पाणी किती खोल?
* शब्दार्थ
१.कडबा - ज्वारी बाजरीची कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग, चारा
२.रेडकू - म्हशीचे पिल्लू
३.कडबाकुट्टी - कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र
४.चघळणे - खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे
५. स्वगत - स्वतःशीच बोलणे
६. पार करणे - ओलांडणे
_________________________________________
* पाठातील जोडाक्षर युक्त शब्द
म्हैस तिच्या म्हातारी
कडब्याची नदीपलीकडच्या
कुट्टी म्हणजे आत्ता
उडया किनाऱ्याजवळ
स्वगत पाण्याचा त्यांच्याजवळ
घ्यायला नदीच्या जास्त
गुडघ्याइतके पाण्यातून
तेवढ्यात सुद्धा वेड्या
_________________________________________
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. म्हैस काय चघळत उभी आहे?
उत्तर - म्हैस कडबा चघळत उभी आहे.
_________________________________________
२. म्हशीच्या आजूबाजूला कोण खेळत आहे?
उत्तर - म्हशीचा नातु रेडकू म्हशीच्या आजूबाजूला खेळत आहे.
_________________________________________
३. म्हशीला काय चावता येत नव्हते?
उत्तर - म्हशीला कडबा चावता येत नव्हता.
_________________________________________
४. कडबा कुट्टी कोठेआहे ?
उत्तर - कडबाकुट्टी नदीपलीकडे आहे.
_________________________________________
५. रेडकूने रिकामं पोतं कशासाठी मागितलं?
उत्तर - रेडकूने कुट्टी आणण्यासाठी रिकामं पोतं मागितलं.
_________________________________________
६.रेडकूला कशाचा आवाज आला?
उत्तर - रेडकूला पाण्याचा आवाज आला.
_________________________________________
७. रेडकाला सुरुवातीला नदीजवळ कोण दिसलं?
उत्तर - रेडकाला सुरुवातीला नदीजवळ बैलकाका दिसले.
_________________________________________
८.बैलकाका काय करत होते?
उत्तर - बैल काका नदी जवळ चरत होते.
_________________________________________
९.नदीला पाणी किती आहे असं बैल काकांनी सांगितलं?
उत्तर - नदीला पाणी गुडघ्याइतके आहे असं बैल काकांनी सांगितलं.
_________________________________________
१०.पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते?
उत्तर- पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते.
________________________________________
११. झाडावरून कोण हाक मारत होते?
उत्तर - झाडावरून खारुताई हाक मारत होती.
_________________________________________
१२. पाणी जास्त आहे असं कुणाला वाटत होतं?
उत्तर - पाणी जास्त आहे असं खारुताईला वाटत होतं.
_________________________________________
१३.पाण्यात कोण वाहून गेले होते?
उत्तर - पाण्यात खारुताईची मैत्रीण वाहून गेली होती.
_________________________________________
१४. खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली?
उत्तर - नदीला पाणी जास्त होते व खारुताईची मैत्रीण बुटकी आणि छोटी असल्यामुळे वाहून गेली.
_________________________________________
१५.सकाळीच नदी पार करून कोण आले?
उत्तर - सकाळी नदी पार करून गाढवदादा आले.
_________________________________________
१६. नदी पार केल्यावर रेडकाने काय केले?
उत्तर - नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले.
_________________________________________
प्रश्न २ कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा:
१. " आता मी खरंच म्हातारी झालेय."
उत्तर - म्हैस म्हणाली कारण तिच्याकडून कडबा चावल्या जात नव्हता.
_________________________________________
२." गुडघ्या इतकच तर पाणी आहे , आरामात जाशील."
उत्तर- बैल काका म्हणाले कारण ते उंच होते व त्यांच्या उंचीच्या मानाने त्यांना पाणी कमी वाटत होते.
_________________________________________
३." वाहून जाशील. मागे फिर ."
उत्तर - खारुताई म्हणाली कारण काल तिची मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली.
________________________________________
४." मग तुला घाबरायचं काय कारण?"
उत्तर - म्हैसआजी म्हणाली कारण बैलकाका व रेडकू उंच आहेत आणि खारुताई बुटकी आणि छोटी.
_________________________________________
५. "मला सहज जाता येईल ."
उत्तर - रेडकु म्हणाले कारण नदीच्या पाण्यात पाय टाकताच त्याला कळले की पाणी खोल नसून गुडघ्यापर्यंतच आहे.
__________________________________________________________________________________
प्रश्न ३.कोण कोणास म्हणाले ते लिहा.
१ ".दे मला पेंढी बांधून. एक रिकामा पोतं सुद्धा दे, कुट्टीसाठी."
उत्तर - रेडकू म्हैस आजीला म्हणाला.
________________________________________
२. "अरे, काळजी करू नको. गुडघ्याइतकच तर पाणी आहे."
उत्तर - बैलकाका रेडकाला म्हणाले.
________________________________________
३. " अरे वेड्या, कुठे चाललास ?
उत्तर -खारुताई रेडकूला म्हणाली.
_________________________________________
४. " अरे ,असं कसं होईल? सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून.
उत्तर - म्हैसआजी रेडकूला म्हणाली.
_________________________________________
५. " खरंच की पाणी फार खोल नाही. माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे."
उत्तर - रेडकू स्वतःशी/ स्वतःला म्हणाला.
________________________________________
प्रश्न ४ . जोड्या जुळवा
कडबा पेंढी
लाकडाची मोळी
मेथीची जुडी
पुस्तकांचा गठ्ठा
_________________________________________
प्रश्न ५. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
( म्हातारी, वेडेपणा, घाबरायचं, कुट्टी, पेंढी )
१.असा वेडेपणा करू नको मागे फिर.
२. कुट्टी बंद होती का?
३. मग तुला घाबरायचं काय कारण ?
४.पण आता मी खरच म्हातारी झाले.
५. दे मला पेंढी बांधून.
________________________________________
.* पाठातील वाक्प्रचार
प्रश्न ६. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
१. पार करणे - ओलांडून जाणे.
गोपालनेने मोठी नदी पोहून पार केली.
२.गोंधळून जाणे- विचारात पडणे.
*प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सूचना ऐकून राधा गोंधळात पडली.
*अभ्यास करायचा राहून गेल्याने सीमा गोंधळात पडली.
_________________________________________
प्रश्न ७. पाठात आलेल्या शब्दांच्या समानार्थी शब्द
म्हातारी - वृद्ध
नीट - व्यवस्थित
भीती - भय
किनारा - काठ
नदी - सरिता
झाड - वृक्ष
हाक - आवाज
बुटकी - ठेंगणी
वेडेपणा - मूर्खपणा
खूप - जास्त
छोटी - लहान
पाणी - जल
_________________________________________
प्रश्न ८.पाठात आलेल्या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द
म्हातारी × तरुण
अलीकडे × पलीकडे
आली × गेली
मोठा × छोटा
रिकामं × भरलेलं
जास्त × कमी
येईल × जाईल
लवकर × उशिरा
खूप × कमी
मागे × पुढे
उंच × बुटके
विचार × अविचार
वर × खाली
आनंद × दुःख
No comments:
Post a Comment