DAILY EDUCATION

Showing posts with label 2 री वर्णनात्मक नोंदी. Show all posts
Showing posts with label 2 री वर्णनात्मक नोंदी. Show all posts

Friday, March 4, 2022

March 04, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी विषय इंग्रजी







• Listens to poems and acts accordingly. 

• Tells the names of different fruits. 

• Tells about favorite pictures from given pictures. 

• Recognizes his name by looking at pictures. 

• Tells suggested words.

• Matches the words and pictures. 

• Recognizes first letter of given picture. 

• Participates in conversation. 

• Listens to poetry with help of music player.

• Participates in conversation and enjoys. 

• Listening to short sentences and says back. 

• Acts on given conversations.

• Explains the meaning of difficult words given. 

• Plays a game on suggested words.

• makes sentences with the help of words. 

• spells numbers up to 10 in English. 

• identifies a given number. 

• Writes a given number. 

• Recognizes the name of a color. 

• Looks at the color shown on the card.

• Asks questions by observing pictures. 

• Answers questions asked. 

• Tells information about friend .

• Trys to explain the meaning of the paragraph read. 

• Tells the names of various items in the house. 

• Tells the names of various items in English. 

• Tells the names of school items in English.

• Tells the names of items in the classroom in English.

• Tells the names of local objects in English. 

• Tells information about favorite animals. 

• Pastes a picture of an animal. 

• Says 1 to 10 digits in reverse order. 

• Rhymes in the poem Tells Matching words. 

• The poem sings in the right rhythm. 

• Discusses the picture. 

• Discusses the picture with friends. 

• Writes names in English. 

• Tells about his family. 

• Tells how to make hats. 

• Collects different types of hats. 

• Makes names for materials needed to make hats. 

• Writes English letters in order. 

• Translates short sentences into Marathi. 

• Translates short English sentences into Marathi.

• Trys to translate Marathi sentences into English.

• Identifies puzzles.

• Says names of vegetables. 

• Tells the names of animals.

• Matches spellings and combinations of numbers. 

• Tells the taste of the food. 

• Acts and says the suggested poems.

• Matching  pairs of capital and small letters. 

•  Tells the names of businesses in the area.


Friday, February 25, 2022

February 25, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी विषय शारीरिक शिक्षण

वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी








विषय शारीरिक शिक्षण

• वाकण्याची आणि वळण्याची कृती करतो.

• जागेवर विविध प्रकारच्या उड्या मारून दाखवतो.

• जागेवर गिरकी घेऊन दाखवतो.

• एका पायावर उडी मारतो.

• उत्तेजक व्यायाम प्रकाराची ओळख आहे.

• डोक्यापासून पायापर्यंतच्या  उत्तेजक व्यायाम करतो. 

• स्नायूंना उत्तेजित करणारे व्यायाम करतो.

• सावधान स्थिती विश्राम स्थिती करून दाखवतो.

• स्थानिक खेळाची चित्रे पाहून नावे सांगतो.

• विटी दांडू हा खेळ खेळतो.

• उपक्रमावर आधारित खेळांची नावे सांगतो.

• शाळेतील स्पर्धांमध्ये सहभागी होतो.

• लघु खेळांची नावे सांगतो.

• आहार कोणत्या प्रकारचा घ्यावा याविषयी माहिती आहे. 

• आहाराचा तक्ता तयार करतो.

• बाह्य अवयवांचा चार्ट पाहून नावे सांगतो.

• क्रिडांगणाची संबंधित चांगल्या व वाईट सवयी सांगतो. 

• क्रीडांगणावर कशा प्रकारचा पोशाख घालावा याची माहिती मिळवतो.

• खेळांवर पोशाख कसा असतो या विषयी माहिती मिळवितो. 

• पायरीवरून खालून वर उडी मारतोो.

• लटकण्याची कृती करतो.

• झोके घेणे ही कृती करतो.

• रोल, मनोरे यांची कृती करून दाखवतो.

• विविध प्रकारच्या अनुकरणात्मक हालचाली करतो. 

• पारंपारिक खेळांची नावे सांगतो. 

• विविध स्पर्धांची नावे सांगतो.

• लघु खेळ या उपक्रमावर आधारित स्पर्धेत सहभागी होतो.

