DAILY EDUCATION

Monday, February 21, 2022

वर्णनात्मक नोंदी विषय मराठी इयत्ता पहिली

 इयत्ता पहिली वर्णनात्मक नोंदी



विषय भाषा

• पानावर स्वतःचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो.

•कविता पाठोपाठ म्हणतो.

• चित्राचे निरीक्षण करून प्रश्न विचारतो.

• गाणे तालासुरात गातो.

•पावसावर आधारित गाणे गातो.

•पावसावर आधारित गाणे अभिनयासह गातो.

•बोलीभाषेतील गीत गातो.

•गमतीदार प्रसंग वर्णन करतो.

•चित्र पाहून झाड कसे बनते सांगतो.

•परिसरातील बिया गोळा करतो 

•बिया रुजविण्याची पद्धत सांगतो.

 •आंधळी कोशिंबीर हा खेळ कसा खेळतात ते सांगतो.

 •खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो.

• परिसरात खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती सांगतो.

 •बोलीभाषेतील इतर पावसाची गाणी म्हणतो.

• ढग, वारा, विज चमकणे, बेडकाचा अभिनय करून दाखवतो

• पावसाळ्यातील गमतीदार प्रसंग सांगतो

• पावसा संबंधित चित्रे जमा करतो

 •पावसात भिजत आहोत खेळत आहोत असे नाट्य करतो

 •गाणे गाण्यासाठी हावभावाचा वापर करतो 

•बेडकाच्या गर्वाची गोष्ट सांगतो

• पावसाळ्यात पावसात भिजण्याचा अनुभव सांगतो

• गाण्यातील चित्र पाहून निरीक्षण करतो

 •चित्रावर आधारित प्रश्न विचारतो

 •बीज कसे रुजते व झाड कसे बनते ते सांगतो

 •कडव्या नुसार कृती करतो

• बिया रुजविण्याची पद्धत सांगतो

 •बीज हे गाणे कृतीसह म्हणतो

 •परिसरातील प्रत्यक्ष पेरणी, खुरपने या शेतकऱ्यांच्या क्रिया सांगतो

 • बी रूजण्याशी संबंधित लोकगीते ऐकतो.

• चित्रे पाहून चित्रात काय दिसते ते सांगतो

• खेळाविषयी माहिती देतो.

 खेळ कसा खेळतात याविषयी सांगतो.

 •लगोरी खेळाविषयी माहिती देतो.

• लगोरी खेळ खेळतो.

 •परिसरातील इतर मनोरंजक खेळाची माहिती सांगतो.

• डाबाडूबी, शिवाशिवी यासारख्या खेळांची माहिती सांगतो.

• कॅरम खेळाविषयी माहिती सांगतो.

• जोडीमध्ये खेळ खेळण्याचा सराव करतो.

 •बुद्धिबळाचे साहित्य व खेळाचे नियम माहीत करून घेतो.

• प्रत्यक्ष बुद्धिबळ कसा खेळतात हे खेळतो.

 •जोडीमध्ये बुद्धिबळ खेळ खेळण्याचा सराव करतो.

 •प्राण्यांची चित्रे पाहतो व त्यांची नावे सांगतो.

• आवडत्या प्राण्यांचे वर्णन करतो.

 •आवडत्या प्राण्यांचे चित्र काढून ते रंगवितो.

• पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचा तक्ता तयार करतो.

• पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचा चित्र जमा करतो.

• मित्रांबद्दल माहिती सांगतो.

 •मित्र प्रेमाच्या गोष्टी सांगतो.

 •चित्रावरून आपले मित्र प्राणी, पक्षी, झाडे या विषयी माहिती मिळवितो.

 •परिसरातील पक्षांची नावे सांगतो.

• परिसरातील पक्षांची माहिती सांगतो.

 •पक्षांची चित्रे काढून ती रंगवतो.

• शेपटीवाले प्राणी आपले मित्र कसे हे समजावून घेतो.

 •परिसरातील प्राण्यांचे आपल्याला होणारे उपयोग समजून घेतो.

 •मित्र प्रेमाच्या प्राण्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो.

• चित्रावरुन पाठातील प्राण्यांबद्दल प्रश्न विचारतो.

 •प्रत्येक कुटुंबातील सदस्य विषयी प्रश्न विचारतो.

• चित्र पाहून चित्राविषयी मित्रांमध्ये गप्पा मारतो.

 •आई विषयी माहिती सांगतो.

• आईचे चित्र काढून ते रंगवितो.

 •आईच्या प्रेमाविषयीची गाणी ऐकतो

• आपली आई काय काय कामे करते ते सांगतो

 •बाबा आपल्यासाठी काय काय करतात ते सांगतो

 •बाबांच्या विषयी गोष्टी व गाणी ऐकतो.

• आपल्या बहीण भावा विषयी माहिती सांगतो.

• आईविषयीच्या कविता सांगतो 

• राखी सणाविषयी माहिती देतो.

