७. मुग्धा लिहू लागली
शब्दार्थ
*बक्षीस - पारितोषिक * समारंभ - कार्यक्रम
*आमंत्रण - बोलावणे *लेखक - लेखन करणारा
*छंद - आवड *अबोल - कमी बोलणे
*आठवण - स्मरण * नित्यक्रम - नियमित
*निरीक्षण - अवलोकन * बाग - उद्यान
*कौतुक - प्रशंसा *घुम्या - अबोल
*परिवर्तन - बदल
*साहित्यिक - साहित्य लिहिणारा
*गुंग - रममाण * डायरी - रोजनिशी
*संकल्प - निश्चय * सुरुवात - आरंभ
*सुसंवाद - चांगली चर्चा *मोकळे - स्वैर
*दैनिक - रोज प्रसिद्ध होणारे
*मासिक - दर महिन्याला प्रसिद्ध होणारे
_________________________________________
जोडाक्षर युक्त शब्द
मुग्धा मुग्धाच्या स्पर्धा
झाल्या त्यांच्या म्हणते
अभ्यासात स्पर्धेत पहिल्या
जास्त म्हणाल्या स्वरात
उत्तर तेवढ्यात आपापल्या
खुर्चीत कार्यक्रमाच्या प्रसिद्ध
स्वागत पाहुण्यांची देण्याचा
मिळवणाऱ्या मिळवलेल्या मध्ये
पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या
सांगितल्या म्हणाले स्वतः
पहिल्यापासून लिहिण्याचा ज्या
गोष्टी त्यात झालेल्या
नित्यक्रम निरीक्षणशक्ती स्मरणशक्ती
शब्दसंपत्ती शाळेतल्या कोणाच्याही
खोड्या घडलेल्या चुकवण्यासाठी
उद्भवलेलेे कल्पना लागल्या
प्रोत्साहन झाल्यावर गप्पा
मारल्या घुम्या बोलण्यानं
लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात
आयुष्याला साहित्यिक पाहुण्यांचे
मुग्ध निश्चय पक्के
संकल्प दुसऱ्या रोजच्या
तिच्या अभ्यास सुट्टीच्या
डायरीच्या मनाविरुद्ध त्यामुळे
अर्थ वर्णन परिवर्तन
_________________________________________
प्रश्न १.पाठातील वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग
१.बक्षीस पटकाविणे - पारितोषिक मिळविणे
* संगीता प्रत्येक वर्षी चित्रकलेच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावते.
_________________________________________
२.ओळख करून देणे - परिचय करून देणे
* घरी आलेल्या पाहुण्यांची आईने मला ओळख करून दिली.
_________________________________________
३. पार पडणे - पूर्ण होणे
* कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षा ऑनलाईन पार पडल्या.
_________________________________________
४.छंद असणे - आवड असणे
* गीताला लहानपणापासूनच पुस्तक वाचण्याचा छंद आहे.
_________________________________________
५.प्रसिद्ध होणे - प्रकाशित होणे
* राजूने लिहिलेल्या बालकविता मासिकात प्रसिद्ध झाल्या.
________________________________________
६.मुग्ध होणे - रममाण होणे.
* सविता संगीत मुग्ध होऊन ऐकू लागली.
_________________________________________
७.निश्चय करणे - ठरवणे
* नवीन वर्षापासून नियमित श्लोक पाठ करण्याचा आदित्यने निश्चय केला.
_________________________________________
८.पोट धरून हसणे - खुप हसणे
* सर्कसमध्ये विदूषकाने केलेल्या गमतीजमतीमूळे सर्व मुले पोट धरून हसू लागली.
_________________________________________
प्रश्न २ एका वाक्यात उत्तरे लिहा
१. मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता?
उत्तर - मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता.
_________________________________________
२. मुग्धाच्या शाळेत कोणकोणत्या स्पर्धा झाल्या?
उत्तर - मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या.
_________________________________________
३. मुग्धाचे आई बाबा शाळेत कशासाठी आले होते?
उत्तर - बक्षीससमारंभाच्या कार्यक्रमासाठी मुग्धाचे आई बाबा शाळेत आले होते.
