DAILY EDUCATION

Tuesday, December 7, 2021

प्रार्थना - हीच अमुची प्रार्थना

 प्रार्थना 

हीच अमुची प्रार्थना


हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे 

 माणसाने माणसाशी माणसासम वागणे||ध्रु||


 भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी 

 सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री 

 तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे

 माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||१||

 

 धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे 

 एक निष्ठा, एक आशा एक रंगी रंगू दे 

 अन् पुन्हा पसरी मनावर शुद्धतेचे चांदणे 

 माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||२||

 

  लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले 

  पाऊले चालो पुढे... जे थांबले ते संपले 

  घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे

  माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||३

No comments:

Post a Comment