• उपक्रमावर आधारित व्यायामप्रकार करतो.

• क्रीडांगण संबंधित चांगल्या सवयींची माहिती मिळवितो.

• वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व जाणतो.

• वैयक्तिक स्वच्छतेविषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.

• क्रीडांगणावर होणाऱ्या अपघाताविषयी माहिती मिळवितो.

• वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व जाणतो.

• मैदानाची स्वच्छता करतो. 

• कवायत संचलन यावेळी सावधान विश्राम स्थिती अचूक रितीने करतो. 

• जागा बदलत उड्या मारण्याचा सराव करतो.

• एका पायावर उड्या मारत पुढे जाण्याचा सराव करतो.

• साधनांवर तोल कसा सांभाळावा याची कृती करतो. 

• सूर्यनमस्काराची कृती करतो.

• लघु खेळाची नावे सांगतो. 

• सायकल शर्यतीत सहभागी होतो.

• मैदानी सुरक्षिततेमुळे होणारे फायदे समजून घेतो.

• मैदान स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्याची यादी तयार करतो.

• लंगडी, कबड्डी हे खेळ खेळतो.

• मुख्य खेळांची नावे सांगतो.

• धाडसी व्यायाम प्रकारांची माहिती मिळवितो.

• व्यायाम प्रकाराची नावे सांगतो.

• विश्रांती व झोपेचे महत्त्व सांगतो. 

• विश्रांती व झोपेचे फायदे याविषयी चर्चा करतो.

• मूलभूत हालचालींचा सराव करतो. 

• तोल सांभाळणे, उड्या मारणे ह्या कृती सहज करतो. 

• दोरीवरून उड्या मारण्याची कृती करतो.

• अडथळ्याच्या शर्यतीत सहभागी होतो.

• काठी वरून उड्या मारून दाखवितो.

• वर्तमानपत्रे ,मासिके यातील पारंपारिक खेळाची चित्रे गोळा करतो.

• वाईट सवयींची माहिती करून घेतो.

• वाईट सवयींचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून घेतो. 

• प्रथमोपचार पेटीतील साहित्याची नावे सांगतो.

• प्रथमोपचाराचे महत्त्व समजावून घेतो.

• प्रथमोपचार पेटी तयार करतो. 

•शाळाबाह्य उपक्रमांची नावे सांगतो.

 •सहलीच्या ठिकाणी माहिती संग्रहित करतोो.

• क्रीडा स्पर्धेसाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• योगाची कृती करून दाखवितो.

Monday, February 21, 2022

February 21, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता दुसरी विषय कला आणि संगीत

 विषय कला आणि संगीत 








•दिलेल्या सूचनेप्रमाणे हालचाली करतो.

• पायाभूत हालचालींच्या कृतीचे निरीक्षण करतो. 

• शब्द संदेशानुसार अवयवाच्या लयबद्ध हालचाली करतो. 

•ठिपके, रेषा यांच्यापासून चित्र तयार करून दाखवतो.

• ठिपके, रेषा यांचे रेखाटन करतो.

• ठिपके ,रेषा यांची ओळख करून घेतो.

 •विविध रेषांचे रेखाटन करतो.

• प्राण्यावर आधारीत बडबड गीते म्हणतो.

• विविध बडबडगीतांचा सराव करतो.

• समूह गीताचे वर्गात गायन करतो.

• कागदाच्या घड्या घालतो.

 •कागद योग्य रीतीने फाडण्याची कृती करतो.

• विविध प्रकारच्या कागदाची ओळख सांगतो.

 • कागदाचे उपयोग सांगतो.

 • कागदाच्या शिल्पाचा नमुना पाहून त्याचे निरीक्षण करतो. 

•रेखाटन संबंधी विविध माध्यमांची नावे सांगतो.

• रेखाटन कसे करायचे याविषयी माहिती मिळवतो. 

•दिलेल्या आकारावर आधारित विविध माध्यमांद्वारे फळांचे, वस्तूंचे रेखाटन करतो.

 • हात व पायांच्या लयबद्ध हालचाली करतो.

• नृत्याची आवड आहे व त्याची माहिती सांगतो.

• विविध नृत्यांची नावे सांगतो.

