प्रार्थना
असो तुला देवा माझा
असो तुला देवा माझा सदा नमस्कार
तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार ||धृ ||
तुझ्या कृपेने रे होतील, फुले पत्थराची
तुझ्या कृपेने रे होतील, मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील, सर्प रम्य हार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार ||१||
तुझ्या कृपेने रे होईल, उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल, सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल. पंगु सिंधू पार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार||२||
तुझ्या कृपासिंधू मधला बिंदू जरि मिळेल
तरि प्रभू शतजन्माची मतृष्णा शमेल
तुझा म्हणूनि आलो रामा बघत बघत दार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार ||३||
No comments:
Post a Comment