DAILY EDUCATION

Thursday, September 23, 2021

ओळख थोर नेत्यांची महर्षी धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिर जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. शिक्षणाची आवड असणारे महर्षी धोंडो केशव कर्वे लहान असताना इयत्ता सहावीची परीक्षा देण्यासाठी 3 दिवस 125 मैलाचे अंतर पायी चालून सातारला गेले. 1881साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 1884साली कर्वे बी. ए.झाले पुढे 4-5 वर्षे त्यांनी मुंबईच्या अनेक शाळेत शिक्षकाची नोकरी केली.त्या काळात विधवांची परिस्थिती अतिशय कठीण, दयनीय होती. विधवांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना सतत वाटे.' उक्तीप्रमाणे कृती ' या न्यायाने 1893साली त्यांनी शारदा सदन या संस्थेतील गोदुबाई ऊर्फ आनंदीबाई या विधवेशी पुनर्विवाह केला. त्यांनी आपल्या जीवन कार्यात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था काढून सुधारणांचे वारे देशातल्या तळागाळापर्यंत पोहचविले.विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ,अनाथ बालिकाश्रम (हिंगणे स्त्री शिक्षण संस्था),महिला विद्यालय, निष्काम कर्ममठअध्यापिका महाविद्यालय अशा कितीतरी संस्था या त्यांच्या योगदानाचेच फलित आहे.त्यांनी स्थापन केलेले महिला विद्यापीठ म्हणजेच आजचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ होय. ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य करण्यासाठी कर्वे यांनी 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली जातिभेद व अस्पृश्यता निवारणार्थ 1944 मध्ये कर्वे यांनी समता संघ या संस्थेची स्थापना केली 1952 मध्ये बनारस विद्यापीठाने त्यांना डी.लीट. ही पदवी दिली पुणे व महिला विद्यापीठाने ही त्यांना डी.लीट .पदवी दिली. 1958 मध्ये भारत सरकारने ' भारतरत्न ' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. 'आत्मवृत्त' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. वयाच्या 105 व्या वर्षी 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले ________________________________________ Dhondo Keshav Karve was born on 18 April 1858 at Sherwali in Ratnagiri district. Maharshi Dhondo Keshav Karve, who was interested in education, went to Satara on foot for 125 days for 3 days to appear for the Class VI examination. In 1881 he passed the matriculation examination. In 1884, Karve b. For the next 4-5 years, she worked as a teacher in many schools in Mumbai. At that time, the condition of widows was very difficult and miserable. They always thought that we should do something to save the widows. ' In 1893, he remarried Godubai alias Anandibai, a widow of Sharda Sadan. In her life's work, she took out various social and educational institutions and spread the winds of reform to the grassroots of the country. University is today's Mrs. Nathibai Damodar Thackeray Women's University. In 1936, Karve set up the Maharashtra Village Primary Education Board to promote education in rurIndiaal areas. In 1944, Karve theset up the Samata Sangh to eradicate caste discrimination and untouchability. This degree was given by Pune and Mahila University also gave her D.Litt degree. In 1958, the Government of India honored him with the Bharat Ratna. His autobiography is famous. He passed away at the age of 105 on November 9, 1962 in Pune ________________________________________ English translator

No comments:

Post a Comment