शब्दार्थ
प्रश्न १.दोन्ही कविता वाचा खालील शब्दांसाठी गोंडी भाषेतील शब्द लिहा
झाडेच झाडे - मरांगे मरांग
फुलेच फुले - पुंगारे पुंगार
फळेच फळे - कायांगे कायांग
झाडी, जंगल - मरांगना गेळा,
लावूया - उरस्काट
वाढवूया - पिसीहकाट
मिळवूया - पुटीहका
करुया - कियाकाट
इकडे तिकडे - हिक्के, हिक्के
तिकडे - होक्के
_________________________________________
*जोडाक्षर युक्त शब्द
उरस्काट हिक्के
होक्के उरस्तांग
_________________________________________
प्रश्न १. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
१.कवितेतील मुलांना काय करायचे आहे?
उत्तर कवितेतील मुलांना झाडे लावायची आहेत.
________________________________________
२. मुलांना झाडे कुठे लावायचीआहेत?
उत्तर - मुलांना जिकडे तिकडे झाडे लावायची आहेत.
______________________________________
३. मुले काय मिळवणार आहेत?
उत्तर - मुले फळे मिळवणार आहेत.
_______________________________
४. मुले काय वाढवणार आहेत?
उत्तर - मुले झाडे वाढवणार आहेत.
__________________________________
५. या कवितेतून कोणता संदेश मिळतो?
उत्तर - या कवितेतून झाडे लावा हा संदेश मिळतो.
_____________________________________
६. ही कविता कोणत्या भाषेत आहे?
उत्तर - ही कविता गोंडी भाषेत आहे.
____________________________________
प्रश्न २. कवितेत आलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द:
झाड - वृक्ष
फुल - सुमन, पुष्प
जंगल - वन
_______________________________________
प्रश्न ३ फुलांची झाडे व वेली यांची यादी करा
फुलझाड - गुलाब, मोगरा, जास्वंद, कर्दळी, प्राजक्त , झेंडू
वेल - मोगरा, मधुमालती, बोगनवेल, रातराणी, जाई-जुई, कुंदा
No comments:
Post a Comment