DAILY EDUCATION

Thursday, February 17, 2022

वर्णनात्मक नोंदी इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग 1 व 2

 






विषय परिसर अभ्यास भाग 1 व 2

भाग 1

• स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

• कोणत्या सवयी योग्य-अयोग्य इतरांना पटवून देतो. 

• आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

• सर्व प्राणिमात्रांच्या गरजा समजून घेतो.

• सुचविलेल्या प्रयोगाच्या साहित्याची योग्य व अचूक मांडणी करतो 

• साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो.

• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

• अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटेछोटे जादूचे प्रयोग करतो.

• विज्ञानातील गमती जमती सांगतो. 

•घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतः प्रयोग बनवितो.

• पाठय भागातील दिलेल्या घटकांचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो. 

• दिलेल्या घटनेने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

• सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.

• दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य विचारपूर्वक व अचूक निवडतो.

• विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

• केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

• मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.

• विज्ञाना संदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.

• विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.

• ज्ञानेन्द्रिय स्वच्छता, गरज व महत्त्व जाणतो. 

• प्राणिमात्र संबंधाने विविध प्रश्न विचारतो.

• परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.

• विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.

• सुचविलेल्या प्रयोगाची जलद परंतु योग्य व अचूक मांडणी करतो. 

• सुचविलेल्या पाठय भाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो. 

• सुचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

• खेळण्यातील गाडी, विविध खेळणी यांची अंतररचना काळजीपूर्वक बघतो.

• दिलेल्या घटनेने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. 

• सुचविलेला पाठ्य भाग विषय अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.

• प्रयोग करताना कृती वैशिष्ट्यपूर्ण व जलद गतीने करतो. 

• प्रयोगाचे साहित्य हाताळतांना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.

• दिलेले साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.

• विचारलेल्या प्रश्नांची अचूक स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देतो. 

• केलेली कृती कशी केली ते सांगतो.

• पाठय भागातील आकृतीचे योग्य मुद्यांसह वर्णन करतो.

• छोटी छोटी यंत्रे, गाडी, बाहुली स्वतः दुरुस्त करतो.

• का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.

• अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. 

• वैज्ञानिक दृष्टिकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचार करतो.

• विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो. 

• प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षण वादी वृत्तीने बघतो. 

• वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.

• वैज्ञानिक व संशोधक यांची चित्रे जमा करतो. 

•पाठ्यपुस्तकातील वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित कात्रणांचा संग्रह करतो

• केव्हा काय करणे योग्य अयोग्य इतरांना सांगतो. 

• विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.

• विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. 

• सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.

• सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवतो.

• प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.

• प्रयोगाची रचना केलेली रेखीव व ठळकपणे नावे लिहिलेली आकृती काढतो.

• नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो.

• योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियांची निगा कृती करतो.

• ज्ञानेंद्रियाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो. 

• भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो. 

• प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो व योग्य उत्तर देतो.

• विविध भूरूपे व जलरूपे इत्यादी बाबत माहिती ठेवतो.

• नकाशावरून कोणते ठिकाण कोणत्या दिशेस आहे हे सांगतो. 

• प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव काय असेल ते सांगतो.

• स्वतः प्रयोग कृती व अनुमान लिहितो. 

• प्रयोगाअंती स्वतःचे अनुभव निष्कर्षा सहज सांगतो. 

• प्रयोगाअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात सांगतो.

• प्रयोग / प्रात्यक्षिक करतो. 

• प्रयोग कृती व अनुमान स्पष्टपणे व अचूक लिहितो.

• नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाण शोधतो.

• सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो. 

• सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.

• नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. 

• सुचविलेल्या विषयास संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

• पाठ्य भागातील दिलेल्या आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

• सुचविलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो. 

• कर भरण्याचे फायदे व महत्त्व स्पष्ट करतो. 

• नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.

• भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो.

• विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.

• सहलीच्या नियोजनासाठीचा नकाशा वापरतो.

• जादूटोणा, मंत्र या बाबींकडे आकर्षक होत नाही.

• इतरांनी मांडलेल्या वैज्ञानिक विचारांचा स्वीकार करतो. 

• अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही.

* भाग 2

• प्राचीन मानवी जीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो. 

• ऐतिहासिक वस्तू, चित्र इत्यादींचा संग्रह करतो.

• प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी जाणतो.

• सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो. 

• अश्मयुगाचे महत्त्व सांगतो.

• दगडी हत्यारे तयार करतो

• वातावरणात घडलेल्या बदलाची माहिती सांगतो.

• अग्नीचा शोध लागला नसता तर या विषयी मित्रांसमवेत चर्चा करतो. 

• स्वाध्यायाचे योग्य व परिणामकारक उत्तरे देतो.

• जुना काळ, चालू काळ यातील फरक वर्णनासह सांगतो. 

• बदलत जाणारे काळाच्या प्रवाह जाणतो. 

• परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो. 

• ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे याबाबत जाणतो. 

• इतिहासात घडलेल्या गोष्टीचा चालू वर्तमान काळात काय काय परिणाम झाला ते स्पष्ट करतो.

• अश्मयुगीन जीवनाची माहिती सांगतो.

• पाठ्यभागातील दिलेल्या घटक बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

• बदलाची आवश्यकता का आहे हे पटवून देतो. 

• प्राचीन काळातील मानवाबद्दल माहिती विचारतो.

• अश्मयुगीन मानवाचे चित्र काढतो. 

• अश्मयुगीन मानवाविषयी इंटरनेटवर माहिती शोधतो.

• जुन्या कलाकुसरी बाबत आकर्षित होतो.

• दगडापासून हत्यारे कशी निर्माण केली असतील याबाबत माहिती घेतो.

• अश्मयुगीन अवजारे प्रतिकृती तयार करतो. 

• आजच्या मानवाची प्रगती याबाबत माहिती देतो.

• अश्मयुगीन मानव व आजचा मानव यातील बदल स्पष्ट करतो. 

• अश्मयुगीन जीवनातील नैसर्गिकता व आधुनिक जीवनातील कृत्रिमता याबाबत विचार मांडतो.

No comments:

Post a Comment