*भाषा
• अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे.
• माझी आई या विषयावर दहा ओळी लिहा.
• दिलेल्या चित्राचे वर्णन करणे.
• बालमित्र / मैत्रिणीबद्दल दहा ओळी लिहिणे.
• रिकाम्या खोक्याचा मोबाईल तयार करणे
• संत तुकडोजी महाराजांप्रमाणे इतर कोणत्याही एका संतांच्या ओव्या, भजने, कीर्तने यांचा संग्रह करणे.
• विविध प्राणी अथवा पक्षी यांच्या कात्रणाचा संग्रह करणे.
• तुमच्या परिसरात सण - समारंभांच्या दिवशी गायली जाणारी गाणी संग्रहित करणे.
• अक्षर कोडे व त्यापासून बनविलेल्या अर्थपूर्ण शब्दांचा तक्ता तयार करून वर्गात लावणे.
• वर्तमानपत्रात येणाऱ्या शैक्षणिक बातम्यांचा संग्रह करणे.
• शैक्षणिक संस्था स्थापन केलेल्या थोर समाज सुधारकांचे फोटो मिळवा संग्रह करा.
• महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या विषयी माहिती संग्रहित करून लिहिणे.
• राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या धाडसी मुलांची माहिती मिळवा.
• पावसाच्या नक्षत्रांची माहिती तयार करणे.
• भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे.
• वेगवेगळ्या खेळां विषयीची माहिती व चित्रे जमवून संग्रह करणे.
• विविध संतांची चित्रे जमवून माहिती गोळा करणे.
*गणित
• विविध भौमितिक आकृत्यांचे चित्र व माहिती मिळवा.
• कागदापासून लघुकोन, विशालकोन, काटकोन तयार करून वहीत चिटकवणे
• आगपेटी काडीपासून लघुकोन, विशालकोन, काटकोन तयार करून कार्डशिट वर चिटकवणे.
• गोलाकार वस्तूंचा संग्रह करणे.
• गोलाकार वस्तूंच्या नावाची यादी तयार करणे.
• नाणी व नोटा यांचा संग्रह करणे.
• परिसरातील वस्तूचे त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करणे.
• तुमच्या वर्गाचे क्षेत्रफळ काढा.
• पाढ्यांचा तक्ता तयार करून वर्गात लावणे.
•विविध वस्तूंचे वजन नोंदविणे.
• गणितातील विविध सूत्रांविषयी माहिती मिळवा व यादी तयार करा.
• वस्तूंच्या साहाय्याने भागाकार करणे.
• कागदापासून विविध आकार तयार करणे.
• रोजच्या व्यवहारात गणिताचा वापर कोठे कोठे केला जातो याची यादी करणे.
• विविध वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एककाचा तक्ता तयार करणे.
• पाढे म्हणणे व तक्ता तयार करणे.
• गावातील किराणा दुकानास भेट देऊन व्यवहार करणे.
• बस कंडक्टर आणि तिकीट या विषयी माहिती मिळविणे.
*परिसर अभ्यास भाग १
• प्राणी व त्यांचे उपयोग यांची यादी तयार करणे.
• प्राणी आणि त्यांची पिल्ले यांच्या नावाचा तक्ता तयार करणे
• प्राणी आणि त्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात याचा तक्ता तयार करणे
• महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणता खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे याची यादी तयार करणे.
• दिशा व उपदिशाचा तक्ता तयार करणे.
• नकाशा तयार करणे.
• शेतीच्या अवजारांविषयी माहिती गोळा करणे.
• वर्तमानपत्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती विषयक बातम्यांचा संग्रह करणे.
• आपल्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींच्या चित्रांचा संग्रह करणे व माहिती गोळा करणे.
• होकायंत्राच्या सहाय्याने दिशा दाखविणे.
• तुमच्या गावातील सार्वजनिक स्त्रोतातील पाणी कोणकोणत्या कारणाने अस्वच्छ होते याची माहिती मिळवा.
• पाणी अस्वच्छ होण्याची कारणे शोधून त्यावर करता येणाऱ्या उपायांची यादी तयार करणे.
•पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा याविषयी माहिती मिळविणे.
• गावातील व्यवसायास अथवा शेतीस भेट देणे व माहिती गोळा करणे
• गावातील ग्रामपंचायत अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देणे.
• गावात असणाऱ्या सार्वजनिक सुविधांची यादी करणे.
*परिसर अभ्यास भाग 2
• महाराष्ट्रातील संतांची माहिती व चित्रे गोळा करा
• महाराष्ट्रातील गड व किल्ले यांची माहिती व चित्रे गोळा करा.
• शिवाजी महाराज व त्यांच्या अष्टप्रधान मंडळाचा तक्ता तयार करणे.
• नकाशात हिंदवी स्वराज्य दाखविणे
• दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या मित्रांसोबत रायगडाची प्रति कृती तयार करा.
• वर्तमानपत्रात येणाऱ्या ऐतिहासिक बातम्यांचा संग्रह करणे.
• इतिहासावर आधारित म्हणींचा संग्रह करणे
• शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळा विषयी माहिती मिळवणे.
• बाजीप्रभू यांच्या विषयी माहिती मिळवा.