_________________________________________
४. मुग्धाने कोणत्या स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीस पटकावले?
उत्तर - मुग्धाने चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीस पटकावले.
_________________________________________
५. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते?
उत्तर - समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक आले होते.
_________________________________________
६. प्रमुख पाहुण्यांची ओळख कोणी करून दिली?
उत्तर - शाळेतील शिक्षिका जाधव बाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
_________________________________________
७. मुले पोट धरून का हसू लागली?
उत्तर - लेखकांनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या त्या ऐकून सर्व मुले पोट धरून हसू लागली.
_________________________________________
८. लेखकांना लहानपणापासून कशाचा छंद होता?
उत्तर - लेखकांना लहानपणापासून लिहिण्याचा छंद होता.
_________________________________________
९.लेखकाची निरीक्षणशक्ती व स्मरणशक्ती कशामुळे वाढली ?
उत्तर - रोज दिसणाऱ्या विविध गोष्टी निरीक्षण करून लिहून काढल्यामुळे लेखकाचे निरीक्षण शक्ती व स्मरणशक्ती वाढली.
_________________________________________
१०. लेखकांचे लिखाण कोठे प्रसिद्ध होत असे ?
उत्तर - लेखकांचे लिखाण दैनिकात व मासिकात प्रसिद्ध होत असे.
_________________________________________
११. बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते ?
उत्तर - बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात हे एक डायरी (रोजनिशी )दिली होती.
_________________________________________
१२. मुग्धाने मनाशी काय ठरवले?
उत्तर - रोज काहीतरी लिहायचं असे मुग्धाने मनाशी पक्के ठरवले.
_________________________________________
१३.मुग्धाला आपली चूक का कळू लागली?
उत्तर - मनाविरुद्ध झालेली गोष्ट ती कागदावर लिहू लागल्याने मुग्धाला आपली चूक कळू लागली.
_________________________________________
प्रश्न ३ कोण कोणास म्हणाले ते लिहा
१." चित्रकला स्पर्धेत पहिला नंबरचं बक्षीसही पटकावलंय ,पण ती जास्त बोलत नाही ."
उत्तर - बाई मुग्धाच्या आई-बाबांना म्हणाल्या.
_________________________________________
२." मला पहिल्यापासूनच लिहिण्याचा छंद होता."
उत्तर - लेखक भाषणात मुलांना म्हणाले
_________________________________________
३."हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय."
उत्तर - लेखकाचे काका लेखकाला म्हणाले.
_______________________________________
४."आणि मी एक साहित्यिक झालो."
उत्तर - लेखक भाषण मुलांना म्हणाले.
________________________________________
५."काय म्हणते आमची मुग्धा?"
उत्तर - मुग्धाची आई बाईंना म्हणाली.
_________________________________________
प्रश्न ४ कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा
( संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनाशी, गमतीजमती )
१. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या.
२. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं.
३. त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली.
४. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले,नवीन वर्षाचा संकल्प केला.
६.मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली.
________________________________________
प्रश्न ५.खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा
गमती - जमती
बारीक - सारीक
जिकडे - तिकडे
काटे - कूटे
दगड - गोटे
चढ - उतार
पाला - पाचोळा
_________________'_______________________
प्रश्न ६.कंसातील शब्द लावून योग्य शब्द तयार करा
( सु गैर अ )
बोल - अबोल
संवाद - सुसंवाद
हजर - गैरहजर
न्याय - अन्याय
_________________________________________
* समानार्थी शब्द
नित्य = नियमित
अभिनय = हावभाव
छंद = आवड
कल्पना = युक्ती
स्मरण = आठवण
पक्के = ठाम , निश्चित
_________________________________________
* विरुद्धार्थी शब्द
बसला × उठला
देणे × घेणे
सुरुवात × शेवट
स्मरण × विस्मरण
अबोल ×बोलका
कळत × नकळत
विचार × अविचार
माया × द्वेष
चूक × अचूक
________________________________________
No comments:
Post a Comment