DAILY EDUCATION

Saturday, March 5, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहिली विषय कार्यानुभव







• बडबड गीताचे गायन करून दाखवितो.

• बडबड गीताचे अभिनयासह गायन करतो.

• पावसा संबंधित बडबड गीते जमवतो.

• विविध बडबड गीते वहीत चिकटवतो.

• परिसरातील आपत्तींची नावे सांगतो.

• पाऊस आपत्तीचे चित्र पाहून वर्णन करतो.

• रिकाम्या खोक्यापासून सोफा तयार करून दाखवतो. 

• परिसरातील विविध रंगाचे रिकामे खोके गोळा करतो.

• रिकाम्या खोक्यापासून घर तयार करतो.

• बाहुली तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• बाहुली तयार करण्याची कृती करतो.

• घरात आणल्या जाणाऱ्या पालेभाज्यांची नावे सांगतो.

• माहिती असलेल्या विविध पालेभाज्यांची नावे सांगतो. 

• फळांची नावे सांगतो.

• विविध वस्त्रांची माहिती करून घेतो.

• वस्त्राचे मानवी जीवनातील महत्त्व सांगतो.

• मातीशी संबंधित बडबड गीतांचे तालासुरात गायन करतो.

• माती व पाणी मिसळून चिखल तयार करतो.

• पाणी कसे प्यायचे याची पद्धती वर्णन करतो.

• दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्त्व समजावून घेतो. 

• पाण्याचे महत्त्व व उपयोग सांगतो.

• पाणी कसे वाचवावे यासंबंधी माहिती देतो.

• दैनंदिन जीवनातील पाण्याचे उपयोग सांगतो.

• आपत्ती चित्रे पाहून नावे सांगतो.

• वादळ या आपत्तीचे परिणाम सांगतो.

• वादळ आपत्तीचे चित्र पाहून निरीक्षण करतो. 

• रद्दी कागदापासून चेंडू तयार करून दाखवतो.

• रद्दी कागदापासून फुल व हार तयार करून दाखवतो. 

• कागदी पंखा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• कागदी पंखा तयार करून दाखवतो.

• आपल्या जीवनातील अन्नाचे महत्त्व सांगतो.

 • कुंडीमध्ये रोपाची लागवड करतो.

• कुंडीतील लागवड कशा रीतीने केली याची कृती सांगतो.

• जीवनातील निवार्‍याची महत्त्व स्पष्ट करतो.

• प्राणी आणि त्यांचे निवारे यांची नावे सांगतो.

• परिसरातील व्यक्तीकडून बांबू कामाची माहिती मिळवतो.

• बांबू पासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगतो.

• बांबूच्या झाडाचे चित्र काढतो.

• मानवाच्या प्राथमिक गरजा सांगतो.

• शिवणयंत्राचाच्या विविध भागांची नावे सांगतो. 

• शिवणकामासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो. 

• भारतीय संस्कृतीची चित्राद्वारे ओळख करून घेतो.

• परिसरात असलेल्या सार्वजनिक संस्थांची नावे सांगतो.

• परिसरातील व्यवसायाची नावे सांगतो.

• नदीचे चित्र पाहून वर्णन करतो.

• विहिरीचे चित्र काढून दाखवतो. 

• कापसा पासून तयार होणाऱ्या वस्तूंची नावे सांगतो.

• पाऊस आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी सांगतो. 

• वर्गाचे सुशोभन करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.

• पाण्यासंबंधित असलेले चित्र शोधून वहीत चिकटवतो. 

• विविध प्रकारच्या आपत्तीच्या चित्रांचा संग्रह करतो.

• परिसरातील बांबूच्या झाडांची पाने गोळा करतो.

• कापसाच्या वाती तयार करतो.

• फळांचा चार्ट तयार करून आणतो.

• फळ बीयांचे नमुने गोळा करतो.

• मत्स्यव्यवसाय याविषयी माहिती गोळा करतो.

• माशाचे चित्र काढून दाखवतो.

• दैनंदिन जीवनातील वस्त्राचे महत्त्व समजावून घेतो व त्याचे महत्त्व सांगतो.

• बाहुली तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• कठपुतली तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो.

• बांबू पासून बनणाऱ्या वस्तूंची चित्रे काढतो. 

• बांबूपासून तयार होणाऱ्या घरगुती वस्तूंची नावे सांगतो. 

• परिसरातील विविध झाडांची पाने, फुले गोळा करून आणतो. 

• पाना - फुलाचा वापर करून वर्गाचे सुशोभन करतो.

• कोलाज कामाद्वारे चौकोन काढून चौकोनात झाडाची पाने, फुले चिकटवून सजावट करतो.

• लहान लहान श्लोक म्हणून दाखवतो.

• जलसाक्षरते संबंधी घोषवाक्य गोळा करतो.

• पाण्याच्या स्त्रोतांची नावे सांगतो.

• काडीपेटीतील काड्याची पासून विविध वस्तू तयार करतो.

• कोलाज तंत्राचा वापर करून सजावट करतो. 

• काडीपेटीतील काड्याद्वारे अंक बनवतो.

• काडीपेटीतील काड्यापासून घर तयार करतो.

• पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे सांगतो.

• पुष्पगुच्छ तयार करून दाखवतो.

• विविध खाद्य पदार्थांची नावे सांगतो.

• खाद्य पदार्थांची निर्मिती कशी झाली केली जाते याविषयी सांगतो.

• अन्नाची नासाडी होऊ नये याकरिता काय करावे याविषयी चर्चा करतो 

• नारळाच्या झाडाचे चित्र काढतो.

• नारळापासून मिळणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगतो.

• सुईबाभूळ झाडाच्या बिया गोळा करून आणतो.

• परिसरातील झाडांची नावे सांगतो. 

• खाद्यपदार्थांचा तक्ता पाहून नावे सांगतो.

• खाद्य पदार्थांची चित्रे जमवून ती वहीत चिकटवतो.

• झाडांची काळजी घेतो 

• शाळेतील झाडांना पाणी टाकतो.

No comments:

Post a Comment