प्रार्थना
खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे | जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे | जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे | जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे | जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे | जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म | जगाला प्रेम अर्पावे
No comments:
Post a Comment