DAILY EDUCATION

Showing posts with label 4 थी वर्णनात्मक नोंदी. Show all posts
Showing posts with label 4 थी वर्णनात्मक नोंदी. Show all posts

Thursday, October 13, 2022

October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास १








• प्राण्यांच्या वाढीचे निरीक्षण करतो.

•झाडांच्या वाढीचे निरीक्षण करतो.

• झाडांची वाढ कशी होते याविषयी सांगतो. 

•प्राण्यांचे माणसाला होणारे उपयोग सांगतो 

•गावातील पाण्याच्या स्त्रोता विषयी माहिती सांगतो.

•जलशुद्धीकरण केंद्राचे कार्य कसे चालते याविषयी माहिती मिळवितो.

•स्वतःच्या घरी पाणी कसे येते याविषयी माहिती मिळवितो.

•गावातील पाणी सोडण्याचे काम करणाऱ्याची मुलाखत घेतो.

•विविध पदार्थांची यादी करून ते कोणत्या धान्यापासून/फळापासून बनवले आहे त्याची माहिती मिळवितो

•कोणत्या ऋतूत कोणती पिके घेतली जातात याविषयी नोंदी ठेवतो.

•इतर प्रदेशात केल्या जाणाऱ्या पदार्थांची माहिती मिळवितो.

•बाहेर गावी गेल्यानंतर खाण्यात आलेल्या प्रसिद्ध अन्नपदार्थांची यादी करतो.

•घरी तयार केलेल्या पदार्थांची कृती वहीत लिहितो

•पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याविषयी माहिती मिळवितो

•हवामानानुसार कपड्यांमध्ये कसे बदल होतात याविषयी चार-पाच वाक्य लिहितो.

•आवडत्या पेहरावाचे चित्र काढतो.

•कोणते प्राणी उपयोगी आहेत याविषयी माहिती मिळवितो.

•वनस्पतीचे मानवाला होणारे उपयोग सांगतो.

• औषधी वनस्पतींची यादी तयार करतो.

 •औषधी वनस्पती व तिचे उपयोग याविषयी तक्ता तयार करून वर्गात लावतो.

 •प्राण्यांची वाढ कशी होते याविषयी सांगतो. 

•अळीचे रूपांतर फुलपाखरात कसे होते याचे सुंदर वर्णन करतो.

•अंड्यातून जन्म घेणाऱ्या प्राण्यांची नावे सांगतो.

•फुलपाखरांच्या वाढीच्या अवस्था सांगतो. 

•अन्नाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगतो.

•पाण्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगतो 

•पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा याविषयी माहिती सांगतो.

•पाणी दूषित होण्याची कारणे सांगतो.

•नळाचे पाणी घरा पर्यंत कसे येते याची माहिती मिळवितो 

•शेतात तयार होणाऱ्या धान्य विषयी माहिती सांगतो.

•फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करतो व वहीत चिटकवतो.

•ऋतुमानाप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये कोणते बदल दिसतात त्याच्या नोंदी ठेवतो 

•पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात ते सांगतो.

•पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याच्या नोंदी करतो.

•धान्य तयार करण्याच्या प्रक्रिया क्रमाने सांगतो 

•हवेत कोणकोणते घटक आहे याविषयी माहिती मिळवितो 

•अंतरिंद्रिये कोणकोणती आहेत याविषयी सांगतो.

October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय इतिहास







 

•शिवाजी महाराजांचे चित्र काढतो.

 •शिवाजी महाराजांची माहिती मिळवितो.

• जिजाबाई विषयी माहिती मिळवितो.

 •सिंदखेडराजा विषयी माहिती मिळवतो. 

•शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती सांगतो.

•जिजाबाईंनी शिवरायांना शिक्षण कसे दिले याचे वर्णन करतो. 

•शिवरायांची राजमुद्रा पाठ करतो. 

•शिवरायांच्या शिक्षणाविषयी माहिती लिहितो 

•दादाजी कोंडदेव विषयीची माहिती सांगतो.

•बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरमरणाचे वर्णन करतो.

•अफजल खान भेटीच्या प्रसंगाचे वर्णन करतो.

•किल्ल्यांच्या नावांची यादी करतो.

•किल्ल्यावरील सोय सुविधा याबाबत माहिती मिळवितो.

•शिवरायांच्या ताब्यातील महाराष्ट्र - नकाशा काढतो.

•रायगडाची चित्रे संग्रहित करतो.

 •किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतो.

•इतिहासाच्या संदर्भात म्हणींचे संकलन करतो.

•अफजलखानाच्या वधावेळी शिवरायांनी वापरलेल्या हत्यारांची चित्रे जमा करतो.

•शिवरायांच्या सेवेमधील स्वामीनिष्ठ सेवकांची यादी करतो.

•शिवरायांच्या सेवेमधील स्वामीनिष्ठ सेवकांची माहिती मिळवितो.

•लालमहाला विषयी माहिती मिळवितो.

 •शिवराय आग्र्याच्या कैदेतून सुटून आल्यावरचे प्रसंग चित्र तयार करतो.

