एकाच शब्दाचे भिन्न अर्थ
* अभंग _ •न भंगलेला •काव्यरचनेचा एक प्रकार
* अंतर _ •भेद •लांबी •मन
* अनंत _ •अमर्याद •परमेश्वर
* आस _ •इच्छा •गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा
* ऋण _ •कर्ज •उपकार
* ओढा _ •मनाचा कल पाहण्याचा •ओघ
* अंक _ •मांडी •आकडा, संख्या
* अंग _ •शरीर •बाजू, भाग
* अंबर _ •आकाश •वस्त्र
* काळ _ •वेळ •यम
* कर्ण _ •कान •महाभारतातील योद्धा •त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू
* कळ _ •भांडणाचे कारण •किल्ली •वेदना
* कर _ •हात •किरण •सारा
* घाट _ •डोंगरातील रस्ता •नदीच्या पायऱ्या
* चिरंजीव _•मुलगा •दीर्घायुषी जीवन •आयुष्य •पाणी
* जलद _ •ढग •लवकर
* डाव _ •कारस्थान •कपट •खेळी
* तट _ •किनारा •किल्ल्याची भिंत
* तळी _ •तलाव •तळाला
* तीर _ •काठ •बाण
* दंड _ •शिक्षा •काठी •बाहू
* द्विज _ •पक्षी •ब्राह्मण
* धड _ •अखंड •माने खालचा शरीराचा भाग
* ध्यान _ •चिंतन •समाधी
* नाद _ •छंद •आवाज
* नाव _ •होडी •कशाचेही नाव
* पय _ •पाणी •दूध
* पार _ •पलीकडे •वडाच्या भोवतालचा पार
* पक्ष _ •वादातील बाजू •पंख •पंधरवडा •राजकीय संघटना
* पर _ •परका •पीस
* पुर _ •नगर •पाण्याचा पूर
* भेट _ •नजराना भेटणे
* भाव _ •भक्ती •किंमत, दर
* माळ _ •फुलांची माळ •ओसाड जागा
* मान _ •मोठेपणा •शरीराचा एक भाग
* माया _ •ममता •धन •कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा
* वल्ली _ •वेल •स्वच्छंद माणूस
* वात _ •विकार •दिव्याची वात
* वर _ •आशीर्वाद •नवरदेव •वरची दिशा
* वाली _ •रक्षणकर्ता • पुराण कथेतील वानराचे नाव
* विभूती _ •पुण्यपुरुष •भस्म, अंगारा, रक्षा
* सुमन _ •फुल •पवित्र मन
* सूत _ •धागा •सारथी
* हार _ •पराभव •फुलांचा हार
No comments:
Post a Comment