५. एकदा गंमत झाली.
शब्दार्थ
१.गंमत - मजा २. वारा - वायू पवन
३.झाड - वृक्ष ४. गार - थंड
५.डोळे - नेत्र ६. उघडझाप - चालू, बंद
७.दंग - मग्न ८.अलगत - हळुवार
९.शाळा - विद्यालय १०.डोंगर - पर्वत
११.नदी - सरिता १२. बाई - शिक्षिका
१३.लांब - दूर १४. गप्प - शांत
१५.हात - कर,हस्त १६. डावा - वाम
१७.बोट - अंगुली १८. स्तब्ध - शांत
१९.सोपी - सुलभ २०.रेषा - रेघ
२१.प्रवाह - ओघ २२ गाव - खेडे
२३.सुरुवात - आरंभ २४.किंचित - थोडासा
२५असंख्य - मोजता न येणारे, अगणित
२६ओहोळ - लहान ओढा
२७. उगम -उदय २८.शहाणी - हुशार
_________________________________________
जोडाक्षरयुक्त शब्द
वाऱ्याने वाऱ्याच्या फिरवल्यासारखा
डोळ्यांची मज्जा आपल्याला
टाळ्या असंख्य शेंड्यावर
इतक्यात तिच्याकडे आलेल्या
ह्या सगळ्या मधल्या
आपल्या पुस्तक दप्तर
नदीबद्दल एखाद्या होत्या
उद्या गप्प माझ्या
त्या म्हणजे डोंगरातल्या
मिळणाऱ्या ओढयांचं म्हणाल्या
डाव्या हाताच्या पानावरल्या
मधल्या बाजूच्या म्हणूनच
तुम्ही तेव्हा फक्त
स्तब्ध सोप्या शब्दात
कल्पना
______________________________________
प्रश्न.१ एका वाक्यात उत्तरे लिहा
१. मनुली कोठे बसली होती?
उत्तर - मनुली खिडकीत बसलेली होती.
_______________________________________
२. मनुली कशाकडे बघत होती?
उत्तर - मनुली फांदीकडे बघत होती.
_________________________________________
३. मनुली कशाने सुखावली?
उत्तर - मनुली गार गार वाऱ्याच्या झुळकेने सुखावली.
_________________________________________
४. आपल्याला आनंद झाला की आपण काय करतो?
उत्तर - आपल्याला आनंद झाला की आपण दोन्ही हातांनी टाळ्या वाजवतो.
_________________________________________
५. झाड कशाप्रकारे टाळ्या वाजवू लागतात?
उत्तर - झाड असंख्य पानांनी टाळ्या वाजवून लागतात.
_________________________________________
६.खिडकीतून आत काय आले?
उत्तर - पिंपळाची दोन पानं खिडकीतून आत आली.
_________________________________________
७. मनुलीने पिंपळाची पाने कोठे ठेवली?
उत्तर - मनुलीने पिंपळाची पाने आपल्या पुस्तकात ठेवली.
_________________________________________
८. बाईंनी वर्गात कशाबद्दल माहिती सांगितली?
उत्तर - बाईंनी वर्गात नदीबद्दल माहिती सांगितली.
_________________________________________
९. नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते?
उत्तर - छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळाले की नदीचे पाणी आणखी वाढते.
_________________________________________
१०. नदी बद्दलची माहिती सांगण्यासाठीची कल्पना मनुलीला कशी सुचली?
उत्तर - नदीबद्दलची माहिती सांगण्यासाठीची कल्पना मनुलीला पानावरच्या शिरा पाहून सुचली.
_________________________________________
* पाठात आलेले वाक्प्रचार
प्रश्न २.खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा
१.अलगत उचलणे - हळूवार उचलणे
*आमच्या बागेत खेळणाऱ्या सशाच्या पिल्लाला मी अलगत उचलले.
_________________________________________
२. एकटक पाहणे - सतत पाहणे
समीराने काढलेले चित्र सर्वजण एकटक पाहत होते.
_________________________________________
३.सुखावणे - आनंद होणे
* लग्न होऊन सासरी गेलेली मीना आईला पाहताच सुखावून गेली.
_________________________________________
४.स्तब्ध होणे - शांत होणे
* शिक्षक वर्गात येताच गोंधळ करणारी मुले स्तब्ध झाली.
_________________________________________
५.दंग होणे - मग्न होणे
* बाईंनी सांगितलेला उपक्रम करण्यात समीर दंग झाला.
_________________________________________
प्रश्न३.कोण कोणास म्हणाले ते लिहा.
१." उद्या नदीचे चित्र काढून आणा."
उत्तर - बाई विद्यार्थ्यांना म्हणाल्या.
_________________________________________
२." मी गमतीशीर चित्र काढले बाई."
उत्तर - मनुली बाईंना म्हणाली.
_________________________________________
३. "हे तर पान आहे!"
उत्तर - बाई मनुलीला म्हणाल्या.
_________________________________________
४. "मनुली, तू छान कल्पना करतेस."
उत्तर - बाई मनुलीला म्हणाल्या.
_________________________________________
५." खरंच मनुलीने किती सोप्या शब्दात नदीचे चित्र उभ केलं पाहा."
उत्तर - बाई विद्यार्थ्यांना म्हणाल्या.
_________________________________________
प्रश्न ४. पाठात टोकदार शब्द आलेला आहे, त्यासारखे शब्द बनवा.
रुबाब - रुबाबदार
समजूत - समजूतदार
पाणी - पाणीदार
चमक - चमकदार
धार - धारदार
टोक - टोकदार
_________________________________________
प्रश्न ५.रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा
(पुढे पुढे, छोटे छोटे, तरंगत तरंगत, गार गार, उंच-उंच)
१.गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली.
२. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं.
३. पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली.
४. नदी पुढे पुढे जाऊ लागते.
५. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे-छोटे ओहोळ
_________________________________________
प्रश्न ६.पाठात आलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द
*समानार्थी शब्द
वारा = पवन
झाड = वृक्ष
फांदी = डहाळी
अंग = शरीर
गार = थंड
आनंद = हर्ष
मन = चित्त
शेंडा = टोक
प्रथम = पहिले
पुढे = समोर
छान = चांगली
नदी = सरिता
_________________________________________
प्रश्न ७.पाठात आलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द
सरळ × वाकडे
पुढे × मागे
शांत × अशांत
लांब × जवळ
लहान × मोठे
हसली × रडली
सुखावली × दुखावली
मिटणे × उघडणे
सुरुवात × शेवट
उगम × अस्त
डावा × उजवा
No comments:
Post a Comment