 •परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची यादी तयार करतो.

•राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी पडलेल्या नाण्यांविषयी माहिती मिळवितो

 •विविध प्रकारच्या टपाल तिकिटांचा संग्रह करतो.

•शिवराय व व्यंकोजी राजे यांच्या भेटीचे व संवादाचे नाट्यीकरण करतो.

•शिवरायांच्या मुलाखतीचे आयोजन ही मुलाखत नाटिका वर्गात सादर करतो.

•भारतीय नौदलातील युद्धनौकांविषयी माहिती मिळवितो.

•विविध प्रकारच्या किल्ल्यांच्या विविध भागांची नावे जाणून घेतो.

•जल व्यवस्थापना विषयी माहिती मिळवितो.

•पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकतात हे सांगतो.

•शाहिस्तेखानाची फजिती याविषयी माहिती सांगतो. 

•कोंढाण्याच्या लढाईचे वर्णन करतो.

•शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी माहिती सांगतो.

•शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचा तक्ता तयार करून वर्गात लावतो.

•शिवरायांच्या आरमारा विषयी माहिती सांगतो.

•शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वर्णन करतो.


October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय शारीरिक शिक्षण

 





 


विषय शारीरिक शिक्षण


•तोल सांभाळण्याच्या कृती करतो.

•दररोज नियमितपणे व्यायाम सराव करतो

• स्थानिक खेळांची नावे सांगतो 

•संधी व स्नायूंना उत्तेजित करणाऱ्या व्यायामाचा सराव करतो

•स्थानिक व पारंपरिक खेळाचा कृतीद्वारे सराव करतो

• स्थानिक व पारंपरिक खेळांची यादी तयार करतो 

•उपक्रमावर आधारित स्पर्धकांची नावे सांगतो 

•शाळेमध्ये उपक्रमावर आधारित घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतो 

•आहार ही संकल्पना स्पष्ट करून सांगतो 

•प्रामाणिकपणा व खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहेत. 

•कोणत्या खेळात किती खेळाडू असतात ते सांगतो 

•विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो 

•विविध खेळाडूंच्या नावांची यादी करून वर्गात लावतो.

•खेळ यांचे प्रकार व खेळाडू यांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो 

•विविध एरोबिक्सच्या कृती करतो. 

•स्वतःच्या पोषाखाबाबत अतिशय दक्ष असतो 

•चौरस आहार म्हणजे काय हे माहीत करून घेतो 

•आहाराच्या सवयीची माहिती मिळवतो 

•क्रीडांगणाच्या चांगल्या सवयीची माहिती मिळवतो 

•नखे व केस नियमितपणे कापतो. 

रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो. 

•हवामानानुसार पोशाख कसा बदलतो याची माहिती मिळवतो. 

•क्रीडांगणांशी संबंधित सवयीची माहिती घेऊन त्याचे पालन करतो. 

•उंची वरून उड्या मारतो. 

•धावणे, चढणे-उतरणे या कृती करतो 

•दररोज प्राणायाम नियमितपणे करतो 

•खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो 

•खेळाच्यावेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो 

•कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो

•आरोग्यदायी जीवनशैली मुळे सहसा आजारी पडत नाही व्यायामाचे फायदे पटवून देतो

•जागा बदलत करावयाच्या हालचालींचा सराव करतो

• विविध पद्धतीने उड्या मारत जाण्याची कृती करतो

• चेंडू झेलणे चेंडू फेकणे या कृती सफाईदारपणे करतो 

•विविध आकाराच्या चेंडूना फटका मारणे व अडवणे ही कृती करतो 

•खेळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो 

•लघु खेळाचा परिचय करून घेतो 

•साहित्य व विनासाहित्य लघुखेळाचे चित्रे गोळा करतो 

•नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो 

•दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो 

•आवडत्या खेळाची पूर्ण माहिती मिळवितो 

•विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो 

•विश्रांती व झोपेचे महत्त्व जाणतो 

•शिस्त, सहकार्य, श्रम या मूल्यांचा स्वतःमध्ये विकसित करतो

•शरीराची आकृती दाखवून अवयवांची नावे सांगतो. 

•शरीराच्या अवयवांच्या हालचालींची कृती करून दाखवतो 

•मैदानाची स्वच्छता ठेवतो व इतरांनाही सांगतो

• मैदान स्वच्छ करण्याच्या साहित्याची नावे सांगतो 

•सुचविलेले आसनप्रकार करतो 

•व्यायाम प्रकार व आसनांची कृती कशी केली ते सांगतो 

•प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याची ओळख करून घेतो 

•प्रथमोपचार पेटीतील साहित्याचा उपयोग कसा व कशासाठी करावा ते सांगतो 

•खेळताना कोण कोणत्या दक्षता घ्यावयाच्या आहेत याची माहिती सांगतो 

•आवडत्या खेळाचे नियम व्यवस्थित सांगतो 

•सुचविलेल्या व्यायाम प्रकाराच्या क्रिया योग्य रीतीने पूर्ण करतो 

•स्वतः कृती करतो व लिहितो

•क्रीडांगणात असलेला कचरा उचलून टाकतो 

•शर्यतीमध्ये सहभागी होतो 

•शरीर स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगतो 

•कपड्यांची स्वच्छता करण्याची कारणे समजून घेतो

• क्रीडा संबंधित साहित्याची हाताळणी काळजीपूर्वक करतो 

•क्रीडा साहित्याची निगा कशी राखायची हे कृतीद्वारे समजून घेतो 

•विविध धाडसी व्यायाम प्रकार करून दाखवतो 

•विविध उंचीवरून उड्या मारतो 

•विश्रांती व झोप यातील फरक समजून घेतो. 

