DAILY EDUCATION

Saturday, January 29, 2022

१८. मजेशीर होड्या class 3rd


 १८. मजेशीर होड्या 

* होडी -नाव            * जंगल - वन

* गाव - ग्राम            * नेता - पुढारी

* रस्ता - मार्ग           * पंचाईत - समस्या

* टरफल - साल       * नीट - व्यवस्थित

* मदत - सहाय्य      * अडचण - संकट 

* प्रकाश - किनारा   * हात - कर 

* डोलकाठी - होडी वरील शिडाची काठी

* शिड - हवा भरण्यासाठी केलेले कापडाचे साधन.

_______________________________________

**वाक्प्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग 

१.थक्क होणे - आश्चर्यचकित होणे .

उत्तर - जादूगाराने केलेले जादूचे प्रयोग पाहून मी थक्क झालो.

_______________________________________

प्रश्न १.एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. ठेंगू कुठे राहत होते ?

उत्तर - ठेंगू एका जंगलात राहत होते. 

________________________________________

२.ठेंगूंची उंची किती होती?

 उत्तर - ठेंगूंची उंची अंगठ्याएवढी होती. 

________________________________________

३.जंगलातील प्राण्यांनी जंगलाची जागा का सोडली ?

 उत्तर - जंगलाची सगळी जागा कुणी तरी विकत घेतली होती म्हणून सगळ्यांनी जंगलाची जागा सोडली.

________________________________________

 ४.उंदरांनी तिथेच लपून राहायचं का ठरवलं ?

उत्तर - कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे हे ओळखून उंदरांनी तिथेच लपून राहायचं ठरवलं.

________________________________________

५.ससे कोठे गेले ?

उत्तर  - ससे दूरच्या डोंगरावर गेले.

_______________________________________ 

६.दुसऱ्या जंगलात कोण गेले ?

उत्तर -  दुसऱ्या जंगलात चिमण्या गेल्या.

________________________________________

 ७.जंगलात तात्पुरती घरं कोणाची झाली होती ?

उत्तर - जंगलात तात्पुरती घर कामगारांची झाली होती.

________________________________________

 ८.ठेंगूंनी कोठे जाण्याचे ठरविले ?

उत्तर - ठेंगूंनी आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहण्याचे ठरवले.

________________________________________

 ९.इच्छापूर्तीच्या रानात काय काय आहे ?

उत्तर - इच्छापूर्तीच्या रानात खूप जागा, खूप झाडं, खूप खायला-प्यायला आहे.

________________________________________

१०.ठेंगूना बंडूची माहिती कुणी सांगितली?

 उत्तर - ठेंगूंना बंडूची माहिती सशांनी सांगितली.

________________________________________ 

११.बंडू कसा मुलगा होता ?

उत्तर - बंडू प्रेमळ, दयाळू आणि हुशार मुलगा होता. 

_______________________________________

१२. ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले ?

 उत्तर -  घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवर चढून डेंगू खिडकीच्या पट्टी वर पोहोचले.

________________________________________

 १३.बंडू थक्क का झाला? 

 उत्तर -  ठेंगूंना खिडकीत पाहून बंडू थक्क झाला.

________________________________________ 

१४.ठेंगूसाठी कागदाच्या होड्या केल्या तर काय होईल, असे बंडूला वाटले ?

उत्तर -   ठेंगूसाठी कागदाच्या होड्या केल्या तर त्या भिजून बुडतील असे बंडूला वाटले.

________________________________________ 

१५.बंडूने कशाच्या होड्या बनवल्या ?

 उत्तर - बंडूने अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या बनवल्या.

________________________________________

१६.कोणते नवे लचांड निर्माण झाले ?

उत्तर - चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला गेला त्याला तो चिकटला हे एक नवे लचांड निर्माण झाले.

________________________________________ 

१७.बंडूने बारावी होडी कशासाठी तयार केली? 

उत्तर - जास्तीच सामान नेण्यासाठी बंडूने बारावी होडी तयार केली. 

________________________________________

१८.बंडू स्वतःशीच काय म्हणाला ?

उत्तर - "आता कधीतरी नदी पलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी" असे बंडू स्वतःशीच म्हणाला.

________________________________________



प्रश्न २ तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा

 १.सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली?

उत्तर - एका जंगलात एक छोटेसे गाव वसलेले होते. जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली व तिथे घर बांधायचं ठरवलं त्यामुळे सगळ्यांनी घाईघाईने जंगलाची जागा सोडावी लागली.

________________________________________ 

 २. सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले?

उत्तर - रस्त्याने जात असताना ठेंगूंना एक ससा भेटला. त्यांनी आपली नदी पार करण्याची अडचण सांगितली. एकदा ससा सापळ्यात अडकला असताना त्याला बंडूने मदत करून बाहेर काढलं होत. बंडू हा हुशार आणि दयाळू मुलगा आहे हे त्याला माहीत होते, तो नक्कीच ठेंगूंन ना मदत करेल हे ओळखून सशाने ठेंगूंना बंडूचे नाव सुचवले.

________________________________________ 

३.ठेंगू खुश का झाले? 

