DAILY EDUCATION

Thursday, December 16, 2021

२. वासाची किंमत प्रश्नोत्तरे

२.वासाची किंमत

शब्दार्थ

चतुर - हुशार 

हलवाई - मिठाई तयार करणारा 

दुकानापाशी -दुकानाजवळ 

खुळा - वेडा

थैली - पिशवी

_________________________________________

एका वाक्यात उत्तरे लिहा.

      १.शिवानी कोठे राहायची?

उत्तर - शिवानी कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत राहायची.

_________________________________________

      २. कुंदापूरचा आठवडी बाजार केव्हा भरायचा?

 उत्तर - कुंदापूरचा आठवडी बाजार रविवारी भरायचा.

_________________________________________

      ३. शिवानीचे आईबाबा बाजारात कशासाठी              जायचे?

उत्तर - शेतातील भाजी विकण्यासाठी शिवानीचे               आई-बाबा बाजारात जायचे.

_________________________________________

     ४. शिवानी आई बाबांना कोणत्या कामात मदत           करायची?

 उत्तर - शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची.

_________________________________________

      ५. शिवानीला काय खायला आवडायचे?

उत्तर - शिवानीला भजी किंवा भेळ खायला                      आवडायचे.

_________________________________________

      ६.शिवानी कोणत्या दुकानाजवळ उभी होती?

उत्तर - शिवानी मिठाईच्या दुकानाजवळ उभी होती.

________________________________________

       ७. मिठाई तयार करणाऱ्याला काय म्हणतात?

 उत्तर - मिठाई तयार करणाऱ्याला हलवाई                         म्हणतात.

_________________________________________

     ८. मिठाईवाल्याने शिवानीकडे कशाचे पैसे                   मागितले?

उत्तर - मिठाई वाल्याने शिवानीकडे मिठाईच्या                    वासाचे पैसे मागितले.

_________________________________________

    ९. शिवानीने मिठाईवाल्याकडून मिठाई घेतली             होती का?

उत्तर - नाही, शिवानीने मिठाईवाल्याकडून मिठाई              घेतली नाही.

_________________________________________

   १०. शिवानी आईबाबांकडे कशासाठी निघाली?

उत्तर - शिवानी चिल्लर पैशांची पिशवी                              आणण्यासाठी आई-बाबांकडे निघाली.

________________________________________

    ११. शिवानीने हलवायाला मिठाईच्या वासाच्या               मोबदल्यात काय दिले?

 उत्तर - शिवानीने हलवायाला पैशांच्या मिठाईच्या               वासाच्या मोबदल्यात पैशांचा आवाज                     ऐकवला.

_________________________________________

कोण कोणास म्हणाले ते लिहा

    १. ए,मुली !चल पैसे काढ.

उत्तर -हलवाई शिवानीला म्हणाला.

_________________________________________

     २. अहो,पण मिठाईचा वास तर येणारच ना ! 

उत्तर - शिवानी हलवायाला म्हणाली.

________________________________________

३.नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो.

उत्तर - गर्दीतील माणूस शिवानीला म्हणाला.

_________________________________________

     ४. आई ss, भाजी विकून आलेल्या चिल्लर                पैशांची थैली दे ग मला.

 उत्तर - शिवानी आईला म्हणाली.

_________________________________________

     ५. काय झालं ? कशाला पाहिजे ?

 उत्तर - आई शिवानीला म्हणाली.

_________________________________________

     ६. अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं?                    मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय                   असणार? पैशांचा आवाज.

उत्तर - शिवानी हलवायला म्हणाली.

_________________________________________

प्रश्न ३. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा:

( मिठाई, गर्दी, चिल्लर, खुळखुळ, ऐटीत )

१. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली.

२. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली.

३. खुळखुळ आवाज आला.

४. मिठाई पाहत ती सहज उभी होती.

५. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या.

________________________________________

कोणास काय म्हणतात?

सोन्याचे दागिने_

No comments:

Post a Comment