•वैयक्तिक शर्यतीत भाग घेतो 

•चांगल्या सवयींचे पालन करतो 

•खेळात सहकार्य वृत्ती व आपसी संबंध जपतो. 

•खेळताना सांघिक भावना जपतो.

•आरोग्य विषयक चांगल्या सवयी सांगतो



October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय कार्यानुभव

 






 

विषय कार्यानुभव


• परिसर स्वच्छतेची गरज सांगतो. 


• परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो. 


• पाण्याचे महत्त्व सांगतो.


• घरगुती कामासाठी पाण्याचा वापर कसा करावा ते स्पष्ट करतो. 


• शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांची नावे सांगतो. 


• कारखान्यासाठी पाण्याचा वापर कसा केला जातो त्याची वर्णन करतो. 


• पाण्याचे जीवनातील महत्त्व यावर पंधरा ओळी निबंध लिहितो. 


• श्रमाचे मोल जाणतो. 


• इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो.


• सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.


• नैसर्गिक आपत्तीचे चित्र काढून दाखवतो. 


• नैसर्गिक आपत्तीचे चित्र गोळा करतो. 


• अग्निशमन दलाच्या कामाविषयी माहिती सांगतोो. 


• टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करतो.


• प्रत्येक वर्ग मित्राला वाढदिवसाचे भेट कार्ड देतो. 


• प्रत्येक कृती स्वतःहून करतो. 


• मातीकाम व कागद काम यात रुची आहे. 


• रंगीत कागदापासून कान हलवणारा ससा तयार करतो. 


• वर्गात ससा तयार करण्याची कृती सांगतो. 


• कागदापासून विविध वस्तू तयार करतो. 


• परिसरातील नाविन्यपूर्ण रचनेचा संग्रह करतो. 


• इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो.


• वर्गातील सर्वांना मदत करतो. 


• कार्डशिट पासून आकाश कंदील तयार करतो.


• आकाश कंदील तयार करण्याची कृती वर्गात सांगतो. 


• आकाश कंदील तयार करण्याची कृती करून दाखवतो. 


• वर्गसुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.


• पाणी एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाणतो.


• जमिनीच्या प्रकाराविषयी माहिती सांगतो.


• फळे, फुले, भाजीपाला यांचा तक्ता तयार करतो.


• वस्त्र निर्मितीच्या विविध स्रोतांची माहिती जाणतो.


• माती विषयी विविध गाणी म्हणतो 


• माती पासून विविध फळे, भाज्या इत्यादींचे आकार तयार करतो. 


• मातीचे विविध आकार तयार करून त्यावर रंग काम करतो. 


• उपक्रमातील केलेल्या कृती लक्षणीय असतात.


• सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.


• शर्टला सुई दोरा वापरुन बटण लावतो.


• मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या याविषयी माहिती ठेवतो. 


• काडीपेटीच्या साह्याने त्या आकराच्या मातीच्या विटा तयार करतो. 


• काडी पेटीच्या सहाय्याने विविध अक्षरे तयार करतो. 


• काडीपेटीच्या सहाय्याने विविध आकार तयार करतो. 


• दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो. 


• विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.


• पाणी गाळण्याचे अनुभव वर्गात सांगतो.


• पाण्या संबंधित खेळाची माहिती गोळा करतो. 


• पाण्याविषयी विविध म्हणींचा संग्रह करतो.


• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.


• सुचविलेले गीत सुरेल आवाजात गातो.


• पाण्यासंबंधीचे संवाद, कथा लक्षपूर्वक ऐकतो.


• उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची मुद्देसूद माहिती देतो.


• उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र या घटकाची माहिती देतो. 


• उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा या घटकाची मुद्देसूद माहिती देतो.


• नैसर्गिक आपत्तीची विविध कारणे स्पष्ट करतो.


• परिसरातील नैसर्गिक आपत्तीच्या घटना कथन करतो. 


• कागदापासून हातपंखा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे सांगतो. 


• हातपंखा तयार करण्याची कृती करून दाखवतो.


• पुठ्यापासून विविध खेळणी तयार करतो. 


• मणी, चॉकलेट, दोरा यापासून माळा तयार करतो. 


• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो.  


• सुचविलेल्या विषयास संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो. 


• केलेली कृती व कृतीचा क्रम सांगतो. 


• सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करून आकर्षक रंगात रंग देतो.


• शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्र कढतो. 


• राष्ट्रीय सणानिमित्त लागणाऱ्या पताका सुंदर रीतीने लावतो. 


