DAILY EDUCATION

Tuesday, February 20, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय ७. आहाराची पौष्टिकता

७. आहाराची पौष्टिकता

आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे पुढे दिली आहेत. ती वाचा:

 भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड.

१) मोठाले डाव किंवा चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ वाढून घेतो?

उत्तर - भाजी, दही, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, घेतात.

----------------------------------------------

२) चहाच्या चमच्याने किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो?

उत्तर - मीठ, गाजराची कोशिंबीर, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे.

----------------------------------------------

३) आता या खाद्यपदार्थांचे दोन गट करा. एका गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ, तर दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या.

----------------------------------------------

• सांगा पाहू.

१) पीठे  कोणकोणत्या पदार्थांपासून मिळतात?

उत्तर - ज्वारी, बाजरी, गहू, डाळ या पदार्थांपासून पीठे मिळतात.

----------------------------------------------

२) लोणी, तूप, दही कशापासून मिळते?

उत्तर - लोणी, तूप, दही दुधापासून मिळते.

----------------------------------------------

३) तेल कोणत्या पदार्थापासून मिळते?

उत्तर - शेंगदाणा, तीळ, करडई, मोहरी, खोबरे, सोयाबीन या पदार्थातून तेल मिळते.

---------------------------------------------

४) प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते?

उत्तर - अंडी, दूध, मांस हे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ आहेत.

---------------------------------------------

५) आंबट/ गोड/ तिखट /कडू लागणारे पदार्थ कोणते?

 आंबट पदार्थ - कैरी, चिंच, लिंबू. 

गोड पदार्थ - चिकू.

 तिखट पदार्थ - मिरची, मिरी, लवंग.

 कडू पदार्थ - कारले.

---------------------------------------------

६) कच्चे खाण्याचे पदार्थ कोणते ?

उत्तर - मुळा, काकडी, गाजर, टमाटर, बीट. 

----------------------------------------------

७) अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?

उत्तर - मिरी, लवंग, विलायची, जायफळ.

----------------------------------------------

८) बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते?

उत्तर - ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, डाळी, शेंगदाणे, दूध, लिंबू हे जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ आहेत.

----------------------------------------------

 स्वाध्याय 

अ) काय करावे बरे ?

सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत. ज्या दिवशी आई पालेभाज्या करते, त्या दिवशी ते जेवत नाहीत.

उत्तर - पालेभाज्यांमध्ये पौष्टिक घटक असतात, त्याने शरीर धष्टपुष्ट बनते. शरीराची झीज भरून निघते, हाडे मजबूत होतात, पालेभाज्या खाल्ल्याने शरीराची वाढ होते. हे सुमेध आणि मधुराला समजून सांगितले पाहिजे.

----------------------------------------------

आ) जरा डोके चालवा.

१) नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते? उत्तर - नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते. कारण भाजणीच्या पिठात गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे, चण्याच्या डाळीचे पीठ एकत्र असते त्यातील सर्व घटक निरोगी शरीरासाठी पोषक असतात. म्हणून ज्वारीच्या व बाजरीच्या भाकरी पेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते.

----------------------------------------------

२) भाजीमध्ये दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थांचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो?

उत्तर - भाजीमध्ये दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थांचा पौष्टिकपणा वाढतो.

---------------------------------------------

३) वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात?

उत्तर - लिंबामध्ये क जीवनसत्व असते त्यामुळे अन्नपचन चांगले होते. म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात.

---------------------------------------------

४) शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते?

उत्तर - शेतात पिकणाऱ्या ऊस या पिकात साखर जास्त प्रमाणात असते.

----------------------------------------------

इ) माहिती मिळवा 

दुधाला विरजण लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा. तुम्ही काय कृती केली ते लिहून काढा. वर्गातील इतरांना सांगा.

 विद्यार्थ्यांनी आपल्या आईला विचारून स्वतः करून पहावे.

----------------------------------------------

इ) चित्रे काढा. जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा.

-----------------------------------------------

उ) यादी करा. जी फळे सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा.

उत्तर - केळी, संत्री, कलिंगड, लिची, डाळिंब, मोसंबी, सिताफळ.

-----------------------------------------------

ऊ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 

१)फळांमध्ये  साखर असल्याने फळे गोड राहतात.

२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत.

३) जिभेवर छोट्या छोट्या उंच वट्यांना रुचिकलिका म्हणतात.

-----------------------------------------------

ए) कारणे सांगा.

१) अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी.

 उत्तर - अन्नपदार्थ शिजवताना थोड्या पाण्यात शिजवावे. त्यातील पौष्टिक घटक पाण्यात विरघळतात. सर्व पाणी खाण्यात वापरले नाही तर पौष्टिक घटक वाया जातात. शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे भाजीची मूळ चव व त्यातील जीवनसत्वे तसेच इतर घटक कायम राहतात. म्हणून अन्नपदार्थ शिजवताना काळजी घ्यायला हवी.

---------------------------------------------

२) शरीर धडधाकट हवे.

उत्तर - आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो. दिवसभर केलेल्या कामांना ऊर्जा हवी असते. याशिवाय श्वसन करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीर धड धाकट हवे.

---------------------------------------------

३) लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही. उत्तर - शरीराच्या गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व अन्नपदार्थांमध्ये थोडे अधिक प्रमाणात असतात. यात खूप काही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही. 

---------------------------------------------

ऐ) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली?

 उत्तर - आवळा चाऊन खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं. ते पाणी गोड लागतं आणि तेही पाणी साखर न घालता प्यायचं. हे पाणी गोड लागतं ही जिभेची गंमत मोनिकाताईने सांगितली.

---------------------------------------------

२) फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का? 

उत्तर - फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते असे नाही तर फळांमध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक आणि जीवनसत्वे असतात.

---------------------------------------------

३) आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते? 

उत्तर - लिंबू, चिंच, कैरी, दही, बोर, आलूबुखार, ताक हे आंबट घटक असणारे अन्नपदार्थ आहेत.

----------------------------------------------

ओ) जोड्या लावा 

       अ गट                             उत्तरे 

         दूध                              लोणी 

         तीळ                            तेल

         चिंच                            आंबट पदार्थ 

         ज्वारी                           पीठ

         चिकू                             साखर 

----------------------------------------------

No comments:

Post a Comment