DAILY EDUCATION

Thursday, February 17, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता सहावी विषय कला आणि संगीत






विषय कला आणि संगीत

• देशभक्तिपर आधारित गीतांचा कार्यक्रम सादर करतो. 

• निसर्गातील विविध घटक आकाराचे बारकाईने निरीक्षण करतो. 

• विविध प्रकारचे आकार रेखाटण्यासाठी यांत्रिक साधनांचा उपयोग करतो.

• वंदे मातरम् या गीताचे तालासुरात गायन करतो.

• रेषा रेखाटण्याच सराव करतो.

• लयदार रेषा काढतो.

• निरनिराळी माध्यमे हाताळून रेखाटन करतो.

• निसर्गातील विविध  प्रकारचे आकार अचूकपणे ओळखतो.

• मूक अभिनयासाठी हस्तमुद्रा यांचा उपयोग करतो.

• हस्तमुद्राद्वारे मनातील भावनांची अभिव्यक्ती करतो. 

• सूचनेनुसार हस्तमुद्रा सादर करतो.

• केलेल्या हस्तमुद्राचा अर्थ समजावून सांगतो.

• वलयाकृती रेषांची ओळख करून देतो.

• विविध घनाकृती आकार तयार करतो.

•विविध घनाकृती आकारातील फरक ओळखतो.

• देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या हालचालीचे महत्व लिहितो.

• संवाद विरहीत लहान प्रसंगाचे देहबोलीतून सादरीकरण करतो.

• घरातील मैदानावरील खेळाची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

• छोट्या प्रसंगावर आधारित स्मरणाने रेखाटन करतो. 

• शिल्पाकृती तयार करतो.

• शिल्पाकृती वर वैयक्तिकरित्या रंगकाम करून दाखवतो.

• माती हाताळतो.

• मातीचे विविध आकार तयार करतो.

• सुचनेनुसार संवाद विरहित प्रसंगाचे सादरीकरण करतो. 

• दैनंदिन जीवनातील प्रसंगाचे अचूकपणे निरीक्षण करतो. 

• दैनंदिन जीवनातील प्रसंगाचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो. 

• परिसरातील, कुटुंबातील दैनंदिन प्रसंग घटना इत्यादींचे निरीक्षण करतो. 

• निसर्गातील निरनिराळे घटक इत्यादींचे आकार व रंग ओळखतो.

• प्रसंगावर आधारित चित्रात आवडीचे रंग भरतो. 

•काढलेल्या स्मरणचित्राची योग्य मांडणी करून दाखवतो.

• दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित स्मरणाने रेखाटन करतो.

• चित्रातील रेखाटन व रंगकामाच्या निटनेटकेपणाचे महत्व सांगतो.

• कल्पनाचित्राचा अर्थ समजावून देतो.

• स्वरालंकाराचा चार्ट बनवितो.

• स्वरांचे चढ-उतार समजून घेतो.

• मूळ स्वराचा परिचय करून घेऊन नवीन नवीन रचना समजून घेतो.

• चित्र रेखाटतो.

• रेखाटलेल्या चित्रा बदल स्वतःचे मत व्यक्त करतो.

• स्वतःच्या कल्पना चित्रात मुक्तपणे मांडतो.

• पाठ्यपुस्तकातील नाट्यछटा व नाट्य प्रवेशाचे वाचन करतो. 

• दैनंदिन अनुभवाचे वर्गात कथन करतो.

• विविध प्रकारच्या कागदांची ओळख करून देतो.

• कागद फाडणे, घडी घालणे व चिकटवणे इत्यादी कृती व्यवस्थितपणे करतो.

• विविध प्रकारच्या रेषा फळ्यावर काढून दाखवतो.

• चित्रकलेच्या मूळ घटकांची ओळख करून देतो.

 • शास्त्रीय नृत्य प्रकारची माहिती संग्रहित करतो.

• पाठ्यपुस्तकातील नाट्यछटाचे विरामचिन्हे जाणून घेऊन वाचन करतो.

• नाट्यछटा व नाट्य प्रवेशाचे भावारूप सादर करतो.

• कागदाच्या सोप्या वस्तू तयार करतो.

• कागदाच्या विविध वस्तूंची सजावट करतो.

• लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य यातील फरक समजावून घेतो. 

• विविध प्रकारच्या रेषा, भौमितिक, अलंकारिक आकाराची आवडीप्रमाणे रचना करतो.

