DAILY EDUCATION

Monday, January 31, 2022

१९.सुगी

१९. सुगी 



*कवितेचा अर्थ 

१कवितेत कवयित्री कल्पना करत आहे, की थंडीमुळे बोरीच्या झाडाला कडाक्याची थंडी वाजत आहे. थंडीमुळे बोरीच्या झाडाला काटे आले आणि सात खंडी बोरं झाडाला लगडली आहे.


२. वळणावळणावर पेरूची झाडे आहेत आणि थंडीमुळे सर्व पेरूची झाडे थरथरू लागली आहेत. पेरूच्या झाडाला आंबट-गोड पेरू जागोजागी लोंबत आहेत.


३. थंडीने हरभऱ्याची राने दव पडल्यामुळे ओलीचिंब झाली आहेत. हरभऱ्याचा आकार पोपटाच्या चोचीसारखा दिसतो आहे. सर्व हरभरे हिरव्या पानातून डोकावतात आणि ते पानातल्या पोपटासारखे दिसत असून गोड गाणे गात आहेत.


४.खूप थंडी असल्यामुळे चिंचेचे सर्व शरीर थंडीने गारठून वाकडे झाले आहे. हात पाय गारठून गेले आहेत. जाळीच्या गर्दीतून पिकलेली चिंचेचे आकडे डोकावून बघत आहेत. थंडीमुळे ते लालबुंद झालेले आहेत. 


५.थंडी वाढल्यामुळे आता शेकोटी पेटवायची आहे थंडी पडली की आपण सर्व शेकोटी पेटवतो. तिच्यावर हात शेकण्यास कवयित्री सांगत आहे तसेच थंडीत गार आहात शेकता शेकता तोंडात ओल्या चार शेंगा टाकून थंडीची मजा घ्यायची आहे. 

_____________________________________

शब्दार्थ

* सुगी - पिकांचा हंगाम   

* रान - जंगल 

*बोरी - बोराचे झाड       

*थरकाप - थरथर कापणे 

*खट्टे-मीठे - आंबट-गोड 

* जागोजाग - जागोजागी, ठिकठिकाणी

* गाभुळणे - पिकण्याच्या अवस्थेत असणे

* आगटी - शेकोटी

* गार - थंड 

* शेकणे - गरम करणे 

* खंडी - 20 मण म्हणजे एक खंडी 

* लगडणे- बहरणे

______________________________________

**वाक्प्रचार,अर्थ व वाक्यात उपयोग

 १.थरकाप उडणे - भीतीने अंग थरथर कापणे, थंडीने अंग कापणे.

उत्तर - समोरच्या अंगणात भला मोठा साप पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. 

_____________________________________

प्रश्न १.एका वाक्यात उत्तरे लिहा 

१.थंडी कोणाला वाजून आली आहे?

 उत्तर - रानातल्या बोरीला थंडी वाजून आली आहे. 

_______________________________________

२.बोरी कोठे पिकली आहेत?

उत्तर - बोरी रानात पिकली आहेत.

______________________________________ 

३.वळणावरचे झाड कशामुळे थरथर कापू लागले? 

उत्तर - वळणावरचे झाड थंडीमुळे थरथर कापू लागले.

_____________________________________ 

४.गाणी कोण गाऊ लागले? 

 उत्तर - पानातले पोपट गाणे गाऊ लागले.

_______________________________________

५.चिंचेचे हात पाय कसे झाले आहेत? 

उत्तर - चिंचेचे हात-पाय थंडीने वाकडे झाले आहेत. 

_____________________________________

६.आगटी (  शेकोटी ) कधी पेटवतात ?

उत्तर - थंडी जास्त झाली आगटी पेटवतात.

_____________________________________

७.शेकता शेकता काय करायला सांगितले आहे?  

 उत्तर - शेकता शेकता ओल्या चार शेंगा तोंडात घालायला सांगितले आहे. 

_____________________________________

८.सुगी या कवितेच्या कवयित्री कोण आहेत?

उत्तर सुगी या कवितेच्या कवयित्री शैला लोहिया आहेत.

___________________________________

प्रश्न २.थंडीमुळे कोणाला काय झाले ते लिहा 

* वळणावरचे झाड - थरथर कापू लागले 

* हरभऱ्याची राने - ओलीचिंब झाली

* लोकांचे हात - गार झाले

 ______________________________

प्रश्न ३.जोड्या जुळवा 

*खट्टे-मिठ्ठे        -           पेरू 

*काट्यातून लगडलेली   -  बोरे 

*शेकोटी भोवती 

खाल्ल्या जाणाऱ्या -         शेंगा 

_______________________________                                        

प्रश्न ४.काटेरी झाडांची नावे लिहा 

 उत्तर - लिंबू, गुलाब, बाभळी, बोर, कॅक्टस 

_______________________________

प्रश्न ५.आंबा, बोर, पेरु, चिंच यापैकी प्रत्येक फळापासून तुमच्या घरी काय काय बनवले जाते ते लिहा? 

उत्तर - *आंबा - लोणचे, सरबत, आमरस, पन्ह, गुळांबा,कढी 

          -----------------------

*बोर - बोरकुट, उकडलेले बोर, बोराच्या वड्या 

           ------------------------

 *पेरू - जेली, भाजी

           -----------------------

 *चिंच - चिंचोणी, चटणी 

_______________________________

प्रश्न ६.खालील फळातील बियांना तुम्ही काय म्हणतात ते लिहा

* चिंच - चिंचोका 

* आंबा - कोय

* डाळिंब - दाणे

* कलिंगड - बिया,मगज

*बोर - आठोळ्या 

_______________________________

 प्रश्न ७.प्रत्येकी दोन फळांची नावे लिहा 

*एक बी असलेले - आंबा, बोर 

*अनेक बिया असलेली फळे - संत्री, मोसंबी, टरबूज, खरबूज, डाळिंब, पपई.

_______________________________

प्रश्न ८. कवितेच्या ओळी पूर्ण करा

१.वळणावरचे झाड थरकापू लागले,

 खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले.

२. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, 

काट्यातून लगडली बोरे सात खंडी.

३. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, 

जाळीतून डोकावले गाभुळले आकडे.


No comments:

Post a Comment