DAILY EDUCATION

Sunday, February 20, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय गणित इयत्ता दुसरी

 







विषय गणित 

• मुक्तहस्त त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ इ. आकार काढतो व रंगवतो.

• भौमितिक आकृत्या ओळखतो.

• विविध भौमितिक आकृत्या काढतो.

• कागदाला घडी घालून उभ्या आडव्या तिरप्या रेषा काढतो.

• सरळ रेषा व वक्ररेषा इत्यादीची कृती करून दाखवतो. 

• आकाराची ओळख करून घेऊन कडा व कोपरे मोजतो.

• गोळा केलेल्या वस्तू व आकार यांच्या जोड्या लावतो. 

• आकृत्या काढण्यासाठी व रंग कामासाठी विविध साहित्यांचा वापर करतो.

• दैनंदिन आकृत्या विषयी सविस्तरपणे सांगतो.

• भाज्या, फळे, पाने इत्यादी वस्तू गोळा करून आकार ओळखतो.

• चित्रातील वस्तू व त्यांचे आकार यांची ओळख करून घेतो. 

• हाताने सरळ रेषा मारतो.

• पुस्तक ,वही च्या साह्याने विविध रेषा काढतो.

• विविध भौमितिक आकार काढून रंगवतो.

• वस्तूंचे दशकाचे गट तयार करतो.

• संख्या वाचून तेवढ्या संख्या दाखवतो.

• संख्येतील एकक व दशक ओळखतो.

• दिलेल्या रिकाम्या जागी योग्य संख्या लिहितो.

• प्रत्येक अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगतो. 

• दशकाच्या घरातील संख्या व एककाच्या घरातील संख्या लिहितो.

• कठीण उदाहरणावर चर्चा करतो.

• पारंपारिक व नवीन दोन्ही पद्धतीने संख्या लिहितो. 

• संख्या कार्डवरील संख्या ओळखतो व लिहितो.

• 21 ते 100 संख्यांचे वाचन क्रमाने करतो.

• तक्त्यावरील संख्यांचे वाचन करतो.

• विस्तारित रूपावरून विविध संख्या तयार करतो.

• स्थानिक किंमत विषयी विविध उदाहरणे यांचा सराव करतो.

• दशक व एककाचा वापर करून विस्तारित संख्या तयार करतो.

• विविध चित्रांवरून बेरीज सोडवतो.

• चित्रांच्या सहाय्याने सशाने मारलेल्या उड्या विषयी सांगतो. 

• छोटी-छोटी तोंडी बेरीज याची उदाहरणे सोडवतो.

• बेरजेच्या कठीण उदाहरणांचा संग्रह करून आणतो.

• विविध चित्रांच्या साहाय्याने बेरजेची उदाहरणे सोडवतो. 

•विविध उदाहरणे तयार करून सोडवतो.

• दशक, एकक वापरून दोन अंकी संख्यांची बेरीज करतो.

• स्टिकर्स चे उदाहरणे समजून घेतो.

• विविध उदाहरणे घेऊन पुढे मोजून बेरीज करतो.

• काड्यांचे उदाहरण स्पष्ट करतो.

• उड्या मारून वजाबाकी कशी करावी याविषयी सांगतो कृती करतो. 

• वजाबाकी करताना सोपी मोजणी कशी करावी ते सांगतो.

• आकाश कंदील, पणत्या तसेच पाठ्यपुस्तक यांच्या जोड्या लावून वजाबाकी करतो.

• कोणत्याही संख्या सोबत शून्य मिळविण्याची विविध उदाहरणे सोडवतो.

• दिलेल्या उदाहरणाच्या चौकटीत योग्य संख्या लिहितो.

• शून्य वजा करण्याची विविध उदाहरणे सोडवतो. 

• मिळविण्याची विविध उदाहरणे सोडवितो.

• बेरीज वजाबाकी यांचा संबंध यावर वर्गात चर्चा करतो.

• बेरीज वजाबाकीची कठीण उदाहरणे सोडवतो.

• दिलेल्या उदाहरणांच्या चौकटी उदाहरणे सोडवून भरून सोडवतो.

• इंग्रजी व भारतीय महिन्यांचे क्रमवार पाठांतर करतो.

• भारतीय वर्षाच्या महिन्याविषयी सांगतो.

• इंग्रजी महिन्यातील दिवसांच्या संख्या सांगतो. 

• दिनदर्शिकेतील इंग्रजी महिन्या विषयी सविस्तरपणे सांगतो.

• दिनदर्शिका वाचतो.

• विविध उदाहरणावरून गणिती क्रियाचा सराव करतो.

• गोष्टीद्वारे वजाबाकी यावर आधारित चर्चा करतो.

• वजाबाकी वर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.

• गोष्टीतून वजाबाकी सोडवितो

• दशक आणि एकक यांचा उपयोग करून विविध उदाहरणे सोडवतो.

• विविध वस्तूंची मापे घेतो. 

• साखर, तांदूळ अशा वस्तू तराजूत मोजतो.

• विविध संख्यांचे लेखन करून लहान मोठेपणा ठरवितो.

• संख्यारेषेवर अंक लिहितो.

• लगतची पुढची संख्या लिहितो. 

