DAILY EDUCATION

Showing posts with label 4 थी प.अ.2 प्रश्नोत्तरे. Show all posts
Showing posts with label 4 थी प.अ.2 प्रश्नोत्तरे. Show all posts

Wednesday, February 14, 2024

February 14, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १८.लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन



१८.लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन 

स्वाध्याय 

१.सांगा पाहू

अ) स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.

उत्तर - शिवरायांनी आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज आणि जंजीरेकर सिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.

------------------------------------------------

आ) स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही.

उत्तर - दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत. प्रजेला सारा माफ करत असत. त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होत असे. एखाद्या वर्षी स्वराज्यात दुष्काळ पडल्याशिवाय सरकारी कोठारात साठवलेले धान्य रयतेला मोफत वाटून देत असत. तसेच दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यावर दुरुस्तीची कामे सुरू करत. या कामामुळे शेतकऱ्यांबरोबर कारागिरांना म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधी जाणवली नाही. 

------------------------------------------------------

इ) शिवरायांनी मलम्मा देसाई हिला दिलेला किताब 

    - सावित्री 

-----------------------------------------------------

२.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा.







--------------------------------------------------

३. चर्चा करा.

पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशाप्रकारे घेतलेली दिसून येते, तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल?

उत्तर - आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत, याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. उदा. आरमारासाठी लहान - मोठ्या नावा, जहाजे, वल्हे, सोड इत्यादी तयार करावे लागत, त्यासाठी लाकूड लागते म्हणून फक्त सागवानाची झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे; परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी तोडू नयेत, असा शिवरायांचा आदेश होता. आम्ही पर्यावरण रक्षणासाठी जास्तीत जास्त झाडे लावू व जंगल तोडीला विरोध करू व जंगलाचे संगोपन करू. 

-----------------------------------------------------

४.वाचा व तुमच्या शब्दात माहिती सांगा.

'जलव्यवस्थापन ' या विषयाची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा. 

उत्तर - पाणीटंचाई असलेल्या भागात रस्ता हा मातीचाच असू द्यावा. त्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी मुर. पाण्याची साठवण करण्यासाठी तळी आणि टाक्या बांधाव्या. पाणी जमिनीत मुरेल अशी जागा ठेवावी. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात जमा होईल.

----------------------------------------------------

February 14, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १७. गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन

 


१७. गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन

 स्वाध्याय

१. सांगा पाहू !

अ) दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ 

     - आज्ञापत्र 

                     --------------------

आ) जलदुर्गांना असेही म्हणत

      - जंजिरा 

--------------------------------------------------------

२.तुम्हाला काय वाटते ते सांगा.

अ) शिवछत्रपतींचा ' भारतीय आरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला जातो.

उत्तर - त्याकाळी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याकडे प्रबळ आरमारी दल होते. ते किनाऱ्यावरील लोकांचा छळ करत असत शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय 'आरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला जातो.

---------------------------------------------------

 आ) शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते ? 

उत्तर - शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते. तसेच त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते अनुभवयास मिळते. जसे, गडकोटांची उभारणी, गडांचे व्यवस्थापन, तोफा, दारूगोळा, आरमार, गनिमी कावा, हेरखाते या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पहावयास मिळते.

--------------------------------------------

३. किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा.

 अ) किल्लेदार 

१. किल्ल्यांचे संरक्षण व कारभार पाहणे.

२. सबनीस, कारखानीस यांना आज्ञा करणे.

                 --------------------------

आ) सबनीस 

१. गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवणे.

 २. पत्रव्यवहार सांभाळणे.

                    --------------------------

इ) कारखानीस

१. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे.

२. युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारूगोळ्याची व्यवस्था करणे.

---------------------------------------------------

४.महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणी दाखवा. 

अ) सिंधुदुर्ग किल्ला            आ) विजयदुर्ग 

इ) मुंबई                             ई) प्रतापगड


----------------------------------------------------


५.छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली ? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल?

