DAILY EDUCATION

Friday, December 17, 2021

३. पडघमवरती टिपरी पडली प्रश्न उत्तरे

 ३. पडघमवरती टिपरी पडली

शब्दार्थ

पडघम - एक ढोला सारखे वाद्य 

टपोरे - मोठे 

भरडते - दळते 

कोसळणे - जोरात पडणे

जल - पाणी

धरती - जमीन 

_________________________________________

जोडाक्षर युक्त शब्द

म्हातारी

रंध्र

धरतीच्या

_________________________________________

प्रश्न १. एका वाक्यात उत्तरेलिहा 

      १.टिपरी कोठे पडली?

उत्तर - टिपरी पडघम वरती पडली.

_________________________________________

      २. कौलारावर काय पडत आहे?

 उत्तर - कौलारावर थेंब पडत आहेत.

_________________________________________

       ३.थेंब कसे आहेत?

 उत्तर - थेंब टपोरे आहेत.

_________________________________________

    ४. म्हातारी काय भरडत आहे?

 उत्तर - म्हातारी हरभरे भरडत आहे.

_________________________________________

     ५.वीज कोणासोबत कोसळत आहे?

 उत्तर वीज थेंबासोबत कोसळत आहे.

_________________________________________

     ६. थेंबाभवती काय उठत आहेत?

 उत्तर - थेंबाभवती तरंग उठत आहेत.

_________________________________________

     ७. आनंदाने कोण नाचत आहे?

उत्तर - आनंदाने अंगण नाचत आहे.

_________________________________________

    ८. धरतीच्या रंध्रा - रंध्रातून काय जुळून आले               आहे?

उत्तर - धरतीच्या रंध्रा - रंध्रातून संगीत जुळून आले               आहे.

_________________________________________

     ९. या कवितेचे कवी कोण आहेत?

उत्तर - या कवितेचे कवी राजा ढाले आहेत.

_________________________________________

प्रश्न २. थोडक्यात उत्तरे लिहा.

    १.'म्हातारी ढगात हरभरे भरडते' असे का म्हटले          असावे?

उत्तर - हरभरे भरडतांना ज्याप्रमाणे जात्यावर                   आवाज होतो, त्याचप्रमाणे आकाशात                    ढगांच्या गडगडाटाचा आवाज येतो.म्हणून              ढगांच्या गडगडाटाला म्हातारी हरभरे भरडते            असे म्हटले आहे.

_________________________________________

प्रश्न ३. कसा आवाज आला ते लिहा

१. पडघम वरती टिपरी पडली - तडम् तड्तड् तडम् 

२. ढग गडगडू लागले - गड्गड् गडम् 

३. वीज कोसळली - कडम् कड्कड् कडम् 

_________________________________________

प्रश्न ४. समानार्थी शब्द वाचा व लिहा

१. ढग - मेघ , घन

२. वीज - चपला , विद्युत

३. जल - पाणी , उदक

४. धरती - धरणी , जमीन

५. टपोरे - मोठे

६.वारा - पवन, वायु

७. पान - पर्ण

_________________________________________

प्रश्न ५. खालील कामे करणाऱ्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा

१. हरभरे भरण्यासाठी - जातं

२. गहू दळण्यासाठी - जातं, गिरणी

२.ज्वारी जाळण्यासाठी - चाळणी 

३.बाजरी पाखडण्यासाठी - सुप 

४.चहा गाळण्यासाठी- गाळणी

५.मसाला वाटण्यासाठी - पाटा-वरवंटा, मिक्सर 

६.काकडी कापण्यासाठी - विळी, चाकू_

_________________________________________

खालील वाक्यातील निळा अक्षराने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा:

१) कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली, म्हणजे कुंडीतला रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली.

 २)सुभानराव निवडणुकीत पडले, म्हणजे सुभानरावांचा निवडणुकीत पराभव झाला किंवा हार झाली.

३) कैरी पिवळी पडली, म्हणजे कैरी पिकली किंवा तिचा रंग पिवळा झाला.

४) समीरा आजारी पडली, म्हणजे तिची प्रकृती बिघडली.

५) खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला, म्हणजे रमेश नाराज झाला किंवा निराश झाला.

६)काल रात्री खूप पाऊस पडला, म्हणजे पाऊस आला होता.

______________________________________

प्रश्न

रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून शब्द पूर्ण करा

No comments:

Post a Comment