• स्वतः कृती करतो.


• झाडे लावण्याच्या कुंडीला रंग देतो. 


• विविध कुंड्यांमध्ये माती भरतो. 


• कुंडीमध्ये योग्य माती भरून रोपांची लागवड करतो. 


• शाळेतील झाडांना पाणी घालतो. 


• सुई दोऱ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. 


• जलवाहतुकीचे महत्व स्पष्ट करतो. 


• जलवाहतुकीचे फायदे सांगतो. 


• जलवहतुकीच्या साधनांची यादी करतो. 


• टाकाऊ वस्तूंपासून राखी तयार करतो.


• राखी तयार करण्याची कृती वर्णन करतो.


• रिकाम्या खोक्यापासून मोबाईल स्टॅन्ड तयार करून दाखवतो. 


• रिकाम्या खोक्यापसून विविध वस्तू तयार करतो. 


• नारळाच्या करवंटी पासून वस्तू तयार करण्याच्या साहित्यांची नावे सांगतो.


• नारळाच्या करवंटी पासून विविध वस्तू तयार करतो. 


• वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके या मधून फळांची चित्रे मिळवून चिकट वहीत चिकटवीत होतो.


• फळाच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगतो. 


•रबरी चेंडू पासून बाहुली तयार करतो.


 •विविध फुलझाडांची माहिती सांगतो.


 •परिसरातील फुलझाडांची नावे सांगतो व त्यांची माहिती गोळा करतो.


• परिसरातील फुलझाडांच्या नावांची यादी तयार करून वर्गात लावतो.


• फुलझाडांचे महत्त्व उपयोग सांगतो.


• सार्वजनिक ठिकाणी पाणी साठवण्याच्या साधनांची माहिती सांगतो.


• सार्वजनिक ठिकाणच्या पाणी साठवण्याच्या साधनाच्या स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करतो.


• पाणी साठवण्याच्या पद्धती सांगतो. 


• कागदापासून भिरभिरे तयार करतो. 


• रिकाम्या खोक्यापासून सोफा बनवून दाखवतो. 


• लाकडी चमच्या पासून मोराची प्रतिकृती तयार करतो. 


• आइस्क्रीमच्या काड्यापासून विविध कलाकृती तयार करतो. 


• लाकडी चमच्यापासून बैलगाडीची प्रतिकृती तयार करतो.


• मत्स्य व्यवसायाची माहिती मिळवतो. 


• माशांची विविध चित्रे गोळा करून चिकट वहीत चिकटवतो. 


• काड्यापासून तयार केलेल्या वस्तूंची नावे सांगतो.


• शोभिवंत झाडांची नावे सांगतो.


• सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो .


• दिलेल्या कृतीसाठीचे साहित्य हाताळताना काळजीपूर्वक वापर करतो.


• केलेली कृती कशी केली ते सांगतो. 


• स्वतः कृती करतो. 


• स्वतः प्रात्यक्षिक करतो. 


• परिसरातील आवश्यक घटकांबाबत ज्ञान आहे. 


• प्रत्येक गटात सहभागी होऊन काम करतो.


• पाणी पिल्यावर नळाची तोटी बंद करतो. 


• मानवी जीवनावर होणारे नैसर्गीक आपत्तीचे परिणाम सांगतो. 


• केलेल्या कृतीचा क्रम सांगतो. 


• दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेऊन तंतोतंत पालन करतो. 


• वडीलधाऱ्यांचा आज्ञा पाळतो.


• शिक्षकांशी अतिशय नम्रपणे वागतो. .


• कृती करतो अन ती कशी केली ते सांगतो


• स्वतःचे मत मांडण्याचा प्रयत्न करतो



October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय कला आणि संगीत

 *विषय कला आणि संगीत








• जाड, बारीक रेषा काढतो.

• परिसरातील विविध घटना दृश्य यांचे निरीक्षण करतो. 

• मुक्त आकाराचा वापर करून नक्षी काम करतो.

• परिसरातील नक्षीकामाच्या नमुन्याचे कात्रणे गोळा करतो. 

• निसर्गनिर्मित वस्तूंची यादी तयार करतो.

• वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो. 

• पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो. 

• नाटकाची पुस्तके वाचतो.

• वैयक्तिक रित्या गायन करतो.

• निसर्ग संबंधित गीतांचा संग्रह करतो. 

• दात घासण्याची कृती करून दाखवितो.

• माती पासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो. 

• मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो.

• मातीची भांडी बनवितो.

• दैनंदिन जीवनात रोज करत असलेल्या कृतीचा तक्ता तयार करतो.

• नाटकाचे पात्र दिल्यास ते सादर करतो. 

• कथा सांगताना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो. 

• विविध आकाराचे चित्र काढून ते वर्गात लावतो. 

• पुस्तकातील कविता स्वतःच्या चालीत म्हणून दाखवतो .

• दाखविलेल्या वस्तूंपैकी गोल, त्रिकोणी, चौकोनी आकाराच्या वस्तू चे वर्गीकरण करतो. 