उत्तर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यात गनिमी कावा आम्हाला सर्वाधिक आवडली. गनिमी कावा या युद्ध तंत्रात आपल्याला सोयीच्या ठिकाणी अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रु त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते. दैनंदिन जीवनात जर कोणी आक्रमण केले तर या तंत्राचा उपयोग करून आम्ही स्वतःला सुरक्षित स्थळी पोहोचवू.

----------------------------------------------------

February 14, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १६.दक्षिणेतील मोहीम



१६.दक्षिणेतील मोहीम 

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते.  

( वेलूरची, तंजावरची, बंगळूरची )

           ----------------------------------

आ) कुतुबशाहाची गोवळकोंडा ही राजधानी होती.

( दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा )

------------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ)शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता?

उत्तर - स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळावी हा शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे हेतू होता.

-------------------------------------------------

आ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली ? 

उत्तर - स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजीराजांना गळ घातली.

----------------------------------------------------------

 इ) शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात काय लिहिले?

 उत्तर - शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले,' परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पुरुषार्थ गाजवावा.' 

-------------------------------------------------------

३.कारणे लिहा 

अ) शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. 

कारण - उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो केव्हा हल्ला करेल याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे, असा विचार शिवरायांच्या मनात आला. म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले.

-------------------------------------------------------

आ) शिवरायांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली.

कारण - महाराजांनी व्यंकोजीराजांना भेटीसाठी बोलावले. महाराजांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे, अशी त्यांना गळ घातली. पण व्यंकोजीराजे काही दिवस महाराजांबरोबर राहिले आणि महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले आणि त्यांच्या फौजेवर व्यंकोजीराजांनी हल्ला केला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. महाराजांना व्यंकोजीराजांच्या वागणुकीमुळे वाईट वाटले. म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजून तिची पत्रे पाठवली.

----------------------------------------------------

February 14, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय१५. एक अपूर्व सोहळा



१५.एक अपूर्व सोहळा 

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली.

 ( सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची )

                 ---------------------------

आ) शिवरायांचा राज्याभिषेक सन १६७४ मध्ये झाला. 

( १६७४,१६७५,१६४७ )

-----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 

अ) सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते ?

उत्तर - सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते. 

------------------------------------------------------

आ) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला?

उत्तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून ' राज्याभिषेक ' हा शक सुरू केला.

--------------------------------------------------

३.दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले?

उत्तर - मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी व सर्व धर्मांना सारखे वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा निर्माण झाला होता, हे जगाला कळायला हवे तसेच स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.

--------------------------------------------------

आ) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड का केली? 

उत्तर - रायगड हा किल्ला मजबूत होता. जिंकायला अवघड होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते व शत्रूवर नजर ठेवायला सोईचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली. 

----------------------------------------------------

इ) मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले ?

उत्तर - शिवरायांवर सात नद्यांच्या पाण्याचा जलाभिषेक झाल्यावर ते उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले, त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न साकार झाले होते. म्हणून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

--------------------------------------------------------

February 14, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १४. गड आला पण सिंह गेला

 




१४. गड आला पण सिंह गेला

स्वाध्याय

१.अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

अ) तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता.

१) महाड       ⚪          २) चिपळूण    ⚪

३) उमरठे       🔴          ४) रत्नागिरी   ⚪

                  ---------------------

आ) जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता. 

१) पुरंदर    ⚪                 २) कोंढाणा   🔴

३) रायगड  ⚪                 ४) प्रतापगड  ⚪

                -------------------------

इ) तानाजीच्या भावाचे नाव हे होते. 

१) रायबा         ⚪            २) सूर्याजी    🔴

३) मुरारबाजी   ⚪            ४) फिरंगोजी ⚪

-----------------------------------------------

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? 

उत्तर - कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता.

----------------------------------------------- 

आ) कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या ?

उत्तर - "कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे." असे जिजामाता शिवरायांना म्हणाल्या.

---------------------------------------------------

इ) आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले?