• जवळच्या किल्ल्यास भेट देणे व माहिती गोळा करणे.
• रायगडावर सहलीचे नियोजन करणे.
• शिवाजी महाराज व अफजल खान भेट - वर्गात सादरीकरण करणे.
• आग्र्याहून सुटका हा पाठ गोष्टी रूपात सादर करणे.
*इंग्रजी
• Write your mother tongue the name of English letters that begin with a sound
• Tell the story
• Make a list of as many things as you can use in daily
• Make simple opposite word.
•Making a chart of good habits.
•List of English words used every day.
• List of difficult English words.
• Describing the rain.
• Making a chart like a garden of words.
•Acting on small stories
• list name of birds and animals, their young ones, their female and their living places.
• Make simple rhyming word list.
• Make a list of singular and plural
• Short conversation about myself.
• let's speak
• collect the words of a garden of words.
• Creating a list of simple English words with Marathi meaning
* कला आणि संगीत
• भेंडी, कांदे, बटाटे यांच्या कापाचे ठसे काढून कलाकृती निर्माण करणेे.
• बडबड गीते संग्रह करणे.
• देशभक्तीपर गीते अथवा लोकगीते तालासुरात म्हणणे व त्यांचा संग्रह करणे.
• गाण्यांमध्ये, कथेमध्ये प्राणी, पक्षी इत्यादींचा आवाज काढून पार्श्व संगीत देणे.
• सर्व वाद्ये व त्यांचे प्रकार याविषयी माहिती मिळवणे.
• विविध वाद्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.
• वाद्य व त्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती यांच्या नावाचा तक्ता तयार करणे.
• चित्रकाराची मुलाखत घेणे.
• खेड्याचे चित्र रेखाटणे.
• शहरांचे चित्र रेखाटणे
• निसर्ग चित्र रेखाटणे
• छोटा अभिनय करणे उदाहरणार्थ कृतींचा अभिनय, वाचिक अभिनय एकात्मिक सादरीकरण.
• विविध आवाज काढणे.
• नकला करणे.
• प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढणे.
• प्राण्यांप्रमाणे नकला करणे.
• पक्ष्यांचे आवाज काढणे.
• फेरीवाल्याचा, भाजीवाल्यांचा अभिनय करणे.
*विषय कार्यानुभव
• कापसापासून वाती तयार करणे.
• मातीच्या पणत्या बनविणे.
• माती पासून विविध फळे तयार करणे.
• मातीचे घर तयार करणे.
• कागदापासून पतंग, हार अशा विविध वस्तू बनविणे.
• आगपेटीच्या काड्यांद्वारे नक्षीकाम करणे.
• आईस्क्रीमच्या काड्या पासून घर बनविणे.
• पूर अथवा वादळ, भूकंप इत्यादी प्रसंगाच्या चित्रांचा संग्रह करणे.
• पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी चित्रांचा संग्रह करणे.
• शेतीकामाच्या साधनांची चित्रे ओळख करून देणे अथवा चित्रांचा संग्रह करणे.
• बांबू उद्योग व बांबूच्या विविध जातींची माहिती मिळवणे.
• काडीपेटी पासून आगगाडी तयार करणेे.
• औषधी वनस्पती विषयी माहिती मिळवणे व चित्रांचे संग्रह करणे.
• राखी तयार करणे.
• माती पासून भांडी, फळे, घर बनवणे
• कागदापासून होडी, तलवार, टोपी बनवणे
• संगणकाचे विविध भाग व त्यांची माहिती तयार करणे.
• रिकाम्या खोक्यापासून मोबाईल, संगणक तयार करणे.
• प्रतिकृती तयार करणे.
*शारीरिक शिक्षण
• खेळाडूंची चित्रे जमवून तक्ता तयार करणे.
• खेळाडू व त्यांना मिळालेले पुरस्कार याविषयीचा तक्ता तयार करून वर्गात लावणे.
• खेळ व त्या संबंधित प्रसिद्ध व्यक्ती तक्ता तयार करणे.
• सूर्यनमस्कारा विषयी माहिती मिळवणे व त्यातील विविध कृतीचे चित्र गोळा करणे.
• कोणत्याही एका मुख्य खेळाविषयी माहिती मिळवा.
• मानवी मनोरे करणे.
• डोक्यावर वस्तू ठेवून चालणे.
• योगासनांचे प्रकार व माहिती मिळवणे.
• लाठीचे प्रकार व मूलभूत क्रियांविषयी माहिती मिळवणे.
• स्थानिक, पारंपरिक खेळ घेणे.
• लेझीम व त्यांचे प्रकार माहिती मिळवणे
• ॲथलेटिक्स उपक्रम
•उदाहरणार्थ उड्या मारत पुढे जाणे.
•पायमागे दुमडत धावणे.
•जागेवर उड्या मारणे.
•गतिरोधक मालिका.
•सशाप्रमाणे उड्या मारत धावणे.
• नागमोडी धावणे.
• अडथळ्याची मालिका.
• चांगल्या सवयींचा तक्ता तयार करून वर्गात लावणे.
• वर्गाची व शालेय परिसराची दररोज स्वच्छता ठेवणे.
Savita
ReplyDelete