला मागणी घातली आणि जिजाबाई या भोसले घराण्याच्या सून झाल्या.

    निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. दरबारात त्यांना मान होता. जेव्हा आदिलशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला तेव्हा मलिक अंबर व शहाजीराजे पराक्रमाने लढले त्यांनी आदिलशहाच्या फौजांचा पराभव केला. अहमदनगर जवळ भातवडी येथे ही लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले.

*शिवाजी महाराजांचा जन्म 

शहाजीराजांना पुण्याची जहागिरी दिली होती. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख केले होते. शहाजीराजांना अतिशय धावपळ करावी लागत होती. जिजाबाई या गरोदर होत्या. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले.शिवनेरी हा पुणे किल्ल्यातील जुन्नर जवळील किल्ला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव  ' शिवाजी ' ठेवले 

* शिवाजी महाराजांचे बालपण आणि शिक्षण 




      लहानपणापासूनच जिजाबाई शिवरायांना शिक्षणाचे बाळकडू पाजीत होत्या. अत्यंत धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. त्यांना त्या रामाच्या आणि कृष्णाच्या, भिमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. संतांचे अभंग म्हणून दाखवत. गरीब मावळ्यांची मुले हीच शिवरायांची सोबती होते. मातीचे हत्ती-घोडे बनविणे, मातीचे किल्ले बनवणे हा त्यांचा छंद. लपंडाव, चेंडू, भवरा हे खेळ ती मुले खेळत आणि शिवाजी महाराजही मुलांबरोबर हे खेळ खेळत असत.

शहाजीराजे लढाईत व्यस्त असल्यामुळे शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ आणि शिवबाची धावपळ चालू असायची. वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानावर पडत. कर्नाटकात आल्यावर शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना थोडा स्वस्थपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. आदिलशहाने बंगळूरची जहागिरी त्यांना बक्षीस दिली. शहाजीराजांनी बंगळूरचे मुख्य ठाणे केले आणि तेथे वैभवात राहू लागले.

* शिवरायांचे शिक्षण 


शहाजी राजांनी शिवरायांसाठी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. वयाची सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. शिवराय लिहिण्या-वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते वाचत. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली. त्यांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे अशा विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला.

शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालू राहिले. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या, जिजाबाई यादेखील काही सामान्य स्त्री नव्हत्या लखुजीराव जाधव सारख्या बलाढ्य सरदारांची त्या कन्या होत्या आणि शहाजीराजांचा सारख्या पराक्रमी पुरुष यांच्या पत्नी होत्या. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासून मिळाले होते. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्य प्रिय होत्या. त्यामुळे परक्यांची चाकरी करणे याचे त्यांना वाईट वाटत होते. आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन करावे या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. पुणे जहागिरीत आता जिजाबाईच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला होता. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी दिली होती. शिवराय या सर्वांच्या मदतीने जहागिरीचा कारभार पाहू लागले लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी कडे लक्ष देऊ लागले. एक प्रकारे जहागिरीचा कायापालटच होत होता.

*शिवाजी महाराजांचे लग्न

शिवरायांचा विवाह त्या काळी अगदी लहानपणी लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजाबाईंनी शिवरायांचे लग्न करण्याचे ठरवले. मग शिवबा करता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ही मुलगी. सईबाई निंबाळकर सोबत शिवरायांचा विवाह थाटामाटाने सजरा झाला 

*स्वराज्यस्थापना प्रतिज्ञा 

शिवराय वयाने खूप लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे मनाशी ठरवले होते.1645 साली शिवराय आणि त्यांचे मावळे मित्रमंडळी सर्वजण रायरेश्वराच्या मंदिरात गेले होते. त्यांनी मित्रांना आपल्या मनातील स्वराज्य स्थापनेचा मनोदय सांगितला आणि मित्र देखील त्यांच्या मागे उभे राहण्यास तयार झाले. त्यांच्यासाठी जीव देण्यास ते तयार झाले. सर्व मित्र आणि शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि आशीर्वाद घेण्यासाठी जिजाबाई कडे गेले आपण मनी धरले ते शिवाजीराजे पूर्ण करणार अशी विश्वास  जिजाबाईंना वाटू लागला.

