DAILY EDUCATION

Tuesday, February 20, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय ८. मोलाचे अन्न

 









८. मोलाचे अन्न

सांगा पाहू 

वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी खायला आई कोणकोणते पदार्थ करून देत असेल? ते कशापासून बनतात?

उत्तर - भाकरी सोबत लोणी, मिरचीचा ठेचा,चण्याच्या डाळीच्या पिठाचा झुणका, वांग्याचे भरीत इत्यादी पदार्थ देत असेल. भाकरी ज्वारीच्या पिठापासून, झुणका चणाडाळीच्या पिठापासून बनतो.

----------------------------------------------

२) वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक पदार्थ खाण्यात असतात ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात?

 उत्तर - मासळी, मीठ - समुद्रातून, अंडी - कुक्कुटपालन गृहातून, भाज्या व डाळी कडधान्ये - शेतातून अशा ठिकाणातून हे अन्नपदार्थ बाजारात विकायला येतात.

----------------------------------------------

स्वाध्याय

काय करावे बरे?

डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे.

 उत्तर - डोंगरी आवळे मिळविण्यासाठी शेतकरी सुरुवातीला ते आवळे तोडतात,पोत्यात भरतात, जवळपासच्या बाजारात आणतात आणि व्यापाऱ्यांना विकतात. नंतर व्यापारी आवळे किरकोळ विक्रेत्यांना विकतात. त्यांच्याकडून आपण आवळे घेतो. तेव्हा डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत पोहोचतात.

----------------------------------------------

 आ) माहिती मिळवा 

समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला काय म्हणतात ?

उत्तर - समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला ठिकाणाला ' मिठागरे ' म्हणतात.

----------------------------------------------

२) शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले, तर बटाटे जमिनीखाली तयार होतात. मुळाही जमिनीखाली तयार होतो.वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात ?

उत्तर - रताळे, बीट, गाजर, लसूण, कांदा, भुईमूग ही कंदमुळे मिळतात.

----------------------------------------------

 ३) कणगी म्हणजे काय? त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो ?

उत्तर - धान्य साठवण्यासाठी तयार केलेले तट्ट्यांचे किंवा तुराट्यांचे पेटार म्हणजे कणगी होय. धान्याला कीड लागू नये; खराब होऊ नये; धान्याचे ऊन - पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांना कणगीचा उपयोग होतो.

----------------------------------------------

४) शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात?

उत्तर - शेतकरी तिफण नावाचे अवजार गहू, हरभरा इत्यादी पेरण्यासाठी वापरतात.

----------------------------------------------

५) लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कुठून येतात? 

उत्तर - लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी साखर, लिंबू, मीठ हे पदार्थ लागतात. ते आपण बाजारातून विकत आणतो. 

लिंबू - शेतात पिकतात. शेतकरी लिंबू तोडून बाजारात व्यापाऱ्याला विकतात. त्यानंतर किरकोळ विक्रेत्याकडे लिंब येतात व त्यांच्याकडून आपण लिंब विकत घेतो. याप्रकारे लिंबू आपल्या घरी येतात.

 साखर - ऊसापासून साखर तयार होते. ऊस आधी साखर कारखान्यात नेतात. कारखान्यात उसावर प्रक्रिया होऊन नंतर साखर तयार होते. ती साखर पोत्यात भरतात व पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोहोचवतात. तेथे व्यापारी विकत घेतो. नंतर ते किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे येतात. आपण त्यांच्याकडून साखर विकत घेतो व आपल्या घरी आणतो. 

मीठ - मिठागरात काम करणारे लोक मीठ समुद्रातून गोळा करतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होण्यासाठी ते मीठ कारखान्यात पाठवतात. तेथे मिठावर प्रक्रिया केली जाते व स्वच्छ आयोडीनयुक्त मीठ बाजारात विक्रीसाठी येते आणि आपण विकत घेऊन ते घरी आणतो. अशाप्रकारे या वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचतात.

----------------------------------------------

इ) पुढील तक्ता पूर्ण करा.

 








----------------------------------------------

ई) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 

१) जमिनीचा वाफसा झाला की पेरणी करतात.

२) कंसापासून बाजारीचे दाणे सुटे करायच्या कामाला मळणी म्हणतात 

३)वाऱ्याने हलकी टरफले उडून दूर जातात 

४) काही लोक बोरे, करवंद अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात.

५) अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात. ती चालवण्यासाठी इंधनावर खर्च होतो.

----------------------------------------------

उ) थोडक्यात उत्तरे लिहा 

१) बाबा जमिनीची मशागत कशी करतात?

 उत्तर - बाबा ट्रॅक्टरवर बसून मशागतीची कामे करत असतात. ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून शेती कामे करतात. मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात. मातीची ढेकळे फोडतात, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. 

----------------------------------------------------

२) धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते?

उत्तर - शेतात पिकलेल्या धान्याची पोती गाडीत भरून बाजारपेठेत पोहोचवतात. तेथे व्यापारी धान्य विकत घेतात. तेव्हा शेतकऱ्यांनी उगवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात. व्यापारी जे धान्य विकत घेतात, ते साऱ्या देशात विकले जाते. ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोचवले जाते. अशाप्रकारे धान्य साऱ्या देशभर पोचवले जाते.

----------------------------------------------------

 ३) अन्न वाया का घालवायचे नाही ?

उत्तर - अन्न तयार करण्यासाठी शेतकरी, कोळी तसेच इतर अन्नपदार्थ तयार करणारे लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला मिळते. त्यांची साठवण, वाहतूक व विक्री करणे, तसेच त्यांच्यापासून खाद्यपदार्थ तयार करणे यात अनेक लोकांचे प्रयत्न व मेहनत कामी येतात  त्यावर खूप खर्च होतो. म्हणून अन्न वाया घालवायचे नाही. 

----------------------------------------------------

४) घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते?

उत्तर - घरात धान्य आणल्यानंतर ते निवडतात, स्वच्छ करतात आणि त्याचे पीठ करतात. मग स्वयंपाक करताना पीठ भिजवून मळतात. थापून भाकरी करतात व भाजतात. अशा प्रकारे भाकरी करतात.

----------------------------------------------------

ए ) जोड्या लावा 

         अ गट                         उत्तरे

          मीठ                         समुद्र 

          ऊस                         मळा 

          मकाणे                     गोड्या पाण्याचे तळे 

          बोरे                          वन

          अंडी                         कुक्कुटपालन 

          भाजीपाला                  शेत.

----------------------------------------------------

No comments:

Post a Comment