DAILY EDUCATION

Tuesday, February 20, 2024

इयत्ता चौथी घरोघरी पाणी

५. घरोघरी पाणी 

• सांगा पाहू 

खालील चित्रात पाणी साठवण्याची भांडी दाखवली आहेत.

१) त्यापैकी अलीकडे वापरात आलेली भांडी कोणती?

उत्तर - वॉटर फिल्टर, माठ, पिंप.

--------------------------------------------------

२) ही भांडी कोणत्या पदार्थांपासून बनवलेली आहेत?

उत्तर - ही भांडी माती, प्लास्टिक, स्टील, तांबे या पदार्थांपासून बनवलेली आहेत. 

--------------------------------------------------

३) पाण्याच्या भांड्याला झाकण आणि तोटी असण्याचे फायदे कोणते? 

उत्तर - पाण्याच्या भांड्याला झाकण असल्याने पाण्यात धूळ व कचरा पडत नाही आणि भांड्याला तोटी असल्यास पाणी वाया जात नाही.

--------------------------------------------------

• जरा डोके चालवा.

 पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील व प्लॅस्टिकची भांडी लोक का पसंत करू लागले ?

उत्तर - स्टील व प्लॅस्टिकची भांडी लवकर स्वच्छ करता येतात. पाणी निर्जंतुक असते. म्हणून पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील व प्लॅस्टिकची भांडी लोक पसंत करू लागले.

--------------------------------------------------

• सांगा पाहू.

घरात प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर 

१) कोणत्या अडचणी येतील?

उत्तर - घरात प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करून घेतला, तर इंधन खूप वाया जाईल. अन्नाचीही नासाडी होईल.

--------------------------------------------------

२) कोणते फायदे मिळतील?

उत्तर - घरात प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करून घेतला तर सगळ्यांना आपापल्या मतानुसार वाटेल ते आवडीनुसार करून खाता येईल.

--------------------------------------------------

रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना 

१) कोणत्या अडचणी येतील?

उत्तर - रोज लागणारे पाणी नदी वरून प्रत्येक कुटुंबाला आणायचे असेल तर उन्हातान्हात त्यांना डोक्यावरून पाणी आणावे लागेल. पाणी आणत असताना लांबवर चालत जावे लागेल.

--------------------------------------------------

२) कोणते फायदे मिळत असतील?

उत्तर - रोज लागणारे पाणी नदी वरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर सगळ्यांना मिळून पाणी आणता येईल. भरपूर पाणी मिळेल. पाण्याची टंचाई भासणार नाही.

--------------------------------------------------

• सांगा पाहू. 

पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी भरून घेतो. त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते? 

उत्तर - पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी भरून घेतो तेव्हा हवेच्या दाबामुळे पिचकारीत पाणी ओढल्या जाते. पाणी वाहण्याची दिशा पिचकारीच्या दिशेने असते.

--------------------------------------------------

• सांगा पाहू  

१) दररोज तुमच्या घरात किती पाणी लागते? रोजच्या रोज लागणारे पाणी कोण भरते?

उत्तर - दररोज आमच्या घरात एक पिंप पाणी लागते. हे पाणी रोज माझी आई भरते.

--------------------------------------------------

• जरा डोके चालवा. 

बागेला पाणी द्यायचे आहे. नळाचे पाणी आहे आणि विहिरीलाही पाणी आहे. तुम्ही कोणते पाणी वापराल ?

उत्तर - बागेला पाणी द्यायचे आहे. तेव्हा आम्ही विहिरीचे पाणी वापरू.

--------------------------------------------------

• सांगा पाहू. 

ही यंत्रे चालवण्यासाठी कोणती इंधने वापरतात?

१) कूपनलिकेतून पाणी काढणारा पंप.

 उत्तर - पंप विजेवर व डिझेलवर चालतो. 

--------------------------------------------------

२) उंचावरील टाकीमध्ये पाणी चढवणारा पंप. 

उत्तर - पंप हा विजेवर डिझेलवर चालतो. 

--------------------------------------------------

३) वस्तीपर्यंत पाणी पोचवणारा टँकर. 

उत्तर - वस्तीपर्यंत पाणी पोचवणारा टँकर डिझेलवर चालतो.

--------------------------------------------------

स्वाध्याय 

अ) काय करावे बरे

 वस्तीतील सार्वजनिक नळ थेंब थेंब वाहताना दिसतो. 

उत्तर - वस्तीतील सार्वजनिक नळ थेंब - थेंब वाहत असेल तर तो व्यवस्थित बंद करू. महानगरपालिकेला कळवून नळदुरुस्तीचे काम करून घेऊ.

--------------------------------------------------

आ) जरा डोके चालवा 

तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते, तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल ?

उत्तर - घरी नळाची सोय करता येईल. तसेच विहिरीच्या पाण्याला पंप लावून ते पाणी इमारतीच्या वर टाकी बसवून पाईपच्या साह्याने नळाद्वारे वापरता येईल. त्यामुळे घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करता येतील. 

-------------------------------------------------

इ) योग्य की अयोग्य ते लिहा.

१) समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही. - अयोग्य

                     ----------------- 

२) भांडे विसरलेले पाणी निशा झाडांना घालते. - योग्य

                      -----------------  

३) नळाला पाणी आले म्हणून सही भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली.- अयोग्य 

                      ----------------- 

४) रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते.- योग्य

----------------------------------------------------

No comments:

Post a Comment