शिवराय स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करत, घोडदौड करणे, डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी, घाट, चोरवाटा निरखणे असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. तरुण मावळे शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे असे मानू लागले. शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह चोरवाटा, भुयारे, तळघरे , दारूगोळे, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणे यांची माहिती मिळविली. ज्यांनी शिवरायांना विरोध केला त्यांनाही शिवरायांनी गोड शब्दांनी आपलेसे केले. ज्यांनी दांडगाई केली त्यांना वठणीवर आणले मावळे खोऱ्यातील सर्व मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली.

*शिवाजी महाराजांची राजमुद्रा 





शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला. शिवरायांनी शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार करून घेतली होती. ती मुद्रा अशी--

        प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||

      शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदय होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे; असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात राजमुद्रा बहुदा फारसी भाषेत कोरलेल्या असत. पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती.

*स्वराज्य निर्मिती व स्वराज्यावरील संकटे

शिवराय आणि त्यांचे मावळे मित्र स्वराज्यस्थापनेच्या तयारीला लागले. स्वराज्य स्थापन करायचे त्यासाठी किल्ले हवे होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्यय. किल्ला ताब्यात असला की प्रदेशावर सत्ता चालते. किल्ला म्हणजेच राज्याचा आधार तेव्हा किल्ला हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले आणि त्यांच्या डोळ्यासमोर पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात असलेला तोरणा किल्ला.  महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. या किल्ल्यावर तोरण जाईचे देऊळ आहे म्हणून किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. या किल्ल्याकडे आदिलशहाचे लक्ष नव्हते शिवरायांनी हेच हेरले आणि त्यांनी या किल्ल्यात वर मराठ्यांचे निशाण उभारले येसाजी कंक याने चौकीवर पहारे बसविले. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. त्यानंतर तोरण्यापासून पंधरा किलोमीटर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे तेथेही आदिलशहाने एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावर पहारा ढिला होता, तेव्हा स्वराज्याचा राजधानीसाठी शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घ्यायचे ठरविले. हा किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी याला राजगड असे नाव दिले आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली.त्यानंतर लगेचच शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही काबीज केले. रोहिडा किल्ला ताब्यात घेतला अशाप्रकारे स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. 

जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील रायरीचा किल्ला खूप महत्त्वाचा होता. शिवरायांनी जावळीवर स्वारी केली हा किल्ला त्यांनी तीन महिने लढविला. रायरीचा हा प्रचंड किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आला. त्यांनी या किल्ल्याचे नाव ' रायगड 'असे ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव प्रतापगड.

        स्वराज्याचे कार्य करीत असताना शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले शिवाजी महाराज किल्ले जिंकत असल्यामुळे आदिलशहा चिडला होता त्याने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजलखानाला पाठवले. परंतु शिवरायांनी युक्तीने अफजलखानाचा पासून स्वतःला वाचवले.

        अफजलखानाचा वध झाल्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला व त्याने शिवरायांना पकडण्यासाठी सिद्दी जौहरला पाठविले. सिद्दी जौहरच्या वेढ्यातून शिवराय सुखरूप निसटले. परंतु या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांची घोडखिंड येथे सिद्धी मसऊद सोबत लढाई होऊन बाजीप्रभू देशपांडे यांना या लढाईत वीरमरण आले. घोडखिंड येथे ही लढाई झाल्यामुळे घोडखिंड पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली.

      शिवाजी महाराजावर औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याचेही असेच संकट चालून आले होते. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला पण पुरंदर ताब्यात येईना मग शाहिस्ताखान पुण्याकडे वळला त्याने चाकणचा किल्ला घेतला त्यानंतर शाहिस्ताखान पुण्यात आला त्यावेळी त्याने शिवरायाच्या लाल महालात मुक्काम ठोकला होता. तो आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी, त्यांची गुरे ओढून आणी. शेतीची नासधूस करी. त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उध्वस्त केला होता. त्याच्यावरही शिवरायांनी युक्तीने हल्ला करून शाहिस्तेखानाला सळो की पळो करून सोडले.