उत्तर - ठेंगूना आपले गाव सोडावे लागले होते. त्यांना पलीकडच्या रानात जायचे होते. परंतु त्यासाठी नदी पार करावी लागणार होती. नदी पार करणे ही त्यांच्यापुढे मोठी अडचण होती. बंडूने नदी पार करण्यासाठी त्यांना अक्रोडाच्या टरफलांचा सुंदर होड्या तयार करून दिल्या. बंडूने त्या टोपलीत नेल्या आणि एकेका ठेंगूला होडीत बसून सावकाश पाण्यात सोडले  त्या होड्या डौलात पाण्यातून जात होत्या आणि त्यामुळे नदी पार करता आली म्हणून सर्व ठेंगू खूश झाले.

_______________________________________

प्रश्न ३बंडूने तयार केलेल्या होडीची कृती लिहा. 

उत्तर - बंडूने स्वयंपाक घरातून सहा मोठे अक्रोड आणले. मग ते नीट मधोमध फोडले आणि तो होड्या बनवू लागला. एका डबीत वापरून झालेल्या काड्यापेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या, त्या काढल्या. कागदाची शिडं करून ती काड्यानं टोचली. गोंदान शिडं डोलकाठीला म्हणजे आगकाडीला घट्ट चिकटवलीआणि अशा प्रकारे होडी तयार झाली. 

_______________________________________

प्रश्न ४.गोष्टीतल्या कोणत्या गोष्टीचे तुम्हाला नवल वाटले का ? 

उत्तर - गोष्टीमध्ये अंगठ्या एवढेच छोटे-छोटे ठेंगू राहात होते या गोष्टीचे फारच नवल वाटले, कारण तेवढे छोटे माणसं असू शकतात हे शक्य नाही. 

_______________________________________

प्रश्न ५ गोष्टीतला कोणता प्रसंग तुम्हाला आवडला?

उत्तर - १) गोष्टीमध्ये बंडूने अक्रोडाची टरफल घेतली, डबीत वापरून  झालेल्या काड्या पेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काढल्या कागदाची शिड करून ती काड्याना टाचणीने टोचली. गोंदाने शिड डोलकाठीला म्हणजे आगकाडी ला घट्ट चिटकवली आणि होडी तयार केली हा प्रसंग मला फार आवडला.

          ---------------------------------

२) बंडूने स्वतः साऱ्या होड्या एका टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेला ठेंगूला  होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या. होड्या डौलात पाण्यातून  जात होत्या. ठेंगू खूप खूश झाले होते. चांदण्यांच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता. अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडी देखील छान चालली होती हा प्रसंग मला आवडला.

________________________________________

प्रश्न ६. गोष्टीला 'मजेशीर होड्या 'असे नाव का दिले आहे? 

उत्तर -  आपण सर्वांनी मोठ्या होड्या पाहिल्या आहेत. पावसाच्या पाण्यात देखील मुले कागदाच्या नावा तयार करून पाण्यात टाकतात. मात्र डेंगू साठी बंडूने तयार केल्या नावा ह्या अक्रोडपासून बनलेल्या होत्या. त्या फारच सुंदर पद्धतीने तयार केल्या होत्या. लहान मुले देखील खेळण्यासाठी अशा होड्या तयार करू शकतात. म्हणून या गोष्टीला मजेशीर होड्या असे नाव दिले आहे.

_______________________________________

प्रश्न ७.कोण कोणास म्हणाले 

१."आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्ती च्या रानात जाऊ". 

उत्तर - ठेंगूंच्या नेत्याने इतर ठेंगूंना म्हटले.

               -------------------------

 २."इथे एक चांगला मुलगा आहे."

उत्तर -  ससा  ठेंगूंना म्हणाला.

              --------------------------

 ३. "बघतो हं ! काय करता येईल मला."

 उत्तर - बंडू ठेंगूंना म्हणाला. 

              ------------------------

४."या नदी पलिकडच्या इच्छापूर्ती रानात जायचे आम्हाला, पण उडायला पंख नाहीत."

उत्तर - चंदू बंडूला म्हणाला.

-----------------------------------------------

 प्रश्न ८.कोण ते सांगा 

* अंगठ्याएवढी  - माणसं 

* इच्छापूर्तीचे - रान

* सायलीचा - वेल

* कागदाच्या - होड्या 

* अक्रोडाची - टरफलं 

______________________________________

प्रश्न ८. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

 १) कामगारांसाठी तात्पुरती घरे तयार झाली. 

२) त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली. 

३) बिछान्यावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसलाा. 

४) सगळे मिळून अकरा ठेंगू होते. 

५) थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते. 

६) बंडू ही नदीकिनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता.

_______________________________________

* समानार्थी शब्द 

          झोप = निद्रा 

           ठेंगू = बुटका, ठेंगणा

       गलका = गोंधळ 

        लचांड = अडचण

          होडी = नाव 

 ________________________________________

* विरुद्धार्थी शब्द 

         झोप × जागे

       जवळ × दूर 

         छोटे × मोठे 

         लांब × जवळ 

        बाहेर × आत

       चढणे × उतरणे 

     आकार × निराकार

        योग्य × अयोग्य 

      अनेक × एक

        खूश × नाखूश

   समाधान × असमाधान 




No comments:

Post a Comment