DAILY EDUCATION

Wednesday, December 15, 2021

इयत्ता तिसरी १. रानवेडी (प्रश्नोत्तरे)

१. रानवेडी
शब्दार्थ :

आख्ख्या - सगळ्या
डुलं - कानात घालायचा अलंकार
चाई - एका वेलीचे नाव
गळसर - गळ्यातील माळ
बुरांडी - एका फुलाचे नाव
झुला - झोका
पानसाबरी - निवडुंग
यंगत - चढत
पहाळी - पावसाची सर
__________________________________ 
      १. पोर कशावर भाळली?
उत्तर - पोर डोंगरावर भाळली.
_________________________________
      २. मुलीने कानात कशाची डुलं घातली आहेत?
उत्तर - मुलीने कानात रानगवताच्या फुलांची डुलं घातली आहेत.
_________________________________________
   ३. मुलीने गळ्यामध्ये काय घातले आहे ?
उत्तर मुलीने गळ्यामध्ये चाईचा मोहर घातला आहे.
_________________________________________
      ४. मुलगी कोणासोबत बोलत आहे?
 उत्तर - मुलगी वाऱ्यासोबत बोलत आहे.
_________________________________________
      ५. मुलीने कशाचा झोका केला आहे ?
उत्तर - मुलीने वड पारंबीचा झोका केला आहे.
_________________________________________
     ६. मुलीचे तोंड लाल कशामुळे झाले?
उत्तर - पान साबरीचं बोंड खाल्ल्यामुळे मुलीचे तोंड लाल झाले.
_________________________________________
      ७.ढोल कशाचा वाजत आहे ?
उत्तर - ढोल ढगांचा वाजत आहे.
_________________________________________
       ८.मुलीने कशाचा नाच पाहिला?
 उत्तर - मुलीने मोराचा नाच पाहिला.
_________________________________________
      ९. मुलगी कशामुळे पळाली?
उत्तर - पाऊस आल्यामुळे मुलगी पळाली.
_________________________________________
     १०. रानवेडी या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर - रानवेडी या कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत.

No comments:

Post a Comment