       शिवरायांना आता मुघल बादशहा औरंगजेब हा नवीन शत्रू निर्माण झाला होता. पुरंदरचा किल्ला घेण्यासाठी त्याने दिलेरखानाला पाठविले. परंतु पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा शूरवीर होता त्याने दिलेरखानास सोबत युद्ध केले. शर्थीने तो लढला या लढाईत मुरारबाजीचा मृत्यू झाला. आपले शूर वीर सरदार विनाकारण मारले जात आहेत हे ओळखून शिवरायांनी दिलेरखानास सोबत १६६५ साली तह केला. यात तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलुख देण्याचे शिवरायांनी कबूल केले आणि याच वेळी आग्र्याला जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे मिर्झाराजे जयसिंग याने त्यांना सुचविले.

      औरंगजेब बादशहाला भेटण्यासाठी आग्र्याला गेले असता तेथे औरंगजेब बादशहाने शिवरायांना दगलबाजीने कैद केले परंतु आजाराचे सोंग घेऊन मोठ्या युक्तीने शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले.

असे एक ना अनेक प्रसंग शिवरायांच्या वाट्याला येत होते तरीही शिवराय मोठ्या कर्तबगारीने आणि हुशारीने, काही ठिकाणी शक्तीने तर काही ठिकाणी युक्तीचा वापर करून स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न करत होते. शिवरायांनी जवळ जवळ सर्व महाराष्ट्र प्रदेश स्वतःच्या ताब्यात काबीज केला होता आणि शेवटी स्वराज्य उभे केले. 

 *शिवरायांचा राज्याभिषेक 





स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांना मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना केली शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. कारण रायगड हा मजबूत किल्ला होता तसेच त्या किल्ल्यावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. राज्याभिषेकासाठी शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले मौल्यवान रत्ने जडवलेली शुभ्र छत्र बसवले राजेरजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रण दिली राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तनद्या आणि समुद्र यांचे पाणी आणण्यासाठी माणसे गेली. शिवरायांवर  नद्या आणि समुद्राच्या पाण्याचा जलाभिषेक झाला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला गडावर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जयजयकार झाला. अशाप्रकारे सन १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि त्या सालापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजन जमा झाले होते.

*शिवरायांचे व्यवस्थापन व प्रजेचे रक्षण 

त्यानंतरही शिवराय स्वस्थ बसले नाही. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी केली. शिवराय पूर्व किनार्‍यावर आले चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे हा रायगड प्रमाणे प्रचंड आणि मजबूत आहे त्याला वेढा घालून शिवरायांनी तो किल्ला जिंकला नंतर त्यांनी वेलुरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ला सर केला. शिवाजी महाराज हे थोर सेनानी, कुशल संघटक, कुशल व्यवस्थापक होते जसे त्यांनी गडकोट किल्ले जिंकले त्या प्रमाणे शिवरायांनी वनदुर्ग, गिरीदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले जलदुर्गला जंजिरा असेही म्हणतात. शिवाजी महाराज यांनी हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव यात अज्ञान करवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवीन किल्ले बांधले. शिवरायांकडे सुमारे तीनशे किल्ले होते. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी ' आज्ञापत्र ' हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते. या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे प्रतिबिंब उमटले आहे. 

शिवरायांनी ज्याप्रमाणे किल्ले उभारले त्याप्रमाणे गडांचे व्यवस्थापनही केले. प्रत्येक गड किल्ल्यावर किल्लेदार, सबनिस, कारखानीस हे अधिकारी नेमले. गडावरील तोफा, दारूगोळा यांचेही संरक्षण केले. इंग्रज, सिद्धी यांचे प्रबळ असलेल्या तसेच आरमार पाहून या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमार निर्माण केले. लहान-मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. शिवरायांनी मालवण जवळ कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला. आपला समुद्र किनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते. त्यामुळेच शिवछत्रपतींचा ' भारतीय आरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला जातो. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची आठ खात्यात विभागणी केली हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ, हे प्रत्येक खात्याला एक प्रमुख नेमला त्यातून महाराष्ट्राचे अष्टप्रधानमंडळ साकार झाले. शिवछत्रपतींच्या राज्यात प्रजा सुखासमाधानाने राहत होती त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी प्रखर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले. शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे- मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी केली जात असे. जर पाणी नसेल तर पावसाळ्यापूर्वी तळी आणि टाक्या बांधून त्यामध्ये पावसाचे पाणी साठविले जाई. त्यामुळे गडावरील लोकांना दुष्काळातही पाण्याची टंचाई जाणवत नसे. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत, प्रजेचा सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्यास शिवराय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचेही कामे सुरू करत त्यामुळे कारागिरांना रोजगार मिळत असे आणि रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवत नसे.