 उत्तर - आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी मालुसरे म्हणाले.

-----------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा 

अ) शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले ?

उत्तर - शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले, शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत."

-------------------------------------------------

आ)सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?

उत्तर - सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाला, "अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागुबाई सारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रू वर तुटून पडा."

-------------------------------------------------

Tuesday, February 13, 2024

February 13, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १२.पुरंदरचा वेढा व तह

१२. पुरंदरचा वेढा व तह 

स्वाध्याय

१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत.

( पुणे, सुरत, दिल्ली )

           ----------------------

आ)पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता 

( बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी )

-----------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

 अ) शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?

उत्तर - औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. 

-----------------------------------------

आ) दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?

उत्तर - शिवरायांचा बिमोड करण्यासाठी दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला.

-----------------------------------------

 इ) मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?

उत्तर - शक्ति चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी ठरवले. 

-----------------------------------------

ई) पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूख देण्याचे कबूल केले?

उत्तर - पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होनाचा मुलूख देण्याचे कबूल केले. 

----------------------------------------

३.दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. 

अ) मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्यास काय म्हणाला? 

उत्तर - खान मुरारबाजीला म्हणाला," मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये. कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील जहागीर देतील, बक्षीस देतील."

-----------------------------------------

आ) मुरारबाजीने दिलेरखानास कोणते उत्तर दिले ?

उत्तर - "अरे आम्ही शिवाजीमहाराजांची माणसे ! तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला?" असे मुरारबाजीने दिलेरखानास उत्तर दिले.

----------------------------------------

४.कोण ते लिहा 

अ) औरंगजेब 

आ) पुरंदर 

इ) मुरारबाजी 

ई) जयसिंग 

उ) दिलेरखान 

-----------------------------------------------------

February 13, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १३.बादशहाच्या हातावर तुरी दिल्या



१३.बादशहाच्या हातावर तुरी दिल्या 

स्वाध्याय

१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता.

( पन्नासावा, चाळीसावा, साठावा )

              ------------------------------

आ) आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.

( झाशीत, मथुरेत, ग्वालियर )

----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 

अ) आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?

उत्तर - आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला.

---------------------------------------------------

 आ) आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले?

उत्तर - आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजी राजे हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले. 

--------------------------------------------------

इ)आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले?

उत्तर - आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटले पाठवण्यास सुरुवात केली. 

--------------------------------------------------

३.दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. 

अ) शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले?

उत्तर - शिवराय महाराष्ट्राचे राजे होते व त्यांचा मान पहिल्या रंगीत राहण्याचा होता. परंतु बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे करून त्यांचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्यामुळे शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले.

----------------------------------------------------

आ) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली?

उत्तर - शिवरायांनी प्रथम आजारी पडण्याचे सोंग केले, आपला आजार कमी व्हावा म्हणून साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यास प्रारंभ केला. रोज रोज पेटारे तपासून पहारेकरी कंटाळले. पुढे दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी शिवरायांनी हिरोजीस आपल्या जागी झोपवून मदारीस त्याचे पाय चेपीत बसवले. त्यानंतर शिवराय व संभाजी दोन पेटार्‍यात बसले. पहारेकऱ्यांनी नेहमीप्रमाणे पेटारे उघडून न पाहताच ते जाऊ दिले. महाराजांचे औषध आणण्याच्या निमित्ताने हिरोजी व मदारी तेथून निसटले. अशाप्रकारे शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.

---------------------------------------------------

February 13, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ११. शायिस्ताखानाची फजिती

 


११.शायिस्ताखानाची फजिती 

स्वाध्याय

१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शायिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला.

( पुरंदर, पन्हाळा, शिवनेरी )

           ----------------------------

आ) शायिस्ताखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला.

( शनिवार वाड्यात, लाल महालात, पर्वतीवर)

             ----------------------------- 

इ) औरंगजेब बादशहाने शायिस्ताखानाची रवानगी बंगालमध्ये केली.

(आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये )

--------------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला?

उत्तर - शिरवळ, शिवापुर, सासवड अशी गावे घेत शायिस्ताखान पुण्याला आला.

------------------------------------------------

आ) शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले?

उत्तर - मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले.

----------------------------------------------- 

इ) शायिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली?

उत्तर - आज बोटे तुटली, उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल अशी भीती शायिस्ताखानाला वाटू लागली.

------------------------------------------------------

३.कारणे लिहा 

अ) औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला.

कारण - औरंगजेब बादशाहाच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाहा चिडला.

---------------------------------------------------

आ ) शायिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला.

 कारण - शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला. 'सैतान ! सैतान' म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला.

--------------------------------------------------------

४. घटना कालानुक्रमे लावा.

अ) शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.

आ) शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

इ) शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला.

ई) शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली.

उत्तर  - इ) शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला.

आ) शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

 ई)शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली.

 अ) शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.

-------------------------------------------------------

Monday, February 12, 2024

February 12, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय १०. शर्थीने खिंड लढवली


 

१०. शर्थीने खिंड लढवली

स्वाध्याय

१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

अ) सिद्दी जौहरने पन्हाळ गडाला चौफेर वेढा घातला. 

आ) बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले.

इ) घोडखिंड पावनखिंड नावानेच इतिहासात अमर झाली. 

----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा 

अ) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला?

उत्तर - शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी 'लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप' सिद्दीला पाठवला.

---------------------------------------------------- 

आ) सिद्दी जौहर का चवताळला ?

उत्तर - शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येतात सिद्दी जौहर चवताळला.

-----------------------------------------------------

इ) विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले?

उत्तर - विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले, "आम्ही गडावर जातो  तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या."

----------------------------------------------------- 

३.दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

 अ) पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती केली ?

उत्तर - शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती शिवा काशीद राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी युक्ती होती.

------------------------------------------------------

आ)बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली ?

उत्तर - बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीचत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांची दगडगोटे जमा केले आणि त्या आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली अशा प्रकारे बाजीप्रभूंनी शत्रूला खिंडीत रोख.

------------------------------------------------------ 

४.कारणे लिहा.

अ) आदिलशाहा भयंकर चिडला. 

कारण - अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. म्हणून आदिलशाहा भयंकर चिडला.

----------------------------------------------------

आ) शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला.

 कारण - शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटण्याची योग्य योजना आखली. त्यानुसार शिवरायांचे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पकडली गेली व तेथे जल्लोष सुरू झाला. थोड्याच वेळात शिवाजीचे सोनग उघडकिस आले व सिद्दिने संतापून त्याला तात्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवाजीने केलेल्या आत्मबलिदानामुळे तो अमर झाला.

-----------------------------------------------------

आ) पावनखिंड इतिहासात अमर झाली. 

कारण - स्वामिभक्त बाजीप्रभूंनी घोडखिंडीत सिद्दी जौहरच्या सैन्याला थोपवून धरले. हे करताना बाजीप्रभूंना अनेक जखमा झाल्या, पण ते मागे हटले नाही. शिवराय विशाळगडावर पोहोचल्याच्या तोफांचा आवाज ऐकून नंतर त्यांनी प्राण सोडले. घोडखिंड स्वामिभक्ताच्या रक्ताने पावन झाली, म्हणून पावनखिंड इतिहासात अमर झाली.

------------------------------------------------------ 

५.कोण ते लिहा.

अ) शूर पण क्रूर होता - सिद्दी जौहर 

आ) घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे - बाजीप्रभू

 इ) वेढ्यातून निसटून जाणारे - शिवराय

------------------------------------------------------

February 12, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

 


८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

स्वाध्याय

१.चुकीची जोडी ओळखा

अ) फलटण - निंबाळकर

आ) जावळी - मोरे

इ) सुपे - जाधव

*चुकीची जोडी : सुपे - जाधव

-------------------------------------------------

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) जावळीच्या मोर्‍यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?

