DAILY EDUCATION

Friday, March 1, 2024

इयत्ता चौथी प.अ.१ स्वाध्याय २४. आपण परिसर धोक्यात आणत आहोत का?



 





• जरा डोके चालवा.

 

पूर्वी शेतीसाठी वर्षासाठी केवळ पावसाळ्यात पाणी लागे. आता ते बऱ्याच ठिकाणी आठ महिने लागते. जिथे तिबार पिके घेतात, तिथे तर शेतीसाठी वर्षभर पाणी लागते. पाऊस तर फक्त पावसाळ्यात पडतो. मग उरलेले आठ महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामांसाठी पाणी कुठून येते?

 उत्तर - पावसाचे जे पाणी जमिनीत मुरलेले असते ते पाणी उरलेले आठ महिने उपयोगी पडते. विहिरींना आणि कुपनलिकांना जे पाणी लागते ते जमिनीत मुरलेले पाणी असते. तसेच नदीवर बांधलेली धरणे, बंधारे यातील पाण्याचा उपयोग पावसाळा संपल्यावर उरलेले आठ महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामासाठी होतो.

--------------------------------------------

स्वाध्याय

काय करावे बरे.


बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे. ती सुरू केली की स्कूटर मधून खूप धूर येत असतो.

 उत्तर - स्कूटरला व्यवस्थित ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करून नवीन साधने घेता येईल त्यामुळे स्कूटर मधून खूप धूर येणार नाही.

--------------------------------------------

आ) यादी करा.


 पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा.

उत्तर -  डिझेलवर चालणारे वाहन - ट्रक, कार, इतर मोठी वाहने इत्यादी.

 पेट्रोल वर चालणारे वाहन - दुचाकी, स्कूटर, मोटरसायकल, कार इत्यादी.

--------------------------------------------

• जरा डोके चालवा.

१) कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात. त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल?

 उत्तर - पाणी ही सर्व सजीवांची एक महत्त्वाची गरज आहे. माणसाला शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता, स्वयंपाक, शेती, उद्योगधंदे या सर्व गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते. परंतु नदीचे पाणी कारखान्यात वापरून खराब झाल्यामुळे नदीचे पाणी आसपासच्या लोकांसाठी निरोपयोगी आणि घातक ठरेल. खराब झालेले नदीचे पाणी पिल्याने विविध रोग, आजार विषबाधा होण्याची शक्यता असू शकते. नदीचे पाणी हे माणसासाठी आणि तेथील जनावरांसाठी सुद्धा घातक ठरेल. अशा प्रकारचा त्रास आसपासच्या लोकांना होईल.

--------------------------------------------

२) विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? 

उत्तर - विजेच्या शोधामुळे मानवी जीवना अतिशय सोपे झाले आहे. विजेची अनेक उपकरणे मानवी जीवनासाठी गरजा बनल्या आहेत. विजेवर चालणारे पंखे, कुलर , वाटणयंत्र (मिक्सर), फ्रिज ही साधने मानवासाठी अतिशय आवश्यक झाली आहेत. त्यामुळे कोणतेही कार्य  करतांना श्रम आणि वेळ दोघांचीही बचत होते. विहिरी, बोरींग इत्यादीचे पाणी काढण्यासाठी विजेच्या पंपाचा उपयोग होतो. शेतीला पाणी देणे, विजेवरील दिवे यांचा उपयोग दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. त्यामुळे आपले श्रम आणि वेळ वाचतात आणि मानवी जीवन सुलभ होते.

--------------------------------------------

 ई) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

 

१) माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत?

 उत्तर - बैलगाडी, दुचाकी,चार चाकी, ट्रक, बस, आगगाडी, विमान, जहाज इत्यादी माणसने निर्माण केली आहे.

--------------------------------------------

२) नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते?

 उत्तर - नवीन वसाहती बांधण्यासाठी मोठमोठी जंगले तोडावी लागतात. शहराभोवतालच्या शेती सुद्धा मोकळ्या करून त्या ठिकाणी वसाहती बांधाव्या लागतात.

--------------------------------------------

३) डासामुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर - डासांमुळे हिवताप, डेंगु, हत्तीरोग, चिकुनगुनिया, मलेरिया या रोगांचा प्रसार होतो.

--------------------------------------------

२) दुबार, तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे?

 उत्तर - दुबार, तिबार शेतीमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.

--------------------------------------------

उ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१) उन्हाळ्यात अनेक गावात प्राण्याची टंचाई निर्माण होते.


२) रेडा किंवा बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते.


३) सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुध्दीमान आहे. 


४) मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी


५)रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत.

--------------------------------------------

ऊ)माहिती मिळवा.

 

पुढील विषयावर माहिती मिळवा.


१) डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा.

 उत्तर - सुमारे दीडशे वर्षांपूर्वी संशोधकांनी खनिज तेलाचा शोध लावला. खनिज तेलापासून डिझेल आणि पेट्रोलची निर्मिती झाली. लोकसंख्या वाढीमुळे तसेच अतिप्रमाणात डिझेल व पेट्रोलच्या वापरामुळे खनिज तेलाचा साठा हा कमी झाला आहे. डिझेल आणि पेट्रोल नसेल तर आपली वाहने चालणार नाही. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोल जपून वापरणे अतिशय आवश्यक आहे.

--------------------------------------------


२) पाण्याची बचत करा.

 उत्तर - ' पाणी हेच जीवन ' हा सुविचार आपण नेहमीच ऐकत असतो. याचा अर्थ पाणी आपल्या मानवी जीवनासाठी तसेच इतर जनावरांसाठी, वनस्पतीसाठी अतिशय गरजेचे आहे. पाण्यामुळेच आपली सजीव सृष्टी जिवंत राहू शकते. पाणी आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आंघोळ करणे, अन्न शिजवण्यासाठी, प्रात:विधी, कपडे धुणे, पिण्यासाठी, शेतीसाठी इत्यादी गोष्टींसाठी आपणास पाणी आवश्यक आहे. परंतु लोकसंख्या वाढीमुळे पाण्याचा अपव्यय अधिक होतो. पावसाळा संपला की हळूहळू नद्यांचे पाणी कमी होऊ लागते. विहिरी आटू लागतात. त्यामुळे अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. लोकसंख्या वाढू लागली, पाऊस मात्र तेवढाच पडतो. त्यामुळे पाणी अपुरे पडते. म्हणून पाण्याची बचत करणे गरजेचे आहे.

--------------------------------------------

No comments:

Post a Comment