*व्यापारीपेठा

 स्वराज्याचे रक्षण चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून स्वराज्यावर लागून असलेल्या समुद्रावर शिवरायांनी स्वतंत्र आरमार उभे केले. व्यापार वाढावा म्हणून मालाची वाहतूक करण्यासाठी खास जहाजे बांधून घेतली. राजापूर सारखी व्यापारी बंदरे विकसित केली. रायगडावर खास बाजारपेठ वसवली. पुण्याशेजारी खेड शिवापूर ही व्यापारी पेठ सुरू केली. वीर माता जिजाबाई यांच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात नवीन पेठ तयार केली. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. राज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळाली.

 शिवरायांनी अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागावे याचे आदर्श घालून दिलेले आढळतात. कर्नाटकातील बेलवाडी येथील गढी जिंकण्यासाठी सैनिक केले असता मल्लंमा देसाई या शूर महिलेने संघर्ष केला तिच्या पराक्रमाची बातमी समजताच शिवाजी महाराजांनी तिला धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला.

 काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची. संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे. सहकाऱ्यांना उत्साह देत व शत्रूंना चुकवत यश मिळवायचे. हे सर्व गुण शिवरायामध्ये होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका युगाचा नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत.

 अशा या थोर तेजस्वी नेत्याचा मृत्यू 3 एप्रिल १६८० रोजी झाला.

*महत्त्वाच्या घटना

•शिवाजी महाराज जन्म - 19 फेब्रुवारी 1630

•रायरेश्वराची प्रतिज्ञा - 1645

•शाहिस्ताखानवर विजय - 5 एप्रिल 1663

•शहाजीराजे मृत्यु - 1664

•पुरंदरचा तह - 1665

•आग्र्याहून सुटका - 1666

•कोंढाणा (सिंहगड) विजय - 1670

•शिवरायांचा राज्याभिषेक - -17 जून 1674

•शिवरायांचा मृत्यु - 3 एप्रिल 1680 

_______________________________

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
__ ________________________
Click here for test



  The great Shivaji Maharaj, whose birthday we celebrate every year with great celebration, joy and pride, not only in the whole of Maharashtra.



* Shivaji Maharaj's family


 Shivaji Maharaj's family is the Bhosle family, originally from Eluru. Maloji Bhosale used to live in Eluru. He was Patil of Verul village. Maloji Raje Bhosale was the grandfather of Shivaji Maharaj. Maloji's younger brother's name was Vithoji Raje.


 These are the children of Babaji Bhosale of Verul. Patilki of Verul village belonged to Babaji Raje Bhosale. Maloji Raje and Vithoji Raje were very capable and brave. There were many armed Marathas under his patronage. At that time Daulatabad was the capital of Nizamshahi. There was a Wazir named Malik Amber. He was dutiful and clever. He saw the deeds of the Bhosle brothers of Eluru near Daulatabad. He informed the Nizamshah about his duties. And Nizamshah gave Maloji Raje the Jahagiri of Pune and Supe Parganas.


 Maloji Raje's wife's name was Umabai. They had two children, one Shahaji and the other Sharifji. When Shahaji Raje was young, Maloji Raje was killed in the battle of Indapur. Later, Vithoji took care of his nephews and Jahagiri. He demanded Jijabai, daughter of Lakhujirao Jadhav of Sindkhed for Shahaji and Jijabai became the daughter-in-law of Bhosle family.


     Nizamshah gave Malojiraja's Jahagir to Shahaji Raja. Shahaji Raje was mighty. He was respected in the court. When Adilshah planned to conquer Nizamshahi, Malik Amber and Shahaji Raje fought valiantly and defeated Adilshah's forces. The battle took place at Bhatwadi near Ahmednagar in which Sharifji was killed.


 * Birth of Shivaji Maharaj


 Shahaji Raja was given the Jahagiri of Pune. It was sold by Adilshah of Bijapur. Shahaji Raja had to run very fast. Jijabai was pregnant. Then Shahaji Raja placed Jijabai on Shivneri fort. Shivneri is a fort near Junnar in Pune fort. Shivaji Maharaj's Falgun Vadya Tritiya Shake 1551 on the Shivneri fort was born on 19th February 1630 according to the English year.