उत्तर - जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने '' हा किताब दिला होता.

----------------------------------------------------

आ) जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता ?

उत्तर -  जावळीच्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले, म्हणून जावळीचा विजय फार महत्वाचा होता.

---------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) जावळीच्या मोर्‍यांच्या वाटेला कोणी का जात नसे?

 उत्तर - जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत असत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे.

---------------------------------------------------

 आ) शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले?

 उत्तर - शिवरायांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र धाडले,' तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे.' या पत्राचे उत्तर मोऱ्यांनी उद्धटपणे लिहिले. म्हणून शिवरायांनी या पत्राचे उत्तर अशाप्रकारे दिले, जावळी खाली करून, राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन, हुजुराची चाकरी करणे. इतकीयावर बंडखोरी केलिया मारले जाल.'

--------------------------------------------------


Sunday, February 11, 2024

February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ९.प्रतापगडावरील पराक्रम



९.प्रतापगडावरील पराक्रम 

स्वाध्याय

१.दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

अ) ता  ग  प्र  ड  प  -  प्रतापगड 

आ) व  रा  य  शि   -  शिवराय 

इ) खा  अ  ज  न  ल  फ -   अफजलखान 

----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) अफजलखानाने कोणता विडा उचलला?

उत्तर - अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला.

---------------------------------------------------

आ)  प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला?

उत्तर - प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना निरोप पाठवला,' तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशाहाकडून सरदारकी देववितो.'

------------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले ?

उत्तर - अफजलखान कपटी असून त्याची फौज मोठी होती. शिवरायांचे राज्य लहान व सैन्यदेखील लहान होते. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही, हे शिवराय जाणून होते. म्हणून शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले.

-----------------------------------------------------

आ) अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?

 उत्तर - अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, " गड्यांनो आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो !"

------------------------------------------------------

४.कारणे लिहा 

अ) शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला.

 कारण - प्रतापगड किल्ला डोंगरात होता. प्रतापगडाभोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट होता. प्रतापगडावर चालून जाणे सोपे नव्हते. म्हणून शिवराय प्रतापगडावर गेले, बातमी खानाला कळताच तो चिडला.

------------------------------------------------------

आ) विजापुरात हाहाकार उडाला.

 कारण - अफजलखानाचा वध करून विजयी शिवराय गडावर गेले. त्यांचा इशारा होताच झाडीत लपून बसलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. मराठ्यांनी खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजलखानाचा मुलगा फाजल खान याच्याकडून ही बातमी विजापूरला समजली तेव्हा बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.

---------------------------------------------------------


February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ७. स्वराज्याचे तोरण बांधले

 


७. स्वराज्याचे तोरण बांधले

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शिवरायांकडे पुणे सुप चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती.

( इंदापूर, सासवड, वेल्हे ) 

                  --------------------------

आ) शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले. 

( सिंहगड, शिवनेरी, तोरणा ) 

                  ---------------------------

इ) स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली.

( राजगड, रायगड, प्रतापगड ) 

-------------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या? 

उत्तर - महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाहा, विजापूरचा आदिलशाहा सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता हुकमत गाजवत होत्या. 

-----------------------------------------------------

आ) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या?

 उत्तर - शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

-----------------------------------------------------

इ) शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले?

उत्तर - शिवरायांनी आदिलशहाला 'जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहाच्या हितासाठीच किल्ला घेतला. यात दुसरा काहीही हेतू नाही.' असे उत्तर पाठवले.

-----------------------------------------------------

३. कारणे लिहा 

अ) स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

 कारण -  महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. या किल्ल्याकडे आदिलशाहाचे फारसे लक्ष नव्हते. तसेच किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारूगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले, म्हणून स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.

----------------------------------------------------

आ) तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या.

