DAILY EDUCATION

Friday, March 1, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय २३. नैसर्गिक आपत्ती



 स्वाध्याय 

अ) काय करावे बरे ?

तुमचे गाव डोंगरावर आहे. डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे.

 उत्तर - आमचे गाव डोंगरावर असल्यामुळे शेजारील गावातील गावकऱ्यांना पूर ओसरेपर्यंत आपल्या गावात सामावून घेऊ.

-----------------------------------------------

आ) जरा डोके चालवा.

पुढे नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे ते पूर्ण करा. त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या.

१) चक्रीवादळ २) मोडकळीला आलेले घर कोसळणे. ३) वीज कोसळून त्यात मरणे. ४) दोन आगगाड्यांची टक्कर होणे. ५) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे. ६) जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे. ७) स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे. ८) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे.

उत्तर - 

नैसर्गिक आपत्ती

१) चक्रीवादळ 

२) वीज कोसळून त्यात मरणे.

३) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे.

४) जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे.

 मानवनिर्मित आपत्ती 

१) मोडकळीला आलेले घर कोसळणे.

२) दोन आगगाड्यांची टक्कर होणे.

३) स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे.

४) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे.

-----------------------------------------------

२) बर्फ पडणे आणि गारपीट यात काय फरक आहे उत्तर - बर्फाळ प्रदेशात हिवाळ्यात बर्फ पडतो. बर्फ पडत असताना तो कापसासारखा पडतो आणि त्याचे बारीक कण पडत असतात. परंतु, याउलट अवकाळी पावसाबरोबर गारपीट होत असते. गारांचा मारा लागून माणसे,जनावरे जखमी होतात. गारा जमिनीवर पडत असताना अतिशय वेगाने पडतात आणि त्या दगडासारख्या असतात त्यामुळे घराची कौले फुटणे, पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होणे यासारख्या वाईट गोष्टी घडतात.

-----------------------------------------------

३) बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ? त्याचे कारण काय असेल? 

उत्तर - बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहतात. त्यांच्या अंगावर केस दाट असतात. कारण थंडीपासून रक्षण होणे ही निसर्गाची योजना आहे.

-----------------------------------------------

इ) माहिती मिळवा. 

मोठ्या शहरांमध्ये अग्निसुरक्षा दले असतात. त्यांच्याविषयी माहिती मिळवा. त्या दलातले सेवक कोणकोणत्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात त्यांची यादी करा. मिळालेले माहिती वर्गातील इतरांना सांगा.

 उत्तर - इमारतीला आग लागणे, स्वयंपाकाचा सिलेंडर फुटून आग लागणे,अपघात,पूर येणे इत्यादी दुर्घटनांमध्ये अग्नी सुरक्षा दलातले सेवक नागरिकांना मदत करतात.

-----------------------------------------------

उ) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात ?

उत्तर - आपल्या देशात ठराविक काळातच पाऊस पडतो. म्हणून त्याला मोसमी पाऊस असे म्हणतात.

-----------------------------------------------

२) हिवाळ्यातला कोणता प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो?

 उत्तर - हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो.

-----------------------------------------------

३) गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत?

 उत्तर - गारांचा मार लागून माणसे, जनावरे जखमी होतात, घरांची कौले फुटतात, गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागाचे नुकसान होते. आंब्याचा मोहोर झडून आंब्याचे उत्पादन कमी होते.

-----------------------------------------------

४) पुराच्या पाण्यात पोहावे का ?

उत्तर - पुराच्या पाण्याला ओढ फार असते. त्यामुळे पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते.

-----------------------------------------------

५) त्सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनावर काय परिणाम होतो?

 उत्तर - त्सुनामीचा मारा इतका शक्तिशाली असतो की किनाऱ्याजवळ असणारी वाहने आत बसलेल्या माणसासकट दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा जखमी होतात.

-----------------------------------------------

ऊ) गाळलेले शब्द भरा.

१) पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात.

२) पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते.

३) त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात.

४) त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात.

-----------------------------------------------

No comments:

Post a Comment