 * Shivaji Maharaj's childhood and education




       From an early age, Jijabai had been imparting education to Shivaraya. Jijabai gave a good education to Shivaraya even in extreme rush. Telling them the stories of Rama and Krishna, Bhima and Abhimanyu. Showing the saints as abhangs. The children of poor Mavals were Shivaraya's companions. His hobby is to make clay elephants and horses, to make clay forts. Lapandav, ball, bhavra were the games played by the children and Shivaji Maharaj also used to play these games with the children.

 As Shahaji Raje was engaged in battle, Shivaraya's childhood in Maharashtra was spent in Dhamdhumi. The stories of his father's prowess fall on the ears of little Shiva. After coming to Karnataka, Shivaji Maharaj and Jijabai got some relief. Shahaji Raja defeated many kings of Karnataka. Adilshah rewarded him with the Jahagiri of Bangalore. Shahaji Raja made Bangalore his main station and lived there in splendor.


 * Education of Shivaraya






 









Shahaji Raja had appointed clever teachers for Shivaraya. He started his education at the age of seven. Shivrai became proficient in the art of reading and writing. He was reading stories from Ramayana, Mahabharata, Bhagwat. Shahaji Raja appointed teachers to teach martial arts to Shivaraya. He started teaching Shivaraya the skills of horse riding, wrestling, swinging the sword, wielding the sword. By the age of twelve, Shivaraya was introduced to various sciences and arts.


 Although Shivrai came to Pune Jahagiri, his education continued under the supervision of Jijabai. Coming from Bangalore, Shahaji Raja was accompanied by a well-known teacher who taught him many sciences and languages. Many learned how to rule well, how to fight the enemy, how to build forts, how to test horses and elephants, how to escape from enemy's remote areas etc. She was the wife of a powerful man like Shahaji Raja. Jijabai had been taught politics and warfare since childhood. Jijabai was very self-respecting and loved freedom. So they felt bad about serving strangers. She was shaping Shivaraya with the idea of ​​establishing the kingdom of her people, i.e. Swarajya. In the Jahagiri of Pune, under the guidance of Jijabai, the new rule of Shivaraya had started. Shahaji Raja had prepared for this work. When he sent Shivaraya from Bangalore to Pune, he had given Samraj Nilkanth Peshwa, Balkrishna Hanmante Mujumdar, Mankoji Dahatonde Sarnobat, Raghunath Ballal Sabnis, Sonopant Dabir. With the help of Shivrai, Jahagiri took care of the affairs of the people and started paying attention to their happiness and sorrow. In a way, Jahagiri was undergoing a transformation.


 * Marriage of Shivaji Maharaj


 Shivaraya's marriage was a method of getting married at a very young age at that time. Then Jijabai decided to marry Shivaraya. Then Shivba started watching girls. One of the girls they liked was Saibai. This girl is from Naik Nimbalkar family of Phaltan. Shivaraya's marriage with Saibai Nimbalkar was celebrated with pomp


 * Pledge of self-government


 Shivrai was very young but his mind was big. He had decided to establish Swarajya with his mind. He told his friends about the establishment of Swarajya in his mind and his friends were also ready to stand behind him. He was willing to give his life for them. All the friends and Shivaji Maharaj took a vow to establish Swarajya in the temple of Rayareshwar and went to Jijabai to seek his blessings.


 Shivrai started a new industry to fulfill his promise of self-government. He started his routine of wielding swords, running horses, looking for sidewalks in the mountains, looking for ghats, ghats and burglaries. Young Mavals started believing that they wanted to live for Shivaraya and die for Shivaraya. Shivaraya got information about all the forts and forts around Pune, including his peers, burglars, basements, cellars, ammunition, weapons and Thane of enemy forces. Even those who opposed Shivaraya were favored by Shivaraya with sweet words. All the congregations in Mavale valley started obeying the word of Shivaraya.


 * The royal seal of Shivaji Maharaj




Jahagiri was started in the name of Shivaraya. Shivaraya Shahaji Raja had made an independent royal seal of Shivaraya. That posture is--


         प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||

       शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

        


 That is, the royal seal of Shivaji Raje, the son of Shahaji Raja, which grows like the crescent of Pratipada and is worshiped by the whole world, is for the welfare of the people; Saying this, the Rajmudra was a sign of the establishment of Swarajya. At that time royal seals were probably engraved in Persian language. But Shivaraya's mudra was in Sanskrit language.


