DAILY EDUCATION

Saturday, February 24, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय १८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल




 १८. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल .

स्वाध्याय

•सांगा पाहू 

शेजारी दिलेल्या तिकिटांची चित्रे पहा.



समाजात झालेले कोणते बदल तिकीटांवरच्या चित्रातून दिसत आहेत?

 उत्तर - कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो.

 पूर्वीच्या काळात माणूस फक्त शेती करत असे. शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता.

 फक्त शेतीमुळे कुटुंबातील सर्वांचे उदरनिर्वाह होत नसल्याने व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास झाला; शहरे वाढू लागली.

 एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता रेल्वे सेवा सुरू झाल्या आणि आता विमानसेवा सुद्धा सुरू झाल्यामुळे जग जवळ आले आहे.

---------------------------------------------------

•सांगा पाहू.



१) या चित्रात तुम्हाला काय दिसते?

 उत्तर - शेजारील काही बाया गप्पा मारत बसलेल्या आहे. मुले त्यांच्या अवतीभोवती खेळत आहेत. शेजारी वस्तूंची देवाण-घेवाण करीत आहेत. मुलाच्या घराच्या किल्ल्या शेजारी ठेवलेल्या आहेत. त्या मुलगा घेत आहे आणि पोलीस काका फलकाद्वारे आपला शेजारी खरा पहारेकरी आहे असे सांगताना दिसत आहे.

---------------------------------------------------

२) तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टींची देवाण-घेवाण होते?

 उत्तर - आपण शेजारी एकाच परिसरात राहत असल्यामुळे परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी,वीज  यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांची मदत घेत असतो. घरात केलेल्या खाद्यपदार्थांची सुद्धा देवाण-घेवाण करत असतो. अशा अनेक गोष्टींची देवाण-घेवाण शेजाऱ्यांमध्ये होत असते.

---------------------------------------------------

अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

 १) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे म्हणतात.

२) स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते.

---------------------------------------------------

आ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरनासे का झाले?

 उत्तर - कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसतसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले.

---------------------------------------------------

२) माणूस स्थलांतर का करतो?

 उत्तर - मुले मुलींच्या शिक्षणासाठी, काम धंदा नोकरी व्यवसायानिमित्त घरातील मोठ्या माणसांना स्थलांतर करावे लागते.

---------------------------------------------------

इ) कारणे द्या.

१) मोठी कुटुंबे विखुरली गेली.

 उत्तर - कारण, कुटुंबातील माणसांची संख्या जास्त असल्यामुळे कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले त्यामुळे व्यापार आणि उद्योगधंदे यांचा विकास झाला. शहरे वाढू लागली, पोटापाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली.

---------------------------------------------------

२) शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात.

 उत्तर - कारण, परिसरातील कचरा, सुरक्षितता, आणि वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत हवी असते. वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्याला मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपल्या शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात.

----------------------------------------------------


No comments:

Post a Comment