DAILY EDUCATION

Thursday, October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास १








• प्राण्यांच्या वाढीचे निरीक्षण करतो.

•झाडांच्या वाढीचे निरीक्षण करतो.

• झाडांची वाढ कशी होते याविषयी सांगतो. 

•प्राण्यांचे माणसाला होणारे उपयोग सांगतो 

•गावातील पाण्याच्या स्त्रोता विषयी माहिती सांगतो.

•जलशुद्धीकरण केंद्राचे कार्य कसे चालते याविषयी माहिती मिळवितो.

•स्वतःच्या घरी पाणी कसे येते याविषयी माहिती मिळवितो.

•गावातील पाणी सोडण्याचे काम करणाऱ्याची मुलाखत घेतो.

•विविध पदार्थांची यादी करून ते कोणत्या धान्यापासून/फळापासून बनवले आहे त्याची माहिती मिळवितो

•कोणत्या ऋतूत कोणती पिके घेतली जातात याविषयी नोंदी ठेवतो.

•इतर प्रदेशात केल्या जाणाऱ्या पदार्थांची माहिती मिळवितो.

•बाहेर गावी गेल्यानंतर खाण्यात आलेल्या प्रसिद्ध अन्नपदार्थांची यादी करतो.

•घरी तयार केलेल्या पदार्थांची कृती वहीत लिहितो

•पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याविषयी माहिती मिळवितो

•हवामानानुसार कपड्यांमध्ये कसे बदल होतात याविषयी चार-पाच वाक्य लिहितो.

•आवडत्या पेहरावाचे चित्र काढतो.

•कोणते प्राणी उपयोगी आहेत याविषयी माहिती मिळवितो.

•वनस्पतीचे मानवाला होणारे उपयोग सांगतो.

• औषधी वनस्पतींची यादी तयार करतो.

 •औषधी वनस्पती व तिचे उपयोग याविषयी तक्ता तयार करून वर्गात लावतो.

 •प्राण्यांची वाढ कशी होते याविषयी सांगतो. 

•अळीचे रूपांतर फुलपाखरात कसे होते याचे सुंदर वर्णन करतो.

•अंड्यातून जन्म घेणाऱ्या प्राण्यांची नावे सांगतो.

•फुलपाखरांच्या वाढीच्या अवस्था सांगतो. 

•अन्नाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगतो.

•पाण्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगतो 

•पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा याविषयी माहिती सांगतो.

•पाणी दूषित होण्याची कारणे सांगतो.

•नळाचे पाणी घरा पर्यंत कसे येते याची माहिती मिळवितो 

•शेतात तयार होणाऱ्या धान्य विषयी माहिती सांगतो.

•फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करतो व वहीत चिटकवतो.

•ऋतुमानाप्रमाणे परिसरातील सजीवांमध्ये कोणते बदल दिसतात त्याच्या नोंदी ठेवतो 

•पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात ते सांगतो.

•पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याच्या नोंदी करतो.

•धान्य तयार करण्याच्या प्रक्रिया क्रमाने सांगतो 

•हवेत कोणकोणते घटक आहे याविषयी माहिती मिळवितो 

•अंतरिंद्रिये कोणकोणती आहेत याविषयी सांगतो.

No comments:

Post a Comment