 * Swarajya formation and crises on Swarajya


 Shivrai and his close friends started preparing for the establishment of Swarajya. Forts were needed to establish self-government. Whose forts are his kingdom. If the fort is under control then the region is ruled. Shivaraya decided that the fort should be captured when the fort is the base of the state and in front of his eyes was the Torana fort in the Kanad valley southwest of Pune. Torna fort is considered to be one of the strongest forts in Maharashtra. The fort got the name Torana as there is a temple of Toran Jai on this fort. Adilashah did not pay any attention to this fort. Shivaraya saw this and raised the flag of Marathas on this fort. Shivaraya named this fort Prachandagad. After that, Adilshah had left a fort half-built at Murumbadeva hill, fifteen kilometers east of Torana. When the guard on this fort was weak, Shivaraya decided to take possession of this fort for the capital of Swarajya. After capturing this fort, Shivaraya named it Rajgad and Rajgad became the first capital of the Swarajya. Rohida fort was captured and thus the horse race of Swarajya started.


 The fort of Rayari in the possession of Chandrarao More of Jawali was very important. Shivaraya invaded Jawali and fought for three months. This huge fort of Rayari came under the rule of Shivaji Maharaj. He named this fort 'Raigad'. He then built a new fort called Pratapgad on the nearby Bhorapya hill.


         While working for Swarajya, Shivaji Maharaj had to face many difficulties. Adilshah was angry because Shivaji Maharaj was conquering the fort, so he sent Afzal Khan to kill Shivaji Maharaj. But Shivaraya managed to save himself from Afzal Khan.


         Adilshah was furious at the killing of Afzal Khan and sent Siddi Jauhar to capture Shivaraya. Shivrai escaped safely from the siege of Siddi Johar. But in this battle Bajiprabhu Deshpande fought with Siddhi Masood at Ghodkhind and Bajiprabhu Deshpande died heroically in this battle. As this battle took place at Ghodkhind, it became immortal in history as Ghodkhind Pavankhind.


       Aurangzeb's uncle Shahistekhan had a similar crisis on Shivaji Maharaj. He laid siege to Purandar fort but when Purandar was not captured then Shahista Khan turned towards Pune. He took the fort of Chakan. He sent his army to the surrounding area, pulling out their cattle. Destroyed agriculture. He had destroyed the canal around Pune. Shivaraya also attacked him with a trick and left Shahistekhan by running away.


        Shivaraya now had a new enemy, the Mughal emperor Aurangzeb. He sent Dilerkhana to capture the fort of Purandar. But Murarbaji, the fort keeper of Purandar, was a knight who fought with Dilerkhanas. Murarbaji was killed in the battle he fought. Recognizing that his brave chiefs were being killed for no reason, Shivaraya made a treaty with Dilerkhana in 1665. In it, Shivaraya agreed to give twenty-three forts and four lakhs below it, and at the same time Mirza Raje Jaisingh suggested him to go to Agra and meet the emperor.


       While Aurangzeb was on his way to Agra to meet the emperor, Aurangzeb imprisoned Shivaraya, but Shivaji Maharaj escaped from Aurangzeb's captivity by pretending to be ill.


 Even though one or more such incidents were happening to Shivaraya, Shivaraya was trying to establish Swarajya with great diligence and cleverness, in some places by force and in some places by using tricks. Shivaraya had conquered almost all of Maharashtra and finally established Swarajya.


  * Coronation of Shivaraya











 Shivaraya planned the coronation so that Swarajya would be recognized by all Rajarajavadas. Shivaraya chose Raigad for the capital. Because Raigad was a strong fort and it was easy to monitor the Swarajya from that fort. For the coronation, Shivaraya made a golden throne, set up a white canopy inlaid with precious stones People went to fetch water from Saptanadya and Samudra. Rivers and sea water were anointed on Shivaraya. Everyone cheered Shivaraya. There were guns on the fort. Shivaraya cheered all over Maharashtra. Thus the coronation ceremony of Shivaraya was held in the year 1674 and from that year the coronation started. Shivaji Maharaj became the Shakkarte king and struck his own coin. Lawyers from different countries attended the ceremony. The British had sent a lawyer named Oxinden with a gift. People from far and wide had gathered to witness the ceremony.