• •बहीण-भावाच्या प्रेमाचे गाणे व गोष्टी ऐकतो.

 •आपल्याला आजोबा-आजी का आवडतात ते सांगतो.

 •आजी-आजोबांच्या गाणी व गोष्टी म्हणतो.

• सांगितलेल्या नावाचे चित्र दाखवतो.

• चित्र व शब्दकार्ड यांचे वाचन करतो.

• चित्रासमोर त्याच्या नावाचे शब्द कार्ड ठेवून वाचन करतो.

 •शब्द व चित्र यांच्या योग्य जोड्या जुळवतो. 

•चित्राखालील शब्द वाचून दाखवतो.

• मुंगळा गुळापर्यंत कसा जाईल ते दाखवतो.

• पाठ्यपुस्तकातील दिलेले आकार गिरवतो. 

•आकार गिरवून ते स्वतंत्र काढतो.

 •पाठ्यपुस्तकातील सर्व अवयव काढतो.

 •दुरेघी वहीत अक्षरांचे अवयव काढण्याचा सराव करतो.

 •चित्र पाहून त्याचे नाव सांगतो.

• शब्दातील सारख्या आकाराची अक्षरे ओळखतो.

• पुस्तकातील सूचनेनुसार आकार गिरवतो.

 • शब्द कार्डातील दिलेल्या शब्दांमधील सुचवलेले अक्षर ओळखतो.

• दुरेघी वहीत लिहितो व वाचतो.

• पाठ्यपुस्तकातील गोष्ट ऐकून गोष्टीत काय सांगितले आहे ते सांगतो.

• थेंबाचे पाऊस कसा तयार होतो हे सांगतो. 

•दिनू व आकाशातील ढग यांचे रेखाटन करतो.

• गोष्टीवरून चित्र काढून दाखवितो.

 •चित्रातील प्रसंगावर आधारित प्रश्न विचारतो.

 •प्रसंगावरून कथा सांगण्याचा प्रयत्न करतो.

• चित्राबद्दल स्वतःच्या शब्दात माहिती सांगतो.

• कथा चित्रातील वेगवेगळी चित्रे पाहून कथेचा क्रम ठरवतो. 

• नाट्यीकरणा द्वारे कथेतील गंमत सांगतो.

• स्वतःच्या शब्दात कथा सांगण्याचा प्रयत्न करतो

 •चित्र कशाचे व चित्रात कोण कोण काय करत आहे ते सांगतो 

•शाळेविषयी माहिती सांगतो.

 •शाळेच्या वर्गातील चित्राविषयी माहिती सांगतो. 

• चित्रातील माहिती बद्दल प्रश्न विचारतो.

• आपल्या शाळेतील मुले कोणता खेळ खेळतात याविषयी माहिती व गमती सांगतो.

 •चित्रातील प्राण्यांच्या नकला करून दाखवतो.

• तुटकरेषाच्या आधारे अक्षरे गिरवतो.

 •नात्या विषयी माहिती सांगतो. 

•वाचनपाठ वाचून दाखवतो.

• वाचनपाठाचे वाचन व लेखन करतो.

•दिलेल्या तक्त्यातील अर्थपूर्ण शब्द वहीत लिहितो.

• कुत्रा व मांजर यांच्यातील संवाद वर्गात सादर करतो.

• दूधवाल्या बद्दल माहिती सांगतो. 

•मांजरीच्या वेगवेगळ्या नकला करतो.

• कथेतील गमती करून दाखवतो.

• दूधवाला, उंदीर, मांजर यांचे चित्र काढतो.

• शिंपी, लोहार, कुंभार यांची कामे सांगतो.

• बाजारात मिळणाऱ्या वस्तूंची यादी करतो.

• बाजारातील विक्रेत्यांच्या नकला करून दाखवतो.

• वर्गात भेळीसाठीचे साहित्य आणतो.

• फळ विक्रेता फळे कुठून आणतो याविषयी माहिती मिळवितो.

 •खाऊच्या डब्यात असणाऱ्या वस्तूंची यादी करतो 

• दप्तरातील वस्तूंची यादी करतो.

• बाजाराच्या पिशवीतील वस्तूंची यादी करतो.

• चित्रातील वस्तूंची नावे सांगतो व नावे लिहितो.

 •प्रत्येक गटातील शब्द घेऊन वाक्य लिहितो.

• विहिरीचे चित्र काढून दाखवतो.

• गोलातील शब्द वाचतो व लिहितो.

• अर्थपूर्ण शब्दांची यादी तयार करतो.

 •चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करतो.

• कवितेतील ओळी आणि चित्र यांची माहिती देतो

• अर्थपूर्ण शब्द अक्षर समूहापासून तयार करतो. 

•लिहिलेल्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतो.

•  कवितेत आलेल्या कठीण शब्दांची यादी तयार करतो.

• यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी तयार करतो 

• गावात भरणार्‍या यात्रेचे वर्णन करतो.

No comments:

Post a Comment