• नृत्यांच्या नावांचा तक्ता तयार करतो.

• एक ते आठ आकड्यांच्या विविध प्रकारे टाळ्या वाजवतो.

• फळांचे, वस्तूंचे रेखाटन करतो.

•राष्ट्रगीताचे वैयक्तिक रित्या गायन करतो.

• परिसरातील प्राणी, पक्षांचे निरीक्षण करून त्यांची माहिती मिळेवतो.

• प्राणी, पक्ष्यांची चित्रे जमा करतो.

• स्वतःची व कुटुंबाची माहिती सांगतो.

• विविध प्राण्यांप्रमाणे उड्या मारून दाखवतो.

• प्रार्थनांचा तक्ता तयार करतो.

• प्रार्थनेचे गायन तालासुरात करतो.

• मातीचे विविध प्रकारचे शिल्प, निरीक्षण करतो.

• मातीचे गोल तयार करतो.

• मातीपासून चौकोनी, त्रिकोणी,गोल वस्तू तयार करून आणतो.

• परिसरातील विविध प्राण्यांची व पक्ष्यांची नावे सांगतो.

• मण्यांची माळ तयार करतो.

• बडबड गीतांचे वर्गासमोर सादरीकरण करतो.

• पक्षांवर आधारित बडबडगीतांचा सराव करतो.

• पक्षांवर आधारित बडबड गीतांचा संग्रह करतो.

• स्वतः शी संबंधित स्मरण चित्र काढतो.

• परिचित सोप्या वस्तूचे कल्पनाचित्र काढतो.

• दिलेल्या विषयावर चित्र काढतो.

•कल्पना चित्र काढून दाखवतो.

• परिसरातील सोप्या वस्तूची, गोष्टीची कृती करून दाखवतो. 

• परिसरातील विविध घटकांचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो. 

•परिसरातील गोष्टी शरीर आकृती मधून साकारतो. 

• कागदापासून विविध सोप्या वस्तू तयार करतो.

• कागदी वस्तूची सजावट करतो.

• परिचित गोष्टीचे मुक्त रेखाटन करतो. 

• परिसरातील गोष्टींचे रेखाटन करून आणतो. 

• नमस्काराच्या विविध पद्धतीची कृती करतो.

• कागदाच्या सोप्या वस्तु तयार करून दाखवतो.

• विविध प्रकारच्या चालण्याच्या पद्धतींची कृती करतो. 

• चालण्याच्या विविध पद्धती लयबद्ध रीतीने करतो.

• बडबड-गीतांवर आधारित कृती करतो.

• वर्तमानपत्रातील लोकगीतांचा संग्रह करतो.

• धनगर गीताचे अभिनयासह गायन, सादरीकरण करतो.

• कोळी गीताचे तालासुरात गायन करतो.

• कोळी गीतावर आधारित कृती करतो.

• प्राणी व पक्षी यांच्या प्रमाणे कृती करून दाखवितो.

• प्राणी आणि पक्ष्यांच्या हालचालीचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो.

• काल्पनिक गोष्टीचे चित्र पाहून निरीक्षण करतो.

• काल्पनिक कवितांचे चित्र पाहतो.

• स्मरण चित्र आणि कल्पनाचित्र यांचा फरक समजून घेतो 

• आवडीच्या आकारात नक्षीकाम सजावट आवडत्या रंगाद्वारे करतो 

• ठिपके रेषा त्रिकोण चौकोन या सारख्या आकाराची मांडणी करतो 

• आवडीच्या बियांची विवीध आकारात सजावट करून दाखवतो.

• विविध प्रकारची नाट्य संबंधित गीते गोळा करतो.

• शरीराच्या लयबद्ध हालचालीचे सादरीकरण करतो.

• नाट्य संबंधित गीताचे तालासुरात गायन करतो व त्याची नावे सांगतो.

• आकृतीच्या साह्याने रंगमंचाची मांडणी करतो

• रंगमंच त्यासाठी आवश्यक असणार्‍या साहित्यांची नावे सांगतो.

• रंगमंच यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची माहिती गोळा करतो.

• परिसरातील निरुपयोगी वस्तूंपासून शिल्प तयार करतो. 

• परिसरातील निरुपयोगी वस्तूंचा संग्रह करतो.