• आवाजात ओहकता ठेवून बोलतो. 

• संवाद फेकीचे कौशल्य उत्तम आहे.

• देशभक्तीपर गीतांचा संग्रह करतो. 

• हातांच्या बोटांचा परिचय करून देतो. 

• पाठ्यपुस्तकातील छोट्या प्रसंगाचे वैयक्तिक वाचन करतो. 

• शाळेतील लहान प्रसंगाचे वर्णन करतो.

• प्रसंगानुरूप गीताचे गायन करतो. 

• संवाद करताना रममाण होऊन जातो.

• कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.

• विविध सणांचे चित्र मिळवतो व माहिती लिहितो. 

• पानाचे चित्र काढतो. 

• फुलाचे चित्र काढतो.

• कथेवर आधारित कल्पनाचित्र काढण्याचा प्रयत्न करतो. 

• मातीपासून गोल, दंडगोल तयार करतो. 

• कागद विविध प्रकारच्या आकारात फाडतो.

• देहबोलीचा सुंदर रीतीने वापर करतो. 

• छोट्या-छोट्या अभिनयाच्या कृती करून हसवितो.

• योग्य हावभावासह संवाद साधतो. 

• चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतो. 

• सुंदर नृत्य करतो.

• नृत्याची विशेष आवड आहे. 

• गायनाची विशेष आवड आहे.

• गोल त्रिकोणी-चौकोनी आकारावर आधारित पाने-फुले वस्तू यांचे आकार रेखाटतो. 

• परिचित असलेल्या सोप्या वस्तूचे चित्र काढतो.

• ठिपके रेषा आणि गोल त्रिकोणी चौकोनी या सारख्या आकाराचे आवडीप्रमाणे मांडणी करतो.

• रांगोळीची आवड आहे. 

• रांगोळीत अत्यंत सुंदर व कलात्मक रीतीने रंग भरतो. 

• प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभागी होतो.

• स्वतः नेत्तृत्व करुन इतरांना मदत करतो. 

• सर्वांना उपयोगी वस्तू बाबत माहिती देतो. 

• क्रमानुसार बोटांची नावे सांगतो. 

• तालाचा रचनात्मक आविष्कार करतो.

• दिलेल्या नाटकाचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो.

• विविध प्रार्थनांचा तक्ता तयार करतो. 

• दिलेल्या वस्तूचे चित्र काढतो. 

• माती पासून विविध फळे बनवून आणतो. 

• कथेवर आधारित स्मरण चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. 

• निसर्ग कवितांचा संग्रह करतो. 

• देशभक्तीपर गीताचे तालासुरात गायन करतो. 

• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची जलद व अचूक माहिती सांगतो. 

• माती काम करताना घ्यावयाच्या कृतीची पायरी सांगतो .

• मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती नेमक्या शब्दात सांगतो. 

• चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो. 

• सुशोभीकरणासाठी आवश्यक असे सर्व घटक सांगतो .

• सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो .

• दैनंदिन जीवनातील अनुभव कथन करतो. 

• मातीची मूर्ती तयार करतो.

• विविध चित्रांचा वर्तमानपत्रातून संग्रह करतो .

• कल्पनाचित्र काढतो. 

• कागदाच्या सोप्या वस्तू बनवून आणतो. 

• बाहुलीचे चित्र काढून आणतो .

• जुन्या कापडापासून बॉल तयार करून आणतो.

• चिंध्यापासून बाहुली तयार करून आणतो.

• चित्रात सुंदर रंग भरतो .

• दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक वस्तू निर्मिती करतो .

• दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो. 

• दिलेल्या घटकांपासून योग्य कृतीद्वारे विशेष वस्तू निर्माण करतो .

• दिलेल्या घटकाचे मुक्तपणे रेखाटन करतो. 

• स्वतःच्या घराचे सुंदर चित्र काढतो .

• काढलेल्या चित्रावर आधारित नक्षी काम करतो. 

• काढलेल्या चित्रात आवडीचे रंग काम करतो. 

• वर्तमानपत्रातील चित्रांचा संग्रह करून रंग काम करतो.

• विविध कथांचे वर्तमानपत्रातून कात्रणे गोळा करतो.

• स्वरांचा परिचय करून घेतो. 

• स्वरांच्या नावाची यादी तयार करतो.

• शाळेचे रेखीव चित्र काढतो कथा वाचून दाखवितो व त्यावर अभिनय करतो.

• सौंदर्य निर्मिती साठी कोलाज तंत्राचा वापर करतो .

• सजावटीसाठी आवडीचा रंग माध्यमांचा वापर करतो.

• कागदाचे विविध प्रकारे घड्या घालून दाखवतो.

• कागदी वस्तू बनवून त्यांचा संग्रह करतो. 

• विविध वस्तूवर कागदाची सजावट करतो. 

• परिसरातील निरुपयोगी वस्तूंचा संग्रह करून त्याद्वारे वस्तूंची सजावट करतो.

• वस्तूच्या पृष्ठभागावर अन्य निरुपयोगी वस्तू चिकटवून सजावट करतो .

