DAILY EDUCATION

Tuesday, February 20, 2024

इयत्ता चौथी प.अ.१स्वाध्याय ६. अन्नातील विविधता

 


६. अन्नातील विविधता.

• जरा डोके चालवा 

१) एखाद्या प्रदेशात एक अन्नघटक मुख्य असतो. असे होण्यामागचे कारण काय असावे?

उत्तर - त्या प्रदेशात विशिष्ट खाद्यांन्नाचे पीक घेतले जाते. त्यामुळे एखाद्या प्रदेशात एक अन्यघटक मुख्य असतो. उदा. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते. कारण तेथील मृदा व हवामान हे त्या पिकाला पोषक असे आहे.

----------------------------------------------

२) प्रदेशानुसार मुख्य अन्नघटकांतही विविधता आढळते याचे कारण काय असेल बरे,?

उत्तर - प्रदेशानुसार मुख्य अन्नघटकांतही विविधता असते. कारण तेथील मृदा व हवामानानुसार अन्न घटकातही विविधता आढळते. तसेच एकाच अन्नघटकाचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे इत्यादी पदार्थ बनवले जातात.

----------------------------------------------

• सांगा पाहू.

 


१) किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात?

उत्तर - तांदूळ, नारळ. 

----------------------------------------------

२) उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न्य पिके होतात ?

उत्तर - गहू, मका. 

----------------------------------------------

३) मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते?

उत्तर - ज्वारी, बाजरी. 

----------------------------------------------

४) भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. या मागचे कारण काय असावे?

उत्तर - तांदळाच्या पिकाला रेताळ जमीन तसेच पाणी जास्त प्रमाणात पाहिजे आणि दक्षिण भागात पाण्याचे प्रमाण व तांदळाच्या पिकाला पूरक असे हवामान आहे म्हणून भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.

----------------------------------------------

• जरा डोके चालवा.

 पुढीलप्रमाणे तक्ता तयार करा.

१) कोणत्या ऋतूत कोणते पिके येतात त्यांची नोंद करा.

२) तुम्हाला माहीत असणारी फळांची नावे लिहा. ऋतूनुसार तक्त्यात लिहा.




----------------------------------------------

• सांगा पाहू 

महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत.

• नकाशाचे निरीक्षण करा व पुढील कृती करा. 

• जिल्हा /राज्य व पदार्थांची यादी करा.



उत्तर - १) गुजरात राज्य - ढोकळा, ठेपला. 

          २) मध्य प्रदेश - बाफला, लापशी.

          ३) हैदराबाद - बिर्याणी. 

          ४) कर्नाटक - इडली, डोसा, सांबार वडा. 

          ५) पंजाब - मक्याची भाकरी, सरसूची भाजी.

----------------------------------------------

• हे पदार्थ कोणत्या धान्यापासून / फळापासून / भाजीपासून बनवले आहेत, त्यांची माहिती घ्या. त्यांची तिसऱ्या सारणीत नोंद करा.




----------------------------------------------

स्वाध्याय 

अ) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात?

उत्तर - हुरडा, पोळी, पापड, सांडगे, धपाटे, धिरडे, मांडे यासारखे अन्नपदार्थ बनवले जातात.

----------------------------------------------

२) विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा.

उत्तर - शेंगदाणा तेल, तिळाचे तेल खोबऱ्याचे तेल, मोहरीचे तेल, जवस तेल, सोयाबीन तेल ही विविध खाद्यतेलांची नावे आहेत.

----------------------------------------------

३) तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो?

उत्तर - पुरण पोळी हा अन्नपदार्थ बनवतात. पुरण हे चण्याच्या डाळीचे तर पोळी गव्हापासून बनवलेली असते.

----------------------------------------------

आ) गटात न बसणाऱ्यांना अन्नपदार्थाभोवती ⚪ करा. गटात तो न बसवण्याचे कारण लिहा.

१) कैरी लोणचे, आंबा, मुरंबा, आमरस 

उत्तर - आंबा - आंबा या घटकापासून बाकी सर्व पदार्थ तयार केले जातात. मात्र आंबा तयार केला जात नाही.

२) पुलाव, पराठा, दहीभात, बिर्याणी 

उत्तर - पराठा - पराठा सोडून इतर सर्व पदार्थ हे तांदळापासून बनवलेले आहेत.

३) मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर 

उत्तर -  मैसूर पाक - मैसूर पाक महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील पदार्थ आहे. इतर तीनही महाराष्ट्रातील आहेत.

----------------------------------------------

इ) खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यापासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात. त्यांची यादी करा.

१) कणीस - धान्य आहे. 

अन्नपदार्थ - कणसापासून उसळ, पोळी, पराठे, वडे इत्यादी अन्नपदार्थ होऊ शकतात.

                ---------------------------

२) भोपळा - फळभाजी आहे.

अन्नपदार्थ - भाजी, सांडगे, धिरडे, शिरा, खीर, भजे इत्यादी अन्नपदार्थ होऊ शकतात.

                ---------------------------

४) गवार - भाजी आहे.

अन्नपदार्थ - भाजी, पुलाव इत्यादी पदार्थ बनवता येतात.

----------------------------------------------

No comments:

Post a Comment