• परिसरातील विविध आवाजाची ओळख करून घेतो.

• प्राणी-पक्षी, ढगांचा गडगडाट इत्यादी आवाजांचे अनुकरण करतो.

• मानवनिर्मित विविध गोष्टींचे आवाज काढून घेतली दाखवतो. 

• परिसरातील विविध घटकांचे आवाज काढतो.

• निसर्गातील विविध आकाराचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो.

• फळे व वस्तूचे यांत्रिक साधनाशिवाय रेखाटन करण्याचा प्रयत्न करतो.

• यांत्रिक साधनाशिवाय फळे व वस्तूंचे रेखाटन करतो.

• ठसे कामासाठी परिसरातील वस्तूंचा संग्रह करतो.

• ठसे कामासाठी योग्य ती सजावट करतो.

• पार्श्वसंगीत म्हणजे काय हे समजावून घेतो.

• मातीशिल्पाविषयी वर्गात चर्चा करतो.

• पाठ्यपुस्तकातील लहान गोष्टीचे भावपूर्ण वाचन करतो.

• प्राणी-पक्षी यासारख्या सोप्या कथांचे नाट्यरूपात सादरीकरण करतो. 

• जत्रेच्या प्रसंगाचे चित्र रेखाटतो.

• कमी वेळ, जास्त वेळ हे शब्द वापरून शब्दाची ओळख करून घेतो.

• ठसेकामाद्वारे सुंदर चित्र प्रती तयार करतो. 

• कोलाज तंत्राचा सजावटीसाठी वापर करतो.

• सजावट करताना मुद्रा तंत्राचा वापर करतो.

• मातीपासून गोलाकार यावर आधारित सोपे आकारातील फळांचे शिल्प तयार करतो.

• मातीपासून फळाचे आकार तयार करतो.

• मातीपासून विविध फळांची तयार करतो.

• तयार केलेली फळे पाहून त्यांचे नावे सांगतो.

 • सामूहिक संवादाचे हावभावासहवाचन करतो. 

• पडदा व नेपथ्य यांचा वापर करून वर्गात सादरीकरण करतो. 

• प्राण्यांची चित्रे जमा करतो.

• पक्षांची चित्रे जमा करतो. 

•विविध प्राण्यांप्रमाणे हालचाली करतो.

•पक्षांचे आवाज काढतो. 

• रेल्वेगाडी प्रमाणे आवाज काढून कृती करतो.

Sunday, February 20, 2022

February 20, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय गणित इयत्ता दुसरी

 







विषय गणित 

• मुक्तहस्त त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ इ. आकार काढतो व रंगवतो.

• भौमितिक आकृत्या ओळखतो.

• विविध भौमितिक आकृत्या काढतो.

• कागदाला घडी घालून उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढतो.

• सरळ रेषा व वक्ररेषा इत्यादीची कृती करून दाखवतो. 

• आकाराची ओळख करून घेऊन कडा व कोपरे मोजतो.

• गोळा केलेल्या वस्तू व आकार यांच्या जोड्या लावतो. 

• आकृत्या काढण्यासाठी व रंग कामासाठी विविध साहित्यांचा वापर करतो.

• दैनंदिन आकृत्या विषयी सविस्तरपणे सांगतो.

• भाज्या, फळे, पाने इत्यादी वस्तू गोळा करून आकार ओळखतो.

• चित्रातील वस्तू व त्यांचे आकार यांची ओळख करून घेतो. 

• हाताने सरळ रेषा मारतो.

• पुस्तक ,वही च्या साह्याने विविध रेषा काढतो.

• विविध भौमितिक आकार काढून रंगवतो.

• वस्तूंचे दशकाचे गट तयार करतो.

• संख्या वाचून तेवढ्या संख्या दाखवतो.

• संख्येतील एकक व दशक ओळखतो.

• दिलेल्या रिकाम्या जागी योग्य संख्या लिहितो.

• प्रत्येक अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगतो. 

• दशकाच्या घरातील संख्या व एककाच्या घरातील संख्या लिहितो.

• कठीण उदाहरणावर चर्चा करतो.

• पारंपारिक व नवीन दोन्ही पद्धतीने संख्या लिहितो. 

