DAILY EDUCATION

Thursday, October 13, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी विषय मराठी










•यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी तयार करतो.

•विरुद्धार्थी शब्दांची यादी तयार करतो.

•समानार्थी शब्द सांगतो/ यादी तयार करतो. 

•कवितेच्या ओळी ऐकून लगेचच पूर्ण करतो. 

•इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो. 

•मजकुराचे हावभावासहित वाचन करतो. 

•परिसरातील मिठाईच्या दुकानाविषयी माहिती मिळवितो. 

•परिसरातील शेतीमध्ये पिकणाऱ्या पिकांविषयी माहिती मिळवितो. 

•संत तुकडोजी महाराजांप्रमाणे इतर संतांचे अभंग मिळवितो.

•संतांची चित्रे जमा करतो माहिती मिळवितो.

•पुठ्ठ्याचा मोबाईल तयार करून आणतो.

•पावसाचे वर्णन करतो.

•संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

•बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

•बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

•कवितेतील नादमय शब्द शोधून त्यांची यादी तयार करतो.

•प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरक समजून घेतो.

•बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो.

•स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

•एकच वस्तू किंवा व्यक्तीसाठी कोणते शब्द वापरले जातात याचे वर्णन करतो.

•वाक्यात विरामचिन्हांचा वापर करून लिहितो.

•पाठातील संवादाचे हावभावासहित वाचन करतो. 

•पाठातील चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात लिहितो. 

•विविध खेळांची माहिती मिळवितो. 

•खेळांची चित्रे जमा करतो. 

•प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

•ब्रेल लिपीचा वापर कसा करतात याविषयी माहिती मिळवितो. 

•वाहतुकीविषयीचे नियम समजावून सांगतो. 

•परिसरातील झाडाझुडपांची नावे सांगतो. 

•भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो. 

•कवितेतील ओळीचा अर्थ सोप्या शब्दात सांगतो. 

•फुलांची झाडे व वेली यांची यादी तयार करतो.

•स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो. 

•मोठ्या विषय बोलताना फार नम्रतेने बोलतो.

•पाठातील प्रसंगाचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो.

•वर्तमानपत्रे, मासिके यात येणारे विनोद शोधतो. 

•आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग वर्गात सांगतो. 

•कवितेचा अर्थ स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. 

•उदाहरणे पटवून देताना म्हणीचा वापर करतो.

•स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

•स्वतःच्या छोट्या छोट्या कथा तयार करतो.

•छोट्या छोट्या कविता तयार करतो.

•आवडलेल्या चित्राचे वर्गात वर्णन करतो. 

•धान्याची नमुने गोळा करून त्याद्वारे नक्षीकाम करतो. 

•पाट्यावर दिसणारे शब्दांचे वाचन करतो. 

•अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. 

•पाठातील मजकुराचा अर्थ समजून घेतो.

• पाठावर आधारित प्रश्न विचारतो.

•विविध प्रकारचे शब्द बाराखडीच्या क्रमाने लावतो.

•अपूर्ण गोष्ट दिल्यास कल्पना करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

•सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे, नैसर्गिकपणे बोलतो. 

•स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. 

•पाठातील संवादाचे नाट्यीकरण करण्याचा प्रयत्न करतो. 

•कचऱ्याचे वर्गीकरण करतो. 

•सूर्याचे चित्र काढून दाखवतो. 

•बोलण्याच्या सुंदरशैलीमुळे सर्वांना खूप आवडतो. 

•सुचविलेला भाग कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

•थोर व्यक्तींची छायाचित्र मिळवितो.

•थोर व्यक्तींच्या माहितीचा संग्रह करतो.

•पाठात आलेले समूह शब्द ओळखतो. 

•शब्द व वाक्य अगदी जशीच्या तसे म्हणतो.

•कवितेतील आवडणाऱ्या ओळींचे सुंदर गायन करतो. 

•सुचविलेली कथा योग्य पण सुंदर भाषेत सांगतो. 

•दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो.

•दिलेल्या घटनांचे चित्र योग्य क्रमवार लावून दाखवतो.

•फळांची माहिती चित्रासहित संग्रहित करतो

•दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन लिहितो.

•आवडत्या सणाविषयी माहिती लिहितो.

•सणांची घरी कशी तयारी करतात याचे वर्णन करतो.

•पक्ष्यांचे सुरेख वर्णन करतो. 

•विरामचिन्हांचा तक्ता तयार करून वर्गात लावतो. 

•जंगलातील प्राण्यांची नावे सांगतो.

•वर्तमानपत्रे मासिके यातून चित्रकथा संकलित करतो. 

•विविध शास्त्रज्ञांची माहिती मिळवितो. 

•जत्रेतील प्रसंगाचे वर्णन करतो 

•ईद या सणाविषयी माहिती मिळवितो.

•मधमाशीचे चित्र काढून माहिती लिहितो सांगतो.

•थोर महिलांविषयी माहिती सांगतो. 

•परिसरातील व्यवसायांची नावे सांगतो. 

•चित्रावर आधारित प्रश्न तयार करतो. 

•गावाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करतो.

No comments:

Post a Comment