• विविध वेशभूषा असलेली चित्रे गोळा करतो.

• वर्तमानपत्रातील कथा कवितांचा संग्रह करतो .

• परिसरातील उपलब्ध वस्तूंची यादी तयार करतो. 

• कल्पनाशक्तीचा वापर करून नवनिर्मिती करतो.

• पुठ्ठ्यापासून विविध वस्तू बनवतो.

• सजावटीसाठी योग्य वस्तूचे निवड करतो.

• पुठ्यापासून कागदी खोके बनवतो .

• कागदी खोक्यापासून विविध वस्तू बनवतो. 

• परिसरातील निकामी वस्तूंचा संग्रह करतो.

• विविध आकाराचे ब्रश जमावितो..  

• सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. 

• सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो.

• जीवनातील कलेचे महत्त्व जाणतो. 

• कृतीचा सराव सावधानपूर्वक करतो. 

• कृती कशी व का करावी हे समजून घेतो. 

• चित्राचे विविध प्रकार ओळखतो .

• सुचविलेल्या विषयावर चित्र काढतो.

• शालेय सुशोभन करताना कामात रस घेतो.

October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय इंग्रजी

  विषय इंग्रजी  













• poem presents with action.


• he /she describes points and write it.

• Names items used in school and at home.

• Complete known stories.

• Creates a list of favorite colors.

• writes meaningful sentences.

• Names the fruits.

• Writes friends name.

• Collects pictures of fruits.

• Writes fruits names with spelling.

• Tells the name of the picture by looking at the picture.

• Tells the suggested word.

• Tells about his / her favourite animal.

• Recognises the spelling of the suggested item.

• Tells about his/ her experience in zoo.

• Tells about his own village.

• Names the objects in the picture in English.

• listens and sequences the events.

• listens and repeats as per the model.

• listens and guess the contextual meaning.

• follows the chain of instructions.

• listens and say.

• listens and notes the characteristic of spoken English.

• listens to rhymes and follow the beat.

• listens to material with the help of audio and video devices. 

• listens and classify.

• follows instructions. 

• commands and request. 

• writes neatly and legibly. 

• writes in four lines.

• writes capital and small letters. 

• makes words from given letters. 

•Tells about favorite city.

• Reads the words on the board.

• Reads short sentences on the board.

• Lists the names of the weeks.

• Informs the rabbit

• Lists the names of the vegetables.

•Names the animals.

• Creates a list of animal names.

• Rhyming Word says.

• Creates a list of flower names.

• Writes five lines of information about himself.

• Gives speech in English

• Tries to read the text

• Collects the pictures of birds and paste them in a note book

• The text reads aloud.

• Tells the name of months.

• Looking at the picture asks small questions

• makes a list of house hold items in kitchen

• Collects pictures of various games

• Lists the names of various games

• Writes information about his own friend

•Names the directions

• Finds the names of the villages given in the map

• Explains the importance of mobile

• Writes on a single line

• makes words from given letters

• punctuates sentences and paragraphs

• construct sentences to make a passage 

• answer questions 

• interact among themselves 

• narrate a sequence of events

• get ready to read and write English 

• read a calendar

• identify match and read some letters of the alphabet

• read with proper punctuation

• read and arrange the words in alphabetical order 

• read and understand hand written material 

• speak about a given topic

• Explains the importance of the sun

• ask the questions on picture 

• Gives information about the suggested animals in five lines

• takes the card and read the word on it.

• Performs the stated action slowly and quickly









October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय गणित









•आयताकृती चौरसाकृती आकृत्यांच्या कडा व कोपरे यांची माहिती सांगतो.

•वर्तुळाच्या विविध भागांची नावे सांगतो. 

•टेबलाच्या कडा मोजतो. 

•दिलेल्या आकारामधून सुचविलेल्या आकाराचे वर्गीकरण करतो.

•गणिती स्वाध्याय सोडवितो. 

•विविध प्रकारच्या संख्या लिहितो. 

•लहान मोठी संख्या तुलना करतो. 

•वर्गातील परिसरातील आयताकृती व चौरसाकृती वस्तू ओळखतो. 

•वर्तुळाकार आकारांच्या वस्तूंची नावे सांगतो.

•कागदाच्या घड्या घालून त्याद्वारे सुचविलेले आकार तयार करतो. 

•विविध प्रकारच्या संख्या ओळखून लिहितो. 

•विविध प्रकारच्या संख्या लिहितो. 

•गणिती स्वाध्याय सोडवितो.

•दोरीच्या साह्याने वर्तुळ, आयत, चौरस, त्रिकोण हे आकार तयार करतो. 

•परिसरातील भौमितिक आकार सांगतो. 

•मापनाची विविध परिमाण व उपयोग जाणतो. 

•मण्यांच्या मदतीने शतक दाखवतो.

•चार अंकी संख्या तयार करतो.

•चार अंकी संख्येचे वाचन व लेखन करतो.

•दिलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहितो. 

•संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवितो.

•संख्यांची अगदी योग्य तुलना करतो. 

•अंक कार्डाच्या मदतीने चार अंकी संख्या तयार करतो.

•संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.

•दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टिकोनातून विचार करतो. 

•प्रत्येक अंकाचे स्थान व किंमत सांगतो.

•संख्यांची ओळख व नावे अचूकपणे सांगतो. 

•कार्ड पासून चार अंकी संख्या तयार करतो.

•विस्तारित मांडणी वरून संख्या व्यक्त करतो. 

•संख्यांची विस्तारित मांडणी योग्य रीतीने करतो.

•वर्तुळाकार आकाराच्या वस्तूंची नावे सांगतो. 

•कागदाच्या घड्या घालून सुचविलेले आकार तयार करतो. 

•विविध प्रकारच्या संख्या ओळखतो. 

•मापनाची विविध परिमाण व उपयोग जाणतो. 

•गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.

•गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्त्व जाणतो. 

•प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजावून सांगतो. 

•सुचविलेल्या संख्येमध्ये मागची संख्या सांगतो. 

•सुचविलेल्या संख्येमध्ये लगतची पुढची संख्या सांगतो. 

•चार अंकी संख्यांची विस्तारित रूप लिहतो.

•स्थानिक किमती लिहितो. 

•बेरीज, वजाबाकी या क्रिया अचूकपणे व जलद सोडवतो. 

•संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो. 

•हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत करतो. 

•रिकाम्या चौकटीत चित्रांची योग्य संख्या लिहितो.

 •बेरजेची तोंडी उदाहरणे सोडवतो. 

•शाब्दिक उदाहरणे तयार करण्याचा प्रयत्न करतो. 

•आडवी, उभी मांडणी करून बेरीज सोडवितो. 

•प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगतो

 • पाठयांशातील विचारलेले सूत्रे अचूक व योग्य स्पष्टीकरणासह लिहितो. 

•घड्याळातील वेळ सांगतो. 

दिनदर्शिका पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. 

•गुणाकार हा संबोध समजून घेतो. 

•भागाकाराची उदाहरणे सोडवितो. 

•पाढे तयार करून दाखवितो.

 पाढ्याच्या रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिहितो. 

•गुणाकाराच्या उदाहरणातील गुण्य गुणक व गुणाकार ओळखतो 

•भागाकाराच्या उदाहरणातील भाज्य, भाजक, भागाकार व बाकी ओळखतो.

 •दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद वचूकपणे सोडवतो.

•नाणी व नोटा यांची बेरीज करतो नोटांचा संग्रह करतो. 

•नोटांची चित्रे पाहून नोटांचे योग्य मूल्य सांगतो

 •उदाहरण वाचून कोणते उत्तर काढायचे अचूक सांगतो. 

•उदाहरणात काय करायचे ते स्पष्ट करतो

• मीटर सेंटीमीटर येथील फरक सांगतो. 

•मापनाच्या साधनांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो. 

•वजन मोजण्याचे एकक सांगतो. 

•द्रव पदार्थांची नावे सांगून ते कसे मोजतात याविषयी माहिती सांगतो. 

•आकारमान व धारकता येतील फरक समजून घेतो 

•स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीत सोडवितो. 

•सोडविलेल्या उदाहरणांचा तळा करून स्वतःचे उत्तर तपासतो. 

•सुचविलेल्या अक्षरांच्या क्रमामध्ये कोणते कृती बंद आहे हे जाणून घेतो. 

•विविध प्रकारच्या आकृतीबंधांची ओळख करून घेतो. परिसरातील 

•पाणी कोणकोणत्या ठिकाणी वाया जाते याची यादी करतो. 

•दिनदर्शिकाच्या पानावरील आकृतीबंध शोधण्याचा प्रयत्न करतो

• अक्षरांचा आकृतीबंध स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतो. 

•शाळेतील फरश्यांच्या मांडणीमुळे तयार झालेला आकृतीबंध निरीक्षण करून सांगतो.

 •परिसरातील झाडांची पाने गोळा करतो व त्यांची निरीक्षण करतो 

•सममित आकृत्या काढून दाखवतो. 

•फलकावर सममित,असममित आकृती काढून दाखवतो. 

•सुचविलेल्या अक्षरातील सममित असलेली आकृती ओळखतो. 

•परिसरातील प्राण्यांची पक्ष्यांची पानांची फुलांची चित्रे गोळा करून त्यांचे निरीक्षण करतो. 

•बंदिस्त आकृत्या कोणत्या आहेत ते सांगतो.

• खुल्या आकृत्या कोणत्या आहेत ते सांगतो.

 •रांगोळ्यातील बंदिस्त असलेल्या, नसलेल्या आकृत्या ओळखतो. 

•दशक मोकळा करून वजाबाकी यावेळी शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 

•घड्याळातील वेळ सांगतो. 

•घड्याळातील वेळ तास व मिनिटात लिहितो. 

•दिनदर्शिकेतील महिन्यांची नावे क्रमाने सांगतो दिनदर्शिकेतील सणांची यादी करतो.

 •चित्ररूप माहितीची वही तयार करून आणतो.

• चित्ररूप माहिती दर्शविणाऱ्या उदाहरणांचा संग्रह करतो.