 कारण - तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले.काम चालू असतानाच मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी किल्ल्यावर सापडल्या.' शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले.' असे कामकार्‍यांनी म्हटले. हे धन स्वराज्याचे आहे आणि ते आपल्या धन्याच्या स्वाधीन केले पाहिजे असा विचार करून एका मोहरेलाही कोणी हात लावला नाही. मोठ्या आनंदाने तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायाजवळ आणून दिल्या.

-----------------------------------------------------

February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ५.शिवरायांचे शिक्षण



 ५.शिवरायांचे शिक्षण

*स्वाध्याय

१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते.

( संस्कृतचे, कन्नडचे, तमीळचे ) 

             ---------------------------

आ) मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात.

( शेतकरी, सैनिक, मावळे )

-----------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ)शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली?

उत्तर - शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूरच्या दरबारात केली.

----------------------------------------------

आ )शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ?

उत्तर - शिवरायांना शिक्षकांनी लिहिण्यावाचण्याच्या कलेबरोबर युद्ध कलेतील घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.

--------------------------------------------

इ )दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सुट का दिली?

उत्तर - शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली. 

----------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) पुण्याचे रूप कसे पालटले?

उत्तर - जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना दिलासा दिल्यामुळे लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली, त्यामुळे देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.

---------------------------------------------------

आ) शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या?

 उत्तर - शिवरायांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूंशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या अवगत झाल्या.

----------------------------------------------------

इ ) जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता?

 उत्तर - जिजाबाईंनी शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील, असा निश्चय केला होता.

-----------------------------------------------------

February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ४.शिवरायांचे बालपण



४.शिवरायांचे बालपण

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

 अ) शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

( पुरंदर, शिवनेरी, पन्हाळा ) 

           ----------------------------------


आ) आदिलशाहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. 

( कर्नाटकातील, खानदेशातील, कोकणातील ) 

----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा 

अ) जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले ?

उत्तर - जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात आपणही मोठे झाल्यावर शूर-पुरुषांसारखे पराक्रम करावे असे विचार घोळू लागले.

-----------------------------------------------------

आ) शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ?

उत्तर - शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असत.

-------------------------------------------------

इ )शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला?

 उत्तर - निजामशाहाच्याची चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला.

-------------------------------------------------

३. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत ?

उत्तर - जिजाबाई शिवरायांना रामाच्या नि कृष्णाच्या, भिमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी ज्ञानेश्वरांचे, कधी नामदेवांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर-पुरुषांच्या गोष्टी आवडत, त्यामुळे शिवरायांना मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे वाटे. तसेच जिजाबाई शिवरायांना साधू संतांच्या चरित्रातीलही गोष्टी सांगत.

----------------------------------------------------

आ )शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातील मुलाला निजामशाहा म्हणून जाहीर का केले ?

 उत्तर - शहाजीराजांनी व जीर फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी निजामांच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले.

----------------------------------------------------

February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ३. मराठी सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे



३. मराठे सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे.

स्वाध्याय

१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) महाराष्ट्रातील शुर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

( मोरे, घोरपडे, भोसले )


आ) बाबाजीराजे भोसले यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती.

( विठोजी, शहाजी, शरीफजी )


इ) निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता.

 (मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी) 

-------------------------------------------- 

२.नातेसंबंध लिहा

अ) मालोजीराजे - विठोजीराजे 

नातेसंबंध - मोठा भाऊ - धाकटा भाऊ  

              --------------------

आ) शहाजीराजे - लखुजीराजे जाधव 

नातेसंबंध - जावई - सासरे 

              --------------------

इ) शहाजीराजे - शरीफजी 

नातेसंबंध - भाऊ - भाऊ 

                 --------------------

 ई) बाबाजीराजे - विठोजीराजे

नातेसंबंध - वडील - मुलगा 

-----------------------------------------------------

३.'अ' गट व 'ब' गट यांच्या जोड्या लावा.

       'अ' गट.             उत्तरे 

अ)सिंदखेडचे      -          भोसले 

आ)फलटणचे      -         निंबाळकर 

इ)जावळीचे        -          मोरे 

ई)मुधोळचे         -          घोरपडे 

-----------------------------------------------------

४.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

 अ) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार कोणी केला ?

