DAILY EDUCATION

Sunday, February 11, 2024

इयत्ता चौथी स्वाध्याय ९.प्रतापगडावरील पराक्रम



९.प्रतापगडावरील पराक्रम 

स्वाध्याय

१.दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

अ) ता  ग  प्र  ड  प  -  प्रतापगड 

आ) व  रा  य  शि   -  शिवराय 

इ) खा  अ  ज  न  ल  फ -   अफजलखान 

----------------------------------------------------

२.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) अफजलखानाने कोणता विडा उचलला?

उत्तर - अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला.

---------------------------------------------------

आ)  प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला?

उत्तर - प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना निरोप पाठवला,' तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशाहाकडून सरदारकी देववितो.'

------------------------------------------------------

३. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले ?

उत्तर - अफजलखान कपटी असून त्याची फौज मोठी होती. शिवरायांचे राज्य लहान व सैन्यदेखील लहान होते. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही, हे शिवराय जाणून होते. म्हणून शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले.

-----------------------------------------------------

आ) अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?

 उत्तर - अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, " गड्यांनो आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो !"

------------------------------------------------------

४.कारणे लिहा 

अ) शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला.

 कारण - प्रतापगड किल्ला डोंगरात होता. प्रतापगडाभोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट होता. प्रतापगडावर चालून जाणे सोपे नव्हते. म्हणून शिवराय प्रतापगडावर गेले, बातमी खानाला कळताच तो चिडला.

------------------------------------------------------

आ) विजापुरात हाहाकार उडाला.

 कारण - अफजलखानाचा वध करून विजयी शिवराय गडावर गेले. त्यांचा इशारा होताच झाडीत लपून बसलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. मराठ्यांनी खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजलखानाचा मुलगा फाजल खान याच्याकडून ही बातमी विजापूरला समजली तेव्हा बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.

---------------------------------------------------------


No comments:

Post a Comment