 •अर्धा पाव पाहून इत्यादींचा वापर करून व्यवहारातील वस्तूंची यादी तयार करतो.

October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय मराठी










•यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी तयार करतो.

•विरुद्धार्थी शब्दांची यादी तयार करतो.

•समानार्थी शब्द सांगतो/ यादी तयार करतो. 

•कवितेच्या ओळी ऐकून लगेचच पूर्ण करतो. 

•इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो. 

•मजकुराचे हावभावासहित वाचन करतो. 

•परिसरातील मिठाईच्या दुकानाविषयी माहिती मिळवितो. 

•परिसरातील शेतीमध्ये पिकणाऱ्या पिकांविषयी माहिती मिळवितो. 

•संत तुकडोजी महाराजांप्रमाणे इतर संतांचे अभंग मिळवितो.

•संतांची चित्रे जमा करतो माहिती मिळवितो.

•पुठ्ठ्याचा मोबाईल तयार करून आणतो.

•पावसाचे वर्णन करतो.

•संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

•बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

•बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

•कवितेतील नादमय शब्द शोधून त्यांची यादी तयार करतो.

•प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरक समजून घेतो.

•बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो.

•स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

•एकच वस्तू किंवा व्यक्तीसाठी कोणते शब्द वापरले जातात याचे वर्णन करतो.

•वाक्यात विरामचिन्हांचा वापर करून लिहितो.

•पाठातील संवादाचे हावभावासहित वाचन करतो. 

•पाठातील चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात लिहितो. 

•विविध खेळांची माहिती मिळवितो. 

•खेळांची चित्रे जमा करतो. 

•प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

•ब्रेल लिपीचा वापर कसा करतात याविषयी माहिती मिळवितो. 

•वाहतुकीविषयीचे नियम समजावून सांगतो. 

•परिसरातील झाडाझुडपांची नावे सांगतो. 

•भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो. 

•कवितेतील ओळीचा अर्थ सोप्या शब्दात सांगतो. 

•फुलांची झाडे व वेली यांची यादी तयार करतो.

•स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. 

•मोठ्या विषय बोलताना फार नम्रतेने बोलतो.

•पाठातील प्रसंगाचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो.

•वर्तमानपत्रे, मासिके यात येणारे विनोद शोधतो. 

•आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग वर्गात सांगतो. 

•कवितेचा अर्थ स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. 

•उदाहरणे पटवून देताना म्हणीचा वापर करतो.

•स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

•स्वतःच्या छोट्या छोट्या कथा तयार करतो.

•छोट्या छोट्या कविता तयार करतो.

•आवडलेल्या चित्राचे वर्गात वर्णन करतो. 

•धान्याची नमुने गोळा करून त्याद्वारे नक्षीकाम करतो. 

•पाट्यावर दिसणारे शब्दांचे वाचन करतो. 

•अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. 

•पाठातील मजकुराचा अर्थ समजून घेतो.

• पाठावर आधारित प्रश्न विचारतो.

•विविध प्रकारचे शब्द बाराखडीच्या क्रमाने लावतो.

•अपूर्ण गोष्ट दिल्यास कल्पना करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

•सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे, नैसर्गिकपणे बोलतो. 

•स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. 

•पाठातील संवादाचे नाट्यीकरण करण्याचा प्रयत्न करतो. 

•कचऱ्याचे वर्गीकरण करतो. 

•सूर्याचे चित्र काढून दाखवतो. 

•बोलण्याच्या सुंदरशैलीमुळे सर्वांना खूप आवडतो. 

•सुचविलेला भाग कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

•थोर व्यक्तींची छायाचित्र मिळवितो.

•थोर व्यक्तींच्या माहितीचा संग्रह करतो.

•पाठात आलेले समूह शब्द ओळखतो. 

•शब्द व वाक्य अगदी जशीच्या तसे म्हणतो.

•कवितेतील आवडणाऱ्या ओळींचे सुंदर गायन करतो. 

•सुचविलेली कथा योग्य पण सुंदर भाषेत सांगतो. 

•दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो.

•दिलेल्या घटनांचे चित्र योग्य क्रमवार लावून दाखवतो.

•फळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो

•दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन लिहितो.

•आवडत्या सणाविषयी माहिती लिहितो.

•सणांची घरी कशी तयारी करतात याचे वर्णन करतो.

•पक्ष्यांचे सुरेख वर्णन करतो. 

•विरामचिन्हांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो. 

•जंगलातील प्राण्यांची नावे सांगतो.

•वर्तमानपत्रे मासिके यातून चित्रकथा संकलित करतो. 

•विविध शास्त्रज्ञांची माहिती मिळवितो. 

•जत्रेतील प्रसंगाचे वर्णन करतो 

•ईद या सणाविषयी माहिती मिळवितो.

•मधमाशीचे चित्र काढून माहिती लिहितो सांगतो.

•थोर महिलांविषयी माहिती सांगतो. 

•परिसरातील व्यवसायांची नावे सांगतो. 

•चित्रावर आधारित प्रश्न तयार करतो. 

•गावाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करतो.