प्रार्थना
या भारतात बंधुभाव
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे|
दे वरचि असा दे |
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे |
मतभेद नसू दे ||ध्रु||
नांदोत सुखे गरिब अमिर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य - सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे ||१||
सकळास कळो मानवता राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळूनि समुदाय प्रार्थना
उद्योगि तरुण शीलवान येथ दिसू दे
दे वरचि असा दे ||२||
जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी
खलनिंदका मनीहि सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे ||३||
सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गियापरी
ही नष्ट होऊ दे विपत्ती भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे
दे वरचि असा दे ||४||
No comments:
Post a Comment