 * Management of Shivaraya and protection of subjects


 Even after that, Shivrai did not sit still. Shivaraya invaded the province of Karnataka. Shivrai came to the east coast. South of Chennai is the fort of Jinji. It is as huge and strong as Raigad. Shivaji Maharaj was a great warrior, skilled organizer and skilled manager. Just as he conquered Gadkot forts, Shivaraya built three forts namely Vandurg, Giridurg and Jaldurg. Jaldurg is also called Janjira. Shivaji Maharaj built many new forts like Hiroji Indulkar, Arjoji Yadav, Agyan Karvi Rajgad, Pratapgad, Sindhudurg etc. Shivaraya had about three hundred forts. It is believed that Ramchandra Pant Amatya wrote the book 'Ajnapatra' on the orders of Chhatrapati Rajaram Maharaj, the youngest son of Shivaji Maharaj. This book reflects the politics of Shivchhatrapati.


 Just as Shivaraya built forts, he also managed forts. At each fort, officers were appointed as fort keepers, sabnis and karkhanis. He also protected the cannons and ammunition of the fort. Seeing the strong armor of the British, Siddhi, Shivaraya created an independent armor to deal with these sea enemies permanently. He built small and big ships and boat building factories. Shivaraya built Sindhudurg on Kurte Island near Malvan. He also built the fort of Khanderi near Mumbai. Protected your beach. It was the first armament built by Shivaraya in medieval India. That is why Shivchhatrapati is rightly hailed as the 'Father of Indian Armor'. Shivaraya built an independent armada and established ownership of the coastal area by defining its maritime boundaries on its strength. In order to run the affairs of the state properly, Shivaraya divided the government into eight departments. This is the Ashta Pradhan Mandal of Shivaraya. The people of Maharashtra were living happily in the kingdom of Shivchhatrapati, so intense self-confidence, self-respect and patriotism were seen in the place of the people of Maharashtra. Shivaraya built small and big dams in the villages of the Swarajya and provided drinking water to the people. The ryots of the Swarajya never felt the severity of the drought. Before the fort was built, it was inspected to see if there was enough water on the site. If there was no water, ponds and tanks were constructed before the rains and rain water was stored in them. Therefore, the people of the fort did not feel water scarcity even during drought. During the drought, Shivrai used to give various concessions to the farmers and forgive the people. As a result, the severity of the drought in the Swarajya was reduced. In case of any famine in the Swarajya, Shivrai used to distribute the grain stored in the government treasury to the ryots free of cost. Also started repair work on different forts. He also started work on dams, canals and dams, which provided employment to the artisans and the people never felt the severity of the drought.


 * Merchant Market


  In order to better protect the Swarajya, Shivaraya set up an independent fleet on the sea adjacent to the Swarajya. Special ships were built to transport goods to increase trade. Developed commercial ports like Rajapur. Established a special market at Raigad. Khed Shivapur, a trading post near Pune. According to the order of Veer Mata Jijabai, a new Peth was built in Pashan village near Pune. It was referred to as Jijapur. In order to increase trade in the state, Shivaraya imposed high taxes on goods coming from outside the region, which gave impetus to local trade.

   Shivaraya is often found to have set an example of how to treat women with dignity through his behavior. While fighting to conquer the fort at Belwadi in Karnataka, a brave woman named Mallamma Desai fought. He also gave her the book Savitri.

   We used to wait in the dark for our direction. When adversity struck, he would overcome it and move on. He used to increase his strength by fighting against the mighty enemies with his meager strength. Succeeding by encouraging colleagues and defeating enemies. All these qualities were in Shivaraya. An ideal son, a cautious leader, a skilled organizer, a public welfare administrator, a wise warrior, a hero of the wicked, a champion of the righteous and a creator of a new age, there are many brilliant aspects of Shivaraya's personality.

 Such a great and glorious leader died on April 3, 1680.

* Important events

• Shivaji Maharaj was born - 19 February 1630

• Promise of Rayareshwar - 1645

• Conquest of Shahista Khan - 5 April 1663

• Shahaji Raje died - 1664

• Treaty of Purandar - 1665

• Escape from Agra - 1666

• Conquest of Kondhana (Sinhagad) - 1670

• Coronation of Shivaraya - 1674

• Death of Jijamata -17 June 1674

• Death of Shivaraya - 3rd April 1680







No comments:

Post a Comment