• संख्या कार्डवरील संख्या ओळखतो व लिहितो.

• 21 ते 100 संख्यांचे वाचन क्रमाने करतो.

• तक्त्यावरील संख्यांचे वाचन करतो.

• विस्तारित रूपावरून विविध संख्या तयार करतो.

• स्थानिक किंमत विषयी विविध उदाहरणे यांचा सराव करतो.

• दशक व एककाचा वापर करून विस्तारित संख्या तयार करतो.

• विविध चित्रांवरून बेरीज सोडवतो.

• चित्रांच्या सहाय्याने सशाने मारलेल्या उड्या विषयी सांगतो. 

• छोटी-छोटी तोंडी बेरीज याची उदाहरणे सोडवतो.

• बेरजेच्या कठीण उदाहरणांचा संग्रह करून आणतो.

• विविध चित्रांच्या साहाय्याने बेरजेची उदाहरणे सोडवतो. 

•विविध उदाहरणे तयार करून सोडवतो.

• दशक, एकक वापरून दोन अंकी संख्यांची बेरीज करतो.

• स्टिकर्स चे उदाहरणे समजून घेतो.

• विविध उदाहरणे घेऊन पुढे मोजून बेरीज करतो.

• काड्यांचे उदाहरण स्पष्ट करतो.

• उड्या मारून वजाबाकी कशी करावी याविषयी सांगतो कृती करतो. 

• वजाबाकी करताना सोपी मोजणी कशी करावी ते सांगतो.

• आकाश कंदील, पणत्या तसेच पाठ्यपुस्तक यांच्या जोड्या लावून वजाबाकी करतो.

• कोणत्याही संख्या सोबत शून्य मिळविण्याची विविध उदाहरणे सोडवतो.

• दिलेल्या उदाहरणाच्या चौकटीत योग्य संख्या लिहितो.

• शून्य वजा करण्याची विविध उदाहरणे सोडवतो. 

• मिळविण्याची विविध उदाहरणे सोडवितो.

• बेरीज वजाबाकी यांचा संबंध यावर वर्गात चर्चा करतो.

• बेरीज वजाबाकीची कठीण उदाहरणे सोडवतो.

• दिलेल्या उदाहरणांच्या चौकटी उदाहरणे सोडवून भरून सोडवतो.

• इंग्रजी व भारतीय महिन्यांचे क्रमवार पाठांतर करतो.

• भारतीय वर्षाच्या महिन्याविषयी सांगतो.

• इंग्रजी महिन्यातील दिवसांच्या संख्या सांगतो. 

• दिनदर्शिकेतील इंग्रजी महिन्या विषयी सविस्तरपणे सांगतो.

• दिनदर्शिका वाचतो.

• विविध उदाहरणावरून गणिती क्रियाचा सराव करतो.

• गोष्टीद्वारे वजाबाकी यावर आधारित चर्चा करतो.

• वजाबाकी वर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.

• गोष्टीतून वजाबाकी सोडवितो

• दशक आणि एकक यांचा उपयोग करून विविध उदाहरणे सोडवतो.

• विविध वस्तूंची मापे घेतो. 

• साखर, तांदूळ अशा वस्तू तराजूत मोजतो.

• विविध संख्यांचे लेखन करून लहान मोठेपणा ठरवितो.

• संख्यारेषेवर अंक लिहितो.

• लगतची पुढची संख्या लिहितो. 

• रिकाम्या चौकटीत मागची व पुढची संख्या लिहितो.

• लहान मोठेपणा दाखवणारा  चिन्हाचा तक्ता तयार करतो. 

• विविध संख्यांच्या गटाद्वारे मागची व पुढची संख्या लिहितो.

• संख्या कार्डावरील संख्याचा चढता उतरता क्रम लिहितो आणि सांगतो. 

• संख्यांचा चढता उतरता क्रम लिहितो.

• विविध संख्याद्वारे उतरता क्रम लावतो.

• विविध संख्याद्वारे चढता क्रम लावतो.

• वर्तुळातील संख्या घेऊन त्यापासून विविध अंकांच्या संख्या तयार करतो.

• दिलेल्या कार्डावरील संख्या घेऊन त्याद्वारे संख्या तयार करतो. 