• नृत्य व चित्र शिल्पकृतीचा संबंध लावतो.

• सोप्या सरगमच्या माध्यमातून राग ओळखतो.

• स्वरांच्या आधारे राग समजून घेतो.

• कोलाज मुद्रातंत्रासाठी उपयोगी साधने साहित्याचा संग्रह करतो.

• प्राथमिक व दुय्यम रंग जाणून घेऊन त्यांचा चित्रात उपयोग करतो.

• आच्छादन पद्धतीचा वापर करतो.

• संकल्प चित्रात सौंदर्य निर्मितीसठी कोलाज मुद्रा तंत्र वापरतो.

• शास्त्रीय संगीताची माहिती मिळवितो. 

• तबल्यावर विविध ताल वाजवतो. 

• विविध प्रकारच्या तालाची माहिती गोळा करतो.

• मानव निर्मित वस्तूची यादी करतो.

•निसर्गनिर्मित घटकाची चित्रासहित माहिती संग्रहित करतो. 

• दैनंदिन वापरातील वस्तूची चित्रे गोळा करतो.

• दैनंदिन वापरातील वस्तूंची चित्रे गोळा करून त्यांची नावे सांगतो. 

•मानवनिर्मित व निसर्गनिर्मित घटकांचे वर्गीकरण करतो.

•वस्तूचे रंगकाम सुयोग्य रंगाने करतो.

•मासिके, वर्तमानपत्रे यातील विविध निसर्ग चित्रांचा संग्रह करतो.

• परिचित वस्तूच्या समूहाचे रेखाटन करतो.

• कागदी तुकड्या पासून विविध वस्तु तयार करून आणतो. 

• शालेय प्रसंगाचे सादरीकरण करतो. 

• शालेय वातावरणात घडणाऱ्या प्रसंगाचे निरीक्षण करतो.

• विविध अक्षरांच्या नमुन्यांचा संग्रह करतो.

• सुंदर व वळणदार अक्षराचे महत्त्व सविस्तरपणे लिहतो.

• सादरीकरणातील रसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देतो. 

• पाठ्यपुस्तके व गोष्टीच्या पुस्तकातील चित्राचा आशय समजून घेतो.

• विविध साधनांनी संग्रहित नमुन्याप्रमाणे अक्षरे रेखाटतो.

• कागदी तुकड्या पासून विविध आकाराची फळे भांडी तयार करतो.

• कागदी तुकड्या पासून वैयक्तिकरित्या वस्तू बनवितो. 

• वर्गातील रंगमंच व प्रेक्षागृह यातील फरक समजावून घेतो. 

• वर्तमानपत्रे, मासिके यातील व्यंगचित्रांचा संग्रह करतो.

• व्यंगचित्रांचा संग्रह करून चिकटवहीत चिकटवतो.

• परिसरातील फलोत्पादन केंद्राला भेट देऊन माहितीचे संकलन करतो. 

• स्थानिक परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेटी देतो.

• फळ्यावर चित्र कढतो. 

• आवडीच्या व्यंगचित्राचे हुबेहूब रेखाटन करतो.

• स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, कलावंत, लोककला यासंबंधीची कात्रणे यांचा संग्रह करतो

• स्थानिक परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेटी देतो व नोंदी ठेवतो.

• परिसरातील निकामी वस्तूंचा संग्रह करतो.

• रिकाम्या  वस्तूंचा संग्रह करून विविध वस्तू बनवतो.

• छोटे छोटे स्वर समूह जोडून निर्मिती करतो.

• विविध माध्यमे व साहित्य द्वारे संगीताचे ज्ञान प्राप्त करून घेतो.

• वस्तू सजावटी मधून नवनिर्मिती करतो.

• त्रिमित वस्तूच्या सजावटी वेळी नीटनेटकेपणाचे महत्त्व समजून घेतो.

• वस्तूच्या पृष्ठभागावर अन्य निरुपयोगी वस्तूद्वारे सजावट करतो.

• परिसरातील लोककलावंतांची मुलाखत घेतो.

• माहितीची नोंद ठेवतो. 

• स्थानिक लोककलावंतांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो.

• वृत्तपत्रे मासिके नियतकालिके इत्यादींमधून उपयुक्त माहिती संकलित करतो

• सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

• सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलनात अभिनय गीते सादर करतो.

 • कथेतील संबंधित व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये, सवयी जाणून घेतो.

 • सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन करतो.

No comments:

Post a Comment