 उत्तर - घृष्णेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला.

---------------------------------------------------

 आ) निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली ?

 उत्तर - निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली. 

--------------------------------------------------

इ)निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? 

उत्तर - निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले.

-------------------------------------------------

ई)आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला?

उत्तर - आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला.

-------------------------------------------------

उ) शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले?

उत्तर - निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.

-------------------------------------------------


February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ३. संतांची कामगिरी

 


३. संतांची कामगिरी

*स्वाध्याय

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

 अ) संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.


 आ ) ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.


इ )संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.


ई )समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.

---------------------------------------------------

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?

 उत्तर - श्रीचक्रधर स्वामींना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.

------------------------------------------------

आ) संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला ?

उत्तर - संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्तीमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला.

-----------------------------------------------

इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? 

उत्तर - प्राणीमात्रांवर दया करा असा संत एकनाथांनी लोकांना उपदेश केला.

----------------------------------------------

ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? 

उत्तर - 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे,' हा समर्थ रामदासांनी संदेश दिला.

------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले?

 उत्तर - संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही; सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून ते आत दुःख करत बसले.

-------------------------------------------------

आ) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ?

उत्तर - 'जे का रंजले गांजले|त्यांसी म्हणे जो आपुले 

          तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा |'

 असा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.

-------------------------------------------------

February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय प.अ.2 शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र



१. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र 

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा:

अ) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्य युगाचा होता.

( प्राचीन, मध्य, आधुनिक )

                --------------------------

आ) शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले.

( महाराष्ट्रात,मध्यप्रदेशात,उत्तरप्रदेशात )

-----------------------------------------------------

२. 'अ' गट व '' गट यांच्या जोड्या लावा.

'अ' गट.                                 उत्तरे   

अ) विजयनगरचा सम्राट       -     कृष्णदेवराय

आ) अहमदनगरचा सुलतान  -     निजामशाहा 

इ) विजापूरचा सुलतान         -    आदिलशाहा     

--------------------------------------------------    

३.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा:

अ) प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. 

उत्तर - उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि महाराष्ट्रातील शिवाजी महाराज हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे आहेत.

-----------------------------------------------------

आ) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले?

उत्तर - स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले.

----------------------------------------------------

इ) शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? 

उत्तर - रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.

-----------------------------------------------------

४.वेगळा शब्द ओळखा.

अ) स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य

उत्तर - गुलामगिरी

             ------------------------

आ) रयत, प्रजा, राजा 

उत्तर - राजा 

---------------------------------------------                                                    

                      

Saturday, February 10, 2024

February 10, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय प. अ.2 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा



६. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा

स्वाध्याय 

१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा:

अ) पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते.

आ) मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती.

इ)शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.

----------------------------------------------------

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा:

अ) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले?

 उत्तर- "हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया."असे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.

----------------------------------------------------

आ )जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला?

उत्तर - आपण मनी धरले ते बालराजे पूर्ण करणार, असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.

-------------------------------------------------

इ )शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडान् खडा माहिती मिळवली?

उत्तर - शिवरायांनी पुण्याभोवतीच्या चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारूगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडान् खडा माहिती मिळवली.

-------------------------------------------------

ई )शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले?

 उत्तर - वतनाचा विलक्षण लोभ असणारे देशमुख आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे, हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे शिवरायांनी ठरवले.

-----------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) शिवरायांचे ध्येय कोणते होते?

 उत्तर - सुलतानशाहीच्या वतनदारीवरच अवलंबून न राहता आपले 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करायचे. परक्यांची गुलामगिरी करायची नाही, मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे हे शिवरायांचे ध्येय होते.

----------------------------------------------------

 आ)शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला?

 उत्तर - शिवराय स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्या असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला.

---------------------------------------------------