• जाड कागदांचा तक्ता तयार करून त्यावर संख्या लिहून आणतो. 

• वनभोजनाचे गीत अभिनयासह गायन करतो.

• संख्यांचे शब्द व क्रम यातील फरक समजून घेतो.

• क्रमवाचक शब्दांची यादी तयार करतो. 

•पाठातील चित्रावरून प्रश्न विचारतो.

• विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

• क्रमवाचक शब्दाचा योग्य वापर करतो.

• दशकांची ओळख करून घेतो. 

• गिऱ्हाईक व दुकानदार बाजारात काय बोलत असतील त्याचे वर्णन करतो.

• आठवडी बाजाराला भेट देऊन माहितीचे संकलन करतो. 

• आठवडी बाजारात विकण्यासाठी आलेल्या साहित्याची यादी बनवतो.

• संबोध स्पष्ट करून घेतो.

• काड्या, मणी, ठिपक्यांचा वापर करून बेरजा करतो.

• शाब्दिक उदाहरण सोडवतो.

• वहीवर, पाटीवर दशक एकक रकाने आखून योग्य अंक लिहतो. 

• बेरीज वजाबाकी दशक वाढवून किंवा कमी करून सोडवतो. 

• शाब्दिक उदाहरण तयार करण्याची क्रिया याविषयी चर्चा करतो.

• साहित्याच्या मदतीने वजाबाकीची उदाहरणे सोडवतो. 

• वजाबाकी संबंधित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.

• दशक एकक रूपात वजाबाकी करतो.

• विविध चित्रे पाहून उंच व ठेंगण्या वस्तू ओळखतो.

• लांबी म्हणजे काय समजावून घेतो.

• वर्गातील विविध वस्तू मोजतो व त्यांच्या नोंदी ठेवतो.

• दोराच्या साह्याने वस्तूच्या चारही बाजूंच्या लांबीची तुलना करतो.

• मातीकाम केलेल्‍या फळे, भाजीपाला इत्यादी वस्तूंचा संग्रह करतो.

• वस्तू विकत घेण्यासाठी किती नोटा द्यावे लागतील ते सांगतो. 

• नाणी व नोटांचे निरीक्षण करतो.

• नाणी व नोटांचा संग्रह करतो. 

• तराजूचे चित्र काढतो व रंगवतो.

• वजन मोजण्याच्या साधनांची यादी बनवतो. 

• चित्राद्वारे जड व हलक्या वस्तू सांगतो.

• विविध भांड्यांचे निरीक्षण करून लहान- मोठी भांडी कोणती सांगतो. 

• स्वयंपाक घरातील भांडी जमा करून पाणी भरण्यासाठीचा अंदाज व्यक्त करतो.

• ग्लास किंवा कप घेऊन त्यात किती झाकणे पाणी मावते ह्याची कृती करतो.

• दूध डेअरीला भेट देऊन मापाचे निरीक्षण करतो. 

• दिनदर्शिकेचे वाचन करतो.

• महिन्यांची क्रमवार नावे सांगतो. 

• दिनदर्शिकेतील वारांची नावे इंग्रजीत सांगतो.

• दिनदर्शिकेतील वारांची नावे पाठ करतो.

• नावाऐवजी फोटो वापरून दिनदर्शिकेतील महिने व वारांची नावे ओळखतो

• दिनदर्शिकेतील वर्षभराची सणांची यादी तयार करतो. 

• आकृतीबंध तयार करून दाखवतो. 

• आकृतिबंधाचा उपयोग करतो. 

• स्वतः आकृतीबंध तयार करतो.

• आकृतिबंधाचे महत्त्व समजून घेतो.

• आकृतिबंधाचे उपयोग सांगतो.

• गुणाकाराच्या उदाहरणांचा सराव करतो.

• पाढे म्हणून गुणाकार सोडवतो.

• दोन ते दहा पर्यंतचे पाढे म्हणतो.

• दिलेल्या अंकाच्या टप्प्याने संख्या सांगतो.

• ग्रीक राजाच्या मुकुटाविषयी माहिती मिळवितो.

• दिलेल्या अंकाचा पाढा तयार करून वर्गात सादर करतो.

• पाढ्यांचा तक्ता तयार करतो. 

