८. ते अमर हुतात्मे झाले !
शब्दार्थ
* अमर - ज्याला मरण नाही असा
* हुतात्मा - देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती
* घरदार सोडणे - कुटुंबीयांपासून दूर राहणे
* त्याग करणे - सोडून देणे
* वनवास सोसणे - हाल-अपेष्टा सोसणे
* झगडणे, झुंजणे - संघर्ष करणे, लढणे
* ध्वज - झेंडा
* वंदन - नमन, नमस्कार
* ज्योतीसम - ज्योतीप्रमाणे, दिव्याप्रमाणे
* माता -आई, जननी ( येथे देश)
जोडाक्षर युक्त शब्द
अमर हुतात्मे त्यागिला
ज्योतीसम स्वतंत्र ध्वज
राष्ट्रध्वज
_________________________________________
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा :
१.अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे ?
उत्तर - जे देशासाठी लढले त्यांना अमर हुतात्मे म्हटले आहे.
_________________________________________
२.या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे?
उत्तर - ज्यांनी देशासाठी बलिदान केले, संघर्ष केला त्यांना अमर हुतात्मे म्हटले आहे .
_________________________________________
३.अमर हुतात्मे कोणा प्रमाणे जीवन जगले?
उत्तर - अमर हुतात्मे ज्योतीप्रमाणे जीवन जगले.
_________________________________________
४. हुतात्म्यांनी कशाचा त्याग केला?
उत्तर - हुतात्म्यांनी सुखी संसाराचा त्याग केला.
_________________________________________
५. देशासाठी फासावर कोण चढले?
उत्तर - देशासाठी फासावर अमर हुतात्मे चढले.
_________________________________________
६. जनता कोणासाठी झगडली ?
उत्तर - जनता भारताला स्वतंत्र करण्यासाठी झगडली.
_________________________________________
७ ध्वज कोठे फडफडले?
उत्तर - ध्वज हिमशिखरी फडफडले.
_________________________________________
८. आपण कोणाला वंदन करायला पाहिजे?
उत्तर - आपण राष्ट्रध्वजाला वंदन करायला पाहिजे.
________________________________________
९.आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले?
उत्तर - आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनता ब्रिटिशांशी लढली व त्यांनी ब्रिटिशांशी जवळ जवळ दोनशे वर्ष संघर्ष केला.
_________________________________________
प्रश्न २ कवितेच्या ओळी पूर्ण करा
सोडिले सर्व घरदार
त्यागिला सुखी संसार
तो तुरुंग ते उपवास
सोसला किती वनवास
झगडली झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हा राष्ट्रध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
_________________________________________
समानार्थी शब्द
ध्वज = झेंडा
वंदन =नमन
घर = गृह, सदन
झुंजणे = लढणे
उपवास = उपोषण
माता = आई जननी
_________________________________________
विरुद्धार्थी शब्द
सुखी × दुखी
स्वतंत्र × परतंत्र
जीवन × मृत्यू
अमर × मर्त्य
No comments:
Post a Comment