• रिकाम्या चौकटीत मागची व पुढची संख्या लिहितो.

• लहान मोठेपणा दाखवणारा  चिन्हाचा तक्ता तयार करतो. 

• विविध संख्यांच्या गटाद्वारे मागची व पुढची संख्या लिहितो.

• संख्या कार्डावरील संख्याचा चढता उतरता क्रम लिहितो आणि सांगतो. 

• संख्यांचा चढता उतरता क्रम लिहितो.

• विविध संख्याद्वारे उतरता क्रम लावतो.

• विविध संख्याद्वारे चढता क्रम लावतो.

• वर्तुळातील संख्या घेऊन त्यापासून विविध अंकांच्या संख्या तयार करतो.

• दिलेल्या कार्डावरील संख्या घेऊन त्याद्वारे संख्या तयार करतो. 

• जाड कागदांचा तक्ता तयार करून त्यावर संख्या लिहून आणतो. 

• वनभोजनाचे गीत अभिनयासह गायन करतो.

• संख्यांचे शब्द व क्रम यातील फरक समजून घेतो.

• क्रमवाचक शब्दांची यादी तयार करतो. 

•पाठातील चित्रावरून प्रश्न विचारतो.

• विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो.

• क्रमवाचक शब्दाचा योग्य वापर करतो.

• दशकांची ओळख करून घेतो. 

• गिऱ्हाईक व दुकानदार बाजारात काय बोलत असतील त्याचे वर्णन करतो.

• आठवडी बाजाराला भेट देऊन माहितीचे संकलन करतो. 

• आठवडी बाजारात विकण्यासाठी आलेल्या साहित्याची यादी बनवतो.

• संबोध स्पष्ट करून घेतो.

• काड्या, मणी, ठिपक्यांचा वापर करून बेरजा करतो.

• शाब्दिक उदाहरण सोडवतो.

• वहीवर, पाटीवर दशक एकक रकाने आखून योग्य अंक लिहतो. 

• बेरीज वजाबाकी दशक वाढवून किंवा कमी करून सोडवतो. 

• शाब्दिक उदाहरण तयार करण्याची क्रिया याविषयी चर्चा करतो.

• साहित्याच्या मदतीने वजाबाकीची उदाहरणे सोडवतो. 

• वजाबाकी संबंधित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.

• दशक एकक रूपात वजाबाकी करतो.

• विविध चित्रे पाहून उंच व ठेंगण्या वस्तू ओळखतो.

• लांबी म्हणजे काय समजावून घेतो.

• वर्गातील विविध वस्तू मोजतो व त्यांच्या नोंदी ठेवतो.

• दोराच्या साह्याने वस्तूच्या चारही बाजूंच्या लांबीची तुलना करतो.

• मातीकाम केलेल्‍या फळे, भाजीपाला इत्यादी वस्तूंचा संग्रह करतो.

• वस्तू विकत घेण्यासाठी किती नोटा द्यावे लागतील ते सांगतो. 

• नाणी व नोटांचे निरीक्षण करतो.

• नाणी व नोटांचा संग्रह करतो. 

• तराजूचे चित्र काढतो व रंगवतो.

• वजन मोजण्याच्या साधनांची यादी बनवतो. 

• चित्राद्वारे जड व हलक्या वस्तू सांगतो.

• विविध भांड्यांचे निरीक्षण करून लहान- मोठी भांडी कोणती सांगतो. 

• स्वयंपाक घरातील भांडी जमा करून पाणी भरण्यासाठीचा अंदाज व्यक्त करतो.

• ग्लास किंवा कप घेऊन त्यात किती झाकणे पाणी मावते ह्याची कृती करतो.

• दूध डेअरीला भेट देऊन मापाचे निरीक्षण करतो. 

• दिनदर्शिकेचे वाचन करतो.

• महिन्यांची क्रमवार नावे सांगतो. 

• दिनदर्शिकेतील वारांची नावे इंग्रजीत सांगतो.

• दिनदर्शिकेतील वारांची नावे पाठ करतो.

• नावाऐवजी फोटो वापरून दिनदर्शिकेतील महिने व वारांची नावे ओळखतो

• दिनदर्शिकेतील वर्षभराची सणांची यादी तयार करतो. 

• आकृतीबंध तयार करून दाखवतो. 

• आकृतिबंधाचा उपयोग करतो. 

• स्वतः आकृतीबंध तयार करतो.

• आकृतिबंधाचे महत्त्व समजून घेतो.

• आकृतिबंधाचे उपयोग सांगतो.

• गुणाकाराच्या उदाहरणांचा सराव करतो.

• पाढे म्हणून गुणाकार सोडवतो.

• दोन ते दहा पर्यंतचे पाढे म्हणतो.

• दिलेल्या अंकाच्या टप्प्याने संख्या सांगतो.

• ग्रीक राजाच्या मुकुटाविषयी माहिती मिळवितो.

• दिलेल्या अंकाचा पाढा तयार करून वर्गात सादर करतो.

• पाढ्यांचा तक्ता तयार करतो. 

• पाढ्यांचे अंकात व अक्षरात लेखन करतो.

• 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे अंकात व अक्षरात लेखन करतो.

No comments:

Post a Comment