• पाढ्यांचे अंकात व अक्षरात लेखन करतो.

• 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे अंकात व अक्षरात लेखन करतो.

Saturday, February 19, 2022

February 19, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय कार्यानुभव इयत्ता दुसरी

 









विषय कार्यानुभव 

• रिकाम्या खोक्यापासून संगणक तयार करतो.

• बाहुली तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी करतो. 

• नैसर्गिक घटकाचा तक्ता तयार करून आणतो.

• नैसर्गिक घडामोडी विषयी सांगतो.

• पाण्यासंबंधित बडबड गीते गोळा करतो.

• पाण्याचे घरगुती उपयोग सांगतो.

• कापसापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी करतो. 

•कापसापासून वाती, फुलवाती तयार करून आणतो.

• कृत्रिम व नैसर्गिक धाग्यांची ओळख करून घेतो.

• विविध प्रकारचे वस्त्रांचे नमुने पाहून वस्त्रांची ओळख करून घेतो. 

• परसबागेतील भाज्यांचे फायदे सांगतो.

• फळांच्या व फुलांच्या चित्रांचा संग्रह करतो.

• परिसरातील वृक्षांची नावे सांगतो.

• परिसरातील झाडांची लागवड कशा प्रकारे केली जाते याची माहिती सांगतो. 

• रिकाम्या काडीपेटी पासून विविध वस्तू तयार करतो.

• काडीपेटी पासून आगगाडी तयार करतो.

• पाण्याचे जीवनातील महत्त्व सांगतो

• पाण्याचे घरगुती उपयोग सांगतो.

• बडबड गीताचे साभिनय गायन करतो.

• पाण्याचे महत्व व उपयोग सांगतो. 

• पाण्याची निगा कशी राखावी या विषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.

• झाडांना पाणी घालण्याच्या पद्धती सांगतो.

• रिकाम्या खोक्यापासून बाहुली तयार करून आणतोो.

• झाडाची लागवड कशा प्रकारे केली जाते याची माहिती सांगतो. 

• परिसरातील वृक्षांची नावे सांगतो.

• परिसरातील साहित्य साधनांचे नमुने गोळा करतो.

• वर्गाचे सुशोभन करण्यासाठी लागणारे साहित्य व साधनांची यादी तयार करतो

• वर्गाचे सुशोभन करतो.

• वर्गाचे सुशोभन करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.

• वर्तमानपत्रातील पाण्यासंबंधीत गोष्टी, कथा यांचा संग्रह करतो.

• पाण्या संबंधित गोष्टी हावभावासहित सांगतो.

• माती भिजवून दाखवतो.

• मातीपासून माळा तयार करतो.

• मातीपासून विविध आकाराच्या वस्तू बनवतो.

• दैनंदिन जीवनातील निवार्‍याची महत्त्व सांगतो.

• पाण्याचे जीवनातील महत्त्व स्पष्ट करतो.

• कागदापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करतो.

• कागदी होडी तयार करून आणतो.

• कागदाची होडी तयार करण्याची कृती वर्गात सांगतो.

 •कागद व कापसापासून तयार करून विविध वस्तू तयार करतो.

• कागदापासून भेटकार्ड तयार करून आणतो.

• कापसाची बाहुली तयार करतो.

• कागदापासून चेंडू तयार करतो. 

• वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तीचे चित्रे जमा करतो.

• नैसर्गिक घडामोडींची सविस्तरपणे कारणे सांगतो. 

• नैसर्गिक घटकांची ओळख करून देतो. 

• नैसर्गिक घटकांची नावे सांगतो.

• विविध प्रकारच्या आपत्तीचा चार्ट बनवतो.

•आपत्तींची नावे सांगतो. 

• वर्तमानपत्रातील फळांची चित्रे गोळा करतो.

• आहारातील फळांचे महत्त्व समजावून घेतो. 

• फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट देऊन माहिती गोळा करतो. 

• परिसरातील फळविक्रेत्यास भेट देऊन माहिती संकलित करतो.

• राखी तयार करून आणतो. 

• राखीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करतो.

• विविध प्रकारच्या राखी यांची ओळख करून देतो. 

• जलसाक्षरता संबंधित म्हणी, घोषवाक्य तयार करतो.

• पाण्यासंबंधित गीते,बडबडगीते यांचा संग्रह करतो. 

• परिसरातील फळ, बिया यांचे नमुने गोळा करतो.

• फळांची चित्रे पाहून त्यांचा उपयोग सांगतो.

• फळ कशाप्रकारे पिकतात याचे वर्णन करतो.

• पाणी साठवण्याचे फायदे सांगतो.

• परिसरातील फळ, बिया यांचे नमुने गोळा करतो.

• फळे व त्यांची चव सांगतो.

• फळांची चित्रे पाहून त्यांचे उपयोग सांगतो.

• वर्षभरातील दिनविशेष सांगतो. 

• दिनविशेषचा चार्ट तयार करून आणतो. 

• पर्यावरण विषयक गीत लयबद्ध रीतीने सादर करतो.

• दैनंदिन जीवनातील अन्नाचे महत्त्व स्पष्ट करतो. 

• कुंड्यांची निर्मिती कशी केली जाते हे सांगतो.

• उपयुक्त व शोभिवंत कुंड्या यांचा फरक समजून घेतो.

• स्वतः कुंड्या रंगवतो.

• कपड्याच्या विविध प्रकाराची ओळख करून घेतो.

• शिवणकामासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी बनवितो. 

• बांबूच्या विविध जातींची माहिती मिळवितो.

• शेंगांच्या टरफलांची नावे सांगतो. 

• शेंगांच्या टरफलांद्वारे सौंदर्य कृती तयार करतो.

• विविध बियांचे नमुने गोळा करतो.

• परिसरातील वृक्षांच्या विविध प्रकारच्या पानांची नावे सांगतो.

• बियांची / शेंगांची टरफले, पाने इत्यादी पासून सौंदर्यकृती तयार करतो. 

• लघुउद्योगाची माहिती सविस्तरपणे सांगतो.

• लघुउद्योगाचा चार्ट तयार करतो.

• लघुउद्योगाची नावे सांगतो

• जलसाक्षरतेवर आधारित बडबड गीतांचा संग्रह करतो.

• रुमालाचा वापर करून बाहुली तयार करतो.

• बांबूंसंबंधित वस्तू गोळा करतो.

• बांबूंच्या पाना पासून रांगोळी तयार करून दाखवतो.

• स्थानिक कारागीरांना भेट देऊन माहिती गोळा करतो.

• रंगीत कापडापासून बाहुलीचा चेहरा तयार करतो.

• खेळण्यातील बाहुल्यांचे उपयोग सांगतो.

• विविध प्रकारच्या वस्त्रांची ओळख करून घेतो.

• जलसाक्षरते संबंधित गीते म्हणून दाखवतो. 

• नारळाच्या करवंटीपासून खेळणी तयार करतो.

• नारळ सोलणे व फोडण्याची कृती करतो.

• कागदाचे भिरभिरे तयार करतो. 

• कागदाचे भिरभिरे तयार करण्याची कृती वर्गात करून दाखवतो. 

• मातीच्या विविध प्रकाराची ओळख करून घेतो.

• मातीपासून विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार करतो.

• मत्स्य व्यवसायाची माहिती मिळवितो.

• माशांची चित्रे काढतो. 

• विविध माशांची नावे सांगतो.

• नारळाच्या झाडाचे चित्र काढतो.

• नारळाच्या झाडाची रचना व भाग समजावून सांगतो.

• कटपुतली बाहुल्या विषयी माहिती सांगतो

• चित्र व कागदी पुठ्ठा पासून बाहुली तयार करतो.

• बाहुलीसाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो. 

• खाद्य पदार्थांची नावे सांगतोो.

• दैनंदिन जीवनातील अन्नाचे महत्त्व स्पष्ट करतो. 

• पाना फुलांची रचना समजून घेतो.

• फुलझाडांची लागवड कशा प्रकारे केली जाते याविषयी माहिती मिळवतो. 

• फुलांच्या रंगांची नावे सांगतो.

• विविध प्रकारच्या फुलांची नावे सांगतो.

• शाळेतील उपक्रमात सहभागी होतो. 

• मित्रमैत्रिणी मिळून मिसळून राहतो मित्रांना मदत करतो.